एकदा

अक्षयाचा डोह भरुनी
वाहतो जेथे सदा
सांडवा तिथला कुठे ते
सांगशिल का एकदा?

अद्भुताचा ढग निळा
ओथंबतो जेथे सदा
बरसतो केव्हा, कुठे ते
सांगशिल का एकदा?

नीरवाचा घुंगरू बघ
रुणझुणे येथे सदा
सातही स्वर वर्ज्य तरिही
ऐकशिल ना एकदा!

field_vote: 
0
No votes yet