शेजारच्या काकूकाकांनी केसावरून गाठला स्वर्ग

कोथरूड, १२ फेब्रुवारी

शेजारच्या काकांना साबुदाण्याची खिचडी खूपच आवडते. "माझ्याएवढी साबुदाण्याची खिचडी कुणालाच आवडत नाही,?" असं काका संध्याकाळी कॉलनीतल्या मुलांना सांगत होते. दर शनिवारी संध्याकाळी काका साबुदाण्याची खिचडी करतात. "आपल्याकडे पाहुणे बोलावायचे तर ते शनिवारी संध्याकाळीच" असंही काकांनी ठरवून टाकलं आहे.

खिचडी

काकांचं खिचडीवरचं प्रेम बघून शेजारच्या काकूंनी त्यांना खिचडी करायलाही शिकवली आहे. अशाच एका शिकवणीसत्रानंतर त्यांना खिचडीमध्ये केस सापडला. केस कुणाचा यावरून काका-काकूंनी चिकार खल केला. केस लहान असल्यामुळे तो काकांचा आहे, अशी शंका पाहुण्यांनाही आली असती. पण काकू खूप शिकलेल्या आहेत. काकू म्हणाल्या, "कशावरून हा केस काकांचाच आहे? माझे केस गळतात; आणि मी आजवर पूर्ण टकली झाले नाही याचा अर्थ मला नवीन केस येतात. हे नवे केस आधी लहान असतील आणि नंतर लांब होतील. अशा एखाद्या तरुण केसांपैकी कुणी अकाली वृद्ध होऊन गळला नसेलच याची काय शक्यता किती? तर काकांच्या डोक्यावर किती केस आहेत ते मोजावं लागेल; आणि मग माझ्या डोक्यावर किती तरुण केस आहेत ते मोजावं लागेल; त्यावरून काकांच्या डोक्यावरचा केस होता का माझ्या, याची निव्वळ शक्यता वर्तवता येईल. या केसाचे डीएनए तपासल्याखेरीज हा केस कुणाचा हे ठामपणे सांगता येणार नाही!"

काकूंचा हा पवित्रा बघून काकांना अभिनव कल्पना सुचली. काका काकूंपासून फक्त दोन फूट अंतरावर आले आणि म्हणाले, "तू नेहमी माझ्या बाजूनं बोलतेस, नेहमीच माझी बाजू घेतेस आणि आता मला खिचडी करायलाही शिकवली आहेस. तर पुन्हा केसांवरून स्वर्ग गाठण्याची सोय परक्या कुणाला मिळू नये म्हणून मीही आता माझे केस तुझ्याएवढेच लांब राखणार आहे. तुझ्या केसांसारखेच दिसण्यासाठी मी माझ्या केसांना रंग लावून काळे करायला सुरुवात करणार आहे. म्हणजे पुढच्या वेळेस कुणाचा केस यावरून जे काही होईल, त्यात तुला माझ्या बाजूनं एवढं तुंबळ युद्ध करावं लागणार नाही." असं म्हणून शेजारच्या काकांनी काकूंच्या दोन पिना आपल्या केसांमध्ये अडकवल्या.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

प्रतिक्रिया

अशा काका काकुंचं आयुष्य ( ६५+बहुतेक) कसं असतं हे डोकवायची संधी मला मिळाली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते एकाच घरातले काका आणि काकू आहेत की तेही एकमेकांचे शेजारी आहेत यावर आजच्या व्हॅलेंटिन दिनाचे महत्व अवलंबून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आनंद आहे. एकमेकांना तुडवण्याची ( भावनिक, मानसिक) इच्छा तरी दिसत नाही.
भांडणं लुटुपुटुची आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

केस म्हटल्यावर तो डोक्यावरचाच का? केसांचे उगमस्थान अन्य ठिकाणी असू शकत नाही काय? केसाचा आकार व तंतुजन्यता यावरुन डिटेक्टिव कथेतील एखादा जासूस त्याचे उगमस्थान नक्कीच शोधून काढू शकेल. केस तो शेवटी केसच मग तो इथला काय अन तिथला काय? असा युक्तिवाद काही जण करु पाहतील. पण तो फसवा आहे. तुम्हाला मग रत्नागिरी हापूस, देवगड हापूस, लंगडा,तोतापुरी अशा स्थानमहात्म्य असलेल्या आंब्याचा भाव एकच असतो का? आंबा तो आंबा मग तो इथला काय आन तिथला काय? असे म्हणुन चालत नाही. थोडक्यात जिओटॅगला महत्व आहेच.
एक प्रयोग करा. एक केस घ्या. तूर्तास त्याच्या उगमस्थानाचा विचार करु नका. त्याचे एक टोक डाव्या हाताच्या चिमटीत पकडा. उजव्या हाताच्या आंगठा व मधले बोट यांच्या नखांमधे पकडून तो घट्टपणे खालपासून वरपर्यंत खर्रकन ओढा. एक स्प्रिंग तयार होईल. आता केसांचे उगमस्थान बदलून दुसरा एखादा केस घ्या. त्यावर हाच प्रयोग करा. त्यातील तंतुजन्यता पहा. त्यातून केसांचे उगमस्थान व तंतुजन्यता याचे एक समीकरण तयार होईल. ते मनातच ठेवा.
अवांतर- डीएनए चाचणीसाठी केस घेतल्यास त्याचे उगमस्थान कोणते यावर त्याचे रिझल्ट अवलंबून नसतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

"कशावरून हा केस काकांचाच आहे? माझे केस गळतात; आणि मी आजवर पूर्ण टकली झाले नाही याचा अर्थ मला नवीन केस येतात. हे नवे केस आधी लहान असतील आणि नंतर लांब होतील. अशा एखाद्या तरुण केसांपैकी कुणी अकाली वृद्ध होऊन गळला नसेलच याची काय शक्यता किती? तर काकांच्या डोक्यावर किती केस आहेत ते मोजावं लागेल; आणि मग माझ्या डोक्यावर किती तरुण केस आहेत ते मोजावं लागेल; त्यावरून काकांच्या डोक्यावरचा केस होता का माझ्या, याची निव्वळ शक्यता वर्तवता येईल. या केसाचे डीएनए तपासल्याखेरीज हा केस कुणाचा हे ठामपणे सांगता येणार नाही!"

चूक! हा केस शेपटीचा आहे. घरातली मांजर खिचडीवर बसली होती, किंवा कसे, ते तपासा आधी!

(एलेमेंटरी, माय डियर चडफडकर!)

----------

(टीप: काकाकाकूंपैकी कोणास - अथवा दोघांसही - शेपटी असल्यास मंडळ जबाबदार नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाताबाहेर चाललीय काकांची
की काकूंची?
की दोघांची?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गॉन केस आहे.

असो चालायचेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छायाचित्र नीट निरीक्षिले. दोन्ही बशांतील खिचड्यांत केस आढळला नाही.

कदाचित, (छायाचित्र काढण्यापूर्वी) केस काढून टाकून दोन्ही खिचड्या पाहुण्यांस खाऊ घालण्याचा इरादा असावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याला मराठीत वाडगा, कुंड्या किंवा बाऊल म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

त्यातल्या खिचडीमुळे त्याला अगदी ' वाडगंमायशोभा' आली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तो वाडगा आहे होय? छायाचित्रात त्याची खोली जाणवली नाही.

परंतु, ते सोडा. चित्रात केसाची विल्हेवाट कशी आणि का लावलीत, ते सांगा आधी. विषय बदलू नका!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एवढाच उद्देश असतो म्हाताऱ्यांचा. पटकन काढून टाकला आणि पदार्थ खाल्ला यास महत्त्व नसते.
----
बशीचा आकार - -
खिमट ( पॉरिज) खाण्यासाठी बनवलेला आकार आहे. काही जण या आकाराची पितळी परात वापरतात. पेण,अलिबागकडे यामध्ये पोहे ( साधे कच्चे) टाकून त्यावर चहा ओततात आणि चहापोहे खातात अजूनही. किंवा चहापोळीसुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेजारच्या काकाकाकूंच्या कुठल्याच गोष्टींना खोली असेल अशी अपेक्षा रास्त नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण सध्याची अगाथा ख्रिस्तीही होत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला अगाथा ख्रिस्ती अतिशय बोअर वाटायची. दोनशे पानांचे जर पुस्तक असेल, तर शंभरावे पान उलटले, तरी हिचे आपले पात्रपरिचय, वातावरणनिर्मिती वगैरे दळण अजून चालूच असायचे. कंटाळा यायचा, नि पेशन्स सुटायचा. नि मग, सरळ एकशे नव्व्याण्णवाव्या पानावर जाऊन अखेरीस या सगळ्या रामरगाड्यातून नेमके निष्पन्न काय होते (The butler did it!), ते जाऊन तपासून ‘हुश्श!’ म्हणण्याची घाई अनावर व्हायची. आणि, एकदा ते जर केले (किंवा करावेसे वाटले), तर मग मजा काय राहिली?

—————

त्याउलट, आमचा वुड्डहौससाहेब प्रचंड आवडायचा. विनोदी तर होताच, परंतु तेवढेच कारण नाही. सर्वप्रथम, पुस्तक दोनशे पानांचेच, परंतु, सुरुवातीस पात्रपरिचय, वातावरणनिर्मिती वगैरेंत दीड ते दोन पाने – अगदीच गंगेत घोडे न्हायले, तर तीन पाने – यांहून अधिक तो कधीही खर्ची करीत नसे. आणि त्यानंतर मग सरळ प्लॉटच्या कोलांट्याउड्यांना सुरुवात व्हायची. पात्रांना येनकेनप्रकारेण एकाहून एक अशक्य गोत्यांत अडकवून, शेवटी मग काहीही करून सुटका करायची, हा कथेचा एकंदर स्थायीभाव. त्यात परत विविध प्रसंगी केवळ वुड्डहौसच करू शकेल असे पात्रांच्या तात्कालिक विचारप्रक्रियांचे विश्लेषण. मजा यायची. आणि त्यात पुन्हा, अखेरीस हे सगळे कसे संपते, हे तपासून पाहायची अजिबात घाई होत नसे. कारण, अखेरीस काय घडते, हे तसेही महत्त्वाचे नसायचेच मुळी. वुड्डहौससाहेब अखेरीस येनकेनप्रकारेण प्लॉटला God’s in His Heaven, All’s right with the world या अवस्थेपर्यंत पोहोचवणार आहे, याची आगाऊ खात्री असायची. तेथे पोहोचविण्यापूर्वी तो पात्रांना कोणकोणत्या अग्निकंकणांतून उड्या मारायला लावतो, याबद्दल खरी उत्सुकता असायची. त्यात खरी मजा असायची. It used to be the journey, and not the destination, that was important. And enticing.

—————

तर, सांगण्याचा मतलब:

१. अगाथा ख्रिस्ती मला बोअर वाटायची.

२. लेखिका यातून काही हिंट घेईल, तर शपथ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला त्यांच्या कथेमधील 'जेन मार्पल' हे पात्र रोचक वाटते. एका लहान गावात, एकटी रहाणारी वृद्ध स्त्री. पण आजूबाजूच्या घडामोडींबद्दल जागरूक असणारी. कुठलीही घटना घडली, की तिला तशीच दुसरी कुठली घटना किंवा व्यक्ती आठवते. मानसशास्त्राचा गंध नसलेली, परंतु मानवी व्यवहार, वर्तन, आणि नातेसंबंध याची अचूक जाण/माहिती तिला असते. आणि त्या आधारावरच घटना, परिस्थिती आणि संबंधित पात्रे यांची संगती लावून ती केस सोडवते.

पण कथा संथगतीने पुढे सरकते हे बरोबर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

काकांनी पटकन तिथल्या बुककेस मधे ठेवलेला चष्मा डोळ्यांवर ठेवून, केस विंचरले असते (कंगव्याने) तर.. अशी वेळ आलीच नसती.
काकु समजुतदार म्हणुन केस घटस्फोटापर्यंत गेली नाही. समजा काकुंनी रागाने सुटकेस मधे कपडे कोंबुन (हिंदी पिक्चर मधल्या हिरवीणीसारखी) बाहेरची वाट धरली असती म्हणजे मग?
काकांना केसकर वकीलांना फोन करावा लागला असता. आणि शेजारच्या केसरकर काकु म्हणाल्या असत्या.."मला वाटलच होते असे होणार.पर्वा केशरी भात करण्यासाठी साधे केशर मागीतले तर म्हणते कशी.. काश्मीरची तिकीटे काढायची आहेत. तिकडे जाऊन आले की देईन. आगऊच आहे, हं, आता म्हणत बस म्हणावे केसरिया बालमा..."

पण काकुंचे माहेर केसनंद इंडस्ट्रीजच्या परिसरात असल्याने त्या शहाण्या आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

समजा काकुंनी रागाने सुटकेस मधे कपडे कोंबुन (हिंदी पिक्चर मधल्या हिरवीणीसारखी) बाहेरची वाट धरली असती म्हणजे मग?

मग ही ष्टोरी छापून आली नसती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण ष्टोरी काही वाईट नाही हं !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

Paperback येणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तशी पुस्तके आली जरी, तरी मी तरी इथेच फुक्कट वाचणार.

लेखिकेनेच तशी सोय करून दिली आहे.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

फक्त विद्वान लोकात होतात.फक्त वाचन खूप पण अनुभव झीरो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राजेश, तुम्हाला हे विनोद बहुतेकदा बरोबर समजतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.