एका झूमकॉलची गोष्ट
अंक दिवाळी सुन्न फटाका
लेख लेखणी सुरसुर पिचक्या
जेमेतेमसे करिती यत्न
गोळा झाला क्षुल्लक कचरा
तशात कोणी येरु आला
जबरा काही सांगे सगळ्यां!
Trash टेस्टचा खूबपसारा
रा रा रा रा लेखच सारा.
दिधले कोणे कौतुकशब्द
वावा!मस्त!
Wow just
झाले, टोळा येणे केले
नेमे जैसे संध्यालागण
फुरफुरले ते कुठेकुठेशी
शब्दांमधुनी कठोर भाकड
येरु खवळे-
पाजी सगळे!!
म्हणे एकटा विरुद्ध सगळे!
म्हणे कसले असले बगळे
मीच हंस अन इतर कावळे.
कितीक होते वाचक प्रेक्षक
पहात-वाचत-ऐकत-हासत
कुठे कोणते कसले असले
रुसून फसून हसून बसले?
येरु काही ऐकत नाही
होई भीषण लाहीलाही;
मला नको जा तुमच्या शंका!
मला नको ते हुल्लड प्रश्न!
मला नको ते जलील टोमणे
भिकार तुमची 'ऐसी' साईट.
(दुमत नसावे, दुमत नसावे
ब्रह्मवाक्य ते शेवटले तर
ठाऊक आम्हा अनंत काळी,
सवयीचे पण पडलो चाकर!)
कुणी येरुला पृच्छा करितो
देता का मज प्रश्ना उत्तर?
(चिकट तरी हा प्राणी इतुका, सोडत नाही पाठही क्षणभर?)
चिकटपृच्छेला येरु देतो
Technologyने टांग भराभर
झूमकॉल तो तुवा करावा
आणि घ्यावे सत्वर उत्तर!
मात्र एकुटा नकोच येऊ
डेंजर डेंजर डेंजर डेंजर
घेऊन ये तू झुंड हुल्लडी
शिवाय त्यांच्या जाशी कुठवर??
निघून जाई येरु आता
(दिसतो केव्हा केव्हा क्षणभर??)
चिकटप्रश्नकरी आता करितो
एक बापडा चिकट-प्रश्न तो;
मायबाप ऐसीकर जनता
काळ संपतो हा हा म्हणता
झूम कॉलच्या झुंडीमध्ये
कोण कोण ते होणे शामिल?
...
....
......
.......
वाट पाहतो चिकटप्रश्नकरी
केव्हा येई कॉल निमंत्रण
अशक्य चिंधी असला तरीहि
प्रश्नाला तर हवेच उत्तर.
+
एकदोन ठिकाणी मीटर जरा घासूनपुसून घेतला तर अधिक चांगली दिसेल, परंतु प्रकार एकंदरीत जबरदस्त आहे. (विशेषत: प्रेरणा तथा टर्नअराउंड टाइम लक्षात घेता.१)
(अतिअवांतर: 'शीघ्रकविता'ऐवजी 'शीघ्रकवन' हा शब्दप्रयोग, चुकीचा नसला, तरीही दुर्दैवी आहे. उगाच त्याच्याशी यमक साधणाऱ्या भलत्याच कशाचीतरी आठवण येते. असो चालायचेच.)
----------
१ अर्थात, त्याने मीटरातला हलगर्जीपणा क्षम्य होत नाहीच म्हणा, परंतु तूर्तास, या इतर घटकांच्या परिप्रेक्ष्यात, त्याकडे दुर्लक्ष करू. (एवीतेवी, मीटराकडे अतिकटाक्ष वगैरेवगैरे हे लोक तसेही फक्त बामनीपणातच करतात, त्यामुळे, जाऊ द्यात.)
अर्थात!
हीच ती घाणेरडी वृत्ती
मीटर वगैरे हे सगळे तुम्हा उच्चभ्रूंचे चोचले आहेत.
अर्थात! मीटराकडे१ अतिकटाक्ष वगैरेवगैरे हे लोक तसेही फक्त बामनीपणातच करतात, हे आगाऊ मान्य केलेलेच आहे२, त्यामुळे, सहमती अर्थात आहेच.
मी मुक्तछंदात लिहिलीये ती कविता
अच्छा. मग हरकत नाही.३, ४
असो.
----------
१ रिक्षाटॅक्सीतल्या, तथा कवितेतल्यासुद्धा.
२ 'कारण शेवटी आम्ही भटेच! त्याला काय करणार?' असे पु.ल. म्हणून गेलेलेच आहेत.
३ तसेही, आम्ही तुमचे जबरदस्त फॅन वगैरे असल्याकारणाने, तुम्हाला काय वाटेल ते माफ आहे.
४ कविता शंभरातले सुमारे नव्व्याण्णव भाग मीटरात व्यवस्थित बसते, हा निव्वळ योगायोग असावा, हे लक्षात आले नाही. माय ब्याड!
'शीघ्रकविता'ऐवजी 'शीघ्रकवन'
'शीघ्रकविता'ऐवजी 'शीघ्रकवन' हा शब्दप्रयोग, चुकीचा नसला, तरीही दुर्दैवी आहे. उगाच त्याच्याशी यमक साधणाऱ्या भलत्याच कशाचीतरी आठवण येते.
खरंतर मला, शीघ्र हा शब्दांश वगळून तो "त्याच्याशी यमक साधणाऱ्या भलत्याच कशाचीतरी आठवण" करून देणारा शब्द अभिप्रेत होता असे या प्रसंगी, या निमित्ताने आणि या माध्यमातून मी प्रतिपादू इच्छितो.
कारण मागच्या काही दिवसांत ऐसीवर उठलेले प्रचंड वादळ (किंवा हलकीशी फुंकर!) यातून काय दिसते? मराठी आंतरविश्वातील एक महत्वाचे संस्थळ (हो, अचूक spelling / शब्द 'संस्थळ' हाच आहे, ज्यांना नीट लिहिता येत नाही त्यांनी शिकून घ्यावा!) असलेल्या ऐसीचा स्तर, बाहेरचा तात्पुरता कुणीतरी येऊन खालावून टाकतो म्हणजे ऐसीच्या बौद्धिक, तार्किक आणि साहित्यिक स्तराचे तात्पुरते का होईना पण "शीघ्र हा शब्दांश वगळून तो 'त्याच्याशी यमक साधणाऱ्या भलत्याच कशाचीतरी आठवण' करून देणारा शब्द" झालेले नाहीय का?
---
ढिस्क्लेमर् : "शीघ्र हा शब्दांश वगळून तो 'त्याच्याशी यमक साधणाऱ्या भलत्याच कशाचीतरी आठवण' करून देणारा शब्द" हे विशेषण / वर्णन मिपावरच्या कुणाही एका विशिष्ट सदस्याला उद्देशून नाही तर एकूणच चर्चेच्या तात्पुरत्या खालावलेल्या स्तराचे माझ्या स्वल्पमतीनुसार मला झालेले आकलन आहे.
झूमकॉलच्या कढईची गा
झूमकॉलच्या कढईची गा
अशीच देवा घडण असू दे;
जळून गेल्या लोखंडातहि
तळण्याची, पण चमचमीत ती
ऐसी तैसी काँट्रोव्हर्सी.
लेखक-समीक्षकांची भक्ती
संपादकीयामध्ये लिहिली
खिळे पाडुनि तिचे जरा ह्या
कढईच्या दे कुट्ट कपाळी
ठोकुनि पक्के, काळे, बळकट.
फुटेल उकळी, आयडी फेक्
उडून जाइल साईटट्रॅफिक
तरि सांध्यांतुन कढईच्या ह्या
फक्त बसावा थोडा कैफ
तव "कचऱ्याचा" भेसुर धुरकट.
समजलो उमजलो;
समजलो उमजलो;
शरणलो संपलो.
अशा उगाच
लिहिलेलेया
तुटक संदिग्ध ओळी
कुणाला वाटू शकतात कविता
फक्त त्यात काहीतरी
अर्थपूर्ण लिहिल्याचा भास
निर्माण करायचा बस!
आणि मग
वाट बघायची
स्तुती करणाऱ्या निंदकांची
हाती घेऊन लाह्यांची पुडी!
(ही कविता आहे का? ह्याचा अर्थ काय? वगैरे प्रश्नांची उत्तरे टिकटॉकवर देण्यात येतील. तरी उगाच इथे वेळ घालवू नये.)
तुकारामच काय म्हणून?
साईटच्या प्रकृतीला ते शोभूनही दिसेल आणि ज्ञानेश्वरांकडून तुकारामाकडे ट्रान्झिशन मारल्यामुळे अब्राह्मणी असल्याचं क्रेडिटही मिळेल.
तुकारामच काय म्हणून? बोले तो, संतच कशाला पाहिजेत?
१. साईटच्या प्रकृतीला शोभून दिसणे, तथा २. अब्राह्मणी असल्याचे क्रेडिट मिळणे, एवढी दोनच जर साध्ये असतील, तर 'भमू' (किंवा 'भमूच'), अर्थात 'भरती मूर्खांचीच' असे नाव या संस्थळाकरिता अतिगंभीरपणे सुचवू इच्छितो.
('प्रेझेंट कंपनी एक्सेप्टेड'चा न्याय प्रस्तुत प्रतिक्रियेस लागू नाही, युअर्स ट्रूली इन्क्लूडेड.)
...
तुळशी परब, मन्या जोशी, सलिल वाघ, वर्जेश सोळंकी असल्या महाकविंच्या दिअंकातल्या कवितेतली एखादी ओळ का ठेवू नये?
साईटच्या प्रकृतीला अर्थातच शोभून दिसेल, परंतु, अब्राह्मणी असल्याचे क्रेडिट मिळेलच काय नक्की? (बाकीच्यांचे माहीत नाही, परंतु मन्या जोशींच्या कवितेतल्या ओळीतून तर खासे मिळू नये!)
शिवाय, गडकरींना (किंवा फॉर्दॅट्मॅटर तुकारामांना किंवा ज्ञानेश्वरांना) आणि त्यांच्या रचनांना जे नेम रेकग्निशन आहे, ते या कवींच्या नो-नेम कवितांतून साध्य होणार काय? (बोले तो, ओळ 'अब्राह्मणी' आहे हे सहज लक्षात येण्यासाठी, ती कोठल्या कवितेतून उचललेली आहे, हेच मुळात कळण्याची शक्यता जेथे शून्यवत्, तेथे त्या कवितेचा कर्ता कोण, हे कोणाच्या लक्षात येणार? कर्ता 'ब्राह्मणी' की 'अब्राह्मणी', ही फार पुढची गोष्ट.)
बरे, 'ब्राह्मणी'/'अब्राह्मणी'चा मुद्दा जरी तूर्तास बाजूस ठेवला, तरी या महाकवींच्या कवितांतील नेमकी कोठली ओळ संकेतस्थळाच्या नावाकरिता निवडणार? 'आईची गांड हत्ती'? (या तमाम महाकवींच्या तमाम महाकाव्यांपैकी एवढी एकच ओळ मला सहज लक्षात राहू शकली! बोले तो, मन्या जोशींची (ही एकच) कविता वगळल्यास बाकीच्या महाकवींच्या कवितांकडे मी ढुंकूनदेखील पाहिले नाही, हा भाग अलाहिदा. कदाचित यामागे 'कारण शेवटी आम्ही भटेच, त्याला काय करणार'-फॅक्टर असावा, असा आरोप करायचा, तर करा बापडा!) नाही, म्हणजे, संस्थळाचा नाही, तरी गेला बाजार खरडफळ्याचा तरी हत्तीखाना होण्याच्या दिशेने चाललेली आगेकूच पाहता, त्या संदर्भात ही ओळ संस्थळाचे नाव म्हणून यथार्थ आहेच, याबद्दल वाद नाही. परंतु, म्हणून काहीही?
('ऐअ' किंवा 'ऐसी'ऐवजी 'आगांह'... जमत नाही!)
(अतिअवांतर: हे ते कोण ते तुळशी परब, मन्या जोशी, सलिल वाघ, झालेच तर वर्जेश सोळंकी, हे सगळे भयंकरभयंकर unsavory लोक आणून 'ऐसी'वर मोकळे सोडण्याचा चावटपणा मालकमंडळींपैकी नक्की कोणाचा? एक वाइल्ड गेस... चिंतातुर जंतूंचा काय?)
असो चालायचेच.
कचरा दिवाळी अंकातील लेख,
प्रतिसाद येथे हलवला आहे :
तळ ढवळताना : जाणीव, नेणीव, वृत्ती आणि भूमिका :
https://aisiakshare.com/node/8618
खरं तर प्रतिक्रियेत नमूद
खरं तर प्रतिक्रियेत नमूद केलेली काव्यरसाची मैफिल, ज्ञानेश्वर ते तुकाराम प्रवास वगैरे तुमच्या धाग्याशी जोडलेले आहेत. तरीही ह्या धाग्याचे निर्माते ह्या नात्याने तुम्ही केलेल्या विनंतीला मान देऊन स्वतंत्र धागा काढला आहे. नवीन सदस्य असल्याने माझा आधीचा प्रतिसाद मला डिलीट कसा करता येईल ते पाहतो आहे.
?
सातासमुद्रापारच्या, समाजाशी देणंघेणं नसणाऱ्यांना कसंही वागण्याने फरक पडणार नाही. पण 'ओ कुलकर्णी - देशपांडे' अशी हाक ज्यांना रस्त्यावर ऐकावी लागते त्यांची भिती अशा प्रसंगातून वाढते.
१. ही (गर्भित) धमकी आहे काय?
२. असल्या धमक्या छापणे हे तूर्तास ‘ऐसी’चे धोरण बनले आहे काय?
(बादवे, कुलकर्णी-देशपांडे, की कुळकर्णी-देशपांडे?)
काय सुमार कविता आहे.
काय सुमार कविता आहे.
असलं काहीतरी लिहिण्यापेक्षा लोक काम का नाही करत?