हे विनोद कोणाचे ?

नमस्कार,

दोन विनोद आहेत.

1. एका माणसाला रस्त्यात गाढव मरून पडलेले दिसते. तो ताबडतोब महानगरपालिकेला फोन करतो. तिकडून उत्तर येते," अहो, अशी बातमी आधी नातेवाईकांना कळवायची असते".
तो माणूस म्हणतो," म्हणूनच तुम्हाला फोन केला".
2. एक अंत्ययात्रा निघालेली असते. यात्रेत नसलेल्या माणसाचा धक्का लागून प्रेत खाली पडते. यात्रेत सामील असलेलेली माणसे लगेच त्या माणसाच्या अंगावर धावून येतात व वादावादी करू लागतात. तो माणूस म्हणतो," अहो, जो खाली पडला आहे तो काहीच बोलत नाही. तुम्ही कशाला आरडाओरडा करत आहात ?"
हे विनोद मी लहानपणापासून साधे म्हणून ऐकलेले आहेत. त्याचबरोबर आचार्य अत्र्यांनी केलेले म्हणूनही ऐकलेले आहेत. म्हणजे, पहिल्या विनोदात फोन करणारा माणूस म्हणजे अत्रे. दुस-यात ज्याचा धक्का लागला तो माणूस म्हणजे अत्रे.

हे विनोद कोणी केले असावेत ? अत्रे की दुसरे कोणी ?
अंदाज व्यक्त करा किंवा खात्री असल्यास सांगा.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

दुसऱ्या विनोदाचे कर्ते अत्रे नव्हेत. अत्र्यांनी राम गणेश गडकरी (ज्यांना अत्रे गुरू मानत ) यांच्या हजरजबाबीचे उदाहरण म्हणून अत्र्यांनी सांगीतले आहेत. गडकऱ्यांनी हा विनोद केला असे अत्र्यांच्या हवाल्याने म्हणता येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

> तो ताबडतोब महानगरपालिकेला फोन करतो. तिकडून उत्तर येते," अहो, अशी बातमी आधी नातेवाईकांना कळवायची असते".

महानगरपालिकेतला माणूस जे म्हणतो त्याचे दोन अर्थ होऊ शकतात:
(अ) मृताच्या नातेवाईकांना
(ब) फोन करणाऱ्याच्या नातेवाईकांना

मला वाटतं फोन करणारा माणूस (अ) हा अर्थ धरून चालतो, पण महानगरपालिकेतल्या माणसाला (ब) हा अर्थ अभिप्रेत असतो. अशा गैरसमजुतीतून झालेला हा विनोद आहे, तेव्हा बहुतेक चिविंचा असणार. पण हा माझा अंदाज झाला. खात्री नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

रस्त्यात जर गाढव मरून पडलेले असेल, तर त्यात फोन करणाऱ्याच्या नातेवाईकांना कळविण्यासारखे नक्की काय आहे?

काहीही हं, चिपलकट्टी!

(आणि, यावरून तो विनोद चिंविंचा नक्की कसा ठरतो? बोले तो, चिंविंचाच कसा? मिरासदारांचा, वुडहौससाहेबांचा, किंवा हरिशंकर परसाईंचा कशावरून नाही?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0