अग्नी - ५

अगनी - ५ चे आज यशस्वी परिक्षण झाले. त्या परिक्षणाच्यामुळे काहि इतर तंत्रज्ञानाचीही चाचणी झाली. एकूणात भारतीयांना अभिमान वाटावा अशीच ही घटना आहे. सार्‍या भारतीयांचे मनःपूर्वक अभिनंदन!!!
या निमित्ताने वेगवेगळ्या संस्थळांवर विखुरलेली माहिती एकत्र करण्याचा हा प्रयत्न.

अग्नी-५
अग्नी-५

संकलीत माहिती

  • अग्नी ५ हे तीन टप्प्यात डागले जाणारे क्षेपणास्त्र आहे.
  • यात संपूर्णतः स्थायु-इंधन वापरले आहे.
  • या आधीच्या अग्नी क्षेपणास्त्राला दोन टप्प्याचे क्षेपणास्त्र होते. अग्नी-५ ला १५०० किमी जाऊ शकेल असा तिसरा टप्पा वाढवला आहे.
  • आधुनिक रिंग लेझर गायरोस्कोप, अत्याधुनिक अ‍ॅक्सिलरोमिटर इत्यादी प्रगत तंत्रज्ञानांनी हे क्षेपणास्त्र युक्त आहे. त्यामुळे अचूक दिशा व लक्ष्याचा भेद अधिक अचूकतेने घेता येतो.
  • ५००० किमी हा टप्पा संपूर्ण क्षमतेचा आहे. कमी स्फोटके भरून अधिक अंतरावरही मारा करता येऊ शकतो
  • हे क्षेपणास्त्र जमिनीवरून सहज इथून तिथे नेता येऊ शकते. या नवीन कॅनिस्टरमुळे केवळ अग्नी-५ नव्हे तर इतरही क्षेपणास्त्रांना फायदा होणार आहे.
  • या कॅनिस्टरवरून क्षेपणास्त्र वाहून नेता येईलच शिवाय त्याचे प्रक्षेपणही कॅनिस्टरवरूनच केले जाईल. त्यामुळे क्षेपणास्त्र कुठल्याही ठिकाणाहून डागता येऊ शकेल
  • एक अग्नी-५ क्षेपणास्त्र १० बॉम्ब बाहून नेऊ शकतो म्हणजेच एखाद्या विभागातील १० वेगवेगळ्या लक्ष्यांचा अचूक वेध एका अग्नी-५ने घेता येऊ शकेल (MIRV प्रणाली

या निमित्ताने क्षेपणास्त्रातली प्रगती, त्यातील इंधनाच्या वापरातली प्रगती, त्याच्या प्रक्षेपण करायला वापरण्यात आलेल्या 'लाँचर'मधील प्रगती, इतर तांत्रिक प्रगती याचा आढावा चर्चेत कोणी घेतला तर धाग्याचे सार्थक झाल्यासारखे वाटेल.

या शिवाय यामुळे भारताच्या सामरीक क्षमतेत, मानसिकतेत, मनोबलात खरोखर किती फरक पडेल यावरही मते वाचायला आवडतील

चित्रः द हिंदू वृत्तपत्राच्या संस्थळावरून साभार

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

अग्नि-५ या आंतरखंडीय बॅलिस्टीक क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीबद्दल भारतीय शास्त्रज्ञांचे हार्दिक अभिनंदन Smile

या शिवाय यामुळे भारताच्या सामरीक क्षमतेत, मानसिकतेत, मनोबलात खरोखर किती फरक पडेल यावरही मते वाचायला आवडतील

आता याबद्दल थोडे विचार

सामरिक क्षमता:
अग्नि-५ च्या यशस्वी चाचणीमुळे सर्वात मोठे धाबे दणाणणार आहे ते चीनचे. कारण या अस्त्रामुळे चीनची राजधानी थेट भारताच्या अचूक निशाण्यावर आली आहे. सामरिकदॄष्ट्या चीनवर मोठा मानसिक दबाव अग्नि-५ च्या या यशस्वी चाचणीमुळे आला आहे.
अमेरिकेला तंत्रज्ञानात उत्तर

मानसिकता:
भारतीय शास्त्रज्ञांना यापेक्षा अधिक क्षमतेची प्रक्षेपास्त्रे विकसित करण्यासाठी व या क्षेत्रात विविध प्रकारचे प्रयोग व संशोधन करण्यासाठी शास्त्रज्ञांच्या मानसिकतेत बराच बदल घडेल.

मनोबलः
सैन्याच्या मनोधैर्यात वाढ हा बोनस आहेच. पण त्याहीपेक्षा जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना व सैन्यावरचा अगोदरच असलेला विश्वास अजून दॄढ होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावर काहि देशांच्या प्रतिक्रीया यायला सुरवात झालेली आहे
चीनः (अर्थातच) जळफळाट. भारताला यातून काय मिळणार तो असे सामर्थ्य येऊनही आमच्याशी बरोबरई करू शकणार अनाही अशी दर्पोक्तीच्या जवळ जाणारे वक्तव्य.
नाटो: भारताचा अण्वस्त्रप्रसाराचा रेकॉर्ड चांगला असल्याने या क्षेपणास्त्रांचा नाटोला धोका वाटत नाही. भारताच्या तांत्रिक प्रगतीचे कौतुक केले पाहिजे
पाकिस्तानः अधिकृत प्रतिक्रिया नाही! मिडीयामधे धुमशान ;)-

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या प्रोजेक्टवर काम करणार्‍या अभियंत्यांचे, तंत्रज्ञांचे आणि व्यवस्थापकांचे अभिनंदन !

आत्ता सह्याद्री वाहिनीवर याविष्यीची बातमी पाहिली. सरकारी वाहिनीवरून "आता चीनमधील शहरे अग्नीच्या मार्‍याच्या टप्प्यात आली आहेत" अशी माहिती दिली गेल्याचे पाहून आश्चर्य वाटले. इतर माध्यमांतून (लेख, चर्चा वगैरे) हे बोलले जाणे वेगळे आणि सरकारी वाहिनीवरून हे सांगितले जाणे निराळे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सरकारी वाहिनीवरून "आता चीनमधील शहरे अग्नीच्या मार्‍याच्या टप्प्यात आली आहेत" अशी माहिती दिली गेल्याचे पाहून आश्चर्य वाटले. इतर माध्यमांतून (लेख, चर्चा वगैरे) हे बोलले जाणे वेगळे आणि सरकारी वाहिनीवरून हे सांगितले जाणे निराळे.

का? आक्षेप कळला/पटला नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

चीनचे नाव घेऊन सांगणे खटकले. ५००० किमी रेंज आहे वगैरे सांगणे ठीक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

असं सागणं ही सामान्य गोष्ट आहे. क्षेपणास्त्रांच्या बातमीत त्यामुळे मिळणारी स्ट्रेटर्जीक अ‍ॅडव्हांडेज अशा प्रकारे नेहमीच सांगितली जाते. आंतररास्ट्रीय राजकारणात अशा प्रकारच्या पल्ल्यांमुळे त्या त्या देशाचे एक स्थान बनत असते. अमेरीकेच्या विमानवाहु नौकांबद्दल हे ऐकलेच असेल. त्यामुळे अशा महत्त्वाच्या शहरांचे टप्प्यात येणे सांगणे यात वावगं काही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

सरकारी वाहिनीवरून "आता चीनमधील शहरे अग्नीच्या मार्‍याच्या टप्प्यात आली आहेत" अशी माहिती दिली गेल्याचे पाहून आश्चर्य वाटले. इतर माध्यमांतून (लेख, चर्चा वगैरे) हे बोलले जाणे वेगळे आणि सरकारी वाहिनीवरून हे सांगितले जाणे निराळे.

सहमत आहे.

निदान मी पाहिलेल्या काही परदेशी बातम्यांमधे याचा उल्लेख नाही. बीबीसी आणि गार्डीयनने चीनची प्रतिक्रिया छापली आहे. खराब हवेमधे हे क्षेपणास्त्र किती लांब जाऊ शकतं याबद्दल चीन साशंक आहे. शिवाय पश्चिमेचे देश भारताच्या या कारवायांकडे दुर्लक्ष करत आहेत याबद्दल नाराजीही व्यक्त झाली आहे.

चीनने क्षेपणास्त्राच्या रेंजबाबत काढलेल्या शंका कुशंका आहेत का नाहीत याचं उत्तर कधीही न मिळाल्यास उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

क्षेपणास्त्र तंत्रज्ञानात भारताने केलेली प्रगती खरंच कौतुकास्पद आहे. टीमचे अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आता जेम्स बाँड/ मि. इंडीया सारख्या सिनेमात दाखवलेल्या, सार्वभौम देशाला वेठीस धरणार्‍या माथेफिरु शास्त्रज्ञाला / स्मगलर मोगँबोप्रभुतींना भारतापासुन पाचहजार पेक्षा जास्त, चीन पेक्षा दहाहजार, अमेरीका, इंग्लंड देश तसेच या दोन्ही देशांच्या आटलांटीक, पॅसीफीक लष्करी तळापासुन १५ हजार, किलोमीटर दूर अड्डे उभारायला लागणार.

तर ती जागा ओळखा.

Smile

अवांतर- भारत ह्या शब्दाऐवजी अशीच यशस्वी चाचणी इराण, उ. कोरीया, पाकीस्तान या नावाने आली असती तर आपली प्रतिक्रीया काय असती?

वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन्स चा निषेध!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवांतर- भारत ह्या शब्दाऐवजी अशीच यशस्वी चाचणी इराण, उ. कोरीया, पाकीस्तान या नावाने आली असती तर आपली प्रतिक्रीया काय असती?

काल्पनिक उदाहरणः अ आणि ब दोन व्यक्ती आहेत. अ कष्टाळू, प्रगतीशिल आणि नितीमान आहे आणि ब हा खोडकर, लोभी आणि दुसर्‍यांना त्रास देणारा आहे. दोघांपैकी कोणाच्या हातात एखादी महत्त्वाची गोष्ट, जिचा सदुपयोग आणि दुरुपयोग दोन्ही केला जाऊ शकतो, पडणे धोकादायक आहे?

इतिहासाला वगळून, काँटेक्ट्सच्या बाहेर जाऊन पॉलिटिकली करेक्ट राहण्याचा प्रयत्न करणे अनेकदा फक्त अज्ञानाचे प्रदर्शनच ठरू शकते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

अ व्यक्ती चान चान व ब व्यक्ती वाईट वाईट ओके...ब्लॅक एन्ड व्हाईट ओके!
ग्रे शेडचे काय झाले? आउट ऑफ फॅशन?

सत्य, ज्याच्या त्याच्या दृष्टीकोनातले सत्य, जोवर आपल्याला पूरक धोरणे तोवर हुकूमशहाही घट्ट मित्र इ इ ररा यांची लेटेस्ट लेखमाला आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काल्पनिक म्हणल्यावर ग्रे चं काय लोणचं घायालचं का?

कंटेक्श पहा. इकडचा तिकडे अन तिकडचा इकडे संबंध लावून काय उपयोग?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

तर ती जागा ओळखा.

परीघ वाढवा, चंद्रावर जा. तिथे म्हणे पिडाकाकांचा एक प्लॉटही आहे, न दिसणार्‍या बाजूला. तिथपर्यंत मिसल पोहोचायला वेळ लागेल. तिथे पोहोचल्यास समाधीवस्थेत मंगळावर जा. सूर्यमाला कमी पडत असेल तर exoplanets ही शेकड्यांनी आहेत.

अवांतर- भारत ह्या शब्दाऐवजी अशीच यशस्वी चाचणी इराण, उ. कोरीया, पाकीस्तान या नावाने आली असती तर आपली प्रतिक्रीया काय असती?

इराण आणि उत्तर कोरीयाशी भारताचं फॉर्मल भांडण आहे का? आणि पाकीस्तानकडे भारताचा बराचसा भाग टप्प्यात असणारं घोरी आधीपासूनच नाही का? टप्पा वाढला तरी आपल्याला काय फरक पडणार?

एक सुधारणा: अग्नि हे क्षेपणास्त्र असून ते "वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन" वाहून नेऊ शकते.
अवांतरः हे डिस्ट्रक्शन्स (अनेकवचन?) नक्की काय भानगड आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

<< तिथपर्यंत मिसल पोहोचायला वेळ लागेल. >>

तुम्हाला मिसळ म्हणायचं आहे का? मिसळ तिथपर्यंतच काय पण त्याच्या पाव अंतरापर्यंतही पोचू शकणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

हे काय भलतंच?!
मी तर बाबा अभिमान वाटला असेच म्हणतो. मला दुसरे काही वाटले असले तरी ते सांगणार नाही कारण त्याचे कौतुक व्हायला मी काय म.गांधी लागून गेलेलो नाही.

बाकी, लेख माहितीपूर्ण आहे. फक्त तांत्रिक प्रगती हा शब्दप्रयोग खटकला. तंत्रज्ञानाची प्रगती असे म्हणायला हवे होते कारण ही फक्त तंत्रज्ञानाची प्रगती आहे इतर कोणाचीही नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टेक्नोलॉजी = तंत्र तर टेक्निकल = तांत्रिक अश्या अर्थाने वापरले आहे Smile तांत्रिक-मांत्रिक वालं तांत्रिक नव्हे.
असा वाक्प्रयोग चुकीचा आहे का? तांत्रिक माहिती वगैरे शब्दप्रयोग सर्रास वापरात दिसतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

टेक्नोलॉजी = तंत्र तर टेक्निकल = तांत्रिक अश्या अर्थाने वापरले आहे

याउलट तंत्रज्ञान चे इंग्रजीकरण केले (तंत्र+ज्ञान) तर टेक्निकल नॉलेज असा अर्थ होतो Smile
तसेच तंत्रज्ञ असतो तो तांत्रिक+तज्ज्ञ = तंत्रज्ञ असा होतो.

शेवटी तंत्र विकसित झाले असेच आपण म्हणतो.

तेव्हा ऋ चे बरोबर आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तंत्रज्ञान याचा शब्दश: अर्थ टेक्निकल नॉलेज असा निघत असला तरी मराठीत टेक्नॉलॉजीसाठी प्रतिशब्द म्हणून तंत्रज्ञान हाच शब्द वापरला जातो असा माझा समज आहे.

तंत्र = टेक्नॉलॉजी असे नसून तंत्र = टेक्निक असे आहे असे मला वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तंत्र = टेक्निक हे मान्य आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शब्द चूक नाही आहे. त्यातून ध्वनित होणारा अर्थ मला या संदर्भात चुकीचा वाटतो. तांत्रिक प्रगती म्हणजे तंत्राने साधलेली कोणाचीतरी प्रगती असा अर्थ निघतो. इथे मात्र इतर कोणाचीही प्रगती नसून रॅम्पंट वाढत चाललेल्या तंत्रज्ञानाचीच फक्त प्रगती झाली आहे असे मला म्हणायचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतीय संशोधकांनी अभिमानास्पद कामगीरी केली आहे. भले शाब्बास!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही