एक किस्सा - दगड आणि खड्डे

तसा मी 'कॉलेज' (रूढार्थाने) जिवनाचा फार काही उपभोग खर्‍या अर्थाने घेउ शकलो नाही, पॉलीटेक्नीक मध्ये शिकलो मी. आमची शाळा तांत्रिक शाळा असल्यामुळे, शाळेच्या अलिखित परंपरेप्रमाणे १०वी नंतर डिप्लोमाला, भागुबाई मफतलाल पॉलीटेक्निकला, अ‍ॅडमिशन घेतली... घेतली म्हणजे मिळाली. हे पॉलीटेक्निक मुंबैच्या टॉप ३ पॉलीटेक्निक मध्ये मोडत असल्यामुळे व्यवस्थापन त्याच्या 'प्रतिमे'साठी फार जागरूक होते. त्यामुळे नियम फारच कडक होते. कॅन्टीनमध्ये सिग्रेटी फुंकायला मनाई होती. तसेच नविन वर्ष चालू झाले की सगळे HOD कॅम्पसमध्ये फिरत असायचे, रॅगिंग होऊ नये म्हणून. असे बरेच काही कडक वातावरण. बाकीच्या नियमांचे मला काही देणे घेणे नव्हते फक्त ते सिग्रेटी कॅन्टीनमध्ये फुंकायला बंदी हे जरा जाचक होते. सिनेमात बघितल्याप्रमाणे कॉलेजात जाऊन काहीतरी 'वेगळे' असे करायचे ह्या स्वप्नाला तडा बसला.

'गरज ही शोधाची जननी असते' असे कायसे म्हणतात त्याप्रमाणे शोध घेतला, नव्हे घ्यावाच लागला, तेव्हा कळले की पॉलीटेक्निकच्या कूपर हॉस्पीटलच्या बाजूला एक बस स्टॉप होता. जुना असल्याने त्यावर बसेस थांबायच्या नाहीत (तसेच होते का नक्की ते आठवत नाही आता). पण हा बस स्टॉप भागुबाईच्या विद्यार्थ्यांचा सिग्रेटी फुंकायचा अड्डा होता. त्याचा शोध लागल्यावर अ‍ॅडमिशन मिळाल्यावर जितक आनंद झाला होता त्याच्या कैक पटीने जास्त आनंद झाला. तिथे बरेच मित्र भेटले नव्या ओळखी झाल्या. पण जास्त करून मी नेहमी मेकॅनिकलच्या कार्ट्यांबरोबर तिथे पडीक असायचो त्याचे कारण म्हणजे इलेक्ट्रॉनिक्सच्या सोकॉल्ड स्कॉलर्ससाठी सिग्रेटी फुंकणे म्हणजे "तोबा तोबा" असे होते. मी डिजीटल इलेक्ट्रॉनिक्सला असूनही माझे मेकॅनिकलचे खुप मित्र होते त्यामुळे मी जगन्मित्र आहे असा माझा गोड समज (?) झाला होता. पण तो समज गैर-समज होता हे लवकरच माझ्या लक्षात आले. मेकॅनिकलला मुलींचा दुष्काळ असतो. त्यामुळे ते सगळे वखवखलेले आत्मे असल्याने, हरामखोरांनी, मला आमच्या वर्गातल्या मुलींचा इंट्रो करून घेण्यासाठी मित्र बनवले होते. असो, पण नंतर दारू आणि सिग्रेट्मुळे त्या मैत्रीला गहिरे रंग आले आणि त्याकडे दुर्लक्ष केले हा भाग अलहिदा. पण बरेच दिवस पोपट झाल्याची भावना मन पोखरून काढायची.

त्या ग्रुपमध्ये एक महान अवलिया कार्टे होते, समीर. कुशाग्र बुद्धीमता (इलेक्ट्रॉनिक्सला अ‍ॅडमिशन मिळत असतानाही आवडीमुळे मेकॅनिकलला गेलेला), अफाट वाचन, तरल विनोदबुद्धी, चेन स्मोकर, पिण्यातला दर्दी हे सगळे गुण एकाच ठिकाणी एकवटलेला असा हा जीव तब्बेतीनेही मजबूत होता. दिसायलाही देखणाच होता, इतका की 'माझ्याशी मैत्री करणार का' असे कुणालाही विचारल्यास नकार येणे शक्यच नाही. पण तो त्याबाबतीत तेवढा एकदम सज्जन होता. पण आमच्याबरोबर बस स्टॉपवर बसून मुलींची थट्टा करण्यात सामील असायचाच किंबहूना त्याच्या तरल विनोदबुद्धीने तो जे काही पंचेस मारायचा त्याने तो आमचा अघोषित नायक असायचा. तसाही तो आमचा सिनीयर होताच. आमच्यापेक्षा एका वर्षाने मोठा होता.

आमच्या थर्ड इयरला केमिकलला अ‍ॅडमिशन मिळालेल्या मुलींची संख्या खुप जास्त होती आणि त्यांच्यातही 'सुंदर' असणार्‍या मुलींची संख्या खुपच जास्त होती. मे़कॅनिकलच्या सर्व 'दुष्काळग्रस्तां'च्या आनंदाला पारावार रहिला नाही. काहीतरी ऐतिहासिक कारणामुळे मेकॅनिकलची मुले आणि केमिकलच्या मुली ह्यांचे परंपरागत वैर होते. एकदम ३६ चा आकडा. त्यामुळे त्या परंपरेला जागून मे़कॅनिकलवाल्या मुलांनी त्या मुलींची सर्व बित्तंबातमी, माहिती काढायला सुरुवात केली. भागुबाईला रॅगिंग करणे / होणे शक्यच नव्हते त्यामुळे बस स्टॉपवर त्या मुली यायची वाट बघायची आणि मग काढलेल्या माहितीच्या आधारे त्यांच्यावर कमेंट्स करायच्या ह्यावर आम्ही रॅगिंगची, दुधाची तहान ताकावर भागवायची असा प्लान ठरला.

केमीकलला, एक आम्हाला सिनीयर असणारी (समीरच्याच बॅचची) सौदर्याची खाण, नमिता त्या वर्षीची रोज क्वीन होती. भागुबाईला शेवटच्या वर्षातले विद्यार्थी हे नविन अ‍ॅडमिशन झालेल्या विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक असतात. (मुलांसाठी अ‍ॅक्चुली तो राजकारणाचा भाग असतो, इलेक्शनला नविन मुले आपल्या बाजूला वळवण्यासाठी). नमिताने त्या नविन अ‍ॅडमिशन झालेल्या सौदर्यवतींचा ताबा घेतला तिच्या अधिकारात आणि त्यांना सगळे कॅम्पस फिरवून दाखवयला निघाली. मार्गावर सगळीकडे हे मे़कॅनिकलचे दुष्काळग्रस्त टोळक्याने उभे होतेच. मीही मजा बघत समीरच्या ग्रुपबरोबर उभा होतो. नमिता आणि तीच्या बरोबरीच्या सौदर्यवतींचा घोळका आमच्यापुढून जाताना कोणीतरी काहीतरी कमेंट मारली. मला काहीही कळले नाही. नमिता मग समीरला उद्देशून काहीतरी खरमरीत बोलली आणि तडाक्यात तिथून त्या मुलींना टाकून निघून गेली. मला तर काय झाले कळायला मार्गच नव्हता. जरा चौकशी केल्यावर कळले की नमिताने सेकंड ईयरला समीरला प्रपोज केले होते आणि समीर नाही म्हणाला होता. तेव्हापासून समीरचा, काहीतरी खरमरीत बोलून, पाणउतारा करायची संधी नमिता सोडत नसे. समीरच्या म्हणण्यानुसार त्याच्या आणि तिच्या आर्थिक स्तरात खुपच तफावत होती आणि त्याच्या घरी ती सुखी होऊ शकली नसती. समीर ज्या पातळीवरून विचार करत होता त्या पातळीवर विचार करणे नमिताला शक्यंच नव्हते, त्यामुळे ती त्या नकाराला अपमान समजत होती. कुठेही समीरचा अपमान करायची संधी सोडत नसायची.

दुसर्‍या दिवशी आम्ही नेहमीप्रमाणे बस स्टॉपवर 'हर फिक्र को धुए मे उडां' असे करत बसलो होतो. तेवढ्यात नमिता आणि सौदर्यवतींचा घोळका नेमका तिथुन पास होत होता. भर दुपारी एवढ्या टोळक्यांच्या तावडीत सापडण्यापेक्षा परत जावे असा विचार करून त्या सर्वजणी नमिताच्या आदेशानुसार परत जायला वळल्या. तेवढ्यात ते बघून समीर चालू झाला 'बेकरार करके हमे यु न जाईये, आपको हमारी कसम लौट आईये'. सगळी कार्टी लगेच गळे काढून नरडी घासू लागले. त्याने नमिता चवताळली आणि परत फिरली.

त्यावेळी बस स्टॉपच्या समोरच्या रस्त्याचे काम चालू होते. मोठ्या मोठ्या दगडांचा रस्त्यावर ढीग पडला होता. नमिता आमच्या समोर आल्यावर थांबली, एक खुन्नस भरी नजर समीरला देउन मुलींना म्हणाली, "हे सगळे दगड आहेत नां दगड रस्त्यावरचे, तसेच दगड भागुबाईत पण आहेत, तेही असेच रस्त्यावर पडलेले असतात. सगळ्या मोठ्या मोठ्या दगडांना फोडून फोडून बारीक केले पाहिजे." अग्ग बाब्ब्बौ! आम्ही सगळे समीरकडे मोठ्या आशेने बघू लागलो. त्यानेही लगेच आमच्या विश्वासाला सार्थ केले...

त्याने आमच्याकडे बघून डोळा मारला आणि नमिताकडे बघून म्हणाला, "दगड लहान असोत वा मोठे , शेवटी खड्डे भरायला दगडच लागतात!". कोणालाच सुरुवातीला काही कळले नाही. पण मग जेव्हा त्याच्या बोलण्याचा मतितार्थ लक्षात आला तेव्हा जो काही गोंगाट आम्ही सर्वांनी केला त्याला तोड नव्हती. नमिता आणि तिच्या बरोबरच्या सगळ्याजणींचे चेहरे पहाण्यासारखे झाले होते, मान खाली घालून निमुटपणे त्यांनी तिथुन काढता पाय घेतला.

Smile

field_vote: 
1.714285
Your rating: None Average: 1.7 (7 votes)

प्रतिक्रिया

कसला रे विनोद हा सोकाजी! हे तर १० मिनिटे हसतच होते वेड्यासारखे.
काढ्ता पाय घेते इकडून आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रमाज्जी, रमाजोबांना सांगणार का हा किस्सा?

असो. वाईनच्या बाटलीच्या तळावरून एकेकाळी आम्ही (मित्रमंडळी) चिक्कार जोक्स करायचो. त्यात मानापमान वगैरे प्रकार नसल्यामुळे किस्से म्हणण्यासारखं त्यात काही नाही.

अतिअवांतरः निळ्या, मागच्या वेळेस नटबोल्टांची माहिती दिलीस, या वेळेस काय करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गमतीशीर किस्सा Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

हा हा
सोकाजीनी एकदम खुलवून सांगितला आहे किस्सा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

कॉलेजकुमारांनी कॉलेजकुमारांत सांगण्यासारखा किस्सा आहे.

(हागण्यापादण्याचे विनोदी किस्से लहान मुलामुलींनी लहान मुला-मुलींना सांगितलेले शोभतात. तद्वतच हे. शाब्दिक खडे टाकणार्‍या मुलीला शाब्दिक भाल्याने अवघड जागी भोसकल्याचा किस्सा आहे हा. पौगंडावस्थेतल्या मुलांनी पौगंडावस्थेतल्या मुलांना सांगितलेला शोभतो. कारण त्या वाढत्या वयात टोलवाटोलवी कुठली आणि भोसकाभोसकी कुठली, तो फरक आपण नीट शिकलेला नसतो.)

"They say that children need to be protected from adult jokes. In fact, adults need to be protected from children's jokes." (कुठे ऐकले-वाचले ते नीट आठवत नाही.)

- - -
एक स्पष्ट करायला पाहिजे. शारिर विनोदाचे मला वावडे नाही. पण कोण्या मुलीने "idiot" म्हणून संभावना केल्यास तिला प्रत्युत्तर म्हणून "c__t" म्हणणे मला पटले नाही. विनोदी आवरणाखाली वरच्या कथेत हेच घडले आहे. (त्या मुलीने "आडवे दांडे" म्हणून संभावना केली असती, तर "खड्ड्यात रोवले" वगैरे काहीतरी म्हटल्यास चिडवाचिडवीची समसमान पातळी दिसली असती)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'खड्डे', ते 'भरणे' वगैरे यांतून मला जो काही अ(न)र्थबोध झाला, त्यावरून किश्श्याच्या दर्जाबाबतच्या भावनेशी सहमतीकडे कल आहे.

मात्र, असे किस्से (किंवा खरे तर त्यांचे अशा मंचांवरील प्रकाशन) हा अगदीच टाकाऊ प्रकार आहे, असे वाटत नाही. अशा किश्शांपेक्षासुद्धा त्यांना येणार्‍या प्रतिसादांचे निरीक्षण हे अनेकदा केवळ मनोरंजकच नव्हे, तर मानवी परस्परव्हवहारांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून उद्बोधक ठरावे - त्या दृष्टीने 'तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे' हे धोरण निरीक्षकास अनेकदा फायद्याचे ठरावे - असे वाटते. (चूभूद्याघ्या.)

या निमित्ताने एक अतिपुरातन ऐकीव/वाचीव किस्सा येथे नमूद करण्याचा मोह अनावर होतो. एकदा एका सद्गृहस्थाने 'लोक आपण जे काही म्हणतो ते किती लक्षपूर्वक ऐकतात' ते पाहण्यासाठी एक प्रयोग करावयाचे ठरवले. अशाच एका पार्टीला आमंत्रण आलेले असताना, मद्याच्या चषकाभोवती लोकांशी हाय-हॅलो-हवापाणी-इकडच्यातिकडच्या गप्पा मारताना मध्येच 'परवाच माझी बायको देवाघरी गेली' अशी एक फुसकुली हळूच सोडून दिली. आलेल्या प्रतिक्रिया या साधारणतः 'अरे वा! किती छान!' किंवा 'अभिनंदन!' येथपासून ते 'मग तू तिला कधी जॉइन होणार आहेस?' येथपर्यंत होत्या, असे सांगण्यात येते.

असो.

In fact, adults need to be protected from children's jokes.

हे विधान मात्र पटण्यासारखे वाटले नाही. लहान मुलांच्या विनोदांचा दर्जा कितीही भिकार असो, स्वतःस प्रौढ म्हणवणारांस त्यापासून संरक्षणाच्या मागणीची गरज वाटावी - पक्षी: त्याविरुद्ध प्रतिकारास अथवा स्वरक्षणास ते सक्षम नसावेत - इतकी दयनीय अवस्था प्रौढांवर आली असावी असे वाटत नाही. पुन्हा चूभूद्याघ्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा किश्शांपेक्षासुद्धा त्यांना येणार्‍या प्रतिसादांचे निरीक्षण हे अनेकदा केवळ मनोरंजकच नव्हे, तर मानवी परस्परव्हवहारांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून उद्बोधक ठरावे

प्रचंड सहमत!

- (निरीक्षक) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+२ प्रतिसादांचे निरीक्षण कधीही मनोरंजक.

मी मागे "जेरी स्प्रिंगर शो*"चे दोन अंक बघितले होते. स्टेजवरील नाट्यमय कथांपेक्षा प्रेक्षकांचे समरस होऊन प्रतिसाद देणे फारच मनोरंजक वाटले. (म्हणून एक झाल्यावर दुसरा अंक बघितला. पण मग सगळे तेच-ते वाटू लागले, म्हणून आणखी अंक बघितले नाही.)

- - -
*जेरी स्प्रिंगर शो मध्ये "माझ्या आईचा प्रियकर माझ्या बापाच्या प्रेयसीशी लफडे चालवतो आहे, पण त्या दोहोंशी माझे संबंध आहेत..." वगैरे "सत्य"कथानकातील सर्व पात्रांच्या स्टेजवर मुलाखती होतात, माफक झिंज्या ओढणे, बा'चाबा'ची होते, वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माफक झिंज्या ओढणे, बा'चाबा'ची

हा (निर्)अतिशयोक्तीचा प्रकार समजावा काय? ('अंडरस्टेटमेंट' अशा अर्थी?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

In fact, adults need to be protected from children's jokes.

ही बरीचशी अतिशयोक्ती आहे. ज्या ठिकाणी मी वाचले, तिथे संदर्भ होता की लहान मुलांना आवडणारे काही विनोद हागण्या-पादण्याबाबत असतात, आणि ते वय सरल्यानंतर हसू येण्यापेक्षा थोडी किळस वाटू शकते.

खरोखरची "प्रोटेक्शन" नको आहे. "किळस इतकी वाटते, की संरक्षण हवे" ही अतिशयोक्ती आहे.

अर्थात, आपण स्वतः कधी तसे विनोद आवडीने सांगत असू, ही आठवण येऊन, आणि मुलांबाबत खेळकर प्रेमळपणा वाटल्यामुळे प्रौढांनी ही किळस सहन करायला पाहिजे. आणि आपण सहन करतोसुद्धा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'न'वी बाजू यांना प्रतिसादांचे निरीक्षण करावयाचे असल्याने आणखी एक मॉडेल प्रतिसादः

अय्या सोक्या, कित्ती कित्ती हुश्शार आहे रे तो समीर. त्याचा फोन नंबर मिळेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इतःपर तो 'ऑब्ज़र्वर इफेक्ट' की कायसेसे म्हणतात तो लागू असल्याकारणाने, हा अथवा यापुढचे सर्व प्रयत्न फाऊल धरल्या जातील.

असो. ते निरीक्षण आम्ही केव्हाच सोडून दिले आहे. (प्रेरणा: शेलारमामा.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रयत्नाची पार्श्वभूमी अशी आहे की सदर धागा अंमळ स्त्रीद्वेष्टा-प्रकारचा असण्याची तक्रार इतरत्र माझ्या कानावर आली. तर सतत आई-बाबांकडे भांडणं नेण्यापेक्षा पोरासोरांनी आपसांत भांडणं सोडवावीत अशी सवय झाल्यामुळे अधिक अगोचर प्रतिसाद कसे देता येतील याचा विचार करता अशा प्रकारचा प्रतिसाद देणे सुचले. आणि हे सर्व तुमचा प्रतिसाद वाचण्याआधीच झाल्यामुळे कृपया वरचा प्रतिसाद अग्राह्य (पक्षी: फाऊल) धरू नये. हवंतर त्यापुढचे बाकीच्या लोकांचे प्रतिसाद फाऊल मानावेत अशी नम्र विनंती.

प्लीज प्लीज प्लीज, वरच्या प्रतिसादास फाऊल मानू नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्लीज प्लीज प्लीज, वरच्या प्रतिसादास फाऊल मानू नये.

आपणांस त्याने नेमका काय फरक पडतो? (हा निरीक्षिताने निरीक्षकात बायस आणण्याचा - तस्मात् फाऊल - प्रकार नव्हे काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपणांस त्याने नेमका काय फरक पडतो? (हा निरीक्षिताने निरीक्षकात बायस आणण्याचा - तस्मात् फाऊल - प्रकार नव्हे काय?)

हा बायस आणण्याचा प्रकार नसून अशा प्रकारचा प्रतिसाद मनोनीत होता. फक्त द्यावा का न द्यावा अशा प्रकारे चलबिचल होत होती. तुमच्या प्रतिसादनिरीक्षण छंदामुळे तुम्हाला अधिक डेटा मिळावा व तुमच्या निष्कर्षांवरील कॉन्फिण्डन्स लिमीट वाढावे एवढाच भद्र विचार आहे. तुमच्या निष्कर्षाच्या अधिक अचूकपणासाठीच ही सर्व धडपड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कितीही सद्हेतूने का असेना, निरीक्षिताने निरीक्षकाच्या निरीक्षणप्रक्रियेत ढवळाढवळ करण्याने निरीक्षणाच्या निरपेक्षतेस बाधा येते, ज्यापेक्षा त्रुटियुक्त निरीक्षणजन्य चुकीचे निष्कर्ष परवडतात, एवढेच नम्र प्रतिपादन या निमित्ताने करू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाय* लावून पळ काढत आहे.

*या पायचा त्या पायशी काहीही संबंध नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

नेमके काय झाले? शब्दभांडार संपले की (अ)विचार खुंटले? या धाग्यावर शब्दभांडार संपले असे म्हणणे हा या धाग्याचाच अवमान आहे. खड्डा आणि दगड यासारखी रुपके जिथं आहेत तिथं असं होऊ नये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छे, छे, हा तर 'न'वी बाजू यांच्या दोन्ही हातात असणार्‍या शब्दखड्गांना दिलेला आदर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खरेतर "(अ)विचार खुंटले" हे वाचून खीक्क असे हसणार होतो पण श्रामोण्णांचे हे "या धाग्यावर शब्दभांडार संपले असे म्हणणे हा या धाग्याचाच अवमान आहे" शालजोडीतला आहे असे समजून गप्प बसलो Sad

- (अपुरे शब्दभांडार असलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अशा किश्शांपेक्षासुद्धा त्यांना येणार्‍या प्रतिसादांचे निरीक्षण हे अनेकदा केवळ मनोरंजकच नव्हे, तर मानवी परस्परव्हवहारांच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून उद्बोधक ठरावे - त्या दृष्टीने 'तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे' हे धोरण निरीक्षकास अनेकदा फायद्याचे ठरावे.* Wink
श्रेयअव्हेर - 'न'वी बाजू!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा धागा व संस्थळ अभिव्यक्ती स्वातंत्र्य निमित्ताने माझ्यापर्यंत आलेल्या काही प्रतिक्रिया (त्या प्रातिनिधिक आहेत असा माझा दावा नाही; पण असाव्यात असं मला वाटलं.)

माझ्या लहानपणी सेंन्सारप्रिय कुटूंबसंस्थेने बाळबोध चित्रपटांचे तुरुंग बांधले होते निदान असे सकस साहीत्य वाचून/ ऐकून मी वेळेवर "मोठा" झालो (मध्यमवयीन अविवाहित समीक्षक)

इथुन तिथुन विषय स्त्री लैंगितकेपाशीच येउन थांबतो (आनंदी मध्यमवयीन अविवाहित)

हा हा हा दगडावर आपटायला आम्हाला फार आवडते (जालीय राखीतै, मल्लीकातै सुखवस्तु गट)

स्त्री लैंगीकतेला हवे तेवढे स्वातंत्र्य आजही मिळत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे. (मध्यमवयीन विवाहित गुर्जी)

लेख रोचक आहे, Real change is not brought on by writing it on marathi forums but by people getting mad enough to actually put the stones of various sizes in the available gaps in real life.( मध्यमवयीन समाजसेवक)

या एका वाक्यात सारं काही आलं... या वाक्यावर युक्तिवाद होऊ शकतात, होतील... असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इथुन तिथुन विषय स्त्री लैंगितकेपाशीच येउन थांबतो (आनंदी मध्यमवयीन अविवाहित)

शेवटी पुरूष असा शब्द राहिला हो! तसे नसल्यास, मुली/स्त्रिया आपसांत काय गप्पा मारतात याबद्दल तुम्हाला काडीमात्र कल्पना नाही. म्हणूनच प्रतिसादांचा अभ्यास करणे रंजक असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बेष्ट किस्सा सोत्रिअण्णा.

काही लोक ह्या किश्शाला नाकं का मुरडत आहेत कळाले नाही. साला हाच किस्सा इंग्रजी गुळगुळीत मासिकात आला असता किंवा वेबसाइटवरती आला असता तर फॉरवर्ड आणि शेअर करायला झुंबड उडाली असती.

अवांतर :- हे इथे लिहिणे योग्य आहे का माहिती नाही, तरी लिहितो आहे. :- ऐसीअक्षरे च्या अधिकारी लोकांचे ह्या धाग्याला दिलेल्या वागणुकीबद्दल विशेष अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

ह्या वेबसाइटवरच्या अदृश्य 'लाइक' बटनावर क्लिक केल्या गेल आहे!

ऐसीअक्षरे च्या अधिकारी लोकांचे ह्या धाग्याला दिलेल्या वागणुकीबद्दल विशेष अभिनंदन.

उगा विशेष अभिनंदन वगैरे करून औपचारिक व्हायला नको होते म्हणून टाळले होते, पण आता विषय काढलाच आहेस तर मीही लगे हाथ 'विषेश अभिनंदन' करूनच घेतो.

- (आभारी) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजय म्हणतात ते हगण्यापादण्याचे लहान मुलांचे विनोद असतात, किस्से नव्हेत. किस्से म्हणजे जे खरे घटलेले आहेत ते.

लहान मुले एकमेकांना अतिरेकी विनोद तर सांगतच असतात. इथे हा अश्लील विनोद सांगावा की नाही हा प्रश्न पडला आहे पण आता सांगतेच. मला ५ वीमध्ये (खरच) माझ्या मैत्रिणीने हा विनोद सांगीतला होता. - एकदा राजाकडे दूध घालायला नेहमीप्रमाणे गवळी येतो व दाराची कडी वाजवतो. पण राजा काही केल्या दार उघडतच नाही. दुसर्‍या दिवशी गवळी राजाला विचारतो "काल दरवाजा का उघडला नाही?" राजा म्हणतो "कुलपात किल्ली अडकली होती."

मला तेव्हा तो विनोद कळला नाही अन ती मात्र कळल्यासारखी हसत होती. पण विचारला असता तिने जे स्पष्टीकरण दिले ते मला तेव्हा अजीबात कळले नाही. असो. नंतरही कळत्या वयात अनेक माफक अश्लील विनोद मैतिणींकडून ऐकले पण ते सर्व कळत्या वयातले होते. हा विनोद लक्षात रहायचे कारण अतिशय नाकळत्या वयातला ब्लेटंट विनोद होता.
___________________________

वरील किस्सा सोत्रि यांनी जाई म्हणतात त्याप्रमाणे खरच छान खुलविला आहे.शिवाय यात कोणाला हजरजबाबीपणा दिसेल तर कोणाला फक्त अश्लीलता.तर कोणाला दोन्ही.

दर वेळेला सुतकी चेहेरे ठेवून गंभीर धागे वाचणेच ही अपेक्षा "ऐसी अक्षरे" ची नाही याबद्दल अभिनंदन!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दर वेळेला सुतकी चेहेरे ठेवून गंभीर धागे वाचणेच ही अपेक्षा "ऐसी अक्षरे" ची नाही याबद्दल अभिनंदन!!!

सारीका तै, प्रतिसादातील हे वाक्य वाचल्यावर, तुम्हाला कुठे ठेवू आणि कुठे नको असे झाले आहे. Smile

- (सारीकातैचा पंखा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"कुलुपात किल्ली होती" याबाबत मी सुतकी चेहरा करेन हे म्हणावेसे तुम्हाला वाटले? "शारिर विनोदाचे वावडे नाही" असे मी म्हटले, ते मी खोटे म्हटले, असे म्हणण्याकरिता तुमच्यापाशी काय आधार आहे? (इतकेच काय, मला "अश्लीलते"चे वावडे नाही. पण ते मी स्पष्ट म्हटलेले नाही, तुम्हाला ठाऊक नसणे साहजिक आहे.) तरी सुतकी चेहर्‍याबाबत तुमचा गैरसमज दूर करू शकलो नाही, ही माझी त्रुटी. दिलगीर आहे.

"दगडासारखा मठ्ठ" म्हणणार्‍या मुलीला उत्तरादाखल "खड्ड्यात दगड भरावेत तशी झ**लायक" म्हणणारा मुलगा हसरा-हजरजबाबी वाटत नाही. कुठल्या टोल्याला कुठला टोला द्यावा, याबाबत या मुलाला जाण नाही, असेच दिसते. मुलीने "पडेल दांडे" वगैरे टोला लगावला असता, तर मुलाचे "खड्ड्यात रोवू" वगैरे उत्तर ठीकच असते, हे मी स्पष्ट लिहिलेही आहे. पुन्हा म्हणतो : शारिर शाब्दिक टोलवाटोलवीचे वावडे नाही. हे सगळे स्पष्ट केल्यावरही "सुतकी चेहरा" दिसला?

किस्सा आहे, खरा आहे. पण संवादातील देवाणघेवाण नीट न कळणे हे कॉलेजकुमाराकरितांच ठीक आहे. असला बेलगामपणा फक्त त्याच वयात हजरजबाबी म्हणून खपतो, असे म्हणणे काही "सुतकी" नाही. शारिर विनोदांचा विरोध नाही.

(सेन्सॉरशिपची मागणी मी केलेली नाही. न-आवडलेल्या लेखनाचे उत्तर सेन्सॉरशिप नसून "नाही आवडले" असे म्हणणे असते. आणि तेच मी केले.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धनंजय, मी ऐसी अक्षरे चे अभिनंदन केलेले आहे. तुम्हाला मी कोठेही गोवलेले नाही. याउप्पर मला काहीही बोलायचे नाही. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रस्तुत किस्सा बालीश आहे का ? आहे.
तो रंगवून/खुलवून सांगितला आहे का ? आहे.
त्यामधे लैंगिकता आहे का ? होय. पोराटोरांच्या विनोदातली असते तशी आहे
यामधे आक्षेपार्ह काही आहे का ? नाही. लहान मुलांचे विनोद असतात तसं कायतरी आहे.
यामधे फार विचारविमर्श करावा असं काही आहे का ? नाही. वाचावे नि हसून/नाक मुरडून सोडून द्यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सोकाजीराव तुमच्या लिखाणातली मजा किश्श्यात नाही, बाकी उदारमतवादी धोरण असल्याचे लगेच दाखवून दिल्याने बचाव सोपा पडतो की काय असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यावरून मलाही एक किस्सा आठवला. पिनाकचा.

एक बिर्जू नावाचा मुलगा असतो. तो रोज त्याच्या वर्गात घडलेल्या गंमती जंमती घरी येऊन पालकांना सांगत असतो. अनेकदा त्याच्या बोलण्यात पिनाकचा उल्लेख होत असतो. पिनाकने हे केले, पिनाकने ते केले. पिनाक अतिशय खोडकर मुलगा आहे हे बिर्जूच्या बोलण्यातून त्याच्या पालकांना जाणवत असते. सुरूवातीला ते पिनाकच्या गोष्टी फारशा मनावर घेत नाही. पुढे पुढे पिनाकचे अतिशय बेफाम किस्से ऐकून बिर्जूचे आईवडील काळजीत पडतात. या किश्शांमध्ये आता शारीर पातळीवरील शेरेबाजी व ज्यातून शिक्षिकाही सुटत नाहीत असा प्रकारही असतो. असे विद्यार्थी ज्या शाळेत आहेत, तिथे शिक्षण घेऊन आपला बिर्जूही तसाच बिघडेल या चिंतेने धास्तावून ते तडक बिर्जूची शाळा गाठतात.

थेट मुख्याध्यापिकेलाच जाऊन भेटतात. तुमच्या शाळेत हा कोण पिनाक आहे त्याला चांगली समज द्या. नाहीतर काढूनच टाका असे त्या बाईंना सुनावतात. अशा मुलांच्या संगतीत राहून आमचा बिर्जू बिघडला म्हणजे? मुख्याध्यापिका आश्चर्यचकित होतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे इतकं काही गंभीर प्रकरण असतं तर त्यांच्यापर्यंत ते पोचलं असतंच. तसं काही अजून झालेलं नसतं. इतकंच काय पिनाकचं नावही त्यांनी कधी ऐकलेलं नसतं. मग त्या बिर्जूच्या वर्गशिक्षिकेला बोलावतात. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांच्या वर्गात पिनाक अशा नावाचा विद्यार्थी नसतोच. कदाचित दुसर्‍या तुकडीत किंवा इतर कुठल्या इयत्तेत असावा म्हणून इतर शिक्षिकांनाही पाचारण केले जाते. एकीनेही पिनाकचे नाव ऐकलेले नसते. शेवटी शाळेच्या संगणकावरील नोंदी तपासल्या जातात तेव्हा संपूर्ण शाळेत पिनाक नावाचा विद्यार्थी नसल्याचे कळते.

तेव्हा बिर्जूचे आईवडील अस्वस्थ होऊन म्हणतात, "अहो पण असं कसं होईल? इतका चळवळ्या मुलगा अचानक कुठे अदृश्य झाला?" आणि ते बिर्जूने त्यांना ऐकविलेले पिनाकच्या पराक्रमाचे किस्से एकामागोमाग एक सांगु लागतात. हे किस्से ऐकताच बिर्जूच्या वर्गशिक्षिका उत्तरतात, "तुम्ही म्हणताय ते सारे उद्योग तर तुमचा बिर्जूच शाळेत करत असतो."

या किश्शात पुढे काय घडते ते महत्त्वाचे नाही तर त्या अनुषंगाने मला पडलेला प्रश्न म्हणजे प्रस्तुत धाग्यातील दगडखड्ड्यांचा प्रसंग खरा असला तरी त्यातील समीर हे पात्र काल्पनिक तर नसावे? लेखकाने स्वतःच्या पराक्रमांचे श्रेय या पात्रास देण्याचा मोठेपणा दाखविला असावा असा माझा अंदाज आहे. धागालेखकाच्या या विनम्र वृत्ती व कृती बद्दल त्याचे अभिनंदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com