"जाड जाहले बूड "

जाड जाहले बूड
सांभाळा ते धूड
हृदयावरती सूड खास हा
हृदयावरती सूड !

बस ती चुकली
गाडी हुकली
शयनगृहातिल प्रणयाराधनी
जाईल सारा मूड ,
सांभाळा ते धूड!

रक्तवाहिन्या अती सूक्ष्म त्या
पौंडामागे दोन मैल त्या
सोपे नाही रक्त ढकलणे,
(संपावरती जाईल ना ते !)
घेईल तेही सूड !

सांभाळा ते धूड, मित्रहो
सांभाळा ते धूड!
xxx

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

शीर्षकावरुन आठवले. पूर्वीच्या दूरदर्शनवर एक ' घेर बेठां ' नामक कार्यक्रम असे. त्याला आम्ही गंमतीने आम्ही 'घेर मोठां ' म्हटल्यावर आमचा एक गुजराती मित्र सातमजली हंसला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

नाहीतर आयुष्याला लागेल चूड.

ही हा!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0