" तो एक पदर मायेचा ... "

तो एक पदर मायेचा
आधार किती आईचा

वादळात सामर्थ्याचा
भयमुक्ती उपदेशाचा
नजराणा संस्काराचा

संदेश शांत जगण्याचा
रागास शांत करण्याचा
मस्तकास थापटण्याचा

तो दर्शक सन्मार्गाचा
तो रक्षक कल्याणाचा
तो पूजक सौंदर्याचा

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

छान आहे कविता...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

सर्वच ओळी खूप सुंदर पण मला शेवटची ओळ फार आवडली.
"तो पूजक सौंदर्याचा"
सौंदर्या ची व्याख्या ही अतिशय व्यापक आणि कवेत न येणारी होऊ शकते. "सत्य शिव" या २ चिरंतन मूल्यांबरोबर सौंदर्याला स्थान आहे.
Beauty is Eternity Gazing at Itself in a Mirror हे खलील जिब्रान या तत्वज्ञाचे वाक्य बरेच काही सांगून जाते.

अप्रतिम कविता आहे. शेवटचे कडवे खासच!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0