अलीकडे काय पाहिलंत? - ३६

काय पाहिलंत
आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा सुरू केला आहे.

field_vote: 
0
No votes yet

नेटफ्लिक्सवर 'द क्राऊन'चा चौथा सीझन बघितला.

ह्यात दोन धागे आहेत. पहिला धागा मॅगी थॅचर पंतप्रधान होणं, तिच्या सुरुवातीच्या काळात म्हाताऱ्या पुरुषांचा पुर्षटपणा, आर्थिक आघाडीवर ब्रिटनची दाणादाण उडलेली असणं, आयर्लंडचा स्वातंत्र्यसंघर्ष असे भाग येतात. मॅगी थॅचर ११ वर्षांहून अधिक काळ पंतप्रधान होती. तो संपूर्ण काळ आहे. त्याच काळात विंडसरांच्या चार्ल्सनं डायानाशी लग्न केलं; त्यांना दोन मुलं झाली; आणि लग्न मोडकळीला आलं. मालिकेत इतरही काही धागे आहेत.

आधुनिक काळात, लोकशाहीच्या जमान्यात ब्रिटनवर आणि कॉमनवेल्थवर राज्य करायचं असेल तर मत असूनही ते व्यक्त न करण्याची, किंवा अगदी मोजक्या आप्तेष्टांपलीकडे ते व्यक्त न करण्याची पराकाष्ठा करणं, हा राजकारणाचा महत्त्वाचा भाग ठरतो. उठलं की मत व्यक्त केलं अशा हल्लीच्या समाजमाध्यमांच्या काळात तर त्याची आणखी गंमत वाटते. 'द क्राऊन'मध्ये दाखवलेली एलिझाबेथ बिनडोक नाही. त्यामुळे थॅचरशी जेव्हा दक्षिण आफ्रिकन अपार्थेइडबद्दल एलिझाबेथचे मतभेद होतात, तेव्हा ते कसे व्यक्त करायचे; ब्रिटन का कॉमनवेल्थ, ब्रिटन का मानवता, ब्रिटन का समानता असा संघर्ष उभा राहतो तेव्हा नक्की काय करायचं हा संघर्ष रोचक आहे.

तो संघर्ष उलगडताना 'लाख मेले तरी चालतील, लाखांची पोशिंदी जगली पाहिजे' ह्यातलं क्रौर्य समोर येतं. तोच धागा संपूर्ण कुटुंब आणि कौटुंबिक संघर्षांमध्येही महत्त्वाचा आहे. चार्ल्स आणि डायानाचं लग्न का होतं; राणीच्या धाकट्या बहिणीचं काय होतं; त्यांच्या काही मामेबहिणींची दुरवस्था का होते; हे असे प्रश्न त्यात येतात. एरवी संपूर्ण कॉमनवेल्थची राणी बनू बघणारी एलिझाबेथच्या घरातल्या लोकांची दुर्दशा होते, आणि ती त्याबद्दल काय-कसे निर्णय घेते, हा संघर्षही बघण्यासारखा आहे. मालिकेत तो विरोधाभास चांगलाच रंगवलेला आहे.

व्यक्तिशः मला कुठल्याही औपचारिकतेचा आत्यंतिक कंटाळा आहे. त्यामुळे ब्रिटिश राजघराणं, त्यांना असलेलं वलय, वगैरे प्रकारही मला काय-कसे वाटतात, हे निराळं लिहिण्याची आवश्यकता वाटत नाही. पण ते लोक माणसं नसून हे राजघराणं आहे; आणि त्यांच्याबद्दल लोकांना आकर्षण आहे, हे मान्य केल्यावर ही मालिका मला आवडते. ज्यांना राजघराण्याबद्दल आकर्षण वगैरे आहे, त्यांना ही मालिका इतिहास म्हणून बघण्याची आणि राजघराण्याचं गॉसिप बघायची सोय आहेच. माझ्यासारख्यांना, ह्या लोकांना मोठेपण तर हवंय पण ते आपण कोणी विशेष लोक आहोत म्हणून हवंय, असं बघण्याचीही सोय आहे. लब्धप्रतिष्ठित, privileged लोकांची पत नसताना मिळालेल्या प्रतिष्ठेमुळे दुर्दशाही होताना दिसते; माणूस म्हणून त्याबद्दल वाईट वाटतं; पण सरंजामी व्यवस्थेचे दुर्गुणही त्यात स्पष्टच दिसतात.

१. अचानक मराठी शब्द आठवेना.
२. हा इतिहास नाही, त्यामुळे ती खरोखर कशी आहे, हे ह्या संदर्भात महत्त्वाचं नाही.
३. तत्त्व‌तः ती पोशिंदी ‌असली तरी प्रत्यक्षात ती पोशिंदी नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

१. अचानक मराठी शब्द आठवेना.

राष्ट्रकुल.

३. तत्त्व‌तः ती पोशिंदी ‌असली तरी प्रत्यक्षात ती पोशिंदी नाही.

उलट, तिलाच लाखजण पोसून असावेत, अशी समजूत आहे. (चूभूद्याघ्या.)

मलाही आवडली क्राउन. सध्या दुसऱ्या सीझनवर कोठेतरी कंटाळा आल्याने पॉज केलेली आहे. पण पुन्हा पुढे बघायची आहे. चर्चिल (यात) असतानाचा ड्रामा होता त्यापुढे हॅरॉल्ड मॅकमिलन चा भाग सपक वाटू लागला व नेफिवर इतर सिरीज व पिक्चर्स खुणावू लागले Smile

जागतिक राजकारणात फारसा भाव न उरलेल्या काळात ब्रिटनच्या राजघराण्यासंबंधी घटना इतक्या उत्कंठावर्धक असतील, तर जेव्हा ब्रिटिश साम्राज्य शिखरावर होते तेव्हाच्या घडामोडी किती नाट्यमय व जगावर परिणाम करणाऱ्या असतील!

गेम ऑफ थ्रोन्स मधले लोक इथेही डोकावून जात आहेत Smile परवाच "स्टॅनिस" दिसला, चर्चिलचे चित्र काढताना. मोठ्या हुद्द्यावरून निवृत्त झाल्यावर एखाद्या बड्या व्यक्तीने छोटे मोठे अकाउण्टिंगचे काम करावे तसे वाटले ते पाहून Smile

मॅकमिलनची टिंगल करण्याचा एक भाग त्यात आहे. त्यात ब्रिटिश विनोदाचा अर्क आहे. शिवाय पंतप्रधानांची यथेच्छ टिंगल करायचे, ते विनोद चांगले असतील तर हसायचे दिवस किती ठिकाणी राहिल्येत कोण जाणे! किमान जुन्या काळात हे होत असे, हे स्मरणरंजन करता येण्यासारखं आहे.

मी 'गेम ऑफ थ्रोन्स' बघितलेलं नाही; त्यामुळे मला तशा काही आठवणी झाल्या नाहीत. मात्र पहिल्या दोन सीझन्समध्ये एलिझाबेथचं काम करणाऱ्या क्लेअर फॉयला तिच्या नवऱ्याचं काम करणाऱ्यापेक्षा चिकार कमी पैसे मिळाल्याची बातमी वाचली होती. पुर्षट जग अजूनही पुर्षटच आहे!!

अवांतर - जगात दोनच स्त्रिया असतील ज्यांच्या मुलांची आडनावं त्यांच्या घराला साजेशी झाली. एलिझाबेथ विंडसर आणि इंदिरा गांधी. हे 'द क्राऊन' बघतानाच लक्षात आलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Hillbilly Elegy - नेटफ्लिक्स वर पाहिला. या चित्रपटावर टीकात्मक लेख आलेले आहेत. मी मूळ पुस्तक वाचलेले नाही. रॉन हॉवर्ड या दिग्दर्शकाचा असल्याने उत्सुकता होतीच (ए ब्युटिफुल माइन्ड, सिण्डरेला मॅन, द विंची कोड वगैरे).

पण मला पिक्चर आवडला. रात्री उशीरा सुरू करून सुद्धा पूर्ण एंगेजिंग होता. नक्कीच रेकमेण्ड करेन.

अनेकदा असे होते की एखाद्या ठिकाणच्या व्यक्तींचे कॅरिकेचर केले जाते. त्या समाजाबद्दल, त्या लोकांबद्दल वरवर ऐकलेल्यांना ते आवडते कारण त्यांच्या डोक्यातील ढोबळ कल्पनांसारखेच ते असते. पण जे त्या समाजाचा भाग होते/आहेत त्यांना ते उथळ चित्रण वाटते. या चित्रपटाबद्दल तसेच झालेले दिसते.

हा चित्रपट "ट्रम्प कंट्री" तील लोकांचे योग्य चित्रण करतो की नाही वगैरे वाद बाजूला ठेवू. पण एकूण बाहेरील जगाशी फटकून असलेले, आर्थिक तंगी, अशिक्षितपणा, वाईट सवयी, व्यसने व एकूणच शिक्षणाबद्दल अनास्था असलेल्या कुटुंबांमधून जी मुले पुढे येउ पाहतात त्यांना यशस्वी होण्याकरता जी आव्हाने अगदी पदोपदी पेलावी लागतात त्याचे यात खूप चांगले चित्रण आहे. हे चित्रण "हिल्बिलीज" चे असू शकते, एखाद्या आफ्रिकन अमेरिकन कम्युनिटीज मधले असू शकते, किंवा भारतातील गावाबाहेरील वस्तीतील असू शकते. आणि "चांगले चित्रण' आहे कारण त्याच कम्युनिटीमधल्या, त्याच कुटुंबातील लोकांनी ते व्हिशस सर्कल तोडायचा प्रयत्न केलेला इथे दिसतो. यातील मुख्य कॅरेक्टर जे डी व्हान्स "जेडी" हा माझ्या दृष्टीने यातला हीरो नाही. त्याची आजी, आई आणि बहीण हे आहेत. जरूर पाहा.

असेल तर सीजन कोणता?

माऊंटबॅटन च्या हत्तेबद्दल विशेष अभ्यासून सिरिज केली असे ऐकून होतो.

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

त्यात फार काही अभ्यास केलाय, असं मलातरी वाटलं नाही. त्यानंतर फिलिप आणि चार्ल्सची टिंगल करायची संधी सोडलेली नाही. दाखवलेलं किती खरं किती खोटं, कोण जाणे!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कधी कधी ब्रिटिश राजघराणी मला उगाचच हायली डेकोरेटेड आणि प्रमोटेड केल्यासारखी वाटतात.

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

मग मजाच येईल मालिका बघताना! Biggrin

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी एकदा क्राऊनच्या पहिल्या सीझनचा पहिला भाग पाहण्याचा प्रयत्न केला होता. ब्रिटिशांना दृश्यकला हे माध्यम कधी झेपलंच नाही; ते फार तर शेक्सपीअरच्या नाट्यपरंपरेत कसलेल्या अभिनेत्यांना संवादबंबाळ पटकथेत कोंबून गोष्ट सांगतात, एवढंच त्यातून (पुन्हा एकदा) अधोरेखित झालं. त्यामुळे मालिका पुढे पाहण्याचा उत्साह उत्पन्न झाला नाही. राजघराण्यातल्या गेमा पाहायला आवडत असतील तर 'वूल्फ हॉल' ही मालिका सुचवेन. किमान दृश्य पातळीवर अधिक बरी असावी. मूळ कादंबऱ्या दोनदा बुकर पुरस्कार मिळालेल्या डांबरट हिलरी मँटेलच्या आहेत हे एक आणखी गाजर.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

त्यापेक्षा सर्वसामान्य लोकांचे गेम अधिक रंजक वाटतात.

माझा रस आहे तो राजघराणं सध्याच्या काळाशी किती सुसंगत आहे, वा नाही, ह्याबद्दल मालिकाकर्त्यांचं काय मत आहे, हा. शिवाय गेला आठवडाभर डायानाचा भाऊ "हा इतिहास नाही", म्हणत डायानाची मानहानी केल्याच्या थाटात बोलतोय. उलट मला तर तो राजघराण्याची खफामर्जी होऊ नये, म्हणून प्रयत्न करतोय असं वाटलं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

एमिली इन पॅरीस बघितली. अमेरिकी लोक, संस्कृती ह्यांची टिंगल करायची असेल तर जरूर पाहा. स्वतःला आत्यंतिक सिरियसली घेणं, सगळं गोडगुलाबी असतं असं समजणं, पॉप कल्चर तयार झालं तरी त्यातली गंमत न समजणं, एक टोकन काळा माणूस, एक टोकन ट्रान्स मनुष्य ... काय नाही ह्या मालिकेत!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

The Impossible - नेटफ्लिक्स. फुल रेको. जरूर पाहा. जबरी आहे. २००४ साली ख्रिसमस च्या सुट्टीत थायलंडला गेलेल्या व सुनामी मधे सापडलेल्या कुटुंबाची कथा आहे. पिक्चर चांगलाच आहे, पण किमान "लुकास" चे काम केलेल्या मुलाच्या कामाकरता बघावा इतके चांगले काम आहे.

याबद्दल आणखी कुतूहल निर्माण झाल्याने सर्च केले. ती माहिती आत्ता इथे देत नाही. आधी पिक्चर बघा आणि मग शोधा.

Few Days back saw a 4 part documentary called Daughters of destiny on Netflix. It is about a boarding school for disadvantaged children in Karnatak. I liked it. Do watch it and give your opinion. Thanks.

बा भ बोरकर मुलाखत आणि कविता
युट्युब सह्याद्री

YouTube Search : pratibha ani pratima

एचबीओ मॅक्स वर "बाँम्बशेल" पाहिला. फॉक्स नेटवर्क मधे रॉजल एल्स विरोधात त्यातीलच वार्ताहर ग्रेचेन व मेगन केली यांनी आरोप केले त्याबद्दल व त्याच्या पार्श्वभूमीबद्दल आहे. चांगला आहे.

https://www.youtube.com/user/everyframeapainting हा चॅनेल सध्या फॉलो करतोय.
२८च विडिओ आहेत पण जबर वाटले.
काही काही तर पुन्हा पुन्हा पहिले (कुरोसावा आणि हालचाली)
सिनेमातल्या काही खुब्या/ दृश्य ह्यांचा उहापोह आवडला.

Every frame a painting म्हंटलं की त्याची ही दोन भावंडं पाहावीच

Nerdwriter1
The royal ocean film सोसायटी academy

धन्यवाद! बघतोच.

आश्चर्य वाटेल पण हा जुना चित्रपट अनेक वर्षांनंतर पुन्हा पहाताना असं जाणवलं की , जेंव्हा तो पाहिला होता तेंव्हा अनेक प्रसंग काटछाट करुन दाखवला असावा. पूर्ण २ तास ५३ मिनिटांचा नक्कीच नव्हता. आणि हे फक्त याच चित्रपटाच्या बाबतीत नव्हे तर जुन्या गाजलेल्या अनेक इंग्रजी चित्रपटांच्या बाबतीत लक्षांत आले आहे.
लहानपणापासून इंग्रजी संवाद समजणाऱ्या जाणत्यांचा काय अनुभव?

इथे अजुनि टेनेट पाहिलेल्यांनी स्तुतीचे बेसनलाडू, निषेधाच्या चकल्या टाकलेल्या दिसत नाहीत.

डुबोया मुझको होने ने
न मै होता तो क्या होता

कुठे पाहता येईल टेनेट?

कुठे पाहता येईल टेनेट?

भारतात ज्या शहरांत आता मल्टिप्लेक्स चालू झाले आहेत तिथे टेनेट रीतसर प्रदर्शित झाला आहे. (उदा. पुणे) अर्थात, एरवीही चित्रपट घरी आणि फुकटात पाहण्याचे जे नेहमीचे मार्ग असतात त्या मार्गांनीही तो पाहता येईलच. Wink

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ऐया! खऱ्या खऱ्या थेटरात पाहावा लागतो?
भलतंच!

'अय्या' लिहिण्याची नवीन पद्धत रोचक आहे.

तुम्ही बघितलात का टेनेट? मी तो 'इंटरस्टेलर' मोठ्या हौसेनं बघायला गेले होते; स्थानिक पोरगा मॅथ्यू मकॉनहे आहे म्हणून. कसलं काय! पिच्चर टुकार, गोष्ट भोंगळ, पुरेसा पोलिटिकली करेक्टपणा नाही आणि सगळ्यात वैताग, मकॉनहेचा शर्टसुद्धा उतरवलेला नाही! कशाला वाया घालवले मी माझे दीड-दोन तास!!

नोलनचा सिनेमा बघण्याची रिस्क ह्यापुढे मी घेणार नाही. कुणी बऱ्या बॉडीच्या पुरुषानं कपडे उतरवलेले असतील तर तेवढ्या क्लिपा यूट्यूबवरून दाखवा म्हणजे झालं!!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मी इंटरस्टेलर आणि डंकर्क दोन्ही आमच्या लग्नाच्या सप्तपदींमध्ये दिलेल्या वचनांसाठी पाहिले.
पण नवऱ्याला नोलानचे सिनेमे का आवडतात हे मला अजून कळलेले नाही.

'द डरेल्स' नावाची मालिका ॲमेझॉन प्राईमवर बघत्ये. गेल्या शतकात, दोन महायुद्धांच्या मध्ये घडलेल्या गोष्टी.

श्रीमती डरेल आपल्या चार मुलांना घेऊन इंग्लंडमधून ग्रीसच्या कोर्फू बेटावर राहायला जाते. तिथे मालिका सुरू होते. ग्रीकांचा समज असतो की ब्रिटिश लोक धनाढ्य, हेकेखोर, हुकूम गाजवणारे वगैरे असतात. हे डरेल लोक तसले काहीही नसतात. ते सतत दारिद्र्याच्या उंबरठ्यावर असतात. कोर्फू स्वस्त आणि तिथे इंग्लंडपेक्षा जास्त सूर्यप्रकाश मिळेल म्हणून तिकडे जातात.

श्रीयुत डरेल मेल्याला काही वर्षं झालेली असतात. श्रीमती लुईझा डरेल हा धक्का अजूनही पुरेसा पचवू शकलेली नाही. तिच्या साथीला अधूनमधून जादुई पेय असतं. मोठा मुलगा, लॅरी डरेल कोर्फूमध्ये हे लोक जातात तेव्हा सज्ञान असतो; तो लेखक असतो. त्याच्या काही कादंबऱ्या कोर्फूत गेल्यानंतर इंग्लंडमध्ये (खरोखरही) प्रकाशित झाल्या. हा कुटुंबातला सगळ्यात उदारमतवादी इसम. दुसरा मुलगा लेझली; तोही जवळजवळ सज्ञान आहे, पण अत्यंत निरागस आहे. त्याचा हातात कायमच बंदुका असतात. लॅरीला लेखक म्हणून पुरेशी मान्यता नाही; कोर्फूतले लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचत वगैरे नाहीत; म्हणून त्याला आपण सडत असल्याची खंत आहे. त्याचं असमाधान अधूनमधून लेझलीवर निघतं. तरीही लेझलीचा निरागस-नितळ स्वभाव दिसत राहतो.

द डरेल्स इन कोर्फू

तीन नंबरची मार्गो वयात(!) येत्ये; तिला बॉयफ्रेंड हवा आहे; आणि आता टॅन झालेला, एक्झॉटिक दिसणारा बॉयफ्रेंड हवा आहे. तिच्याबद्दल फार काही निराळं दिसत नाही - मूळ पुस्तक तिच्या भावानं लिहिलेलं असावं. (समवयस्क मुलींबद्दल काय लिहावं हे मुलग्यांना समजत नाही. आईबद्दल मात्र तो भरभरून लिहितो.) चौथा, धाकटा जेरी अत्यंत निराळा इसम आहे. तो प्रत्यक्षात पुढे प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ झाला; त्याच्या प्रयत्नांमधून प्राणीसंग्रहालयाचे यमनियम चांगल्यासाठी बदलले, वगैरे. तो लहानपणी तासन्‌तास प्राणी, पक्षी, कीटकांचं निरीक्षण करत बसतो.

आईला ब्रिटिश सरकारचं, विधवा म्हणून मिळणारं पेन्शन आहे. (वडील ब्रिटिश राजमधले कुणी मध्यम दर्जाचे अधिकारी असावेत; तसे थेट उल्लेख मालिकेत येत नाहीत.) त्यावरच बरीचशी गुजराण कशीबशी चालते. आई उद्यमशील आहे. चारही मुलं आपापल्या परीनं मजेशीर आहेत. ते कधी पैसे कमावतात, कधी नाहीत. त्यांची पैशांच्या दृष्टीनं फार भरभराट होत नाही. अर्थातच, ही ब्रिटिश मालिका आहे, अमेरिकी डिस्नीपणा नाही! लॅरी डरेल्सच्या कादंबऱ्या प्रसिद्ध झाल्या तरी त्याला फार कुणी हिंग लावून विचारत नाहीत. त्याला कधी मिळाले तर पैसे मिळतात. लेझली आणि मार्गोला कधी नोकऱ्या असतात, कधी नसतात. मालिकाभर जेरी लहान मुलगाच आहे; पण त्याच्या प्राणीसंग्रहालयात, प्राण्यांच्या निरीक्षणात अजिबात खंड पडत नाही.

त्यांच्या घरी काम करणारी लुग्रात्झिया, कुटुंबाचा टॅक्सीड्रायव्हर मित्र स्पिरो, आणि जेरीचा ज्येष्ठ मित्र थिओ ही ग्रीक मंडळी आपला ग्रीक तऱ्हेवाईकपणा त्यात वाढवतात. लुग्रात्झियाचं लेझलीवर प्रेम कारण त्यानं एकट्यानंच ग्रीक शिकण्यासाठी जरा प्रयत्न सुरुवातीला केलेले असतात. स्पिरो प्रथमदर्शनीच लुईझाच्या प्रेमात पडलेला असतो. थिओचं सगळं आयुष्य कामाला वाहिलेलं असतं आणि प्राणीप्रेमामुळे तो जेरीचा सगळ्यात जवळचा मित्र होतो.

एकंदर सुंदर, ब्रिटिश खेड्यांसारखी मालिका आहे. कोर्फू सुंदर आहे, पण फार पैसा नाही. माणसं आपापल्या पद्धतीनं तऱ्हेवाईक आहेत. तरीही माणसांमाणसांतले संबंध, एकमेकांना सांभाळून घेणं, आपसांत भांडणं आणि आपण ब्रिटिश बाकीच्या युरोपीय लोकांपेक्षा वेगळे असलो तरी युरोपीयच आहोत, हे दोन्ही अधूनमधून येत राहतं.

मजेशीर आहे मालिका. गेल्या शतकातला निरागसपणा बघावासा वाटतो. शिवाय चकाचक अमेरिकी जाणिवांचा कंटाळाही येतो. त्यावर हा उतारा उत्तम आहे.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वा वा हे बघायलाच पाहिजे.
यातला जेरी बहुधा जेराल्ड डरेल असणार. बाकी सगळं जुळतय.
त्याचे किमान एक पुस्तक जरूर वाचा Bafut Beagles.
ऐसीवरच चर्चा झाली होती त्यावर.

मालिका नर्मविनोदी आहे. जरूर बघा.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डरेल्स इन कोरफू अतिशय आवडती मालिका. दोनदा बघून झाली. जेराल्ड डरेल्सच्या My Family and Other Animals ह्या पुस्तकावर आधारित आहे. पुस्तक पण धमाल आहे. चारही डरेल्स मुलांचा जन्म भारतातला, मि. डरेल्स ब्रिटीश सैन्यात होते.

-ताराबाई
टिप टिप चांदणी

"मालिकेहून रसग्रहण उत्कट"
मस्त लिहिलय तुम्ही ! वाचूनच बघायची इच्छा झाली. "तारे"वर आल्यावर बघण्यात येईल.

राव हिकडं दिसना ही मालिका

भारतात लवकरच दिसावी अशी आशा करू.

आजच एक भाग बघितला. त्यात हेन्री मिलर आणि त्याच्या एका कादंबरीचं नाव ऐकून संदर्भ लागला.

'साईनफेल्ड'मध्ये जॉर्जकडे एक लायब्ररीचं पुस्तक असतं, 'द ट्रॉपिक ऑफ कॅन्सर'. ते हरवतं; आणि मग अनेक वर्षांनंतर पुस्तकाचा शोध घेताना जेरीला त्याबद्दल मोठा दंड भरावा लागतो, वगैरे घटना एका भागात घडतात. त्या चावट कादंबरीचा लेखक असतो हेन्री मिलर.

त्याची लॅरी डरेलशी ओळख असते; म्हणून तो ह्या डरेल लोकांकडे राहायला कोर्फूमध्ये येतो; तो तिथे सगळे कपडे काढून समुद्रस्नान वगैरे करतो आणि लोक बऱ्यापैकी स्कँडलाईज होतात, असा काहीसा भाग आहे. त्यात त्या कादंबरीच्या नावाचाही उल्लेख आहे. मग त्या 'साईनफेल्ड'ची आठवण येऊन आणखी गंमत वाटली.

त्या भागात समलैंगिकता आणि त्या संबंधित गंमत घडते. एकीकडे उद्यमशील स्वेनला समलैंगिकतेबद्दल हे लोक अटक करतात; आणि गुन्हा काय तर public indecency. आणि दुसरीकडे हा हेन्री मिलर हा संपूर्ण नग्नावस्थेत डरेल लोकांच्या घराच्या आवारात बागडत असतो.

इथले प्रतिसाद वाचून भागाच्या सुरुवातीची नावं वगैरे वाचली. जेराल्ड डरलचं नाव मूळ लेखक म्हणून तिथे आहे. बऱ्या अर्ध्याबरोबर स्ट्रिमींगवर मालिका बघताना सुरुवातीचं गाणं, श्रेय वगैरे वाचायची काही सोय नसते!

--

अवांतर - लुईझा डरलचं काम करणाऱ्या अभिनेत्रीला कुठे तरी बघितल्यासारखं वाटत होतं. म्हणून बघितलं तर तिनं 'बॉडीगार्ड' नावाच्या ब्रिटिश मालिकेत काम केलंय. त्यात ती हुजूर पक्षाची, स्नॉबिश, मंत्री दाखवली आहे. मेकप, कपडे वगैरे झालेच; तिची देहबोली, बोलण्याची पद्धत पूर्णतया निराळी आहे. 'द डरेल्स'मध्ये ती प्रेमळ आईच दिसते. तीच गोष्ट लॅरी डरेलचं काम करणाऱ्या अभिनेत्याची. त्याचे कान बघून चार्ल्स आठवतो; पण दोन्ही भूमिकांमधली त्याची देहबोली, बोलण्याची ढब, उच्चार, सगळं साफ निराळं आहे. कुठल्याही मालिकेत हे लोक अस्थानी वाटत नाहीत.

शाहरूख खान सगळीकडे शाहरूख खानच असतो!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

डरेल्स इन कोर्फ्यु  हे माझे फार आवडते पुस्तक आहे. त्याचा फार थोडा भाग मालिकेत आहे. पण तरीही मालिका चांगली आहे. पण मूळ पुस्तक वाचाच. भन्नाट आहे. 

या पुस्तकाचा डरेल?

काल हेलन नावाचा मल्याळम सिनेमा पाहिला.
प्लॉट कसा छान जमवून आणायचा याचं मस्त उदाहरण आहे हा सिनेमा.
आणि तो जमावत असताना पहिला हाफ बोरिंग आहे वगैरे काहीही वाटत नाही.

हेलन हा मल्याळम चित्रपट पाहिला. नुसत्या कथेने प्रभावित झालो नाही तर त्यातील दिग्दर्शनाच्या कौशल्याबद्दल बरंच काही बोलण्यासारखं आहे. अनावधानाने होणाऱ्या चुका, मनुष्यस्वभाव आणि माणसातला ओव्हरऑल चांगुलपणा याच्या बारीक बारीक छटा दिग्दर्शकाने फार सुरेख दाखवल्या आहेत. प्राईमवर उपलब्ध आहे असे कळते.

Crown che pahile 2 season aani tyachi cast badalalyamule flow tutla. Princess Margaret cha role Vanessa Kurby nech kela pahije. Atta hi Padmini Kolhapure kuthun aali dev jane.

AK prime var aahe. timepass aahe. Picky blinders Netflix var just chalu kelay..

मीही 'क्राउन' बघितली. 'द डरेल्स' त्याआधीच आल्ये, पण मी बघितली नव्हती. त्यातला मोठा मुलगा लॅरी डरेल बघून मी ह्याच क्रमात बोलले, "ह्याचे कान बघून बिनडोक चार्ल्स आठवला.... त्यानंच तर 'द क्राऊन'मध्ये चार्ल्सचं काम केलंय!"

काल त्या अभिनेत्याची मुलाखत वाचली. तरुण मार्गारेटचं काम करणारी व्हनेसा कर्बी आणि तो (जॉश ओ'कॉनर) एका वयाचे(, आणि मैत्र) आहेत. ती व्हनेसा कर्बी तिशीच्या चार्ल्सची मावशी कशी शोभेल?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

क्राऊनमधला चार्ल्स अजित आगरकरसारखा दिसतो.

आयुष्यात कधीही अजित आगरकर 'द क्राऊन'मधल्या चार्ल्सएवढा गोंधळलेला आणि हरवलेला वगैरे नसेल. कुणीही सर्वसामान्य आणि अर्धं डोकं असणारा माणूस एवढा गोंधळलेला नसेल. त्याचं काम कधी सुरू होईल - त्याची आई गेल्यावर.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

द क्राउन चा जॅकी केनेडीवाला एपिसोड एकदम एंगेजिंग आहे.
दुसरा सीझन आठवा की सातवा एपिसोड बहुधा.

पण राहून राहून असे वाटते की अशी सिरीज जर विक्टोरियन कालाबद्दल कोणी बनवली किंवा अगदी पाचव्या जॉर्जच्या, तर ती किती जबरी असेल. तेव्हा ते सूर्य न मावळण्याचे वगैरे दिवस होते, तेव्हाच्या कालावधीबद्दल. (म्हणजे पुलं व मित्रांनी "माँजिनी" मधे फोर कप्स ऑफ टी ॲण्ड बिस्कुट्स मागवले तो काळ असावा)

'गुडबाय २०२०' नावाची मॉक्यूमेंटरी नेटफ्लिक्सवर आल्ये. 'ब्लॅक मिरर'वाल्या लोकांनी बनवली आहे. अत्यंत वाह्यात आणि स्क्रू ढिला असलेल्या लोकांनी लिहिलेली आहे. सॅम्युअल जॅक्ससन, ह्यू ग्रांट, लेझली जोन्स, लिझा कुड्रो, इत्यादी लोक त्यात आहेत. पात्रनिवडही अगदी रास्त आहे. जरूर बघा.

आता या मॉक्यूमेंटरीचं नाव बदलून 'डेथ टू २०२०' केल्याचं दिसलं. ते मला आवडलं नाही; फारच मेलोड्रामाटिक आहे.

गुडबाय २०२०

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पाहिला. आवडला. Smile

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

संप्रदायाच्या मंडळीमध्ये या आमच्या गुरुभगिनी हे आमचे गुरुबंधु असा एक शब्द वापरला जातो.
आमचे प्रिय महागुरु श्री सचिन पिळ्ळ्ळ्ळगावकर यांच्च्या गुरुभगिनींचे काल दर्शन झाले त्या महा नसल्याने आम्ही गुरुभगिनी हा शब्द वापरला हे चाणाक्श वाचकांनी ओळखले च असेल. तसेच या गुरुभगिनी अगदी उघड उघड सचिनजी सारख्या मीमी करत नाहीत फार च साटल्यमय फारच तरलतेने हे मीमीपण अवतरत ते तस बघण हे डोळ्याचे काय ते फिटण्यासारख आणि कानाच जे काय असत ते तस ल भार्री आहे. तरी महा हे विशेषण त्यांना अजुन देउ शकत नाही म्हणुन सध्या गुरुभगिनी म्हण्युयात्
तर सादर आहे सौ. निशिगंधा वाड या आमच्या गुरुभगिनींच हे प्रवचन
हरीओम्
यातील मुलाखतकर्य्ता ताईंचा भक्तीभाव ही आवर्जुन बघण्या सारखा आहे. भक्तीच्या अतिरेकात एक दोनदा शब्दही आता फुटत नाही की काय इतपर्यंत मॅटर सिरेइयस झालेले होते एकवेळ तर अशी आली की त्या पडता की काय आता असे ही वाटुन गेले. शिवाय गुरुभगिनी प्रात:दवणीय आहेत हे ही चाणाक्शांच्या लक्शात येइल च येइल्
कृपया "अक्षराला" हसु नये
कळावे लोभ असावा
सिनिकांचा धिक्कार असो
https://www.youtube.com/watch?v=78ARcbUhSes

आवर्जून पाहिली मुलाखत - अर्थात तुकडया-तुकड्यात.
स्वत:ला फारच सिरिअसली घेणाऱ्या लोकांत आता निशिगंधा वाड ह्यांचा आदराने उल्लेख होईल.

शिवाय त्या सुभाषितं वगैरे छान "बोलतात". किंबहुना सलग मराठीत कुणीतरी एवढा वेळ बोलतंय हे ऐकूनच बऱ्याच जणांना गहिवर आला असावा.

यातील मुलाखतकर्य्ता ताईंचा भक्तीभाव ही आवर्जुन बघण्या सारखा आहे.

खरंच. ह्याचे GIFs करून ठेवायला पाहिजेत.

'द हेटर' नावाची पोलिश फिल्म नेटफ्लिक्सवर पाहिली. सोशल मीडिआचा वापर करून निवडणुका किंवा इतर बाबतींत जनमत बदलण्याचे प्रयोग कसा केला जातो हे 'ग्रेट हॅक'सारख्या डॉक्युमेंटरीत दिसतं. इथे त्याचा संबंध पोलंडमधल्या वाढत्या राष्ट्रवादाशी आणि असहिष्णुतेशी लावत एक थरारक गोष्ट सांगितली आहे. गर्भपातावर निर्बंध आणणारा कायदा वगैरे बातम्यांतून पोलंडमधल्या सध्याच्या वातावरणाचा अंदाज येऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर ही फिल्म रोचक वाटली. (याच दिग्दर्शकाच्या आधीच्या फिल्मला ऑस्कर नामांकन होतं. तीही मिळाल्यास पाहा.)

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'पनामा पेपर्स' घोटाळ्यावर आधारित स्टीव्हन सॉडरबर्गची 'लॉन्ड्रोमॅट' पाहिली (नेटफ्लिक्स). मोसॅक-फोन्सेका आणि पनामा पेपर्स घोटाळा ह्यांची हलकटपणे आणि हसतखेळत करून दिलेली ओळख म्हणून पाहायला चांगली आहे, शिवाय मेरिल स्ट्रीप, आंतोनियो बांदेरास आणि गॅरी ओल्डमन ज्यांना आवडतात त्यांच्यासाठी तोही एक बोनस.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

यु ट्युबवर मुजी या गुरुंच्या गायडेड मेडीटेशनचा व्हिडियो बघितला. म्हणजे ते ध्यान स्वत: करुन बघितले आणि महीनाभर झाले करतोय. फार सुंदर अनुभव आला. सर्वसाधारणपणे ध्यान म्हणजे तुमच्या खऱ्या " स्व" मध्ये स्थित होणे त्याचा अनुभव घेणे अशी व्याख्या केली जाते. यात अजुनही पैलु असतील ते माहीत नाही. पण जितके समजले त्याप्रमाणे ध्यानात तुम्ही तुमच्या मनाच्या विकारांपलीकडे कंपनांपलीकडी जात जे अकंप स्थिर आहे असे जे स्व तुमच्या आत आहे गाभा आहे त्याचा अनुभव घेणे याला महत्व दिले जाते. पण ते कसे करावे नेमके ? तो अनुभव घ्यावा कसा येइल कसा ?
तर त्याविषयी कमीच प्रॅक्टीकल आणि थेअरीच खुप असते.
मुजी चा हा व्हिडीयो हे ध्यान केल्यावर मात्र याची एक झलक जरुर मिळाली असे वाटते.
जमल्यास एकदा प्रयोग जरुर करुन पहावा
फक्त एक शांत जागा, चांगले हेडफोन्स लावुन शांत डोळे मिटुन बसुन मुजींच्या सुचनांना केवळ प्रामाणिक प्रतिसाद देत राहीले की बस इतकेच करायचे
मला एक सुंदर शांतता आनंद न वर्णन करता येइल असा आंतरीक अनुभव मिळाला हे आर्वजुन नमुद करतो.
https://www.youtube.com/watch?v=RYcvhZRg040

netflix वर नुकतीच एक docuमालिका आली आहे - headspace’s guide to meditation. पहा काही सापडतंय का.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

जिमच्या ट्रेनरला आजच सांगत होते, हा व्हिडिओ बघायला!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सध्या AGT - Champions 2020 पाहतो आणि कलाकारांची/स्पर्धकांची नावे गूगलशोधून धुंडाळा घेतो. सर्वच विनर होणार नसले तरी करमणूक जबरदस्त करत आहेत. (Salthevoice, jakie evancho, lost voice guy, Colin cloud वगैरे)

फायनली टेनेट बघितला.....
नंतर डाऊनलोड करून पाहिला....
त्यानंतर मध्येमध्ये पॉझ करत पाहिला...
मध्येच फॉरवर्ड करून पाहिला..
नंतर रिव्हर्स करून पाहिला.

सरतेशेवटी युट्युबवर तज्ञ लोकांनी पोस्ट मार्टेम केलेले उद्बोधक व्हिडीओ पण पाहिले.

.... आणि मग सगळे खटाटोप समजले.
भूतकाळात घडलेली गोष्ट बदलता येत नाही हेच ठामपणे सांगितले आहे.

कॉलेजमध्ये असताना टाईम इन्व्हर्जन, पँराडॉक्स, एन्ट्रॉपी आणि बऱ्याचशा संकल्पना समजल्या नव्हत्याच आता हा सिनेमा पाहून युट्युबवर सर्च केल्यावर तुंबळ फिजिक्सच्या संकल्पनांचे रेकमेंडेड व्हिडीओज येऊ लागले आहेत. नोलनकाका फार भारी आहेत. सिनेमा पाहणाऱ्या लोकांच्या डोक्याला बराच खुराक देऊन जातात.

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

पाहिला -
(टॉम अल्टरला स्वच्छ इंग्रजीतून आणि शुद्ध हिंदीतून बोलताना ऐकून बरं वाटलं.)
पूर्ण आवडला असं म्हणत नाही पण
पोषाख
चित्रपटात वापरलेली ॲनिमेशन्स
आणि अर्थात गोष्ट -
हे खूप भारी वाटलं.

'गेट शॉर्टी' नामक मालिका ॲमेझनवर बघायला घेतली आहे.

माईल्स नावाचा आयरीश गुंड हे मुख्य पात्र. गुंड म्हणण्यापेक्षाही उपगुंड आहे तो. मेक्सिकन कार्टेलची हस्तक अमारा नावाची गुंड,आणि तिच्या गुन्ह्यांचे पुरावे नष्ट करणारा हा माईल्स. या माईल्सला अचानक अस्तित्ववादी प्रश्न पडायला लागतात. म्हणजे, आपलं हे काय सुरू आहे, आपल्या आयुष्याला काय अर्थ आहे वगैरे. मग तो सिनेमा काढायला जातो. सिनेमाचा निर्माता म्हणजे कसंही करून पैसे सुटल्याशी कारण, इतपतच कुवत राखून आहे; पण माईल्सची स्वप्नं मोठी आहेत. अमाराकडे पैसा, ताकद, सत्ता आहेत, आणि तिचं लग्न तिच्या मनाविरोधात एका म्हाताऱ्या श्रीमंताशी लावून दिल्याचा सल आहे. माईल्सचा मित्र आहे लुईस, तो जरा लोकांना घाबरून असणारा उपगुंड आहे.

गेट शॉर्टी

'एपिसोड्स' आणि 'ब्रेकिंड बॅड' एकत्र करून काय तरी मजेशीर बनवलं असावं. आतापर्यंत तीन भाग बघितले; फारच मजा येत्ये.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इण्टरेस्टिंग दिसते. बघतो. याच नावाचा एक चित्रपट आहे हॉलीवूडचा. तो ही विनोदी होता इतके लक्शात आहे.

बऱ्या अर्ध्याकडून समजलं की त्या सिनेमावरूनच ह्या मालिकेला नाव दिलेलं आहे. मालिका मजेशीर आहे, तुला आवडेल बहुतेक.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आनंद पटवर्धन यांच्या विवेक या माहितीपटाचे प्रदर्शम होतेय.
इथल्या बहुतेकांनी पाहिला असेलच. तरीही...

त्यांचा फेसबुकवरील संदेश:

After a great response at the last screening, I'm glad to announce we will, once again, virtually screen my latest film, Reason (English version, 218 mins). It will be followed by a Q&A session with Dhruv Rathee and myself where we will be answering your questions regarding the film and the general state of reason in our country.

Reason takes us to a macrocosm – India, the world’s largest democracy. Its eight chapters are a chilling account of how murder and mind control are being applied to systematically dismantle secular democracy in a country which once aspired not just to Liberty, Egalite and Fraternity, but to lead the post-war world out of its mindless spiral of violence and greed.

Day: Sunday, 28th March 2020
Time: Screening at 3PM, Q&A at 7PM
You can directly register on the BookMyShow link: bit.ly/ReasonFilm
I hope to see you there.

पाहिला. खूपच आवडला.

फ्रान्सिस मॅक्डॉरमंड - जियो. पूर्ण सिनेमाभर जेमतेम बोलूनही अख्खा सिनेमा तिने पेलला आहे. काही प्रसंगात एक-दोन सुंदर ओळी तिच्या वाटेला आल्या असतील, पण एरवी तिचा वावरच आहे.
आणि सिनेमा कुठलीच भावना बळजबरी आपल्यावर लादत नाही- सिनेमाचं पार्श्वसंगीतही. त्यामुळे प्रचंड आवडला.
फर्नच्या आयुष्यातल्या काही महिन्यांत कॅमेरा तिची सोबत करतो, तिच्या सोबत आपल्याला ते महिने जगता येतात - एवढंच.

आधी एका परिक्षणातून रिसेशनमुळे आलेल्या नैराश्यातून एका बाईने केलेली वाटचाल असं काहीसं एकसुरी चित्र उभं केलं होतं, त्यामुळे बघायचं टाळत होतो, पण हे खूपच मर्यादित वर्णन आहे.
अवांतर -
अमेरिका हा देश आणि त्यातल्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती प्रत्यक्ष अनुभवल्याखेरीज समजणं कठीण आहे. लोक काय काय करतात! पुन्हा त्यात काही स्वखुशीनेही. आणि ह्या सगळ्याला दु:खाची किनार तर आहेच, पण अमेरिकेचा "we shal overcome" हा दुर्दम्य आशावादही आहे. (स्टीवन फ्रायच्या एका मुलाखतीत त्याने अमेरिकन आणि ब्रिटिश चित्रपटांतला हा फरक फार छान सांगितला होता.) अफाट देश, समुद्रापासून हिमाच्छादित पर्वतशिखरापर्यंत सगळं काही आहे - आणि त्यात रहाणारे तेवढ्याच परीचे लोक.
individualism चं बाळकडू मिळाल्याने त्यांचे काही निर्णय हे आपल्या #माणूसम्हणजेचसमाज छाप शिकवणीला ठार वेडगळ वाटू शकतात.
उ.दा. टायगर किंग ह्या अचाट प्रकारात, स्वत:चे दोन्ही पाय गमावून बसलेला मनुष्य झूकीपर होतो हे बघून मला धक्का बसला होता. तसंच इथंही कित्येकांनी स्वखुशीने पत्करलेला भटकेपणा अनाकलनीय वाटू शकतो. पण त्यातही पुन्हा पदर आहेत.

.
पुन्हा एकदा- फ्रान्सिस मॅक्डॉरमंड - जियो.

अमेरिका हा देश आणि त्यातल्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती प्रत्यक्ष अनुभवल्याखेरीज समजणं कठीण आहे. लोक काय काय करतात! पुन्हा त्यात काही स्वखुशीनेही. आणि ह्या सगळ्याला दु:खाची किनार तर आहेच, पण अमेरिकेचा "we shal overcome" हा दुर्दम्य आशावादही आहे. ......... अफाट देश, समुद्रापासून हिमाच्छादित पर्वतशिखरापर्यंत सगळं काही आहे - आणि त्यात रहाणारे तेवढ्याच परीचे लोक.

क्या बात है!!! जिओ!!! किती सुंदर शब्दात अनुभव मांडलात. हेच हेच मला वाटते. अगदी अस्सेच.

चित्रपट अपेक्षेने पाहिला. तसा चांगला वाटला, पण फिल्म महोत्सवातही जसे अनेक चांगले चित्रपट असतात तसा वाटला. ऑस्कर मिळण्याइतके विशेष काही जाणवले नाही. स्वखुषीने निवडलेले भटके जीवन दाखवताना कुठेही भावनांचा अतिरेक दाखवला नाही, ही जमेची बाजु. पण बहीण, भटकंतीत मिळालेला वयस्कर मित्र, हे सगळे आपुलकीने वागतात तरी कशातच गुंतायचे नाही, हे या कथानायिकेने ठरवलेच असते. तशी ती गुंतत नाही हे ही योग्यच वाटते. पण शेवटी आपण जगतो कशासाठी ? रंगुनी रंगात साऱ्या .... सारखी ॲटिट्युड ठेवून जगता येतेच की!

दि फँमिली मँन चा सीझन टू जबराट आहे.
मनोज वाजपेयी भारीच.
मला आवडले ते समंथाचे काम. तमिळ बँकग्राउंड एवढ्या प्रॉमिनंटली एखाद्या हिंदी सिरिजमध्ये वापरलीय पहिल्यांदाच पाहतोय.
कॉमिक टायमिंग पण जबरदस्त जमलेय एकेकाला. थ्रीलर, सस्पेन्स, स्पाय एजंट वगैरे प्लॉट या आधी इंग्रजीत भारी वाटत होते. पण भारतात लोकल लेव्हलला अशा सिरिज तयार करणे म्हणजे भारी जमलंय दिग्दर्शकांना.

भाव खाऊन समंथा गेलीय. एक डायलॉग मला फार आवडला "देश के लिए मर सकता हूँ, पॉलिटिक्स के लिए नही।" हे ऐकून पाऊलो कोईल्हो चा एक कोट मेसेज वाचल्याच आठवलं..
"You can love your country without having to love your government"

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा
- स्वयंभू

विद्या बालनचा शेरनी पाहिला. गोष्ट चांगली असली तरी चित्रपट पकड घेत नाही. फॉरेस्ट खात्याला कामात अडथळा आणणारे गावगुंड, अवैध शिकार, वगैरेभोवती चित्रपट फिरतो. ज्युनिअर लेव्हलला प्रामाणिक अधिकारी आणि वरच्या लेव्हलला राजकारण्यांना मिळालेले अधिकारी हे वास्तव आहेच. पण ते परिणामकारक वाटत नाही. विद्याच्या इतर चित्रपटांच्या तुलनेने अभिनयही साधारणच वाटला.

'नेटफ्लिक्स'वर इस्रायली मालिका 'ब्लॅक स्पेस' बघितली.

एका शाळेत समारंभात चार मास्कधारी लोक गोळीबार करतात; त्यात चार विद्यार्थी मरतात, एक कायमची जायबंदी होते. तपासप्रमुख असणारा पोलिस त्याच शाळेचा माजी विद्यार्थी असतो. तो हुशार, पण हेकट असतो. आणि त्याला एकच डोळा असतो. दुसऱ्या डोळ्याला काय झालं, हे सांगण्यात त्याला रस नसतो. इस्रायली मालिका असल्यामुळे 'गेला असेल हाणामारीत डोळा' असं मी गृहित धरलं.

संपूर्ण आठ भाग ह्या गोळीबाराचा तपास अशीच कथा आहे. सुरुवातीला तीन पॅलेस्टिनी कामगार संशयित असतात. त्यांतला एक गुन्हा कबूल करतो, आणि आपण कशा गोळ्या झाडल्या हे सांगतो. ते वर्णन मूळ गोळीबाराच्या जखमांशी अजिबातच जुळत नाही. 'अरबांवर संशय घेणं सोपंच आहे', असं म्हणून पोलिस त्याच्या बॉसला दटावतो. तिचा याच्यावर विश्वास असला तरी याचा विक्षिप्तपणा पाहता याच्या भूतकाळाबद्दल शंका येतात. त्याला शाळेबद्दल, आणि शाळेतल्या शिस्त-संस्कृतीबद्दल अजिबात प्रेम नसतं.

ब्लॅक स्पेस

शाळेतले विद्यार्थी सुरुवातीला भेदरलेले असतात. अरबांवर सुरुवातीला संशय असला तरी, आता शाळेतल्याच कुणी तरी हा गोळीबार केला आहे, हे सामूहिक हत्याकांड घडवलं आहे, असं पोलिस जाहीर करतो. हळूहळू विद्यार्थी त्यांच्या भीतीमधून बाहेर यायला लागतात, आणि मग त्यांच्यातल्या कुणावर संशय घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा याबद्दल प्रश्न पडायला लागतात. अर्थात मालिकेच्या शेवटी हे सगळं समजतं.

शाळेचा मुख्याध्यापक गोडगोड विचारसरणीचा असतो. बाहेरचं जग कितीही हिंस्र, वाईट, गुंतागुंतीचं असलं तरी मुलांना हे सांगून काय मिळणार, अशी त्याची विचारसरणी असते. त्यामुळे या सामूहिक हत्याकांडात मुलं मारली गेली असली तरीही त्याचं मूळ कारण काय असेल, याबद्दल त्याला प्रश्न पडत नाहीत. आपल्याच काही विद्यार्थ्यांनी हे काही घडवलं असलं तरी पोलिसांना पूर्ण माहिती देऊन काय मिळणार; चार मुलांच्या दुष्कृत्यामुळे सगळ्या मुलांना गोडगोड जगातून बाहेर आणून काय मिळणार असा त्याचा विचार असतो. प्रत्यक्षात ही मुलं भलतीच विचित्र आहेत. वस्तुस्थितीपासून मुलांना, कुणालाही लांब ठेवलं तर त्यातून काय निपजणार?

तपास करणारा पोलिस याच विचित्र परिस्थितीतून मोठा झाला आहे. त्याच्यावर विनाअट प्रेम करणाऱ्या माणसांमुळे तो त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी तो गुन्हेगार पकडतो, आणि त्यांतल्या एकाला वाचवायचा प्रयत्न करतो, तेव्हा तोच स्वतःच्या लहानपणापासून मुक्त होतो.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हा १९६६ चा जुना गाजलेला चित्रपट पुन्हा पाहिला. कारण लहानपणी डायलॉग्ज समजलेच नव्हते. त्यावेळेस, क्लिंट इस्टवुडच्या व्यक्तिमत्वाने भारुन गेलो होतो. पण आता पहाताना त्यातील खरा हिरो Eli Wallach होता, असे आता जाणवते. या चित्रपटाची सिग्नेचर ट्युन मात्र तेंव्हापासूनच लक्षांत राहिली आहे.

मला ते तिन्ही सिनेमे फारच आवडतात, For fistful of dollars, for a few more dollars, आणि हा the good, the bad, and the ugly.

तिसऱ्या सिनेमातल्या 'द बॅड'लाच खरं नाव आहे, त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी दाखवलेली आहे. 'ब्लाँडी' आणि 'एंजल आईज' दोघांचीही खरी नावं दाखवलेली नाहीत. त्यांचा आगापिछा दाखवलेला नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खतरनाक ट्रिलॅाजी आहे. एन्न्यो मारिकोनेचे असामान्य पार्श्वसंगीत ही त्या चित्रपटांतील जणू एखादी महत्त्वाची व्यक्तिरेखाच आहे. या भन्नाट संगीतकाराने निर्माण केलेले हे संगीत Voyager Golden Records (Murmurs of the Earth) मध्ये घालण्याच्या दर्जाचे आहे!

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

नोबेल शांतता पुरस्कार प्राप्त मारिया रेसा यांचे पुरस्कार स्वीकारताना दिलेले भाषण.

-ताराबाई
टिप टिप चांदणी

शेअर केल्याबद्दल शतश: धन्यवाद. काय बोलल्ये!

….शेवटी मदांध तख्त फोडते मराठी!

Despite the falling snow हा रेकमेन्डेड चित्रपट पाहिला. अतिशय सुंदर आणि तरल चित्रिकरण. मुख्य हिरॉईनचा निरागस चेहेरा आणि सर्वांचाच उत्तम अभिनय आवडला. कथेला १९६० च्या दशकातल्या अमेरिका व रशिया यातल्या शीतयुद्धाची पार्श्वभूमी आहे.

अलिकडे लोकसत्ता मध्ये उत्क्रांतीवादावर एक लेख मालिका येते (सृष्टी-दृष्टी - प्रदीप रावत नावाचे कुणी माजी खासदार आहेत). लेखमालेचा बराचसा भाग "Why Evolution Is True - Jerry A.Coyne" या पुस्तकावर आधारलेला आहे असे पहिल्या भागात म्हटले होते. ही लेखमाला मला आवडते आहे. या अगोदर घासकडवी यांनी ऐसीवर मागे लिहिलेली लेखमालाही मला आवडली होती. उत्क्रांती म्हटले की डार्विनचा उल्लेख आल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे मी ओरिजीन ऑफ स्पिशिज (१८५९) वाचले. त्यानंतर डार्विनने केलेल्या १८३१-१८३६ मधल्या सफरीवर आधारीत व्हॉएज ऑन बीगल (१८३९) हे पुस्तक वाचायला घेतले आहे. (अजून बरेच बाकी आहेत वाचायचे). तत्पुर्वी नेट वर शोधता शोधता बीबीसीची "व्हॉएज ऑफ डार्विन"  - ही १९७९ च्या काळातली, ७ भागांची (प्रत्येकी एक तास)- टिव्ही मालिका युट्यूबर सापडली. ती पाहिली. या मालिकेत पुस्तकाच्या व्यतिरिक्त त्यांच्या खाजगी आयुष्यातल्या घटनांवरही चित्रिकरण केले आहे. एकंदर डार्विन बद्धलचा आदर दुणावला. एकतर जीवाष्म बनणे दुर्मिळ, त्यात ती सापडणे अजून दुर्मिळ, त्यात डार्विन सारखा शास्त्रज्ञ (नॅचरलिस्ट), केवळ आपल्या सूक्ष्म निरिक्षणशक्ती, तत्कालिन उपलब्ध संशोधन आणि तर्काच्या सहाय्याने ज्या शक्यतांचा विचार करतो ते खरोखर कौतुकास्पद आहे. गेल्या दिडशे वर्षात इतर शास्त्रज्ञांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने (डीएनए इ.) त्याचा सिद्धांत अजून समृद्ध केला आहे.

मराठीत यावर शोधले असता फारसे काही हाती लागले नाही, पण मागे सत्यपाल सिंग यांच्या मतप्रदर्शनानंतर निरंजन घाटे यांनी मटा मध्ये डार्विनवर लिहिलेला हा लेख आवडला.

त्या काळात शीडाच्या बोटीवरून केलेला दक्षिण गोलार्धातला (खास करून दक्षिण अमेरिका) प्रवासही तितकाच आव्हानात्मक होता. डार्विन प्रत्यक्ष आयुष्यात एक व्यक्ती म्हणून नेमका कसा असेल माहित नाही. पण मालिकेत तो खूपच शांत दाखवला आहे. खासकरून जेव्हा आपल्या विचारांची खिल्ली उडविणारे, वा आपल्या विचारांमुळे, परमेश्वरावर (वा बायबलवर) श्रद्धा असलेल्यांबरोबर त्याचे प्रचंड मतभेद निर्माण होतात तेव्हा तो शांत राहतो. आपले सगळे म्हणणे मनात ठेवतो. वाद विकोपास नेत नाही. खास करून बोटीचा कप्तान फिट्सरॉय बरोबर उडालेले त्याचे खटके तो शांतपणे परतवतो. डार्विन आपले मैलाचा दगड ठरलेले पुस्तक आणि प्रबंधसुद्धा तेव्हाच लिहितो जेव्हा तशाप्रकारचा प्रबंध दुसर्‍या एका शास्त्रज्ञाकडून येतो. (आल्फ्रेड रसेल वॉलेस - डार्विन इतकेच ह्याचेही योगदान उतुलनीय आहे. त्या दोघांनी मिळून मग तो प्रबंध सादर केला). अर्थात ज्याची डार्विनला भीती असते तेच होते. त्याच्यावर चोहूबाजूने टीका होते. पण शेवटी काळाच्या कसोटीवर त्याचीच थिअरी टिकते. मालिकेतले सगळे कलाकार पण आवडले. कॅ. फिट्सरॉयची दया येते. दक्षिण अमेरिकेचा किनारा अचूकपणे मोजमाप केला जावा म्ह्णून झगडणारा, निडर, साहसी दर्यावर्दी  ज्याची बायबलवर  अतोनात श्रद्धा आहे,  खरोखर डार्विनच्या  विचारांमूळे  चलबिचल झाला असेल का?  श्रद्धांना तडे गेल्यामूळे नैराष्य  येउन आत्महत्त्या  केली की आणखी काही कारण होते हे कळावयास मार्ग नाही.  मालिकेतले सुरुवातीचे संगीत पण खूप सुंदर आहे. फक्त एकच त्रुटी जाणवली. (त्याकाळातल्या तंत्रज्ञानाची मर्यादा ) म्हातार्‍या डार्विनचा मेकअप अजून चांगला करता आला असता.

https://youtu.be/a7zXZ238ORQ

खरं तर गाणं असल्याने अलीकडे काय ऐकलंय हवं पण व्हिडीओ जबरी वाटला.
भाडीपा हा अतिशयच म्हणजे "हा" चॅनल आहे असं माझं मत होतं ते जरा बदलायला कारणीभूत आहे हे गाणं. एरवी भाडीपा जे काही यत्ता दुसरी च्या लेव्हलचे चाळे करतात ते बघवत नाही - आलोक राजवाडे हा अँड्रॉइड असल्यागत मराठी का बोलतो?

तर गाणं- त्यातले आजी, आजोबा, काका मामा, पेटीवाला-खुळखुळा वाला दादा आणि swag ताई हे सगळे जमले आहेत.
(म्हणजे हेही कुठल्यातरी स्टाईलची कॉपी असूच शकते, पण जो काही माल तयार झालाय तो आवडला)

ह्याच a v prafulchandra चं म्युझिक असलेला घर बंदूक बिर्याणी चा ट्रेलरसुद्धा आवडला आहे.

या साहेबांचा आवाज अतिशय डोक्यात जाणारा आहे. त्याला 'चांदणं' हा शब्द शंभरवेळा बोलताना इमॅजिन करा. दिवसाची वाट लागते!

त्यांची बेरोजगार ही सिरीजदेखील मला काही एपिसोडपुरती आवडली.

जाफर पनाहीचे उच्च दर्जाच्या चित्रपटांमध्ये नांव आहे. त्याचे व्हाईट बलून, मिरर वगैरे चित्रपट बहुतेकांनी पाहिलेच असतील. त्याचा टॅक्सी हा चित्रपट नुकताच पाहिला. स्वत: टॅक्सी चालवून, भेटणाऱ्या विविध लोकांचे अनुभव चांगले चित्रित केले आहेत. माजिद माजिदीचा 'द टर्टल्स कॅन फ्लाय ' हा चित्रपट नुकताच पाहिला. इराकमधल्या अमेरिकन वॉरमुळे झालेली भीषण परिस्थिती आणि त्यातही जमिनीत पेरलेले ग्रेनेडस वेचून व ते विकून त्यावर गुजराण करणाऱ्या, त्या प्रयत्नांत हात पाय गमावलेल्या लहान मुलांची ही करुण, भीषण कहाणी आहे. मन हेलावून जाते.

माजिद माजिदीचा 'द टर्टल्स कॅन फ्लाय ' हा चित्रपट

याचा दिग्दर्शक बेहमान घोबाडी हा कुर्द आहे. यातली मुलं सीमेवरच्या कुर्द भागातील असावीत.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

झोंबी मराठी चित्रपट निघाला आणि तो हजारो वर्षापूर्वी चा झोंबी व्हायरस रशियात सापडला .

काय योगायोग आहे.
स्टार war ,Cigna the space city .
आणि असे अनेक चित्रपट कल्पना शक्ती वर निर्माण झाले पण पुढे जावून ते सत्य पण ठरले
जुरासिक पार्क ही कल्पना खरी ठरू नये

जुरासिक पार्क ही कल्पना खरी ठरू नये

ती खरी ठरलेली नाहीये कशावरून?

आपण (म्हणजे तुम्ही. आदरार्थी(!).) डायनोसॉर नाही आहात, या आपल्या (म्हणजे, पुन्हा, तुमच्या) गृहीतकास आधार काय?

--------------------

(सॉरी. मोह आवरला नाही.)

व्हाट्सॅपवर एक जोक वाचला होता. गण्याने झेराॅक्सचे दुकान टाकले पण गिऱ्हाईके काही येईनात. उपाय म्हणून त्याने दुकानाच्या नावात '१८०० पासूनची अविरत परंपरा' टाकून पाहिले तरी दुकानाकडे गिऱ्हाईकांचे दुर्लक्ष चालूच. मग त्याने "सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली शाई वापरुन काढलेल्या झेराॅक्स" असे टाकून पाहिले तरी काही फरक पडला नाही. शेवटी "येथे चुलीवरच्या गावरान झेराॅक्स मिळतील" असे टाकले आणि गिऱ्हाईकांची गर्दी आवरता आवरता त्याच्या नाकी नऊ आले.

रजनीकांतपासून संजयदत्तपर्यंत सर्वांच्या अंगावर शहारे आणणारा कंटारा हा चित्रपट पाहण्याचा काल प्रयत्न केला. गण्याच्या चुलीवरच्या गावरान झेराॅक्स टाईप हाईप्ड वाटला. पहिल्या पाच मिनिटांत उंचावलेल्या अपेक्षा पुढच्या दहा मिनिटांत दण्णकन जमिनीवर आल्या. उरलेले दीडतास बेवडा हीरो, चित्रपटातील सौथ इंडियन स्टाईल आक्रस्ताळेपणा आणि नक्की स्टोरीलाईन काय आहे (मायथॉलॉजी, पर्यावरण रक्षण, जातीभेद, गरीब वि. श्रीमंत, लव स्टोरी वगैरे) हे शोधण्यात गेला. शेवटची दहापंधरा मिनिटं (आधीच्या दोन तासांच्या तुलनेत) ठीकठाक पण चटकन उरकून घेतली. गावभर गाजावाजा झालेला हा चित्रपट पाहण्यात निष्कारण वेळ का घालवला याचा पश्चाताप करत झोपून गेलो.

"साहिब बीबी और गुलाम" यावरचा हा लेख वाचून चित्रपट (फास्ट फॉरवर्डमध्ये - गाणी पुढे ढकलत) पाहिला. चांगला वाटला. मी पाहिलेला गुरुदत्तचा (आणि वहिदा रहेमानचासुद्धा) पहिलाच सिनामा. मिना कुमारीचा अभिनय मला इतकासा नाही आवडला (कदाचित मद्यधुंदीत असण्याचा अभिनय करणारी -जो बिलकूल जमलेला नाही- ती प्रथम स्त्री अभिनेत्री असावी ) पण गुरुदत्त आणि वहिदा रहेमानचा अभिनय आवडला. चित्रपटात त्या काळातल्या समाजाच्या रुढी, मान्यता, विरोधाभास इ. गोष्टी या चित्रपटात प्रकर्षाने जाणवतात उदा. जमिनदाराची "मर्दानगी/पुरुषार्थ" याची समज, 'पती हाच परमेश्वर' या समजुतीमुळे त्यांच्या बायकांची घरातली परवड आणि आयुष्याला आलेला निरर्थकपणा (दागिने घडवा दागिने मोडा, वा विधवा असेल तर रात्रंदिवस कुठल्यातरी विधीत स्वतःला गुंतववून ठेवा), सनातन्यांचा बालविवाह, ब्राह्मोसमाजाच्या माणसाच्या घरातले न खाणे, ब्राह्मोसमाजातल्या मुलीने कुंकू न लावणे पण त्या कुटुंबाचा कुंकवाचा कारखाना असणे, त्याच्या जाहिरातीसाठी "बाबा बंगाली छापाची" जाहिरात करणे इत्यादी.

लेखात म्हटल्याप्रमाणे शब्दात पकडता न येणारे मानवी नातेसंबंध हा या चित्रपटाचा आत्मा आहे. छोटी बहू आणि भूतनाथ यांचे नाते वरकरणी मालकीण-नोकर असे असल्यामुळे त्यात जरी अधिकारशाही दिसत असली तरी ते थोडे आई-मुलगा या नात्याकडे झुकलेले आहे असे मला वाटले. त्यांच्या नात्यात कुठेही लैंगिक आकर्षण आहे असे मलातरी वाटले नाही. त्यात भूतनाथचे आईचे छत्र लहान असतानाच हरपलेले. शेवटच्या वेळी छोटी बहू भूतनाथला लग्न करून सून आण म्हणून सांगते. भूतनाथ आणि जबा यांचे नाते नक्कीच प्रियकर-प्रेयसीचे आहे. जर छोटी बहू आणि भूतनाथ यांच्या नात्यात लैंगिक आकर्षण असते (जे समाजाला आणि सुरुवातीला जबाला वाटते) तर भूतनाथ हे पात्र भोळा-भाबडा असे नसते. अर्थात हे सगळे चित्रपट पाहणार्‍याच्या दृष्टीकोनावर अवलंबून आहे त्यामुळे गुलजारचे "रिश्तोका इल्जाम" वैगैरे आपल्यापरीने ठिकच.

फार चांगलं लिहिलंय तुम्ही. चित्रपट बघावासा वाटला.
गेल्या पिढीतील बहुतांश बायकांचे आयुष्य असे कंटाळवाणे, निरर्थक कृतींनी भरलेले आणि आर्थिकदृष्ट्या परावलंबी असल्यामुळे निर्णयप्रक्रियेत दुर्लक्षीत असेच होते. माझी आजी हे ठामपणे म्हणते की बाईने स्वतः पैसे कमावण्याइतके महत्वाचे काहीच नाही.

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

पहिला.
तद्दन भिकार वाटला. डिस्ने कंपनीने म्हणे 200 मिलियन खर्च केला होता जाहिरातबाजीवर- ते खरं आहे हे पटलं.
ढिसाळ ह्या शब्दाने मरून जावं इतकं चिंधी कथानक, त्यात भली थोरली भोकं, ना धड मारधाड ना धड नाट्य आणि अभिनय म्हणजे 1 1 चतुर एकोळी पिंका.

३ तास खर्च करायचेच तर मग हिंदी सिनेमे काय वाईट? निदान हे असले अक्कलशून्य सुपरहिरो तरी बघायला नको. (मला gardian of galaxy जाम आवडलेले- groot and rocket and drax ..)
पण इथे म्हणजे बिनडोकपणाचा कळस आहे.
एक चांगली गोष्ट म्हणजे लोखंड माणूस कायमचा मरतो. 30 एक मिनिटं सगळे रडतात वगैरे, तेव्हा कायमचाच मेला असावा.
त्यापेक्षा जुने कॉमिक्स काढून वाचायला/बघायला हरकत नाही.

बहुतांशी असंच मत RRR पाहून झालं. मध्यंतरानंतरचा भाग (फॉरवर्ड करत) बघून डोकं सुन्न झालं आणि वेळ वाया घालवला म्हणून वैताग आला. तुमचा प्रतिसाद वाचून endgame आता बघणार नाही.

खरंय. चित्रपटाचा गाजावाजा असा की जणू एकमेवाद्वितीय काहीतरी आहे. प्रत्यक्षात अगदीच सुमार आहे. बाहुबलीदेखील ह्यापेक्षा उजवा वाटला होता.

"गपागप भरलेले स्पेशल इफेक्ट्स + प्रचंड प्रमाणात जाहिरातबाजी"
ही बहुतेक आता पैसे कमवायची नवी ट्रिक दिसते.

मार्व्हलचे आधीचे काही सुपरहिरो चित्रपट बरेच प्रेक्षणिय (आणि बऱ्यापैकी पटकथा) असणारे होते(GotG, Black Panther( अत्याधुनिक तंत्रज्ञान असणारे civilisation भावी नेता मात्र नदीत कुस्ती खेळून ठरवते वगैरे बाळबोध प्रकार वगळता), Winter Soldier). अव्हेंजर नावाची खिचडी( थोर आणि आयर्नमॅन एकत्र, अशी थोर संकल्पना) बनविण्याचा घाट कोणी घातला असावा?

The Journey Is the Reward...

ते ओडीनलाच ठाऊक!

मला GotG, Black Panther आवडले होते - एक मस्त मारामारीपट, वेगवान ॲक्शन आणि अर्थात माझा आवडता ग्रूट.
"बिनडोक देमारपट म्हणून बघ की" असा सल्लासुद्धा द्यावा लागला नाही कारण त्यात पटकथा "होती".

एंडगेम म्हणजे खरंच गुलाबजाम, खिचडी, जिलेबी, ताक, मटार उसळ, रेशमी कबाब, बरिटो कालवून त्यात थोडा गरम चहा ओतला आहे.
चुका काढणं सोडून द्या कारण तोंडात शिव्याच येतील पण "जस्टीस लीग" ला तोड म्हणून हे प्रकरण तयार केलं असावं असा नेहेमीप्रमाणेच अनभ्यस्त अंदाज.

--------------
डी.सी. कॉमिक्स खरंच भारी आहेत. त्यांचे सुपरहिरो बॅटमॅन, सुपरमॅन वगैरे निदान एक व्यक्तीरेखा म्हणून काही अंशी आवडतात - त्याला बरेच पैलू आहेत.
लोखंड माणूस हा स्टॅन ली ने बॅटमॅनवर बेतला असं ऐकून आहे. थॅनोस ही डार्कसीड ची आवृत्ती असावी.
पण अमेरिकन आणि जागतिक बाजारपेठेचा लसावि काढून त्याला सुपरहिरोंच्या one liner banter ची फोडणी देऊन मार्वलने बाजार ताब्यात घेतला आहे.
आणि आता कुठल्याही गोष्टीला हिडीस बाजारू रूप देणाऱ्या कंपनीने मार्वल विश्वाचा ताबा घेतलाय.

GotG -३ मधे काय वाढून ठेवलं आहे बघूया!

तुम्ही केजीएफ, पुष्पा वगैरे पाहिलेत का? केजीएफ, पुष्पा आणि RRR हे गेल्या काही महिन्यांत गाजलेले तिन्ही एकदम पकाऊ पिक्चर्स आहेत. उतरत्या क्रमाने.

RRR म्हणजे मनमोहन देसाईंच्या मर्दची ग्लोरिफाइड व्हर्जन वाटते. अर्थात मर्द हा एक महापकाऊ पिक्चरच होता. अमिताभच्या लोकप्रियतेची कांडी चिपाड होईपर्यंत चरकातून काढलेला. पण RRR ही त्याचीच आधुनिक तंत्रद्न्यानातील आवृत्ती वाटते. एकच सीन पाहू: हे दोघे हीरो पाण्यात पडलेल्या मुलाला वाचवतात. पूर्वी लहान मुलगा पाण्यात पडला तर कोणीतरी पाण्यात उडी मारून त्याला बाहेर काढत. ही पद्धत फार जुनी झाली.

प्रचंड नेत्रदीपक चित्रीकरण, जबरदस्त पार्श्वसंगीत याचा वर्ख लावलेला अचाट आणि अतर्क्य सीन आहे तो. आधी तो राम पुलावर त्याचे ५०० माणसांना सहज झोडपणारे हात ठेवून रागाने बघत असतो व तो पूल थरथरू लागतो. मला वाटले हाच हलवतोय आख्खा पूल. तेलुगू चित्रपट हीरोज चे काही सांगता येत नाही. पण त्याखालून एक मालगाडी चाललेली असते. तिचे ते ठेक्यावर आल्यासारखे आवाज येत असतात. मग क्लोज अप मधे अगदी गुळगुळीत व अजिबात सांधे नसलेल्या रूळांवरून सुद्धा ठकाक ठकाक आवाज करत गाडी चाललेली असते. रूळ सलग असतील तर असे आवाज कोठून आले काय माहीत.

मग तो स्फोट वगैरे. एकतर मी रेल्वेला थांबवणारा सिग्नल पुलावर असल्याचे कधी पाहिल्याचे आठवत नाही. पण ते सोडून देउ. वाघिणीचा स्फोट व ती खाली पडते ती त्या मासा पकडायला आलेल्या मुलाच्या बाजूला. नंतर त्या एका रेषेत चाललेल्या गाडीच्या इतर वाघिणीसुद्धा - त्यांनी आपापल्या जागी खाली पडावे ना? तर नाही. त्याही त्या मुलाच्या आजूबाजूलाच पडतात. आता हा स्थानिक मुलगा, त्यात नेहमी मासे पकडणारा. तो पोहू शकत नाही? प्रत्यक्षात ही असली पोरे पाण्याखाली वगैरे जाउन येतात बिनधास्त.

तर तेथे हा "वॉटर" म्हणून गाजावाजा केलेला भीम डायरेक्ट पाण्यात उडी टाकून त्याला वाचवण्या ऐवजी "अरे कोणाकडे दोरी वगैरे आहे का रे" करत बसतो. तेव्हा वरून राम ला खाली तो मुलगा दिसतो. त्याला कोणीतरी पाण्यात शिरून वाचवण्या ऐवजी नाट्यमय पद्धतीने वाचवायचे ठरते. मग तो तेथून पार लांबून याला खूण करतो की तू असा तिकडून पुलावर ये. याच्याकडे फटफटी आहे हे त्याला का कोणास ठाउक माहीत असते. तसेच बाजूच्या टांग्यात एक लांबलचक दोरखंड आहे, हे ही. टॉम अ‍ॅण्ड जेरी ला लाजवतील अशी साधने पाहिजे तेव्हा हाताशी असतात यांच्या. घोडा, फटफटी, दोरखंड, वंदे मातरम झेंडा. मग एक सर्कस अ‍ॅक्ट होते. साउथ च्या पिक्चर मधे फटफटी सुरू केली व सरळ निघाली असे कधी नसते. सर्रकन गिरकी घेउन हवेत माती उडवलीच पाहिजे. बुडणारा मुलगा काय, थांबेल दोन मिनीटे.

ती सर्कस अ‍ॅक्ट फिझिक्स चा शोध लागायच्या आधी घडलेली आहे. पुलाला परपेण्डिक्युलर दिशेने झोके घेताना रामसाहेब त्या मुलाला भिरकावतात तो थेट काठावर - पुलाला समांतर इतक्या लांब फेकला जातो की जेथून लोक पाण्यात उतरायला कचरत होते. पूर्व-पश्चिम झोका घेत असताना दक्षिण किंवा उत्तरेला इतकी जड वस्तू इतक्या लांब कशी फेकता येइल? माहीत नाही. अर्थात लॉजिक या सीनच्या बर्‍याच आधी रानोमाळ हरवले आहे.

मग हे दोघे पुन्हा शेक हॅण्ड करतात. ७० च्या बॉलीवूड पिक्चर्स सारखे. आणि मग खाली पाण्यात उड्या टाकतात व स्कूबा डायव्हिंग केल्यासारखे, पण मास्क शिवाय, आरामात हिंडतात.

मग आधीच नुसते पाण्यात का नाही उतरले? उगाच सर्कस.

मनमोहन देसाईचे जुने चित्रपट जर नवीन तंत्रज्ञान वापरून पुन्हा केले तर जसे होतील तसे वाटते हे पाहून. पण तेव्हा त्याची नॉव्हेल्टी होती. ती तेव्हा सुद्धा पाच एक वर्षात ओसरली होती.

अर्थात "अभ्यासपूर्ण" श्रेणी देतो आहे!
------------
पुष्पा बघवला नाही - जुन्या केजीएफमधल बहुतेक एक गाणं ऐकलं (त्रिदेव वालं?)
--------------------------------

पण RRR ही त्याचीच आधुनिक तंत्रद्न्यानातील आवृत्ती वाटते.

सहमत.
मला वाटतं ते मॅकेनिकल खेळ असतात ना - एका दोरीला धक्का लागला की बॉल फिरून मग नळकांडीत जातो, तिथून खाली येऊन मग एका चमच्याला धक्क देतो - तो चमचा मग डॉमिनोज पाडतो आणि शेवटी एक बटण दाबतो आणि पंखा सुरु होतो -
तेलुगु चित्रपतताऱ्यांना असल्या कसरती करून "पावर" दाखवणं आवडत असावं Biggrin

मला वाटतं ते मॅकेनिकल खेळ असतात ना - एका दोरीला धक्का लागला की बॉल फिरून मग नळकांडीत जातो, तिथून खाली येऊन मग एका चमच्याला धक्क देतो - तो चमचा मग डॉमिनोज पाडतो आणि शेवटी एक बटण दाबतो आणि पंखा सुरु होतो -
तेलुगु चित्रपतताऱ्यांना असल्या कसरती करून "पावर" दाखवणं आवडत असावं Biggrin

अवांतर: ‘पॅडिंग्टन’ चित्रपट पाहिला होतात काय?

(अस्वलांचाच होता, म्हटल्यावर पाहिला असलाच पाहिजेत.)

हाहाहा! तुमचा वैताग अतिशय अभ्यासपूर्ण आहे.
तुम्ही सांगताय ते आधीचे दोन सिनेमे (thankfully) पाहिलेले नाहीत. 'चांदोबा' मासिकात यायच्या तशी गोष्ट मोठी करून सिनेमा बनवला असावा असं मत बाहुबली पाहताना झालं होतं. त्यामुळे आता हाइप झालेले सिनेमे बघायला घेताना जराही अपेक्षा न ठेवता सुरू करून अर्ध्या तासात सोडून द्यायची सवय ठेवायला पाहिजे.

असो.

मी "अ‍ॅनिमल फार्म" हे पुस्तक वाचल्यावर हा चित्रपट पाहिला. चित्रपट १९९९ च्या आसपासचा आहे. कुठले तंत्रज्ञान वापरले ते माहित नाही पण त्यातल्या प्राण्यांच्या डोळ्यातले, चेहर्‍यावरचे हावभाव अस्सल वाटतात. खास करून त्या नेपोलिअन डुक्कराच्या चेहर्‍यावर, डोळ्यात एकप्रकारचा धूर्तपणा दिसतो.

पहा, तुम्ही ज्या चित्रपटावर टीका करता त्याला (एकतरी) बक्षीस मिळालं आहे!
https://www.ndtv.com/entertainment/golden-globe-awards-rrr-first-indian-...

फारेण्ड यांना 'सो बॅड दॅट इट्स गुड' म्हणून ट्रॅशी चित्रपटांची मजा घेता येते. परंतू आपण सर्रास हिणवतो त्या मेनस्ट्रीम/बॉलीवूड सिनेमाला देखील एक परदेशात चाहतावर्ग आहे हे समजले नसेल असे कसे? मध्यंतरी जपानमध्ये रजनीकांतच्या चित्रपटांची क्रेझ आलेली. माझा एक लेबॅनॉनमधला सहकारी म्हणतो त्याचा सगळ्यात आवडता चित्रपट आहे 'रब ने बना दी जोडी'. गमंत म्हणजे हा चित्रपट सोल, साऊथ कोरिया इथेही भरपूर चालला. चीन मध्ये दंगल आणि सिक्रेट सुपरस्टार? भरपूर चालले.

काईट्स या भंगार चित्रपटाला देखील रोटन टोमॅटोवर ७२ टक्के क्रिटिक्स मस्त म्हणतात. तिथल्या समीक्षकांना/लोकांना बॉलीवूड/टॉलीवूडचा चित्रपट एक वेगळा, मेलोड्रॅमॅटिक, भावनिक, मसाला चित्रपट म्हणून आवडतो परंतु आपल्याला तो अतिपरिचयाने 'ठीक' वाटतो.

खूप लोकांना आरार मधला 'ब्रोमान्स' भावला आहे. हा ब्रोमान्स भारतीय लोक वेगळ्या नजरेने पाहतात आणि ते लोक जरा वेगळ्या नजरेने. दुसरे कारण म्हणजे टिकटॉक!

हे थोडं "क्राऊचिंग टायगर- हिडन ड्रॅगन" च्या वळणावर आहे - ?
आकाशातून उडून मारामाऱ्या करणारे शेंडी/बिनशेंडीवाले चिनी लोक्स आणि त्यांच्या गुरुत्वाकर्षणविरोधी शक्ती इ.इ. प्रकार चीन्यांना बोरिंग आणि क्लिशे वाटला असेल पण हॉलिवूडला त्यात मटेरिआ एक्झॉटिका दिसली असावी - त्यामुळे ह्या चित्रपटाचा (तेव्हा!) भारतातही बोलबाला झाल्याचे आठवते.
----------------

दुसरे कारण म्हणजे टिकटॉक!

अगदीच गावंढळ प्रश्न आहे - म्हणजे काय? टिकटॉक बनवल्याने चित्रपट अधिक पापिलवार झाला आहे का?

आरआरआर हा मला २०२२ मध्ये पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक वाटला. ब्रोमान्स बाजूला ठेवला तरी चित्रपट कसा मनोरंजक, भव्यदिव्य असावा हे राजामौळी यांच्या चित्रपटांतून दिसते. अत्यंत अतर्क्य, अचाट प्रसंग असूनही कथेची मांडणी, उत्तरार्धातली कलाटणी या सर्वच गोष्टी उत्कृष्ट आहेत. याउलट अत्यंत बोलबाला झालेला पावनखिंड हा मराठी चित्रपट आठवतो. व्हाट्सॅपसकट सर्वत्र झालेली चर्चा पाहून अतिशय अपेक्षेने पावनखिंड पाहण्याचे धाडस केले. शिवरायांच्या चरित्रात अनेक नाट्यमय, प्रेरणादायी प्रसंग आहेत. विशेषतः पावनखिंड ज्या घटनेवर आधारित आहे ती घोडखिंडीतली लढाई या प्रसंगात शिवरायांवरची स्वामीनिष्ठा, चातुर्य, शौर्य अशा अनेक गोष्टी मोठ्या पडद्यावर दाखवण्यासाठी सुयोग्य आहेत. इथल्या एका थेटरात लोक चक्क ढोलताशे घेऊन आले होते. दुर्दैवाने चित्रपट अपेक्षेपेक्षा फारच सपक वाटला. टेकडीसारखे दिसणारे लहानसे किल्ले, लुटुपुटुच्या बाळबोध लढाया, काही ठिकाणचे पाणचट विनोद यामुळे चित्रपट अतिसामान्य वाटला. मराठीत असे भव्य चित्रपट कधी निर्माण होतील असे वाटत नाही.

भव्य आणि स्पेशल इफेक्ट्स - खूपच भारी आहेत. पहिला सीन बघून मी खिळलो होतो स्क्रीनला (अर्थात छोट्या)
थेटरात पाहिला तर मला कदाचित खूप भावला असता
पण बाहुबली ह्यापेक्षा चिकार आवडला होता.

इथे नुसताच मसाला वगैरे असल्याने जाम बोर झालं.
---------
पावनखिंड वगैरे निव्वळ "सध्याची राष्ट्रीय क्रेझ वसूल करण्याचे उद्योग आहेत".
वसंत कानेटकर (तेच ना रायगड जाग वाले?) ह्यांच्या नाटकांत कसं सगळं ऐतिहासिक असलं तरी मध्यमवर्गीय वन रूम किचनमधे चालू असायचं?
तसेच मराठी सिनेमे. पैकाच नाही, काय भव्य करणार? स्पेशल इफेक्टच बऱ्यापैकी महाग असतात, ते जर का स्वस्त झाले तरच मराठीत स्पे.इफेक्ट्सची रेलचेल असलेला सिनेमा होईल असे वाटतें.

वसंत कानेटकर (तेच ना रायगड जाग वाले?) ह्यांच्या नाटकांत कसं सगळं ऐतिहासिक असलं तरी मध्यमवर्गीय वन रूम किचनमधे चालू असायचं?

लोल.. सही पकडे हैं! स्वामी अंत:पुरात चला, स्वामी चालले बेडरूममध्ये!

मला लै खटकणारी गोष्ट म्हणजे वेशभूषा, रंगभूषा.
म्हणजे रोज ई व्हिटॅमिनच्या १० गोळ्या खात असल्यासारखे कपाळापासूनचे भरदार केस जणू काही ऐतिहासिक पात्रानी टकलं असूच नये!

फर्जंद नावाचा सुमार शिवपट पाहिला.

शिवपटातील प्रसंगरचना -

'शिवाजी' साकारणे म्हणजे सतत डोळे वटारून आणि चेहऱ्याला कडक इस्त्री मारून कायम आवेशातच बोलणे असा गैरसमज असलेल्या बसक्या मानेच्या चिन्मय मांडलेकराला का म्हणून या भूमिकेत घेतले आहे ते समजेना. अरे बाळांनो, शिवाजीराजाच्या आयुष्यात नाट्यमय घटना जरूर होत्या परंतु मध्ये मध्ये अनेक वर्षांचा (क्वचित दशकांचा) संयमाचा, नित्य राज्यमुलकी कारभाराचा प्रचंड मोठा काळ होता. या काळात अतिनाट्यमय असे फारसे घडत नव्हते. त्यात शिवाजीराजाने प्रत्यक्ष घोड्यावरून वगैरे फारच कमी प्रवास केलेला आहे. (याचंही कुण्या इतिहासकाराने गणित मांडलं आहे). शिवाजीराजांना खूप व्यवधाने असणार. व्यक्तीचा दिनक्रम हा शिस्तबद्ध असणारच. व्यग्र असणे, मोहिमांच्या धामधुमीत असणे, चिंतेत असणे, विचारात असणे, विचारविनिमयात असणे, गुप्त खल करणे, कुलाचार-देवदेव करणे, न्यायनिवाडा करणे, काळजी करणे, पत्रव्यवहार करणे, शोकात असणे, सणवार इत्यादी सेलिब्रेशन करणे. आजारपणे, कौटुंबिक जबाबदाऱ्या वगैरे गोष्टी असणारच. (शहाजींचा दिनक्रम पाहिल्यावर तर शिवाजींचा दिनक्रम कसा असेल याची थोडीफार कल्पना येऊ शकते) त्यात दाढी वगैरे कायम ग्रूम ठेवणे वगैरे. अतिशय नेटके पण श्रीमंती परिवेष दागदागिने परिधान करणे. या सगळ्या व्यापांचा शिवपटातील प्रसंग लिहिताना काय उपयोग करतात? इतकी व्यवधाने असणाऱ्या एका राजाचे हावभाव, मुद्रा कशा असाव्यात याचा काडीचाही विचार न करता सतत डोळे वटारून आवेशात बोलणे, नजर न हलवता सरळ रेषेत उगाचच छाती फुगवून चालणे म्हणजे मांडलेकराचा अभिनय! नुसते पाठीमागे हात बांधून सारखे इमोशनल होऊन अंगार-अंगार होऊन डायलॉगबाजी करणारे शिवाजी पाहून पाहून इतका प्रचंड वैताग आलेला आहे की बस्स.

सातपाटील कुलवृत्तांत नावाच्या रंगनाथ पाठाऱ्यांच्या कादंबरीत पुण्याजवळचे खराडी हे गाव वसवण्याचं खूप तपशीलवार असं निव्वळ थक्क करणारं वर्णन आहे. हे एका गावाचं झालं. राज्य वसवणाऱ्या एका स्वतंत्र वृत्तीचा राजाला काय काय सांभाळायला लागत असेल? तरीही शिवपटात जे प्रसंग असतात त्यात पटकथा लेखकांचे, संवाद लेखकांचे इतके प्रचंड कल्पना दारिद्र्य का बरे असते?

ड्रेपरी/वेशभूषा आणि इतर प्रॉप्स -

ह्या भंगार वेशभूषा कोण ठरवतं कुणास ठाऊक. एका प्रसंगात चौकोनी बीट मारलेले काळे लेदरचे जाकीट घालून शिवाजी तलवारबाजी करताना पाहणे म्हणजे, जगदंब जगदंब. विजापुरात चामड्याच्या ढाली आणि चिलखते ठेवली आहेत ती तरी पाहायची. शिवाय प्रत्येकाचा, मग तो साधा मावळा का असेना, फेटा म्हणजे रंगीत; जरीचा काठ अगदी मोजुन मापून समोरून घेतलेला एकाच छापातून काढलेला फेटा. सगळ्याचे कपडे नुकतेच ड्रायक्लीन करून आल्यासारखे चकचकीत. मग एखाद्या धनगराचा का वेष असेना. घोंगडं आत्ताच यंत्रमागातून काढल्यासारखं! जिजाऊ कायम शंभर दीडशे लामणदिवे जळत असलेल्या दालनात नाहीतर प्रतितुळजाभवानीच्या समोर. दालने पण चांगली १०० बाय १०० फुटांची.

तलवारबाजी आणि शस्त्रकला -

' साहसदृश्ये - अकबर शरीफ ' बरा म्हणावा इतकी हा जो कोण बबू खन्ना आहे त्याची साहसदृश्ये वाईट आहेत.

मला शिवपटांमध्ये तालवारबाजीचे दोन ठळक प्रवाह दिसतात. एक म्हणजे भालजी पेंढारकर इत्यादी कोल्हापूरकरांनी सध्या प्रचलित 'शिवकालीन शस्त्रकलेचा' वापर करून चित्रित केलेली तलवारबाजी.हा म्हणजे कोरिओग्राफ्ड डान्सच होता असं वाटतं! हे नाटकाबिटकात ठीक आहे, कलात्मक मूल्य म्हणून. चित्रपटात कायतरी व्हरायटी द्या (हे शिकवणारे पण आहेत आजकाल) दुसरे म्हणजे ३०० ची भ्रष्ट कॉपी तलवारबाजी. अर्थात मला दोन्ही तलवारबाज्या हास्यास्पद वाटतात.

प्रत्यक्ष युद्धात कशी तलवारबाजी केली जायची हे चित्रपटात साकारणे अवघड आहे हे मान्य. परंतु तलवारबाजीतले सगळे थ्रीलच ह्या गाढवांनी घालवून टाकले आहेत.
'१३ असासिन्स' माझा अतिशय आवडता समुराईपट आठवला. बाबौ! काय ती तलवारबाजी आणि त्यातले वैविध्य! हेसुद्धा अतिशयोक्त आहेच परंतु तलवारबाजी कशी चित्रित करावी आणि तलवारबाजी करताना साऊंड डिझाईन कसे करावे याचा जबरदस्त नमुना! काही प्रसंगात तर तलवारबाजी करून थकलेल्या/थकत चाललेल्या लोकांच्या धाप लागण्याचे आवाजसुद्धा स्पष्ट ऐकू येतात. शिवाय युद्धात अशी मोठी तलवारबाजी करताना काही विशिष्ट आवाज काढून कण्हणे वगैरे इतर बारीकसारीक गोष्टींचा विचार खास जपानी मेटिक्यूलसनेस! वेशभूषा सुद्धा एकदम तंतोतंत.

ड्युएलिस्ट्स नावाचा रिड्ले स्कॉटचा चित्रपट आहे त्यातून किंवा जपानी चित्रपटांतून तलवारबाजांचे द्वंद्व प्रत्यक्षात कसे असावे हे कळते. नाहीतर मराठी चित्रपट पाहून हे तल्वारबाजी करताहेत की कोळीनृत्य हेच कळत नाही.

जाम आवडलेला प्रतिसाद!

नाहीतर मराठी चित्रपट पाहून हे तल्वारबाजी करताहेत की कोळीनृत्य हेच कळत नाही.

Biggrin Biggrin Biggrin

----------
वेशभूषा, घटना आणि तपशील - ह्यासाठी मला हिंंदीत "लाल कप्तान" प्रचंड आवडला होता.

विषय संवेदनशील असल्याने फारच संयमानं लिहावं लागतंय. वेषभूषा, अभिनय, लढाई वगैरे सर्वच ठिकाणी सुमारपणा आहे.

जबरी डिसेक्शन . हसून हसून मेलोय.

माझ्या एका काही अंशी गोऱ्या, अमेरिकी मैत्रिणीच्या घरी बाहुबलीचं पोस्टर बघून मी दचकले होते. तिच्या बऱ्या अर्ध्याला म्हणे बाहुबली आवडतो.

आणखी एक तरुण मुलगा मला आरारार बघायला सांगत होता. मी तो अजूनही बघितलेला नाही (खरं तर हिंमत होत नाही). तर तो रस्त्यात येताजाता भेटला की 'बघितला का आरारार' म्हणून चौकशी करतो. आणि मी नाही म्हणाले की निराशेनं मान हलवतो.

असं काही मी म्हणू नये. एके काळी मीही आर्नोल्डचे मारधाड सिनेमे हौसेने बघायचे. अजूनही टीव्हीवर दिसला की मी थांबून दोन-चार सीन बघतेच. 'ट्रू लाईज' माझा अत्यंत आवडता आहे. आणि 'टोटल रिकॉल'ही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वय झाले म्हणायचे.

एके काळी मीही आर्नोल्डचे मारधाड सिनेमे हौसेने बघायचे. अजूनही टीव्हीवर दिसला की मी थांबून दोन-चार सीन बघतेच.

मग हा सीन पाहा आणि आयकँडी म्हणून आर्नोल्डपेक्षा ज्यु. एनटीआर चांगला आहे का ते ठरवा, म्हणजे सिनेमा पाहायला हुरूप किंवा अनुत्साह मिळेल.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आधीच पुरुषांना मोठं व्हायला वेळ लागतो. त्यात तुम्ही लहान मुलं दाखवा! अहो, तुमच्यासारखे मित्र असल्यावर...

अपडेट - बघितला तो सीन. वरवर पाहता तो विनोद असावा असं वाटलं नाही. अपेक्षा काय आहे नक्की?

आर्नोल्डचे सिनेमे मी अर्थातच मांसाच्या प्रदर्शनासाठी बघायचे. सदर इसमाकडे तितपत मांस नाही. आणि असल्या डायलॉगांसाठीही, तेही काही तुम्ही दाखवत नाही.
Total Recall -
You are not you, you are me!
Get your ass to mars

Commando -
My left hand is weak.

Red Sonja -
Don't drink and bake

True Lies -
You're fired.

एक वेळ ८०च्या दशकांतला टॅकीपणा आणता येणार नाही, पण विनोद किंवा डायलॉगबाजी दाखवा! तसं काही जमत नसेल तर 'बॉलिवूड वाईव्ह्ज'च्या दुसऱ्या सीझनच्या शेवटचा भागात रणवीर सिंग कसा, 'बघा मी मांसाचं दुकान आहे, माझं वस्तुकरण करा' म्हणत नाचून दाखवतो, तसा नाच दाखवा!

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ऐसीअक्षरेवरील नाक मुरडणाऱ्या चार दुढ्ढाचार्यांच्या प्रतिक्रिया या - सर्रास हिणवणे - इतक्या मोठ्या नाहीत हो.

आरआरआर चित्रपटातील वीएफएक्स इफेक्ट्ससाठी ब्लेंडर या ओपन सोर्स सॉफ्टवेअरचा वापर केला आहे. इतक्या मोठ्या व्यावसायिक गुंतवणुकीसाठी ब्लेंडरचा उपयोग होण्याचा ही पहिलाच प्रसंग आहे. खालील दुव्यावर याबाबतची आणखी माहिती वाचता येईल

https://www.blender.org/user-stories/visual-effects-for-the-indian-block...