हाऊ टू गेट पेड फॉर यू आर वर्थ

परवाच एका मित्राच्या सांगण्यावरुन, मी अ‍ॅमेझॉनवरुन पुढील पुस्तक मागविले - "हाऊ टू गेट पेड फॉर यू आर वर्थ". पुस्तक अजून घरी यायचे आहे. मित्राने पुस्तक चाळले आहे आणि त्याला प्रथमदर्शनी खूप आवडले. या पुस्तकाच्या संदर्भात त्याने मांडलेले मुद्दे अर्थात त्याला का आवडले त्याची कारणे पुढीलप्रमाणे- एक तर पुस्तक वाचनीय आहे तसेच वाचायला सोप्या भाषेत आहे.
पुस्तकात लिहीलेले मुद्दे पुढीलप्रमाणे -
(१) जेव्हा तुमचा एम्प्लॉयर (मालक) तुम्हाला नोकरी देतो तो कमी पगारच नेहमी ऑफर करतो.
(२) खुद्द एम्प्लॉयरची तुमच्याकडून ही अपेक्षा असते की तुम्ही पगार वाढवून मागावा.
(३) तुमचा वेळ, तुमच्याकरता किती महत्त्वाचा आहे, तसेच कंपनीच्या तुम्ही किती उपयोगी पडू शकता याची सुयोग्य जाणीव ठेऊन तदनुसार तुम्ही पगार वाढवून मागावा हीच अपेक्षा असते.
(५) तुम्ही ज्या रीतीने "निगोशिएट" करता त्यातून तुमचे "सॉफ्टस्किल्सच (कौशल्य) दिसून येतात.
(६) सांगीतलेला पगार जसाच्या तसा स्वीकार करणे हे अपेक्षितच नसते.किंबहुना एका सर्व्हेअंती असा निष्कर्ष काढण्यात आला की जे एम्प्लॉयी (कर्मचारी) पगार वाढवून मागतात त्यांच्याकडे अधिक सकारात्मक दृष्टीकोनातून पाहीले जाते.
_____________________________________

वरील सर्व माहीती इतक्या वर्षांच्या अनुभवानंतरही माझ्यासाठी नवीनच होती. कारण आपलं काय होतं, नवीन नोकरी लागते वेळी उतावळेपणा, असुरक्षितता नडते. मग एम्प्लॉयर सांगेल ती पूर्वदिशा या न्यायाने देतील तो पगार आपण आनंदाने स्वीकारतो. पुढे प्रत्येक कंपनी बदलताना आधीचा पगार विचारतात. आणि मग पगारवाढ अक्षरक्षः गोगलगाईच्या गतीने होते.
______________________________________
हे पुस्तक वाचण्याची खूप उत्सुकता आहे. पण त्याचबरोबर ही भीतीदेखील वाटते की न जाणो हे पुस्तकदेखील १०० पानात तुमची विचारप्रणाली बदलण्याची हमी घेणारे "क्विक-फिक्स गिमिक" पुस्तक तर नसेल? म्हणजे काही उपयोगी टिप्स मिळाल्या तर हव्या आहेत पण अतिरंजित पॉझिटीव्हीटी (सकारात्मकता) प्रवचन देणारे नको. जरा कॉमन सेन्स असलेल्या टिप्स असाव्यात.
सध्या तरी पुस्तकाची वाट पहाते आहे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान हो सारिके. निवॄत्त होऊनच ह्यांना २५ वर्षे झाली.तेव्हा हे काही वाचणार नाहीत. मी तर नाहीच म्हणा.सध्याची पिढी अशी पुस्तके वाचते आहे ह्याचेच आम्हाला कौतुक. हे पूर्वी जे एकदा नोकरीला चिकटले ते चिकटलेच -निवॄत्त होईपर्यंत.अर्थात संधीही कमी होत्या म्हणा.
काम नेकीने केले की पगार चांगला मिळतो एवढेच आपले माहित आम्हाला.
(थोडा काळ नोकरी केलेली) रमाबाई.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वेगळा विचार आहे. मात्र फारसा पटत नाही.
प्रत्यक्षात आपण कोणाचे अप्रेझल करत असू आणि त्यात कोणी पगार वाढवून मागितला तर हे 'ऑट ऑफ स्कोप' आहे असे सांगतो Wink

आता आपण आपल्या घरातल्या धुणीभांडीकरणार्‍या मावशींनी पगार वाढवून मागितला तर त्यांना अधिक योग्यतेच्या समजतो का? नाही ना? प्रसंगी वैतागतोच. तसेच आहे हे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उलटी बाजू सांगणारी पुस्तकं येणार नाही. शेवटी मालक जात अल्पसंख्य, ते लोकं थोडेच अशी पुस्तकं वाचणार आहेत. ते शेवटी आपलं तेच खरं करणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण अदिती मालक देखील कधीतरी नोकराच्या भूमिकेतून गेलेला असतो.

दुसरं म्हणजे "विन-विन सिचुएशन" म्हणून काही असू शकते. शेवटी मालकालाही आपली तितकीच गरज असते हेही खरेच.

तेव्हा आपल मुद्दा आपल्याला प्रथम आणि मग मालकाला कसा पटवून द्यायचा ते शिकवणारी अनेक पुस्तके बाजारात आहेत त्या पठडीतील पण ऋषीकेश म्हणतात त्याप्रमाणे किंचीत वेगळा मुद्दा मांडणारे पुस्तक अशी माझी तरी अपेक्षा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0