""श्रीमंत" लोक कसे रहातात"

"श्रीमंत" लोक कसे रहातात : खूप महाग
व्हिस्कीचा शेवटचा घोट संपल्यावर ते
फ्रिजमध्ये अर्धवट राहिलेला बुंदीचा लाडू
मधुमेहाची चिंता न करता खातात. आयुष्यात
एखादी काळी , विशेष उर्जावान, विशेष पसरट
रुंद पार्श्वभागाची स्त्री भेटावी असे त्यांचे स्वप्न असते. हे
कधीच पुरे होत नाही ,आणि यातून
पैशाने सर्वकाही मिळतेच असे नाही ही उक्ती सिद्ध होते, पण
ते सोडा. आयुष्य कंटाळवाणे न होऊ देणे
हे त्यांचे सर्वस्व असते. रात्री एकटेच गाडीत बसून ते दूर दूर
अशा जागी जातात जिथे एक दिव्याच्या अजस्त्र
बिल्डिंगबाहेर उतरल्यावर परग्रहावर आल्याचा
भास होतो (अनुभव येतो?). ते त्या बिल्डिंगच्या रिसेप्शनची
घंटी वाजवितात: "आतून" बराच काळ कोणीही येत नाही.
बऱ्याच काळाने "जे' येते ते सांगण्यासारखे नाही. कंटाळा
दूर होतो हे निश्चित. त्याची किंमत काय असते ते
सांगण्यासारखे नाही. मधुमेहाची चिंता न करता
ते उरलेला बुंदीचा लाडू खातात. श्रीमंत लोकांचे विशेष हक्क
त्यातून सिद्ध होतात. एखाद्या शेअरवर करोडो रुपये लावून
हृदयाच्या धडधडत्या अवस्थेत ते दिवसातले अनेक तास
का घालवितात याचे उत्तर त्यात मिळते.
आपण अफाट श्रीमंत नाही
याबद्दल आता देवाचे आभार माना .
xxx

field_vote: 
0
No votes yet