दशकातील प्रभावशाली घडामोडी

२०१० ते २०२० या कालखंडात घडलेल्या ज्या घडामोडींचा प्रभाव लक्षात राहील असा ठरला त्याबद्दलची चर्चा इथे अपेक्षित आहे. या कालखंडात साहित्यात नव्यानं प्रकाशित झालेलं एखादे पुस्तक जे विशेष दखल घेण्याजोगे आहे त्याबद्दल चर्चा व्हावी. अशीच चर्चा महत्त्वाचे चित्रपट प्रदर्शित झाल्यावर विशेष प्रभावाशाली राहिले त्याबद्दल व्हावी.. नाटके जी गेल्या दहा वर्षात रंगभूमीवर आली आणि त्यांचा महत्त्वाचा प्रभाव राहिला. गेल्या दहा वर्षांत विशेषकरून समाजमाध्यमात गाजलेल्या घटनांचा पण उहापोह आवश्यक आहे. तूर्तास राजकारणातील घटना वर्ज्य करूयात.
काही पथ्ये:
१) चित्रपट, पुस्तक किंवा नाटके जी २०१० ते २०२० या कालावधीत आलेली असावीत. काही दुर्लक्षित असलेली इथे चर्चेसाठी आली तर स्वागतच!
२) घडामोडींचा उल्लेख करताना निगडित थोडक्यात माहिती दिली तर उत्तमच.

हिंदू - भालचंद्र नेमाडे

हिंदू कादंबरी मी वाचलेली गेल्या दहा वर्षांतील महत्वाची कादंबरी. माझे आवडत्या लेखकांपैकी एक भालचंद्र नेमाडे यांची बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित कादंबरी. यावर बरीच टिकाही झाली. कौतुकही झाले. मला या कादंबरीचा विशेष प्रभाव जाणवतो तो एका मोठ्या क्यानव्हॉसवर झालेल्या सामाजिक, सांस्कृतिक उलाढाली खूप अभ्यासून मांडल्या आहेत.

गँग्ज ऑफ वासेपुर

अनुराग कश्यप दिग्दर्शित गँग्ज ऑफ वासेपुर या चित्रपटाचे दोन्ही भाग कमाल आहेत. पन्नास साठ वर्षाचा कालखंड ज्याप्रमाणे दाखवला गेलाय त्याला तोड नाही. अभिनय, पटकथा, दिग्दर्शन, संगीत सगळंच झक्कास जमून आले होते.

समाजमाध्यमात वाढलेले युट्युबर, व्ह्लॉगर

गेल्या पाच सहा वर्षांत युट्युबवर जे प्रमाण वाढलेय "कंटेंट" बद्दल त्याला तोड नाही. कंटेंट कुठलाही असो. पण ज्या प्रकारे एक नवी पिढी व्यावसायिक पद्धतीने लोकांसमोर नवनवीन विषयांवर व्हिडिओज आणतेय त्याला तोड नाही. त्यातले काही चांगले असतात तर काही टुकार. मला असे वाटते की युट्युबवर व्हीडिओ अपलोड करणाऱ्यांची संख्या एकवेळ व्हिडीओ पाहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त होईल भविष्यात.

ओटीटी प्लॅटफॉर्मचा उद्रेक

गेल्या काही वर्षांपासून ओटीटी प्लॅसटफॉर्म वर जो काही कंटेंट येतोय त्यापैकी काही सिरिज किंवा माहितीपट फार विशेष दखल घेण्याजोगे आहेत.

आत्ता लिहिताना वरील घडामोडी मला विशेष वाटल्या म्हणून खरडल्या. विचार करून अजून एखादे दुसरे उल्लेखनीय वगैरे पोस्ट करेन. तूर्तास थांबतो.

field_vote: 
0
No votes yet

ही जिओची कमाल, २०१६ . यावर बरीच चर्चा झाली.
प्रत्येक जण केबल घेईल असं नाही पण १५० रुपयात क्रांती झाली. ओटीटी वगैरे हे त्यामुळेच शक्य झालं. विडिओ पाहणे आणि कॉल्स करणे परवडणे .

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सोशलमेडियाचा भस्मासूर वगैरे बोकाळला याचे एकमेव कारण मोबाईल डेटा स्वस्त होणे हे होय. नंतर रिकामटेकड्या लोकांना हातासरशी हवे ते उद्योग करणे सोपे झाले.
कोंबडीच्या पिसासारखे डोईवरील केस रंगवून खेडोपाड्यातून जिओमुळे टिकटॉक स्टार तयार झाले. त्यामुळे मनोरंजनासाठी बातम्यांनंतर असे व्हिडीओ स्पर्धेत उतरले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा

पुस्तक-सिनेमा आणि इतर माध्यमांवरील घडामोडींबरोबरच ग्लोबल वॉर्मिंग आणि एक्सट्रीम वेदर इव्हेंट्स नी जगाच्या तोंडचं पाणी पळवलं. अमेझॉन जंगल, कॅलिफोर्निया आणि ऑस्ट्रेलियन आगी, पूर, रेकॉर्ड वेगाने वितळत चाललेला ध्रुवीय बर्फ इ. अनेक बेचैन करणाऱ्या गोष्टी घडत आहेत. करोना पुराण तर चालू आहेच. ह्या विषयीची माहिती आंतर जालामुळेच जगभर पोहोचली.
शिवाय डेटा सेफ्टी आणि सरकारी निर्णय विषयी किंतु वाटावा अशा बातम्या आल्या. आधार आणि आरोग्य सेतूचा डेटा ही काही उदाहरणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मोदीजींवर आलेला सिनेमासुद्धा 'गुंडा'सारखा गाजवला जात आहे.

टिकटॉकचा उदय आणि ग्रामीण जनतेलाही आपलं वाटावा असा त्याचा वापर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.