माणूस माणूस म्हणतात मला

अंधार कोसळे जगावरी या
दिवस दाटूनी येती.
बिळामध्ये लपावे लागते आता
कुणी न दिसें भुवरती..

एकेकाळी जो वावरला वाऱ्यावरती
तो गर्व गळूनी गेला.
जीव जपावे लागे आता
श्वास श्वास मोजूनी..

बेफिकीरीही पडेल भारी
असे कधी वाटले का हो कोणा??
माणूस माणूस घाबरे आता
एकमेकांस बोलण्या...

चेहेरा निम्मा झाकोनी तो दिवस कंठीतो आता
कधी दूर होईल हे सावट तर्क करितो बहुधा
आप्त गमावतो तेव्हा अश्रू टाकतो पिऊनी
शिव्या शाप येती मनी पण नक्की कोण तयांचा धनी

व्याकुळ होतो मनी तेव्हा
आठवे तो देवाला
पण तो आजवरी कुणासही
सहजे ना गवसला...

मग तसाच बसतो दिवस कंठीतो
जे आजवरी केले.
येणाऱ्या दिवसा जसे जमेल
तसें सामोरे गेले.

कोसळणाऱ्या अंधारातही दूर दिसें कवडसा
तोचि त्यास पुरे आता
तो काळोख दूर करण्या..
त्याची करुनी तलवार उभा तो तिमिरात ठाकला
तो वीर मनीचा साहस करुनी आज परत गवसला...

मग आता भीती कशाची
मी स्वतःस परत मिळवले
आतापर्यंत असे युद्ध मी कितीदा जिंकले..
आताही परत जिकिंन मी हे माझे मलाच समजले
मी वीर मनीचा साहस करुनी संकटास झेलले

माणूस माणूस म्हणतात मला
तो हाच मी रे एकटा
किती आले ह्या भुवरती आणि किती गेले
सर्वांना पुरुनी उरलो एकटा....
सर्वांना पुरुनी उरलो एकटा...

14May2021

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आशावादी कविता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********

पांघरसी जरी असला कपडा - येसी उघडा, जासी उघडा |
कपड्यांसाठी करीसी नाटक - तीन प्रवेशांचे ||