शेजारच्या काकूंना पातळ शी झाली.

(खडकी, तारीख आजची.)

आता, झाली तर झाली; त्यात तसे विशेष असे काहीच नाही. होते प्रत्येकालाच आयुष्यात, कधी ना कधी. मुद्दा तो नाही. झाली म्हटल्यावर, काकूंनी तसे स्टेटससुद्धा (सचित्र) अपडेट केलेनीत, फेसबुकावर. (हो! तमाम दुनियेस त्वरित समजावयास नको?) तेदेखील सामान्यच; जनरीतच आहे तशी. परंतु, चारचौघे जे करतात, केवळ तेवढ्यावरच थांबतील, त्या काकू कसल्या? फेसबुक इज़ सो… डाउनमार्केट, यू नो!

म्हणून मग काकूंनी ‘ऐसीअक्षरे’ नावाचा एक (स्वतःसच) उच्चभ्रू म्हणवणारा प्रकार गाठला, नि तेथील आपल्या पडीक पार्टटाइम-वार्ताहर-पार्टटाइम-भिकार-मृत्युलेखक-(नि कदाचित पार्टटाइम-दिनवैशिष्ट्यलेखक-सुद्धा (चूभूद्याघ्या.)) पित्थ्यांस पकडून या बातमीस साजेशी प्रसिद्धी देण्याबद्दल तंबी दिली, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. (डिस्क्लेमर: आम्ही कोणावरही विश्वास ठेवतो.)

==========

(आगामी आकर्षण: शेजारच्या काकांना जोरदार वारा सरला. डेटलाइन: शनवार पेठ.)

#ifyoucantbeatthem

#newsyoucanuse #शेजारच्याकाकाकाकूंनातिलांजली #ऐसीमेरीतक़दीरकहाँ

#शेजारच्याकाकाकाकूंनाआवरा

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

"शेजारचे काका-काकू विशेषांक" काढण्याचा गांभीर्याने विचार करावा. हा महत्वाचा विषय समर्थपणे हाताळणार्‍या सृजनशील लेखकांत दिवसेंदिवस पडणारी भर आश्वासक आहे.

जाहिरात - जुना एसी त्वरित बदला आणि आमचा नवीन घ्या.
दोन वर्षांत बदलावासा वाटण्याची ग्यारंटी.
ही जाहिरात पाहायची नसेल तर ** इथे क्लिक करा. ■

पुढे वाचण्यासाठी इथे ■ क्लिक करा.

पुणे परिसरातील इतर बातम्यांसाठी ■ इथे क्लिक करा.

अशाच काकाकाकूंच्या अडचणी समजण्यासाठी ■ इथे क्लिक करा.

अशा बातम्या unsubscribe करण्यासाठी ■ इथे क्लिक करा.

बीपी यंत्र भाड्याने मिळेल.

कायम सुख चूर्ण हमखास वारासारक चूर्ण. वाजवी भावात. मध्य प्रदेशातील चित्रकुट पर्वतावरील वनस्पत़ीपासून बनवलेले मिळेल. नावाजलेले.