समलैंगिकता : विकृती कि प्रवृत्ती?

श्री. संजय सोनवणी यांनी त्यांच्या ब्लॉगवर ' समलैंगिकता : विकृती कि प्रवृत्ती? ' नावाचा लेख प्रसिद्ध केला आहे. या लेखामध्ये सोनवणी यांनी आपल्या नेहमीच्या चिकित्सक आणि संयमित लेखन शैलीमध्ये या विषयावरील आपली मते मांडली आहेत. लेख वाचनीय आणि मननीय वाटल्याने या ठिकाणी प्रसिद्ध करत आहे तरी अभ्यासू वाचकांनी या लेखाचे वाचन करून आपली प्रतिक्रिया / मते मांडावीत हि विनंती !
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
समलैंगिकता : विकृती कि प्रवृत्ती?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांनी समलिंगींच्या विवाहांबद्दलच्या विधानामुळे हा विषय अधिकच चर्चेत आला असला तरी २००५ मद्धे जेंव्हा मानवेंद्र सिंग गोहील या राजपुत्राने आपल्या देशात प्रथमच आपण "गे" असल्याचे जाहीर केले तंव्हापासुन या विषयाला प्रथमच जाहीर तोंड फुटले. आता समलिंगी (सम-रती) आपल्या हक्कांसाठी आंदोलनेही करत आहेत. आंतरजालीय संस्थळांवर या विषयावर खडाजंग्या घडत आहेत. या विषयाच्या नैतीक, सांस्कृतीक, कायदेशीर, वैद्यकीय इ. पैलुंवर अथक चर्चा घडत आहेत. पुर्वी या विषयावर तोंड उघडणेही अशक्यप्राय होते. भारतात समलिंगी मंडळी आपण "तसे आहोत" हे सांगायची हिम्मत करत नव्हते. परंतु आता ते तोंड उघडु लागले आहेत, न्यायालयाचे दरवाजे आपल्या हक्कांसाठी ठोठावू लागले आहेत. जाहीरपणे मुलाखती देवु लागले आहेत...त्यामुळे संस्कृती रक्षकांचीही पंचाईत झाली आहे. भारतीय संस्कृती रसातळाला जात आहे असा त्यांचा आक्रोश आहे. समलैंगिकता ही विकृतीच असून समाजव्यवस्था यामुळे कोसलेल असा यांचा दावा असतो. त्याचवेळीस, अशा व्यक्तींची घृणा वाटली तरी त्यांच्याकडे मानवतेच्या दृष्टीकोनातुन पहावे, त्यांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता द्यावी असे म्हणनाराही मोठा वर्ग आहे.

सामाजिक निषिद्धांत समलिंगी संबंध ठेवणे हे गंभीर पातक गणले गेले असले तरी भारतातील निषिद्ध संभोगाची परंपरा पुरातन आहे हे खुद्द धर्मशास्त्रे, पुराणकथा, महाकाव्ये, कामशास्त्रे, विविध शिल्पे (खजुराहो) व चित्रांमधुनही दिसून येते. निषिद्ध संभोगांत समलिंगी, अन्य-प्राणी संभोग, मुख वा पार्श्व-संभोग व क्लीबांशी केलेला संभोग प्रामुख्याने येतात. या सर्व प्रकारचे संबंध विपुल प्रमाणावर होते. मनुस्म्रुतीने स्त्रीने स्त्रीशी संभोग केला तर तिला चाबकाचे दहा फटके मारावेत व तिच्याकडुन दुप्पट वधुमुल्य वसुल करावे व समजा वयाने मोठ्या स्त्रीने कुमारिकेशी संबंध ठेवला तर तात्काळ तिचे केशवपन करुन तिची गाढवावरुन धिंड काढावी आणि हाताची बोटे कापुन टाकावी असे आदेश दिलेले आहेत. नारदस्मृतीही असेच निर्देश पुरुषांबाबत देते. असे नियम स्मृतीकारांना बनवावे लागले याचा अर्थ तो समाजातील एक प्रचलित भाग होता. आजपर्यंत तो अव्याहत चालु राहिला आहे, परंतु याबाबतीत गौप्य बाळगण्याच्या (लज्जेपोटी, समाजबहिष्कृततेच्या भयापोटी) प्रवृत्तीने काही जगजाहीर नाही म्हणुन याबाबत आपण फार सोवळे आहोत आणि पाश्चात्य जगच काय ते पापांच्या दलदलीत फसत चालले आहे असा भ्रम बाळगण्याचे कारण नाही.

समलिंगी संबंध फक्त मानवप्राण्यांत आहेत असे नाही. जगातील बव्हंशी प्राणी-पक्षी व जलचर जगतातही द्वै-लिंगी संबंध (समलिंगी व विभिन्नलिंगी) ठेवले जातात. यात बदके, कबुतरे, पेंग्वीन, डाल्फिन, सिंह, हत्ती, रानरेडे, जिराफ सरडे, घोरपडी इ. सर्वच आले. अर्थात त्यामागील कार्यकारण भाव आणि मानवी कारणभाव यात फरक आहे हे नक्कीच. पण पशुजगतही या प्रकारच्या संबंधांपासुन मुक्त नाही. किंबहुना नैसर्गिक कारणांमुळे निर्माण होणारी गरज आहे.

ही विकृती आहे काय?

निसर्गत: प्रत्येक पुरुषात थोडा स्त्रीचा तर प्रत्येक स्त्रीत थोडा पुरुषाचा अंश असतोच परंतु भोजनात मीठ असते तेवढ्याच प्रमाणात. त्यामुळेच मैत्री, स्नेह या सामाजिक भावना निर्माण होतात. परंतु या बाबतचे संतुलन ढळले कि समलिंगी संबंधांकडे वाटचाल होवू लागते. ही प्रवृत्ती (मी याला विकृती म्हणणार नाही) जन्मजात असते असा दावा अनेकदा केला जातो, पण ते सर्वस्वी खरे नाही. सम-रती बनण्यात अनेकदा कौटुंबिक, सामाजिक पर्यावरणामुळेही मानसिक बदल घडवण्यात हातभार लागतो व निसर्गत: तशी नसलेली व्यक्तीही समलिंगी बनु शकते. त्यासाठी आपण खालील काही कारणांवर चर्चा करुयात.

१. ज्या पालकांना मुलगाच हवा असतो पण मुलगीच झाली तर असे पालक अनेकदा मुलीला मुलासारखे कपडे घालणे, तशीच केशरचना करणे ई. उपद्व्याप करत असतात. मुलगा झाला, पण मुलगी हवी होती असे झाले तर त्याच्यावर मुलीचे संस्कार केले जातात. यातुन जी मानसिकता बालवयापासुनच निर्माण होत जाते ती विभिन्नलिंगियांबाबत आकर्षण वाटण्याऐवजी समलिंगियांबाबत आकर्षण निर्माण करते.

पालकांचे याबाबत प्रबोधन करणे आवश्यक आहे. मुलाला मुलासारखेच व मुलीला मुलीसारखेच वाढु दिले पाहिजे. आता "नैसर्गिक" कलच जन्मता: वेगळा असला तर त्याचाही स्वीकार मोकळेपणाने केला पाहिजे. परंतु स्वत:च्या कर्माने समलिंगी निर्माण करण्यास हातभार लावणे हाच मुळात एक सामाजिक अपराध आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

२. कळत्या वयात विभिन्न-लिंगिय व्यक्तीची अनुपलब्धता. मुले व मुली लग्नाच्या वयाच्या आधीच वयात आलेले असतात. सामाजिक दबाव, योनीशुचितेचा आजही असलेला प्रचंड प्रभाव, आपल्याकडील विचित्र कायदे यामुळे विभिन्न लिंगियांचाच बाबतीत आकर्षण असले तरी ते जेंव्हा अप्राप्य होते व शरीर वासना जिंकतात तेंव्हा वासनाशमनासाठी समलिंगियच एकमेकांना मदत करू लागतात. असे घडण्याचे प्रमाण खेड्यांत तर कल्पना करता येणार नाही एवढे प्रचंड आहे. यातील अनेकजण पुढे लग्न झाल्यावर हा नाद सोडुन देतात, काही बाय-सेक्श्युअल बनतात तर अत्यल्प मंडळी कायमस्वरुपी समलिंगी बनतात, कारण त्यातच आनंद मिळत असतो. ही विभक्ती किती काळ संबंध राहिले यावर अवलंबुन असते. अनेक मुली वा मुले केवळ ज्येष्ठांच्या बलात्काराने समलिंगी बनल्याची अनेक उदाहरणे आहेत. होस्टेल्समद्धे राहणा-यांनी कधीतरी हा अनुभव (आवडो अथवा न आवडो) घेतलेलाच असतो, व तेथुनही समलिंगी निर्मितीचे लघुउद्योग चालु असतात..

कामशास्त्र ज्या देशात सर्वप्रथम लिहिले गेले त्या देशात सेक्सकडे पाहण्याचा दृष्टीकोन अजुनही विकृत आहे. मानवी कामवासना या मुळात नैसर्गिक आहेत. त्याचे शमन करण्याची सोय असायलाच हवी. वेश्या (अगदी पुरुषवेश्यांचीही) नीट आरोग्यदायी सोय असायला हवी, अथवा समाजातच तरुण तरुणींना पुरेशी मोकळीक द्यायला हवी. सातच्या आत घरात हा फंडा कालबाह्य झालेला आहे. पुर्वी गणिकांना समाजात जो सन्मान होता तो या मोकळ्या मनोवृत्तीमुळेच. तसेच वसंतोत्सवादि उत्सव खास तरुण-तरुणींकरताच राखुन ठेवलेले असत. त्यंत तरुण-तरुणींना मुक्त मोकळीक असे. पण हे उत्सव संस्कृती रक्षकांनी कधेच बंद पाडुन ताकले आहे. वेश्यांचे म्हणावे तर बव्हंशी एड्सचे-गुप्तरोगांचे आगर आहेत. त्यांना समाजात कसलाही दर्जा नाही. सर्वांना तेथे जायची हौस असतेच, पण कबुल करायची शरम वाटते...मग असे दुस-यांना सहजी शंका येणार नाही असे "कुतुहल" व वासना शमवण्याचे मार्ग शोधले जातात हेही लक्षात घेतले पाहिजे.

. ३. दीर्घ पल्ल्याच्या शिक्षा भोगणारे कैदी बाय डिफाल्ट समलिंगी बनतात. त्यांच्या मादीची भुमिका करणा-याची स्त्रीसारखीच काळ्जी घेतात, अगदी लुगडी चोळीही हौसेने घालायला लावतात. येरवडा जेलमद्धे अचानक झडतीसत्र आले तेंव्हा दोनशेपेक्षाही अधिक साड्या मिळाल्या होत्या. महिला तुरुंगही यात मागे नाहीत. हीच मंडळी जेंव्हा मुक्त होवून बाहेर येते तेंव्हा अर्थातच ते पुर्णपणे समलिंगी बनलेले असतात.

अशा दीर्घमुदतीच्या सजा झालेल्या कैद्यांना कुटुंबियांना भेटता यावे यासाठी प्यरोलची तरतुद आहे. पण ती वर्ष दोन-वर्षांतुन मोठ्या मिन्नतवारीने मिळते. धनदांडगे कैदी इस्पितळात दाखल व्हायची सोय करुन आपली सोय करुन घेतात...त्यांचे ठीक आहे, पण मग अन्य कैद्यांची नैसर्गिक गरज मारण्याचा कोणता मानवी अधिकार आपल्या सुसंस्कृत समाजाला व कायद्याला आहे? पण तसे होते व समलिंगी आपसुक तयार होतात...कारण मनुष्य वासनाशमनाचा काहीतरी तोडगा काढतोच! मग ती सवय बनते. त्यापेक्षा नैसर्गिक मार्गानेच त्यांचे वासनाशमन होईल अशी व्यवस्था करता आली तर? मग ज्या संबंधांना आपण समाज-कुटुंबसंस्थेचे मारेकरी समजतो तसे संबंधच निर्माण होणार नाहीत.

४. शेळी, म्हैस व गायीशीही वासना न आवरता आल्याने संभोग करणारेही खुप महाभाग आहेत. खेड्यात याचे प्रमाण अर्थातच जास्त आहे व यात बहुतेक गुराखीच अधिक असतात. वर आधीच सांगितल्याप्रमाणे हा अनैसर्गिक संभोग असला तरी त्याचे कारण विकृती हे नसुन मादीची अनुपलब्धता आहे. स्त्रीयांना अश्वमेध प्रसंगी यद्न्यिय अश्वाशी संभोग करावा लागे, यावरुन स्त्रीयांतही ही अनैसर्गिक उर्मी येत असेल, शास्त्रकर्त्यांना ते माहित असल्याने अशी अनुमती असेलही...परंतु विद्यमान जगात तिचे शमन कसे होते हे मला माहित नाही.

थोडक्यात, निसर्गत: जेनेटिक समस्येने, हार्मोनिक असमतोलामुळे जी समलिंगी संबंधांची भावना निर्माण होते अशा व्यक्तींना दोष देणे आपला मुर्खपणा आहे. त्यांनाही सन्मानाने जगायचा, आपले हक्क अबाधित ठेवण्याचा अधिकार आहे व तो नाकारणे अमानवी आहे. अश रितीने निर्मान होणारे सम-रती हे तुलनेने अत्यल्प असतात. परंतु जे ६०-७०% समलिंगी निर्माण होतात ते आपल्याच सामाजिक विकृतींमुळे, आपल्या कर्मामुळे हेही लक्षात घ्यायला हवे. धर्म-संस्कृती या संकल्पना किती ताणायच्या हे आता आपल्याला ठरवावे लागणार आहे. कामवासना अत्यंत नैसर्गिक असून तिचे दमन विशिष्ट मर्यादेपार अशक्य असते व तिचा स्फोट हा असे संबंध निर्माण होण्यात होतो. अनेकजण मग बलात्कारही करतात. त्यामुळे याकडे अत्यंत मोकळ्या दृष्टीने पाहण्याची व तसे प्रबोधन करण्याची गरज आहे. निकोप कामजीवनाची सोय ज्या समाजात आहे त्या समाजात असे घडणार नाही अशी आशा आपण करु शकतो.

यावर प्रश्न असा उद्भवेल कि अमेरिकेत एवढे मुक्त लैंगिक स्वातंत्र्य असुनही तिकडे अशांचे प्रमाण जास्त का? पण हा प्रश्न निरर्थक असाच आहे, कारण ते मुक्तपणे बोलतात, हक्कांसाठी लढतात म्हणुन ती संख्या मोठी वाटते. आपल्याकडे असे प्रमान अत्यंत नगण्य असे आहे, वास्तव हे आहे किमान दहा कोटी लोकांनी पौगंड ते युवावस्थेतील काळात हे अनुभव घेतलेले असतात...त्यातील कोटभर स्त्री-पुरुष आज किमान समलिंगी आहेत. लोकलाजेस्तव हे संबंध गुप्तच ठेवण्याची खबरदारी ते घेत असतात. पण ही संख्या काळजी करावी एवढी मोठी आहे, हे नक्कीच! त्यामुळे संस्कृती रक्षकांनाच प्रथम डोळे उघडुन या वास्तवाकडे गांभिर्याने पहात जरा समाजाला मोकळा श्वास घेवू दिला पाहिजे.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

विवेचन मानवतावादी दृष्टिकोनातून लिहिलेलं असावं असं वाटतं, पण त्याचा वैद्यकीय किंवा शास्त्रीय पाया काहीसा ठिसूळ असल्याचंदेखील जाणवतं आहे. उदा :

>>थोडक्यात, निसर्गत: जेनेटिक समस्येने, हार्मोनिक असमतोलामुळे जी समलिंगी संबंधांची भावना निर्माण होते अशा व्यक्तींना दोष देणे आपला मुर्खपणा आहे.<<

>>परंतु जे ६०-७०% समलिंगी निर्माण होतात ते आपल्याच सामाजिक विकृतींमुळे, आपल्या कर्मामुळे हेही लक्षात घ्यायला हवे. <<

समलैंगिकता ही जनुकीय समस्या किंवा संप्रेरकांच्या असमतोलापायी येते किंवा मुख्यतः सामाजिक विकृतींमुळे येते याला आधुनिक वैद्यकात आधार नसावा.*

>>यावर प्रश्न असा उद्भवेल कि अमेरिकेत एवढे मुक्त लैंगिक स्वातंत्र्य असुनही तिकडे अशांचे प्रमाण जास्त का? पण हा प्रश्न निरर्थक असाच आहे, कारण ते मुक्तपणे बोलतात, हक्कांसाठी लढतात म्हणुन ती संख्या मोठी वाटते. आपल्याकडे असे प्रमान अत्यंत नगण्य असे आहे<<

हे खरं तर उलट असायला हवं. म्हणजे जिथे मुक्त वातावरण आहे तिथे लोक या बाबतीत खरं बोलतात आणि वागतात म्हणून तिथलं समलैंगिकांचं प्रमाण अधिक स्पष्ट जाणवतं. आपल्याकडे उलट अशी प्रवृत्ती झाकून, स्त्रीशी विवाह करून आपण 'नॉर्मल' आहोत असं भासवलं जातं म्हणून हे प्रमाण कमी आहे असं भासतं. समलैंगिक वर्तन करणारे बहुसंख्य लोक हे स्त्रीची अनुपलब्धता असल्यामुळे किंवा लहानपणी मुलीसारखं वागवलं गेल्यामुळे वगैरे तसे वागू लागतात असं लेखकाचं मत दिसतं. परंतु याला वैद्यकीय आधार नाही. उदाहरणार्थ *:

The American Psychological Association, American Psychiatric Association, and National Association of Social Workers stated in 2006:
“ Currently, there is no scientific consensus about the specific factors that cause an individual to become heterosexual, homosexual, or bisexual—including possible biological, psychological, or social effects of the parents' sexual orientation. However, the available evidence indicates that the vast majority of lesbian and gay adults were raised by heterosexual parents and the vast majority of children raised by lesbian and gay parents eventually grow up to be heterosexual. ”

The Royal College of Psychiatrists stated in 2007:
“ Despite almost a century of psychoanalytic and psychological speculation, there is no substantive evidence to support the suggestion that the nature of parenting or early childhood experiences play any role in the formation of a person's fundamental heterosexual or homosexual orientation. It would appear that sexual orientation is biological in nature, determined by a complex interplay of genetic factors and the early uterine environment. Sexual orientation is therefore not a choice. ”

The American Academy of Pediatrics stated in Pediatrics in 2004:
“ Sexual orientation probably is not determined by any one factor but by a combination of genetic, hormonal, and environmental influences. In recent decades, biologically based theories have been favored by experts. Although there continues to be controversy and uncertainty as to the genesis of the variety of human sexual orientations, there is no scientific evidence that abnormal parenting, sexual abuse, or other adverse life events influence sexual orientation. Current knowledge suggests that sexual orientation is usually established during early childhood. ”

* संदर्भ : समलैंगिकतेविषयी विकीपीडिआ पान

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आपल्याकडे उलट अशी प्रवृत्ती झाकून, स्त्रीशी विवाह करून आपण 'नॉर्मल' आहोत असं भासवलं जातं

स्त्रीशी/पुरुषाशी (अ‍ॅज़ द केस मे बी)?

(अन्यथा, प्रतिसादाच्या उर्वरित भागाशी असहमतीचे काही कारण प्रथमदर्शनी तरी दिसत नाही.)

जो संभोग परस्पर संमतीशिवाय घडून येतो तो विकृत. जो संभोग परस्पर संमतीने घडून येतो तो प्रकृतीस धरुन.
____
#४ - प्राण्यांची संमती घेता येत नाही. तेव्हा हा संभोग केवळ "अ‍ॅनिमल अ‍ॅब्युज" या घृणास्पद सदराखाली मोडतो. अगदी "चाईल्ड अ‍ॅब्युज" असते त्याप्रमाणेच.
_________

कुठला अश्वमेध यज्ञीय अश्वांशी स्त्रियांचा संबंध? काय आधार आहे या वाक्याला. तळटीपेत सोनावणींनी संदर्भ (श्लोक आदि) दिले आहेत काय?

कुठला अश्वमेध यज्ञीय अश्वांशी स्त्रियांचा संबंध? काय आधार आहे या वाक्याला. तळटीपेत सोनावणींनी संदर्भ (श्लोक आदि) दिले आहेत काय?

अधिक शोध घेता मला ही माहिती सापडली. ह्याविषयीच्या माहितीसाठी आपण विकिपीडियाची http://en.wikipedia.org/wiki/Ashvamedha ही लिंक पहावी.

The chief queen ritually calls on the king's fellow wives for pity. The queens walk around the dead horse reciting mantras. The chief queen then has to mimic copulation with the dead horse, while the other queens ritually utter obscenities.

On the next morning, the priests raise the queen from the place where she has spent the night with the horse. With the Dadhikra verse (RV 4.39.6, YV VSM 23.32), a verse used as a purifier after obscene language.

'नैसर्गिक' किंवा 'प्रकृती' म्हणजे काय हे स्पष्ट झाल्याशिवाय 'अनैसर्गिक' किंवा 'विकृती' ठरवता येत नाही. त्यातच मुळात एकवाक्यता नाही कारण जगात अनेक विचारप्रणाली आहेत. ते ठरवायचेच असेल तर एक कुठल्या तरी एका प्रणालीचा आधार लागतो. आता तसे करायचे तर सङ्ख्याबळाचे महत्त्व आले जिथूनच समाजात अल्पसङ्ख्याक समूहाची 'मुस्कटदाबी' सुरू होते. समाजव्यवस्था 'सन्तुलित' ठेवण्यासाठी आत्ताच्या काळात विज्ञान ही पाश्चात्त्य जगात आणि अनेक देशान्त कायदे ठरवण्यासाठीची मूलभूत बैठक आहे. (भारतातले माहीत नाही कारण भारतातले विवाहविषयक कायदेच मुळात धर्मानुसार ठरवायची मुभा आहे.) त्याऐवजी उदाहरणार्थ, जर पुनर्जन्माची आणि मानवाच्या जन्माच्या कारणाची तर्कप्रणाली आधार म्हणून घेतली तर 'प्रकृती' आणि 'वि़कृती' (खरे तर 'चूक' आणि 'बरोबर') या गोष्टीङ्कडे बघण्याची दृष्टी बदलते. त्यामुळे जोपर्यन्त चर्चेसाठी ही बैठक सिद्ध होत नाही तोपर्यन्त हा वाद-विवाद कुठेही भरकटू शकतो.

सर्वांच्या प्रतिक्रिया वाचल्या. मनःपुर्वक धन्यवाद. अश्वमेधाबद्दलच्या शंकेचे आधी निरसन करण्याचा प्रयत्न करतो. अश्वमेध यज्ञासंबंधीचा यज्ञविधी यजुर्वेदात येतो. यजुर्वेदात पट्टराणेचा अश्वाशी संभोग विहित आहे. या प्रसंगीचे मंत्र अश्लील असे असून त्यांचा अनुवाद यजुर्वेदाचे अनुवादक ए. बी. कीथ यांनी टाळले होते. रामायणातील बालकांडातील खालील श्लोक पहावा:

पतत्रिणा तदा सार्ध सुस्थितेन च चेतसा
अवसद्रजनीमेकां कौसल्या धर्मकाम्यया- (१४-३४)
(कौसल्येने धर्मकामना मनात धरुन स्थिर चित्ताने अश्वासह एक रात्र घालवली.)

स्त्रौतसुत्रात (कात्यायन-२०.६ .१५-१६)पट्टराणी व मृत अश्वाचे मैथुन विहित आहे. पुढील काळात मात्र हे मैथुन सांकेतिक स्वरुपाचे राहिले. परंतु मंत्रोच्चार व हावभाव मात्र कायम ठेवले गेले. पुढे अश्वमेध यज्ञच बंद पडले हा भाग वेगळा. असो. मी हे एक उदाहरणमात्र दिले आहे व स्त्रीयाही पशु-मैथुन करु शकत असतील असा अंदाजमात्र वर्तवला आहे. आजचे वास्तव काहीही असू शकेल.

मी मेडिकल सायन्सचा विद्यार्थी नाही, त्यामुळे तांत्रिक संज्ञा चुकु शकतात, परंतु जन्मजात समलैंगिकत्व हे वेगळे आहे व सामाजिक परिस्थितीने येणारे समलैंगिकत्व वेगळे आहे. येथे मला "प्रकृती" म्हणजे ज्या कारणांसाठी मुळात निसर्गाने जननेंद्रिये दिली आहेत त्या कारणासाठीच ती वापरणे तर त्याउलट करणे म्हणजे एक नैसर्गिक असमतोलातुन निर्माण होणारा बिघाड व त्यातुन होणारे वर्तन.

सामाजिक कारणांचा समलैंगत्वावर परिणाम होत नाही हे मान्य होण्यासारखे नाही. किंबहुना याच घटकांचा मोठा परिणाम असतो हे मी अनेक उदाहरणांवरुन सांगु शकतो. समलिंगी दांपत्याची दत्तक मुले नौर्मल असणे यातुन काही सिद्ध होत नाही. मी आमच्या गांवात ३५ वर्षांपुर्वी मुलीसारखा वाढवला गेलेला तरुन होमो बनला हे पाहिले आहे. त्यानेही लग्न केले. त्याची बायको दोन वर्षात घर सोडुन निघुन गेली. हाही नंतर मेला. त्याची जोडपीही अशीच आयुष्य बरबाद करुन बसली. (सवय लागलेली होती.) नंतरही मी अशा अनेक व्यक्ती पाहिल्या. खेड्यांत हे व प्राणि-संभोगाचे प्रमाण फार मोठे आहे हे समजावुन घेण्याची गरज आहे. तुरुंगंबद्दल तर मी लिहिलेच आहे. त्यामुळे जैवीक, सामाजिक, मानसिक वा मुले वाढवण्याच्या पद्धतीचा काही संबंध नसतो असे म्हनता येत नाही. माझा मुद्दा एवढाच आहे कि जेवढी सामाजिक बंधने जास्त तेवढी अशी प्रव्रुत्ती होण्याचे प्रमाण जास्त. आपला समाज कधीच सोवळा नव्हता व नाही. येथे आवर्जुन सांगायची बाब म्हनजे अठराव्या शतकातील नाचे. सरदारादी मंडळी त्यांच्याशीही संबंध ठेवत असत, त्यातुन काही प्रेमप्रकरणेही उद्भवलेली होती याचे संदर्भ काही साधनांत मिळतात. (मला याक्षणी नेमका संदर्भ आठवत नाहीय, पण आठवला कि नक्की देईन.)

धन्यवाद.

>>स्त्रीशी/पुरुषाशी (अ‍ॅज़ द केस मे बी)?<<

विधायक दुरुस्ती सुचवल्याबद्दल 'न'वी बाजू यांचे आभार. 'भिन्नलिंगी व्यक्तीशी विवाह करून...' असं म्हणणं कदाचित जास्त सयुक्तिक ठरेल. असो.

>>"प्रकृती" म्हणजे ज्या कारणांसाठी मुळात निसर्गाने जननेंद्रिये दिली आहेत त्या कारणासाठीच ती वापरणे तर त्याउलट करणे म्हणजे एक नैसर्गिक असमतोलातुन निर्माण होणारा बिघाड व त्यातुन होणारे वर्तन. <<

प्रकृतीनं संततीवृद्धी म्हणजे वंशसातत्यासाठी ही इंद्रियं दिली आहेत असं मानलं तर मुखमैथुन, गर्भनिरोधक साधनं वापरणं किंवा रजोनिवृत्तीनंतर शारिरीक संबंध ठेवणं अशा अनेक गोष्टी नवरा-बायकोंतही अनैसर्गिक म्हणता येतील. पण यातली कोणतीही गोष्ट 'नैसर्गिक असमतोलातून निर्माण झालेल्या बिघाडापोटी' केली जाते असं मानण्याला वैद्यकीय आधार नाही.

>>सामाजिक कारणांचा समलैंगत्वावर परिणाम होत नाही हे मान्य होण्यासारखे नाही. किंबहुना याच घटकांचा मोठा परिणाम असतो हे मी अनेक उदाहरणांवरुन सांगु शकतो.<<

व्यक्तिगत आयुष्यात दिसलेल्या उदाहरणांपेक्षा उपरोल्लेखित संस्थांकडे अधिक प्रमाणात आणि शास्त्रीय निकष पार पाडून गोळा केलेली माहिती असावी. त्यामुळे वर उद्धृत केलेल्या "Despite almost a century of psychoanalytic and psychological speculation, there is no substantive evidence to support the suggestion that the nature of parenting or early childhood experiences play any role in the formation of a person's fundamental heterosexual or homosexual orientation." विधानाला तुमच्या-माझ्या व्यक्तिगत अनुभवांहून अधिक वजन देणं भाग पडतं. इथे "fundamental heterosexual or homosexual orientation' हे महत्त्वाचं ठरावं. तुरुंगातला कैदी किंवा अविवाहित गुराखी तात्पुरता समलिंगी/भिन्नप्रजातीय संबंध ठेवत असेल आणि संधी उपलब्ध झाल्यावर पुन्हा भिन्नलिंगी व्यक्तीशीच रत होत असेल तर हा 'fundamental homosexual orientation'चा प्रकार मानता येत नसावा. ते परिस्थितीजन्य वर्तन मानता यावं.

>>जेवढी सामाजिक बंधने जास्त तेवढी अशी प्रव्रुत्ती होण्याचे प्रमाण जास्त. <<

यालाही शास्त्राधार नसावा. अन्यथा ज्या देशांत किंवा संस्कृतींत आता समलिंगी संबंधांना समाजमान्यता आणि कायद्याची मान्यता मिळते आहे तिथे समलिंगी प्रवृत्ती कमी होताना दिसली असती.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिंतातुर जंतुजी, काही गोंधळ तर होत नाहीहे ना? आपण म्हणताय-
---प्रकृतीनं संततीवृद्धी म्हणजे वंशसातत्यासाठी ही इंद्रियं दिली आहेत असं मानलं तर मुखमैथुन, गर्भनिरोधक साधनं वापरणं किंवा रजोनिवृत्तीनंतर शारिरीक संबंध ठेवणं अशा अनेक गोष्टी नवरा-बायकोंतही अनैसर्गिक म्हणता येतील.---
ते आहेच व त्याला कायद्यात गुन्हाच मानले गेले आहे. मुखमैथुन व गुदासंभोग हा भारतीय दंडविधानानुसार अनैसर्गिक संभोग मानला गेला असून तक्रार झाल्यास गुन्हा दाखल होतो. एक गुन्हा पुण्यातील झोपडपट्टीतील महिलेने आपल्या नव-याच्या विरोधात गुदा-संभोगाचा (हा खास पोलिसी शब्द) गुन्हा दाखल केला होता व त्याचे रिपोर्टींग क्राईम रिपोर्टर म्हणुन मी केले होते. रजोनिवृत्तीनंतर संभोग करने कायदेशीर कि बेकायदेशीर हे माहित नाही, ते नैतीक कि अनैतिक हे फार फार तर जबरी झाली कि स्वेच्छा होती यावरुन ठरु शकते. -------
पुढे आपण म्हणता....
----पण यातली कोणतीही गोष्ट 'नैसर्गिक असमतोलातून निर्माण झालेल्या बिघाडापोटी' केली जाते असं मानण्याला वैद्यकीय आधार नाही.-------
नाहीच आहे. फक्त यात दोन्ही व्यक्ती भिन्नलिंगी असतात व त्यात स्वेच्छा वा आपल्या जोडीदाराचे समाधान करण्याची (वा न करण्याची) भावना असु शकते व भावना नसल्यास गुन्हा दाखल करण्याचे स्वातंत्र्य कायद्याने दिलेलेच आहे.
मुळात विषय समलैंगिकतेचा आहे. आपण मला अमेरिकेत वा कोठेतरी झालेल्या सर्वेचा संदर्भ दिला आहे. सर्व्हे हे शास्त्रीय पद्धतीने घेतले जात असले तरी शेवटी ते उत्तरकर्त्यांनी दिलेल्या माहितीवर अवलंबुन असतात. भारतात प्रत्येक सर्व्हेकर्त्या सम्स्थेचे निष्कर्ष वेगवेगळे असल्याचे आपल्यालाही माहित आहे. खुद्द दारिद्र्यरेश्षा ठरवण्यासाठीचे निकष एकही सर्वे वास्तवदर्शी दिग्दर्शन करु शकलेला नाही. आणि ही तर अत्यंत व्यक्तिगत बाब आहे. त्या सर्वेंवर विश्वास ठेवत कोणताही अंतिम निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल असे मला वाटते.
पुढे आपण म्हनता=====
तुरुंगातला कैदी किंवा अविवाहित गुराखी तात्पुरता समलिंगी/भिन्नप्रजातीय संबंध ठेवत असेल आणि संधी उपलब्ध झाल्यावर पुन्हा भिन्नलिंगी व्यक्तीशीच रत होत असेल तर हा 'fundamental homosexual orientation'चा प्रकार मानता येत नसावा. ते परिस्थितीजन्य वर्तन मानता यावं......
मी नेमके हेच म्हटले आहे, शब्द वेगळे असतील. परंतु यातुन (भिन्न प्रजातीय) वगळता कायम स्वरुपीची समलैंगिकता मात्र निर्माण होते. आणि हे दीर्घकालीन सजा भोगणा-यांच्याच बाबतीत घडते असेच मी म्हटले आहे. गुराख्यांबाबत असे सरसकट विधान मी केलेले नाही.
धन्यवाद.

>>ते आहेच व त्याला कायद्यात गुन्हाच मानले गेले आहे. मुखमैथुन व गुदासंभोग हा भारतीय दंडविधानानुसार अनैसर्गिक संभोग मानला गेला असून तक्रार झाल्यास गुन्हा दाखल होतो. एक गुन्हा पुण्यातील झोपडपट्टीतील महिलेने आपल्या नव-याच्या विरोधात गुदा-संभोगाचा (हा खास पोलिसी शब्द) गुन्हा दाखल केला होता व त्याचे रिपोर्टींग क्राईम रिपोर्टर म्हणुन मी केले होते. रजोनिवृत्तीनंतर संभोग करने कायदेशीर कि बेकायदेशीर हे माहित नाही, ते नैतीक कि अनैतिक हे फार फार तर जबरी झाली कि स्वेच्छा होती यावरुन ठरु शकते.<<

'जबरी झाली की स्वेच्छा' हाच खरा तर कळीचा मुद्दा आहे. मानवी संस्कृतीच्या इतिहासात लैंगिक आनंदाच्या अनेक रीती निर्माण झाल्या. त्यातल्या कित्येक वंशवृद्धीसाठी निरुपयोगी असूनही शेकडो किंवा हजारो वर्षं त्या मानवी संस्कृतीचा एक भाग आहेत. त्यामुळेच 'सज्ञान व्यक्ती परस्परसंमतीनं खाजगीत जे लैंगिक वर्तन करतात ते बेकायदेशीर मानू नये' या दिशेनं जगभरातले कायदे बदलत आहेत आणि भारतीय दंडविधानाची दिशाही तेच दर्शवते. थोडक्यात, मुखमैथुनादि क्रिया मूलतः दंडनीय मानल्या जाऊ नयेत ही दिशा आता रूढ आहे.

>>फक्त यात दोन्ही व्यक्ती भिन्नलिंगी असतात व त्यात स्वेच्छा वा आपल्या जोडीदाराचे समाधान करण्याची (वा न करण्याची) भावना असु शकते व भावना नसल्यास गुन्हा दाखल करण्याचे स्वातंत्र्य कायद्याने दिलेलेच आहे.<<

या क्रिया मूलतः दंडनीय नाहीत हे एकदा मान्य केले की 'व्यक्ती भिन्नलिंगी असाव्यात' हा मुद्दाच गैरलागू होतो. म्हणूनच सज्ञान असणं, परस्परसंमती असणं आणि क्रिया खाजगीत घडणं हे मुद्दे त्या क्रियेची दंडनीयता ठरवतात.

>>मी नेमके हेच म्हटले आहे, शब्द वेगळे असतील. परंतु यातुन (भिन्न प्रजातीय) वगळता कायम स्वरुपीची समलैंगिकता मात्र निर्माण होते. आणि हे दीर्घकालीन सजा भोगणा-यांच्याच बाबतीत घडते असेच मी म्हटले आहे.<<

मी उलट म्हणतो आहे. ज्यांचं वर्तन परिस्थितीजन्य नाही तर कायमस्वरूपी आहे, आणि ज्या वर्तनामागे तुरुंगवासासारखी तात्कालिक कारणं नाहीत असे पुरेसे समलैंगिक आढळतात. म्हणून मग 'निव्वळ परिस्थितीमुळे (भिन्नलिंगी जोडीदाराचा तात्पुरता अभाव) कायमस्वरूपी समलिंगी प्रवृत्ती निर्माण होण्याचं प्रमाण मोठं आहे' अशासारख्या दाव्यांना शास्त्राधार नाही.

बाकी मी दिलेल्या निष्कर्षांविषयी संशय असला तर त्यांमागची कार्यपद्धती आपण तपासू शकता. संशोधनात अधिकाधिक वस्तुनिष्ठता आणि त्यायोगे विश्वासार्हता यावी यासाठीचे अनेक प्रमाण निकष आता पाळले जातात. त्यांशिवाय त्या त्या विषयातली मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय नियतकालिकं किंवा ज्ञानपत्रिका (पीरिऑडिकल्स आणि जर्नल्स) संशोधनाला प्रकाशितच करणार नाहीत. शिवाय, आज अशा निष्कर्षांमागचा आधार निव्वळ सर्वेक्षणं नसतात. अनेक पद्धतींनी वस्तुनिष्ठ माहिती आता गोळा केली जाते. उदाहरणार्थ, कोणती चित्रं पाहून मेंदूचा कोणता भाग उत्तेजित होतो याची नोंद करून त्यावरून एखाद्या व्यक्तीची लपवलेली किंवा सुप्त लैंगिक प्रवृत्ती काय असेल याविषयीदेखील माहिती मिळते. डोळ्यांची हालचाल, शरीराच्या विशिष्ट भागांकडे होणार्‍या रक्तपुरवठ्यात वाढ अशा अनेक गोष्टींद्वारे 'fundamental sexual orientation' ठरवता येतं, वगैरे. त्यामुळे अशा संशोधनापेक्षा व्यक्तिनिष्ठ आणि मर्यादित अनुभव प्रमाण मानणं फारसं शास्त्रीय ठरत नाही.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

येथे आपले कही ठिकानी मतभेद आहेत, तरीही मी आपल्या मतांचा सन्मान करतो. समलैंगित्व दंडनीय अथवा तिरस्करणीय असावे कय? यावर त्याबाबत माझेही मत आहे कि "नाही, ते तिरस्करणीय अथवा दंडनीय असु नये...फक्त त्यात स्वेच्छा उभयपक्षी हवी, एन्सायटिंग अथवा जबरी असू नये व ते मी लेखात स्पष्ट केले आहेच. आपले मतभेद परिस्थितीजन्य समलैगत्वाबाबतचे व त्यात नंतर येणारी स्थिरता याबाबत आहेत. त्अरीही चांगली चर्चा केल्याबद्दल व नवे मुद्दे सुचवल्याबद्दल आभार.

>>येथे आपले कही ठिकानी मतभेद आहेत, तरीही मी आपल्या मतांचा सन्मान करतो. <<

माझ्या (किंवा आधुनिक वैद्यक आणि मानसशास्त्र या ज्ञानशाखांत संशोधन करत नसणार्‍या माझ्यासारख्या इतर कुणाच्याही) व्यक्तिगत मतांना किंवा अनुभवांना फार महत्त्व (किंवा सन्मान) देण्याऐवजी या ज्ञानशाखांमध्ये होत आलेल्या संशोधनाधारे या विषयावर पाश्चिमात्य देशांत गेल्या काही वर्षांत जे मतपरिवर्तन झालेलं आहे ते कोणत्या दिशेनं गेलं आहे, आणि त्यानुसार कायद्यांत काय बदल झाले आहेत यांकडे आपलं लक्ष वेधून घेणं हा माझा मुख्य हेतू होता. कोणत्याही विषयातल्या संशोधकाला ते मननीय वाटावं हीच त्यामागची आशा होती - कारण संशोधनाच्या ज्ञानशाखा वेगवेगळ्या असल्या तरीही तर्कशुद्ध आणि विवेकाधारित संशोधनाची बैठक आणि पद्धत ही अशा वैज्ञानिक दृष्टिकोनाला अनुसरतच जाते असं सामान्यतः दिसतं. असो.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आपले म्हणणे योग्य असले तरी आधी हायपोथिसिस आणि मग त्यानुसार पर्श्नावल्या व चाचण्या ही मानसशास्त्रीय सर्वेक्षणाची पद्धत आहे. ती अयोग्य आहे असे नाही परंतु नि:ष्कर्ष हे वेगवेगळ्या परिस्थितेतील, समाजघटकांतील चाचण्यांनुसर व चाचणीपद्धतीनुसारही बदलते असतात हेही एक वास्तव आहे. उदा. अलीकडेच न्युट्रिनोचा वेग प्रकाशवेगापेक्षा अधिक असतो असे संशोधन प्रसिद्ध झाले व दुस-याच महिन्यात ते मागे घेण्याची नामुष्की त्या शास्त्रज्ञांवर कोसळली. संशोधन हे टप्प्याटप्प्यानेच पुढे जाते व अनेक सिद्धांत कालबाह्य ठरतात हा आपला अनुभव आहे. भारतात आपण म्हनता तशा प्रकारचे समलैगिकत्वाच्या बाबतीचे सखोल सर्वेक्षण झाले आहे काय? माज्या माहितीप्रमाने तरी नाही. अमेरिकेतील सर्वेक्षण्/चाचण्यांतुन आलेली निरिक्षणे व नि:ष्कर्ष भारतीय परिप्रेक्षात तशीच्या तशी लागु होतील असे म्हनणेही अवैज्ञानिक ठरेल. माझे व्यक्तिगत निरिक्षण हे पाच-सहा गावांचे व काही वर्षांचे आहे. तसेच अन्य खेड्यातुन आलेल्या मित्रांकडुन ऐकलेल्या माहितीनुसार आहे. तुरुंगात तर मी स्वतः ५१ दिवस होतो त्यमुळे आतली वित्तंबातमी मला माहित आहे. स्त्रीयांबद्दलची मी कसलीही विधाने केलेली नाहीत कारण "माहित नाही".

भारतात व्यापक सर्वेक्षण होणेही आवश्यक आहे व जोवर तसे केले जात नाही तोवर तरी याबाबत खात्रीशीर आकडेवारी उपलब्ध होनार नाही तोवर तरी विशेष जनजागरण होईल असे वाटत नाही. सध्या तरी अंदाजावर विसंबुन रहावे लागत आहे. मुळात या विषयाबाबत जाहीर बोलणे, मत व्यक्त करणे हेही आपल्याकडे जवळपास आजही सामाजिक निषिद्धच आहे. परंतु प्रबोधन व्हायचे असेल तर त्याला इलाज नाही. माझा द्रुष्टीकोन पुर्णतया सामाजिक असून कोठे चुकते याकडे लक्ष वेधण्याचा आहे. सध्या तरी ही मते व्यक्तिगतच आहेत. असो.

मनःपुर्वक धन्यवाद.

>>भारतात आपण म्हनता तशा प्रकारचे समलैगिकत्वाच्या बाबतीचे सखोल सर्वेक्षण झाले आहे काय? माज्या माहितीप्रमाने तरी नाही. अमेरिकेतील सर्वेक्षण्/चाचण्यांतुन आलेली निरिक्षणे व नि:ष्कर्ष भारतीय परिप्रेक्षात तशीच्या तशी लागु होतील असे म्हनणेही अवैज्ञानिक ठरेल.<<

लैंगिकता या विषयासंबंधात बोलताना आपण मानवी शरीर आणि मनाविषयी ठोकताळे बांधत आहोत हे लक्षात घेणं सर्वात महत्त्वाचं आहे. मानवी शरीराची रचना, मेंदूची कार्यपद्धती आणि त्यातून उत्पन्न होणारी व्यक्तीची मानसिकता अशा बाबींत जगभरातल्या मानवांमध्ये साम्यस्थळं खूप आणि सांस्कृतिक फरक त्या मानानं खूप कमी असतात. त्यांचा अभ्यास वैद्यकशास्त्रानुसार केला जातो आणि त्यांचे निष्कर्ष वैश्विक असतात. उदाहरणार्थ, भारतात भारतीयांवर उपचार करणारे अ‍ॅलोपॅथिक डॉक्टर हे आधुनिक वैद्यकाच्या आधारानं उपचार करतात. जगभरात मिळतात तीच औषधं आपल्याकडे वापरली जातात, कारण मानवी शरीर (आणि मन) त्या औषधांना जे प्रतिसाद देतं ते (व्यक्तिगत फरक सोडता) वैश्विक असतात; सांस्कृतिक नाही.

समलैंगिकता : दिल्ली उच्च न्यायालयानं या संदर्भात दिलेला निकाल मुळातून वाचावा अशी मी आपल्याला विनंती करेन. तो या दुव्यावर उपलब्ध आहे. त्यात इंग्लंड, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका अशा विविध देशांतल्या याविषयीच्या कायद्यांचे संदर्भ आहेत. हे कायदे घडताना त्या त्या देशांतल्या न्यायालयांनी विविध देशांतल्या वैद्यकीय संस्थांची (उदा : अमेरिकन सायकॉलॉजिकल असोसिएशन) मतं आधारभूत मानलेली आहेत. एका भारतीय उच्च न्यायालयाला आपला निकाल देताना परदेशी संशोधन आणि त्यावर आधारित परदेशी न्यायालयांचे निकाल ग्राह्य धरावेसे वाटले आणि भारतीय संस्कृतीविशिष्ट मुद्दे त्यात आणण्याची गरज भासली नाही हे आपल्या दृष्टीनं किती महत्त्वाचं आहे हे अर्थात मला सांगता येणार नाही. मी या धाग्यावर दिलेले प्रतिसाद हे निव्वळ माझ्या व्यक्तिगत मतांपेक्षा अधिक विश्वासार्ह स्रोतांवर आधारित आहेत एवढंच मला सांगायचं आहे.

मासल्यादाखल दिल्ली उच्च न्यायालयाच्या निकालातली काही उद्धृतं खाली देत आहे :

There is almost unanimous medical and psychiatric opinion that homosexuality is not a disease or a disorder and is just another expression of human sexuality. Homosexuality was removed from the Diagnostic and Statistical Manual of Mental Disorders (DSM) in 1973 after reviewing evidence that homosexuality is not a mental disorder.

In 1992, the World Health Organisation removed homosexuality from its list of mental illnesses in the International Classification of
Diseases (ICD 10). Guidelines of the ICD 10 reads: “disorders of sexual preference are clearly differentiated from disorders of gender identity and homosexuality in itself is no longer included as a category.”

According to the Amicus brief filed in 2002 by the American Psychiatric Association before the United States Supreme Court in the case of Lawrence v. Texas:
“According to current scientific and professional understanding, however, the core feelings and attractions that form the basis for adult sexual orientation typically emerge between middle childhood and early adolescence. Moreover, these patterns of sexual attraction generally arise without any prior sexual experience.” [page 7 of Amicus brief] Thus, homosexuality is not a disease or mental illness that
needs to be, or can be, 'cured' or 'altered', it is just another expression of human sexuality.

ऑस्ट्रेलियन कोर्टानं दिलेल्या निर्णयामागची कारणमीमांसा दिल्ली उच्च न्यायालयानं उद्धृत केली आहे. ब्रिटिशकाळात आपल्याकडे याविषयी जो कायदा अस्तित्वात आला तोच ऑस्ट्रेलियात होता. तो चुकीचा का होता याविषयी ऑस्ट्रेलियन कोर्ट म्हणतं :

Such laws are wrong:
[...]
Wrong because they fly in the face of modern scientific knowledge about the incidence and variety of human sexuality

किंवा -

Discrimination on the basis of sexual orientation is itself grounded in stereotypical judgments and generalization about the conduct of either sex. This is stated to be the legal position in International Law and comparative jurisprudence.

वगैरे वगैरे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सरजी, आपण दिलेले रेफरन्सेस मी आधीच पाहिले आहेत. त्याबद्दल अधिक न बोलता मी खालील मुद्दे मांडु इच्छितो.

१. समलैंगिकता (नैसर्गिक जैविक असंतुलनाने) निर्माण होते त्याबाबत कसलाही विवाद नाही व त्यामागे मानसिक कारणे नसुन निव्वळ नैसर्गिक प्रेरणा असतात व त्यांचा सन्मान केलाच पाहिजे हे मी म्हटलेही आहे व त्याला विकृती मानु नये, प्रव्रुत्ती मानावे असेच म्हटले आहे. याचाच अर्थ या प्रकाराला "आजार" मानु नये असाच होतो.
२. “According to current scientific and professional understanding, however, the core feelings and attractions that form the basis for adult sexual orientation typically emerge between middle childhood and early adolescence. Moreover, these patterns of sexual attraction generally arise without any prior sexual experience.” [page 7 of Amicus brief] Thus, homosexuality is not a disease or mental illness that
needs to be, or can be, 'cured' or 'altered', it is just another expression of human sexuality."

काम-प्राथमिकता ही बालपण ते पौगंडावस्था या काळात, कसलाही कामुक पुर्वानुभव नसतांना ठरते हे विधान फारच सधारणात्मक विधान आहे. हे विधान वैज्ञानिक नाही. कारण काम-प्राथमिकता ही सर्वात आधी कामभावना तृप्त करु शकणा-या बाबींच्या/साधनांच्या उपलब्धतेवर अवलंबुन असते. पण समलैंगिकत्व हा आजार नाही याबाबत पुन्हा सहमत. महत्वाचे हे कि कामभावनेचे शमन. कोणी ते हस्तमैथुन करुन करेल, कि गद्दीमैथुन. कोणी ते काकड्या-रताळे वापरुन करेल कि कोणी अन्य्...अन्य्...पद्धतींनी. हे स्पष्ट लिहिओत आहे ते मुद्दा स्पष्ट व्हावा म्हणुन. एके काली "वीर्यनाश म्हणजे मृत्यु" असा जयघोष करत एका पीढीची वाट लावनारे विद्वान होतेच व आजही तशा जाहीराती पेपरांत येतच असतात. हा आजार नाही, उद्दीपीत कामभावनेचे शमन करण्याचे मार्ग लोक शोधतात, मग ते कसेही असोत, आणि मला वाटते हेच मी माझ्या लेखात लिहिले आहे. त्यामुळे "...it is just another expression of human sexuality." आपण दिलेले हे उद्घृत त्याआधीचे विधान मिळवले तर अर्धसत्य ठरते.

मी येथे मुळात प्राणीजगतातही समलैंगिकत्व असते हे लिहिले आहेच. ही प्रव्रुत्ती आहे हे एकदा म्हटल्यानंतर ती विकृती आहे असे कसे असेल? पुन्हा माझे म्हनणे हेच आहे कि आपण जीही उद्घ्रुते दिली आहेत तीही शास्त्रीय नाहीत.

कायद्यांबाबत म्हनाल्...तर यात कायद्याने पडुच नये, हा त्याचा भागच नाही, असेच मी म्हतलेले आहे. उलट प्रबोधन आणि ज्याही कारनांनी अनैसर्गिक (म्हणजे जे जन्मता: नाहीत) समलिंगी बनण्याची स्थिती ओढवते त्यावर कसा आळा घालता येईल यावर विचार व तसा प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे प्रकार उपच्घारांनी बदलता येवु शकतात, थांबवता येवु शकतात्...पण मुलता: जे तसे आहेत त्यांना बदलवता येत नाही, त्याला अदुयाप नैतीक विज्ञान अनुमती देत नाही हेही लक्षात घ्यायला हवे.

>>समलैंगिकता (नैसर्गिक जैविक असंतुलनाने) निर्माण होते त्याबाबत कसलाही विवाद नाही व त्यामागे मानसिक कारणे नसुन निव्वळ नैसर्गिक प्रेरणा असतात व त्यांचा सन्मान केलाच पाहिजे <<

'नैसर्गिक जैविक असंतुलन' या शब्दांविषयीच प्रश्न आहे. संशोधनातून या प्रवृत्तीतली साहजिकता/नैसर्गिकता सिद्ध झाली आहे. मुद्दा स्पष्ट होण्यासाठी एक उदाहरण देतो : त्वचेचा वर्ण गोरा असणं हे नैसर्गिक आणि काळा असणं हे जैविक असंतुलन मानलं जात नाही. केवळ काही व्यक्ती काळ्या तर काही गोर्‍या असतात आणि हा भेद नैसर्गिक/साहजिक आहे असं मानलं जातं. तद्वत हे आहे.

>>काम-प्राथमिकता ही बालपण ते पौगंडावस्था या काळात, कसलाही कामुक पुर्वानुभव नसतांना ठरते हे विधान फारच सधारणात्मक विधान आहे. हे विधान वैज्ञानिक नाही. कारण काम-प्राथमिकता ही सर्वात आधी कामभावना तृप्त करु शकणा-या बाबींच्या/साधनांच्या उपलब्धतेवर अवलंबुन असते. <<

मूलभूत लैंगिक प्रवृत्ती (fundamental homosexual orientation) ही कशाच्याही किंवा कुणाच्याही उपलब्धतेनं किंवा तिच्या अभावानं ठरत नाही म्हणूनच ती मूलभूत असते असं संशोधन सांगतं.

>>ज्याही कारनांनी अनैसर्गिक (म्हणजे जे जन्मता: नाहीत) समलिंगी बनण्याची स्थिती ओढवते त्यावर कसा आळा घालता येईल यावर विचार व तसा प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे प्रकार उपच्घारांनी बदलता येवु शकतात, थांबवता येवु शकतात्.<<

सज्ञान व्यक्तीच्या बाबतीत 'हे प्रकार' 'थांबवणं' किंवा त्यांना 'आळा घालण्याच्या' दृष्टीनं पावलं उचलणं हे अशास्त्रीय आणि अनैतिक आहे. व्यक्ती सज्ञान असली तर तिला आपल्या मर्जीनुसार (अर्थात, परस्परसंमती आणि खाजगीपणा लक्षात घेऊन) लैंगिक वर्तन करण्याची मुभा असणं नैतिकतेला धरून होईल असं मानणं आणि त्या अनुषंगानं कायदे करणं ही जगातल्या मानवतावादी आणि लोकहितवादी सरकारांची दिशा आहे. त्याचा आधार वैद्यकीय आणि मानसशास्त्रीय संशोधन आहे. उदाहरणार्थ, 'सायंटिफिक अमेरिकन'मधल्या एका लेखाचा दुवा - Can Psychiatrists Really "Cure" Homosexuality?

असो. मी पुनःपुन्हा केवळ एवढंच सांगू पाहतो आहे की जागतिक स्तरावर जे संशोधन ठिकठिकाणी उद्धृत केलं जातं आणि अशा विषयातल्या तर्कशुद्ध युक्तिवादांत जे प्रमाण मानलं जातं त्याला आपण निव्वळ आपल्या व्यक्तिगत मतं/अनुभवांवरून खोडू पाहता आहात. जर आपल्यापाशी याला खोडून काढणारे आणि शास्त्रशुद्ध संशोधनाच्या पातळीवर खरे ठरू शकतील असे पुरावे आणि युक्तिवाद असतील तर आपण नक्कीच यावर शोधनिबंध प्रकाशित करू शकता. तो जागतिक स्तरावर चांगलाच गाजेल. ती मुभा तुम्हाला आहे. पण जोवर तसं होत नाही तोवर निव्वळ तुमची मतं म्हणून कुणी याला वजन द्यावं ही अपेक्षा अवास्तव आहे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ज्ञानसंपन्न आणि अनुभवी प्रतिक्रिया वाचून बरीच माहिती मिळत आहे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

ही चर्चा होत आहे हे चांगले. समाजातील विचारप्रवाह बदलत असल्याची ही चिन्हे आहेत.

"तुमचा हा लेख अतिशय संतुलित आहे.
माझे हॉटेल व्यवस्थापन करणारे काही मित्र लहानपणापासून हॉस्टेल वर राहायचे तेव्हा त्यांना सुरवातीला होमसिक वाटले कि त्यांचे जेष्ठ सहकारी त्यांना शौशालयात घेऊन यायचे . आपल्या आत्प्तांपासून दूर गेलेल्या त्या अभागी जीवांची स्वतःच्या विश्वात रमण्याची ही क्लुप्ती त्यांना क्षणभंगुर आनंद द्यायची पण त्यांना आयुष्यभर समलैंगिक बनवून जायची.
पंचतारांकीत दुनियेत काम करतांना ,कूच पाने के लिये कूच खोना पडता हे वाक्य मुलींच्या इतके मुलांना लागू पडतांना पहिले आहे.
आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीत महिलांचे शोषण हे काही नवीन व त्या कल्चर मध्ये अघटीत मानले जात नाही. मात्र पुरुष मोडेल किंवा होतकरू अभिनेत्रे पार कोलमडून पडेल हे मी पाहिले आहे"

ही माझ्या संस्थलावरील प्रतिक्रिया एक आहे. यावरही विचारमंथन अभिप्रेत आहे.

धन्यवाद.

एखाद्या अविवाहित स्त्रीवर बलात्कार झाल्यास तिचे लग्न त्या पुरूषाशी लावून देणे इष्ट अशा प्रकारचे (योनीशुचितेच्या भोंगळ कल्पनांचे) विचारही ज्या समाजात आढळतात तिथे एकदा समलिंगी संबंध (जबरदस्तीने वा आपखुशीने) ठेवले म्हणून मनुष्य समलिंगीच झाला असे विचार नसतीलच कशावरून?

या प्रतिक्रियेवरून जीवशास्त्रापेक्षा समाजशास्त्राचा आणि लोकांकडे असणार्‍या शास्त्रीय माहितीच्या अभावाचा अभ्यास करता येईल.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चिंतातुर जंतूंचे प्रतिसाद आवडले आणि पटलेही.

मूळ लेखातल्या काही विधानांबद्दल मला शंका आहेतः

प्रत्येक पुरुषात थोडा स्त्रीचा तर प्रत्येक स्त्रीत थोडा पुरुषाचा अंश असतोच

याचा नक्की अर्थ काय? स्त्री आणि पुरूष यांच्यात फरक काय असतो किंवा पुरूष आणि स्त्री यांच्या शास्त्रीय व्याख्या काय?

निसर्गत: जेनेटिक समस्येने, हार्मोनिक असमतोलामुळे जी समलिंगी संबंधांची भावना निर्माण होते अशा व्यक्तींना दोष देणे आपला मुर्खपणा आहे.

१. जनुकीय समस्या म्हणजे नक्की काय? आणि कोणत्या प्रकारच्या समस्येमुळे समलिंगी संबंधांची भावना निर्माण होते? अशा काही प्रकारचे संशोधन प्रसिद्ध झालेले आहे काय? असल्यास त्याचा संदर्भ मिळेल का? वेगवेगळ्या जनुकीय शारीरिक समस्यांसाठी उत्तरदायी असणारी जनुके वेगळी करण्यात आलेली आहेत. तशा काही प्रकारचे जनुक समलैंगिकत्त्वासाठी शोधले गेलेले आहे का?
२. स्त्रियांमधे टेस्टोस्टीरॉन (पुरूषांमधे स्पर्म्स निर्माण करणारा, स्नायू जपणारा हॉर्मोन) आणि पुरूषांमधे एस्ट्रोजेन (स्त्रियांमधे मासिक पाळीशी संबंधित अतिशय महत्त्वाचा हॉर्मोन, शिवाय त्वचा आणि केसांची तकाकी राखण्यासाठी आवश्यक) हे हॉर्मोन आढळणे सामान्य असते. स्त्रियांच्या शरीरात टेस्टोस्टीरॉनचे प्रमाण कमी झाल्यास स्नायू टिकत नाहीत, पुरुषांमधे इस्ट्रोजेन नसल्यास हाडे ठिसूळ होतात. यांचे प्रमाण ठराविक प्रमाणापेक्षा अधिक झाल्यास स्त्रियांमधे शरीरावरचे केस राठ होणे, अकाली केस गळणे असे प्रकार दिसतात. पुरूषांमधे इस्ट्रोजेन अधिक झाल्यास मेदवृद्धी होते, कामेच्छा कमी होते. हॉर्मोन्सच्या असमतोलामुळे मूळच्या भिन्नलिंगी संबंध ठेवणार्‍या व्यक्तीला समलैंगिक होण्याची इच्छा होत नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखात या मथळ्याखाली काही मुद्दे यादी करून दिलेले आहेत.

सम-रती बनण्यात अनेकदा कौटुंबिक, सामाजिक पर्यावरणामुळेही मानसिक बदल घडवण्यात हातभार लागतो व निसर्गत: तशी नसलेली व्यक्तीही समलिंगी बनु शकते. त्यासाठी आपण खालील काही कारणांवर चर्चा करुयात.

याखाली दिलेली कारणे "असे लोक म्हणतात असे निरीक्षण आहे"; की "असे होते असे निरीक्षण आहे" यापैकी कुठल्या प्रकारे विचारात घ्यायची आहेत.

उदाहरणार्थ पहिले कलम घेऊया. "लहान मुलीला हौसेने मुलासारखे कपडे घातले, तर प्रौढवयात मुलीला समलैंगिक आकर्षण वाटू लागते"असा काहीसा मुद्दा आहे. "असा लोकप्रवाद आहे" असे म्हटले तर ठीक - लोकप्रवाद असल्याचे निरीक्षण मीसुद्धा केले आहे.
परंतु "असे झाल्याचे निरीक्षण आहे" असा जर मथितार्थ असेल, तर आश्चर्यकारक आहे. मला फारसा पटत नाही, किंवा माझ्या निरीक्षणांशी विसंगत आहे. याचे कारण असे : गेल्या पन्नास वर्षांत मुली विजारी आणि सदरे हे "मुलांचे" कपडे सर्रास वापरू लागल्या आहेत. मात्र मुलांचे कपडे वापरणार्‍या मुलींना विशेषकरून समलैंगिक आकर्षण असते, असे काही माझे निरीक्षण नाही.

"लहान मुलींना हौशीने मुलांसारखे कपडे घातल्यास, वगैरे, त्या पुढे समलैंगिक-आकर्षित होतात" असे काही प्रतिपादन करायचे असल्यास खरोखरचे सर्वेक्षण केले पाहिजे. सर्वेक्षण लहान मुलींचे करावे (त्यांची लैंगिकता घोषित होण्याच्या वयाआधी), आणि मग त्या मोठ्या झाल्यावर पुन्हा सर्वेक्षण करून काय ते ठरवावे.

समलैंगिक व्यक्तींच्या आईवडलांना दोष देऊन उगीच दु:खाचा भार निष्कारण ठेवणे अन्यायकारक आहे.

माझा स्वतःचा अनुभव आहे, की आईचे मन तिला खात होते "मी काय चूक केली, की मुलगा समलैंगिक-आकर्षित झाला?" तिने काहीच चूक केली नाही, हे सांगणे नलगे. आणि मुलांना समाजात कसे वागायला शिकवायचे, त्या बाबतीत तिच्या सर्व मुलांना तिने एकसारखीच शिकवण दिली. माझ्या (विषमलिंगी-आकर्षित) भावाचे आणि माझे कपडे एकसारखे होते. सगळे काही या बाबतीत समसमान. हे सगळे असून माझ्या आईने स्वतःला दोष देऊन कुढत का राहावे. यात संजय सोनवणींनी सांगितलेला लोकप्रवाद आहे.

परंतु स्वत:च्या कर्माने समलिंगी निर्माण करण्यास हातभार लावणे हाच मुळात एक सामाजिक अपराध आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

हे असले भाकड आणि भडकाऊ लोकप्रवाद ऐकल्यामुळे "आपण काही चूक केली का?" हे आईवडलांचे अनाठायी दु:ख अधिकच वाढते.

आणखी एक विचित्र आणि भडकाऊ मुद्दा असा की बलात्कारामुळे समलैंगिकत्वाची चटक लागते. (पुरुषने स्त्रीवर केलेल्या [भिन्नलिंगी] बलात्काराने स्त्रियांना मुस्कट दाबून सुरा गळ्याशी ठेवून संभोगाची चटक लागते का? )

अशा बाबींमुळे वरील लेख काही प्रमाणात घातक आहे, असे मला वाटते.

सहिष्णुतेच्या सल्ल्यामुळे एका पारड्यात लेख सकारात्मक भासतो, आणि वरील भडकाऊ मुद्द्यांमुळे घातक भासतो, पैकी कुठले पारडे अधिक भरते? त्याबाबत मी अजून साशंक आहे.

- - -
मूळचा तोकडा प्रतिसाद अजून कायम आहे. ही चर्चा आजकाल समाजात होते, ही प्रगतीची खूण आहे.

"लहान मुलींना हौशीने विरुद्धलिंगी कपडे घालण्याने त्यांच्यात समलैंगिक आकर्षण निर्माण होऊ शकते" या लोकप्रवादात काहीही तथ्य नाही *, हे पटण्यासारखे वाटते. किंबहुना समलैंगिक आकर्षण हे निसर्गतः असू शकते, पालकांनी काही केल्यामुळे (अथवा न केल्यामुळे) ते निर्माण होते असे नव्हे, ही मूलभूत जैविक प्रवृत्ती असू शकते, आणि त्यात "अनैसर्गिक", "विकृत", "अनैतिक" (या संज्ञेचा जो काही अर्थ असेल तो) अथवा "उपचारांनी 'बरे' करण्यालायक" असे काही नाही, हेही समजू शकतो.

मात्र,

आणखी एक विचित्र आणि भडकाऊ मुद्दा असा की बलात्कारामुळे समलैंगिकत्वाची चटक लागते. (पुरुषने स्त्रीवर केलेल्या [भिन्नलिंगी] बलात्काराने स्त्रियांना मुस्कट दाबून सुरा गळ्याशी ठेवून संभोगाची चटक लागते का?)

या मुद्द्यावरून एक शंका मनात येते.

ज्यातून सुटकेची दृष्टिपथातील भविष्यकाळात (foreseeable future) शक्यता नाही, अशा कारावाससदृश परिस्थितीत (captivity) वारंवार होणार्‍या मनाविरुद्ध अत्याचारांच्या संदर्भात, बहुधा त्यातून टिकून उरण्याच्या (survival) मानसिक गरजेतून कधीकधी अशा अत्याचारांबद्दलच्या अथवा अत्याचारकर्त्यांबद्दलच्या प्रवृत्ती बदलण्याची उदाहरणे दिसून येतात, असे वाटते. (या विषयात माझी जाण शून्य आहे आणि कदाचित माझी ही धारणा पूर्णपणे चुकीची असेलही, हे आगाऊ मान्य आहे.) 'अंकल टॉम' प्रवृत्ती ही उपजतच गुलामगिरीवर मनापासून प्रेम करणार्‍या गुलामाची प्रवृत्ती खाशी नसावी. (मात्र, अशी प्रवृत्ती बळावलेल्या गुलामास स्वातंत्र्य मिळाल्यास त्यास तेही पचवणे बहुधा कठीण जावे.) किंवा, युद्धकालीन जर्मनीतील भूमिगत झालेल्या ('यू-बोट') ज्यूंना पकडून (नाझींच्या ताब्यात) देणारे अथवा (आपल्याच बांधवांविरुद्ध) नाझींशी अन्य प्रकारे सहकार्य करणारे ज्यू हे उपजत नाझीप्रेमी (अथवा ज्यूद्वेष्टे) नसावेत - कदाचित तग धरण्याच्या वृत्तीतून (survival instinct) हा मानसिकतेतील बदल घडला असणे शक्य आहे. किंवा कदाचित 'स्टॉकहोम सिंड्रोम'मध्ये असेच काहीसे घडत असावे काय? (चूभूद्याघ्या.)

विचारण्याचा मुद्दा, जगातील बहुसंख्य समलिंगी हे उपजत, निसर्गतः समलिंगी असतीलही, आणि अशांबद्दल काहीच म्हणायचे नाही. परंतु, कारावाससदृश परिस्थितीत इच्छेविरुद्ध बळजबरीने वारंवार होणार्‍या अंतहीन समलिंगी नित्यबलात्कारांतून, sexual abuseमधून, त्यातून तग धरण्याच्या मानसिक गरजेतून समलैंगिक संबंधांना अंगीकृत (internalize) केले जाणे, ती एक नित्य-सवयीतून-गरज-बनणे, असे काही होणे शक्य असावे काय? वैज्ञानिकांचे याबद्दल नेमके काय निरीक्षण / म्हणणे आहे?

जगातील बहुतांश समलिंगींच्या उपजत, निसर्गतः समलिंगी असण्याने (अल्प संख्येत का होईना, पण) या संदर्भातील "इतर शक्यता" या आपोआप मोडीत काढता याव्यात का? त्या मोडीत काढता येण्याच्या दृष्टीने नेमका कोणता विदा उपलब्ध आहे?

(त्याच अनुषंगाने, पुरुषाने स्त्रीवर केलेल्या भिन्नलिंगी बलात्कारांच्या बाबतीतसुद्धा, असे जर वारंवार आणि त्यातून सुटकेच्या कोणत्याही आशेविना होऊ लागले, इतके की नित्यनेमाचे बनले, तर त्यातून 'मानसिक पळवाट' (escape mechanism) म्हणा किंवा अन्य काही म्हणा, म्हणून अशा स्त्रीकडून मुस्काट दाबून सुरा गळ्याशी ठेवून केलेला जबरीसंभोग अंगीकृत (internalize) केला जाणे हे अशक्य असावे काय? थोडक्यात, कदाचित हा वरकरणी वाटतो तितका ट्रिवियल प्रश्न नसू शकेल काय? तज्ज्ञांचा या बाबतीत काय अनुभव आहे? अथवा अशा बाबतींतील संशोधन नेमके कोणत्या निष्कर्षाप्रत नेते?)


तळटीपः
* मुलींचे माहीत नाही, परंतु लहानपणी पालकांनी हौशीने भिन्नलिंगी कपडे घातलेल्या विरुद्धलिंगी मुलांची उदाहरणे परिचयातील आहेत, तेव्हा या लोकप्रवादात बहुधा काही तथ्य नसावे, असे मानायला जागा आहे. तसेच, मी शिकलो त्या मुलांच्या प्राथमिक शाळेत अनेकदा शिक्षा म्हणून मुलाला फ्रॉक घालून शाळाभर फिरवण्याच्या पद्धतीचा अवलंब केला जात असे. आज पस्तीस ते चाळीस वर्षांनंतर माझ्या तत्कालीन वर्गमित्रांशी माझा आता काही संपर्क राहिलेला नाही, परंतु ही पद्धत आमच्या शाळेत तेव्हा बर्‍यापैकी सर्रास असूनही त्यामुळे आमच्या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांतून समाजात समलिंगींचे पीक आले असावे, याबद्दल प्रचंड साशंक आहे.

स्टॉकहोम सिंड्रोम बाबत मुद्दा बहुधा बरोबर आहे. पण तशा प्रकारची आत्महिंसक सहानुभूती बहुधा विवक्षित जुलमी व्यक्ती होण्याची शक्यता अधिक वाटते. म्हणजे ओलीस व्यक्ती त्या विवक्षित अपहरणकर्त्या टोळीबाबत सहानुभूतिशील होते. पण सुटल्यानंतर पुन्हा आवडीने दुसर्‍याच कुठल्या टोळीकडून अपहरण करवून घेणार नाहीसे वाटते.

या विषयात अधिक जवळून समांतर आणि सामान्य ओळखीचे उदाहरण म्हणजे "battered woman syndrome" म्हटला पाहिजे. अनेकदा सारखी मारपीट फोत असली तरी अशी बाई मारपीट करणार्‍या पुरुषावर एकनिष्ठ प्रेम करते. स्वतःलाच दूषणे देते, वगैरे. पण तरी हे आत्मघातकी प्रेम त्या विवक्षित मारहाण करणार्‍यावरच करते.

अशा बाबतीत (म्हणजे बॅटर्ड् वुमन किंवा प्रिझन पंक) मूळ असंमती/हिंसा/पुढे आत्मघातक संमती ही नैतिक आणि सामाजिक महत्त्वाची कारणपरंपरा आहे. बलात्कार समलैंगिक होता ही बाब काहीशी गौण आहे. (हा परिच्छेद "इतर शक्यता मोडीत काढण्या"च्या संदर्भात आहे)

- - -
सर्वेक्षण नाही, पण एक आत्तबिंदू :
काही वर्षांपूर्वी (एनपीआर) रेडियोवर एका (आता मुक्त) कैद्याची मुलाखत ऐकली होती. या (पुरुष) कैद्याने बलात्कार होण्यापूर्वीच दुसर्‍या एका कैद्याची "गांडू/कोती" होण्याचा मार्ग पत्करला.

रेडियो-आलेखाचा दुवा :
http://www.thisamericanlife.org/radio-archives/episode/119/transcript
त्या संकेतस्थळावरच्या अनेक कथांपैकी ही एक आहे. स्क्रोल करून शोधावी लागेल. (शोधण्याकरिता) सुरुवात अशी :

Act Three, Who's Your Daddy? This is an excerpt from a pamphlet written by an ex-convict, Stephen Donaldson.
Many prisoners who have been raped by fellow inmates, or who have been threatened with rape, decide to become hooked up with another prisoner (as the daddy's punk). However distasteful the idea may seem, they believe it to be the least damaging way to survive in custody. ... This arrangement, it must be said, is never totally voluntary for the punk. But it is preferable to a series of violent gang rapes, and, in the age of AIDS, far safer...

तुरुंगापुरता "कोती" होणार्‍याने "पंथी" कसा शोधावा, त्याबाबत तपशीलवार सल्ला लेखात आहे. पण शेवट असा आहे :

That's a lot of advice, but you'll need it. Good luck finding a decent man. And remember that you will leave it all behind, except for a much better understanding of men and of women, when you walk out the front gate.

यातील "you will leave it all behind" असे म्हणण्यामागे या लेखकाची बरीच निरीक्षणे असतील, तर स्टॉकहोम सिन्ड्रोमने मूळ प्रवृत्ती बदलत नसल्याची उदाहरणे मानली पाहिजे.

चिंतातुर जंतू आणि धनंजय यांनी लेखातल्या काही त्रुटी दाखवलेल्या आहेत. विशेषतः शास्त्रीय अभ्यासासाठी वैज्ञानिक पद्धत वापरणं किती महत्त्वाचं आहे हे त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. त्यांचे मुद्दे अतिशय मननीय आहेत. त्यामुळे त्या अंगाने मी काही लिहीत नाही.

मला या लेखातून एक बाब प्रकर्षाने जाणवली म्हणजे लेखकाने वापरलेली भाषा. पहिल्या तीन परिच्छेदात भाषा तटस्थ आहे. त्यात कुठल्याही पूर्वग्रहाचा लवलेष दिसत नाही. तसंच विषयाचा आढावा शास्त्रीय दृष्टिकोनातून घेताना निव्वळ सत्यं मांडून लेखक पुढे जातो. त्यामुळे लेखाविषयीच्या अपेक्षा वाढतात. पुढचा संपूर्ण लेख अशाच भाषेत आला असता तर मला अतिशय आवडलं असतं.

मात्र त्या भाषेचं स्वरूप हळूहळू बदलतं.

निसर्गत: प्रत्येक पुरुषात थोडा स्त्रीचा तर प्रत्येक स्त्रीत थोडा पुरुषाचा अंश असतोच

हे विधान मात्र कुठल्या शास्त्रज्ञाने लिहिल्यापेक्षा एखाद्या कथाकाराने लिहिल्याप्रमाणे वाटतं. इथे लेखकाच्या मांडणीतला दृष्टीकोन बदलल्याचं जाणवतं.

ही प्रवृत्ती (मी याला विकृती म्हणणार नाही) जन्मजात असते असा दावा अनेकदा केला जातो

या वाक्यात लेखकाने आपण समलैंगिकतेला विकृती म्हणत नाही हे स्वच्छपणे सांगितलेलं आहे. मात्र पुढे येणारी भाषा पाहिली तर या विश्वासाला तडा जायला लागतो.

परंतु स्वत:च्या कर्माने समलिंगी निर्माण करण्यास हातभार लावणे हाच मुळात एक सामाजिक अपराध आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

समलिंगी वागणूक ही विकृती नसेल तर ती कोणीतरी 'शिकल्यामुळे' स्वीकारणं यात सामाजिक अपराध घडतो असं म्हणणं टोकाचं वाटतं.

तेथुनही समलिंगी निर्मितीचे लघुउद्योग चालु असतात..

लघुउद्योग या शब्दाला एक तिरकसपणाची छटा आहे.

मग ज्या संबंधांना आपण समाज-कुटुंबसंस्थेचे मारेकरी समजतो तसे संबंधच निर्माण होणार नाहीत.

मारेकरी हा एक जळजळीत शब्द झाला. आपण या शब्दामुळे लेखक स्वतःही सामील आहे असा गैरसमज निर्माण होतो.

निसर्गत: जेनेटिक समस्येने, हार्मोनिक असमतोलामुळे जी समलिंगी संबंधांची भावना निर्माण होते

असमतोल या शब्दातच ज्यांचा तोल बिघडला आहे तो - असा अर्थ येतो. लेखकाला मनापासून असं वाटतं का, की जे भिन्नलिंगी-आकर्षित असतात ते खरे संतुलित आणि समलिंगी असतात ते असंतुलित? मग या शब्दातून विकृतीच सुचवली जाते. अर्थातच लेखकाचा तसा उद्देश नसावा कारण त्याने सुरूवातीलाच म्हटलेलं आहे की मी समलैंगिक वागणुक ही विकृती मानत नाही.

पण ही संख्या काळजी करावी एवढी मोठी आहे, हे नक्कीच!

काळजी करण्यासारखी गोष्ट यातून एखादा गुन्हा, किंवा विकृत वागणुक करणाऱ्यांची संख्या खूप अधिक आहे असं सूचित होतं. पुन्हा लेखकाचा हेतू शुद्ध आहे हे लेखातल्या 'विकृती नाही' या विधानातून स्पष्ट केलेलं आहेच. मात्र अशा शब्दप्रयोगांनी वाचकांना त्याबाबत शंका येऊ शकते.

एकंदरीत लेखाचा रोख 'हा प्रश्न कसा सोडवावा' असाच दिसतो. त्यामुळेही 'विकृती नाही' या विधानावरचा विश्वास उडायला लागतो. सोनवणींनी भाषा जरा काळजीपूर्वक वापरावी अशी विनंती करतो.

भाषा भडकावु नाही. जे निसर्गतः समलिंगी नाहीत परंतु लेखात वर्णीलेल्या पर्स्थितीजन्य कारणांमुळे निर्माण होत असतील तर तो नक्कीच सामाजिक अपराध आहे. काळजी करण्यासारखाच आहे. नैसर्गिक प्रवृत्ती/कल याबाबत कसलाही आक्षेप नसल्याचे मी म्हटले आहेच. पर्स्थितीजन्य संदर्भातील व्यक्तिगत निरिक्षणे मी नोंदवलेली आहेत, ती काल्पनिक नाहीत. फार तर याबाबत जेवढा शास्त्रीय अभ्यास (भारतीय परिप्रेक्षात) व्हायला हवा तेवढा झालेला नाही एवढेच म्हणता येईल. मुळात या विषयाकडे लक्ष जावुन ६-७ वर्षेच झालेली आहेत. असो.
येथीलही चर्चा वाचावी...

http://mimarathi.net/node/8706
http://mimarathi.net/node/8738

धन्यवाद.

चांगली सुरवात होऊनही अनेक मुद्यांना स्पर्श करण्याच्या नादात लेख उत्तरोत्तर 'ललित' (व बर्‍यापैकी पोकळ) होत जातो. त्यामुळे लेख वाचून संपल्यावर कल असहमतीकडे झुकतो. ज्यावर असहमती आहे ती वाक्ये व त्याची योग्य मिमांसा वर अनेकांनी दिली आहेत त्यामुळे पुन्हा देत नाही. माझा मुळ आक्षेप प्रश्न मांडून (प्रश्नरूपात) नोंदवतो:
-- जर एखादी निसर्गत: समलैगिंक व्यक्तीला योग्य पार्टनरचा अभाव असल्याने तिने भिन्नलिंगी संबंध ठेवले व त्यामुळे त्याचे परिवर्तन सवयीने-भिन्नीलिंगी व्यक्तीत झाले तर तो अपराध ठरले असे तुम्हाला वाटते का? नसल्यास का?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अगदी हाच प्रश्न पडला. त्याच्या उत्तरावरून सगळ्याच गोष्टी स्पष्ट होतील. सोनवणींचे उत्तर वाचण्यास उत्सुक.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

-- जर एखादी निसर्गत: समलैगिंक व्यक्तीला योग्य पार्टनरचा अभाव असल्याने तिने भिन्नलिंगी संबंध ठेवले व त्यामुळे त्याचे परिवर्तन सवयीने-भिन्नीलिंगी व्यक्तीत झाले तर तो अपराध ठरले असे तुम्हाला वाटते का? नसल्यास का?

-प्रश्न व्यक्तीच्या अपराधाचा नाही. तो अपराध नाही उलट मनुष्य अडचणींतुन कोणता ना कोनता मार्ग शोधतोच असेच मी म्हटलेले आहे. तसे मी कोठेही म्हटलेले नाही. परंतु सामाजिक निर्बंधांमुळे जर अशी अवस्था येत असेल तर ती सर्वस्वी सामाजिक नीति-नियमांच्या चौकटीची चुक आहे असेच मी म्हटलेले आहे. त्यासाठी उपायही सुचवले आहेत. ते उपाय चुक कि बरोबर यावर्ची चर्चा अधिक अभिप्रेत होती. पण चर्चा कशी करायची हेही प्रतिसादकर्त्यांच्याच हातात असते त्यामुळे सर्वच प्रतिसादांचा सन्मान. हा लेख ललित आहे कि पोकळ कि अधिक काही हा प्रत्येक वाचकाचा द्रुष्टीकोन आहे. त्या दृष्टीकोनांचा सन्मान. प्रतिक्रिया मुलगामी, विचारांना पुढे नेणारी असावी कि उथळ हाही प्रत्येक प्रतिसादकर्त्याचा व्यक्तिगत दृष्टीकोन, त्याचाही सन्मान. असो.

दुसरी बाब अशी कि भारतीय न्यायालयांनी दिलेले काही विवक्षीत निकाल विदेशी संस्थांच्या अहवालांचा (मानसशास्त्र/कायदे/सांस्कृतिक) संदर्भ घेत दिलेले आहेत हे खरेच आहे, याचाच दुसरा अर्थ असा कि असे कसलेही संशोधन वा सर्वेक्षण आपल्याकडे झालेले नाही. त्यामुळे न्यायालयीन निरिक्षणे/निर्णयही चुकीचे असू शकतात आणि भारतीय न्यायालयांचे निकाल म्हणजे काही कोनत्याही विषयावरील अंतिम शिक्कामोर्तब नव्हेत. भारतीय न्यायालये अगदी हिंदु धर्माचीही व्याख्या करु शकतात...नव्हे, केलेलीच आहे...म्हणुन ते काही हिंदु धर्माचे सर्वोच्च विद्वान नसतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. पण तो येथे मुद्दा नाही. भारतीय समाजरचना, ग्रामव्यवस्था, मानसशास्त्र, काम-कल ई संदर्भांत व्यापक सर्वेक्षण व्हायला हवे एवढेच माझे मत आहे. ते झाले नाही तर आपण सारेच पुन्हा व्यक्तिगत अनुभव-निरिक्षणांतुन समोर आलेल्या बाबींवर विश्वास ठेवत राहु....व असे मतभेद वाढवत राहु.

दुसरे बाब म्हणजे अमेरिकेतील तुरुंगातील अनुभवकथन भारतात कामी येत नाहीत. येथे बलात्कार झाल्याचे उदाहरण नाही. (मारामा-या-खुन्-चो-या अशी अनेक आहेत.) शिक्षेच्या प्रदिर्घ काळात आपसुक कामशमनासाठी निर्माण केली गेलेली ती एक सोय आहे. पुढे ती कायमस्वरुपीच्या समलैंगत्वात बदलते. त्यामुलेच मी चिंतातुर जंतु यांना म्हटले होते कि अमेरिकन परिप्रेक्षातील सर्वेक्षने भारतीय परिप्रेक्षात तशीच्या तशी लागु पडत नाहीत. याबाबतीत उलट व्यापक सर्वेक्षण व्हायला हवे. अशा कोणत्याही सर्वेक्षणाच्या अभावी काही मते (वा निष्कर्ष) अर्थातच व्यक्तिगत असतात, जशी काही प्रतिसादकर्त्यांचीही आहेत्...माझीही आहेत.

जेनेटिक असमतोल या शब्दावर शास्त्रीय संज्ञा चुकीची असेल तर आक्षेप एक वेळ ठीक आहे. परंतु त्याचा (असमतोल शब्दाचा) वापर करत मी पुन्हा "भिन्नलिंगी म्हनजे संतुलित आणि समलिंगी म्हनजे असंतुलित असे सुचवु इच्छितो" अशा अर्थाचे विधान एका ठिकाणी प्रतिक्रियेत आलेले आहे. हा प्रतिसादकर्त्याचा व्यक्तिगत तर्क आहे एवढेच म्हणता येईल.

या विषयावर मतमतांतरे असणे स्वाभाविक आहे याची मला पुरेपुर जाणीव आहे. एका गुढ वलयात (याला ललित लेखन म्हणता येइल कदाचित) हजारो वर्ष छपुन राहिलेला विषय किमान चर्चेत येतोय आणि त्यावर चर्चा होतेय हे नक्कीच स्वागतार्ह आहे. जसजसे नवीन पुरावे पुढे येतील तसतसे विचारसंदर्भही बदलत जातील एवढे नक्की.

सर्वांना मनःपुर्वक धन्यवाद. आता मी पुढचे चार दिवस संजय क्षीरसागर यांच्या ग्रंथप्रकाशनात व्यस्त रहाणार असल्याने कदाचित मी उत्तर द्यायला उपलब्ध नसेल्...पण जेंव्हाही वेळ मिळेल मी अवश्य आपल्याशी चर्चा करायला उपलब्ध असेल.

तो अपराध नाही उलट मनुष्य अडचणींतुन कोणता ना कोनता मार्ग शोधतोच असेच मी म्हटलेले आहे

परंतु सामाजिक निर्बंधांमुळे जर अशी अवस्था येत असेल तर ती सर्वस्वी सामाजिक नीति-नियमांच्या चौकटीची चुक आहे असेच मी म्हटलेले आहे

आभार. याचा अर्थ समलिंगी व्यक्तीस पार्टनर न मिळाल्याने भिन्नलिंगी संबंध ठेवावे लागले तर तो समाजाचा - त्यांच्या निती नियमांच्या चौकटीचा दोष आहे असे तुमचे मत आहे हे समजतो. असे असल्यास खंडन करण्याचा प्रश्नच येत नाही. समाजाने आत्मपरिक्षण करण्याची गरज आहे हे योग्यच!

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

या अर्थाने घ्या कि त्या अर्थाने...अर्थ तोच आहे. समलैंगिक कल असना-याला भिन्नलिंगीशी विवाह (संबंध हा शब्द अति होइल काय? माझ्या मते होय,जर तो "कल" बाय्-सेक्स्युअल नसेल तर) "संबंध" या शब्दाला अर्थच रहात नाही. झालाच तर त्याला फारतर बलात्कार (अन्य-लिंगियाकडुन) म्हणता येईल.

सर्वसाधारण स्त्री अथवा पुरुषांचा नैसर्गिक लैंगिक कल हा भिन्नलिंगीय व्यक्तींकडे आकर्षित होण्याचा असतो. त्यामुळे समलैंगिकता ही विकॄती असावी असे प्रथमदर्शनी तरी वाटते. आणि मानसोपचारांनी ही विकॄती बरी होत असावी असे वाटते. जर तसे नसेल तर काही मूलभूत प्रश्न वरील चर्चा वाचून पडले आहेत.
१) समलैंगिकता ही विकॄती नसेल तर जनावरांबरोबर समागम करणे हीदेखील विकॄती नाही असे म्हणावे काय ? जर ही विकॄती नसेल तर जनावर आणि माणूस यांच्यातील विवाहाला देखील कायद्याने प्रवानगी द्यावी काय ?
२) एखाद्या माणसाला फक्त लहान मुलेच आवडत असतील (लैंगिक आकर्षणाच्या दॄष्टीने) तर तीदेखील विकॄती नाही असे म्हणावे काय ? कायद्याने असे करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचे कायद्यामुळे सेक्शुअल स्टार्व्हेशन होते असे म्हणण्यास वाव आहेच.
३) सामान्य माणसाला जे विचित्र आणि विकॄत वाटते अशा शरीरसंबंधांना कायद्याने मान्यता दिली तर विवाहसंस्था धोक्यात येईल काय ?

इतर काही प्रश्नः
१) निवड आणि इतर प्रकारचे संपूर्ण स्वातंत्र्य असताना जनावरांबद्दल किंवा इतर स्पिसीजमधल्या प्राण्यांबद्दल कोणत्याही स्पिसीजमधे लैंगिक आकर्षण निर्माण होणे हे आत्तापर्यंत बघितले गेले आहे काय? त्यावर कितपत शास्त्रीय संशोधन झालेले आहे? काही संदर्भ?
१अ) जगातले बहुसंख्य लोक समलैंगिक असते तर भिन्नलैंगिक संबंध विकृत मानले गेले असते का?
२) लैंगिक आकर्षण, शारीरिक संबंध म्हणजे काय हे ज्या व्यक्तींना समजत नाही आणि शिवाय ज्या व्यक्तींच्या काहीही लैंगिक प्रेरणा, आकर्षण नाही अशा व्यक्तींना संभोगाला सामोरं जावं लागणं हा त्या व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर हल्ला नाही काय?
२ अ) "मला कोणत्याच लिंगाच्या, वयाच्या व्यक्तीबाबत लैंगिक आकर्षणाच्या भावना नाहीत" असं म्हणणारे जगात काही लोक तरी आहेत.
२आ) समलैंगिकांची लैंगिक उपासमार होते म्हणून कायद्याबद्दल चर्चा नसून दोन सज्ञान व्यक्तींच्या शय्यागृहाच्या आतील आयुष्यात समाजाने कायदा करून डोकावण्याचा समाजाला, कायद्याला कितपत अधिकार आहे याबद्दल सर्वसाधारण, सुज्ञ समाजात चर्चा होते आहे.
३) लैंगिक (अगदी भिन्नलैंगिकच का होईना!) आकर्षणाची परिणती विवाहातच व्हावी का? विवाहसंस्था अशी काय महान आहे की तिचे पावित्र्य जपणे मनुष्याचे आद्यकर्तव्य असावे? जगातले किती लोक विवाहसंस्थेचे पावित्र्य आणि एकूणच विवाहसंस्था जतन करण्यासाठी लग्न करतात?

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही उत्तरे नसावीत - नाहीत पण माझी मते जरूर आहेत

१) समलैंगिकता ही विकॄती नसेल तर जनावरांबरोबर समागम करणे हीदेखील विकॄती नाही असे म्हणावे काय ? जर ही विकॄती नसेल तर जनावर आणि माणूस यांच्यातील विवाहाला देखील कायद्याने प्रवानगी द्यावी काय ?

दोन जीवांमधील 'परस्परसंमतीने' केलेला संभोग हा नैसर्गिक मानला जावा. मनुष्यप्राण्याव्यतिरिक्त इतर एखाद्या प्राण्याची अश्या संभोगाला संमती आहे की नाही हे समजण्याचे साधन नसल्याने हे स्वाभाविक आहे की विकृत हे ठरवता येणे कठीण आहे.

२) एखाद्या माणसाला फक्त लहान मुलेच आवडत असतील (लैंगिक आकर्षणाच्या दॄष्टीने) तर तीदेखील विकॄती नाही असे म्हणावे काय ? कायद्याने असे करणे हा गुन्हा आहे. त्यामुळे अशा व्यक्तींचे कायद्यामुळे सेक्शुअल स्टार्व्हेशन होते असे म्हणण्यास वाव आहेच.

लहान मुलांना (लहान मुले कोणास म्हणावे हे स्थल-काल-व्यक्ती(समाज)सापेक्ष आहे) संभोग करण्याचे / करायचा आहे का हे ठरवायचे ज्ञान/जाणीवा नसतात तोपर्यंत त्यांच्यासोबत केलेला संभोग हा एकतर्फीच झाला. म्हनजेच तो परस्परसंमतीने नाही. त्यामुळे तसा संभोग विकृत समजला जावा असे वाटते. [मात्र कायद्याने मायनर असुनही एखाद्या मुलास (/मुलीस) संभोगाबात पूर्ण कल्पना व तो करायची मनिषा -गरज-जाणीव आहे अश्यावेळी त्याने एखाद्या सज्ञानाबरोबर(मुलगा/मुलीबरोबर) संभोग केल्यास त्यात दोन्हीबाजुने विकृती नसावी. (असा संभोग नैसगिक आहे की केवळ उत्सुकता आहे हे केस बाय केस बदलेल)- शिवाय असा संभोग (सध्या - भारतात) बेकायदेशीर जरूर आहे]

३) सामान्य माणसाला जे विचित्र आणि विकॄत वाटते अशा शरीरसंबंधांना कायद्याने मान्यता दिली तर विवाहसंस्था धोक्यात येईल काय ?

याचे उत्तर खाली मेघना भुस्कुटे यआंनी दिले आहे तसेच. आली तर आली विवाहसंस्था बदलु नये असे थोडेच आहे? शिवाय केवळ समलिंगी/भिन्नलिंगी संबध ठेवल्याने माणूस सामान्य/असामान्य कसा काय गणला जातो हे समजले नाही

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मानसोपचारांनी ही विकॄती बरी होत असावी असे वाटते. जर तसे नसेल तर काही मूलभूत प्रश्न वरील चर्चा वाचून पडले आहेत.

मि. आप्पा, तुमचे प्रश्न वाचल्यावर तुम्हाला मानसोपचार तज्ञाची भेट घेण्याची गरज आहे हे कळले. लवकरात लवकर भेट घ्या, तुम्ही बरे होण्याची शक्यता असेल तर दवडू नका.

-Nile

हे अतिअवांतर आहे.
पण विवाहसंस्था धोक्यात येण्याबद्दल लोकांना जी सतत आणि अतिरिक्त काळजी वाटत असते, ती बघून वाटतं - आली धोक्यात, काय बिघडलं? विवाहसंस्था म्हणजे काय समाजाची अतीव नाजूक, अतीव मौल्यवान अशी, एखाद्या उंच मनोर्‍यावर सुरक्षित वगैरे ठेवलेली प्राणज्योत वगैरे आहे की काय? जी विझली तर जगावर अरिष्ट ओढवेल? समाजाला ज्या संस्थांची गरज भासते, त्या टिकतील. नाही त्या काळाच्या ओघात विलीन होतील. हे नैसर्गिकरित्या घडतंच ना?

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

>>सर्वसाधारण स्त्री अथवा पुरुषांचा नैसर्गिक लैंगिक कल हा भिन्नलिंगीय व्यक्तींकडे आकर्षित होण्याचा असतो. त्यामुळे समलैंगिकता ही विकॄती असावी असे प्रथमदर्शनी तरी वाटते. आणि मानसोपचारांनी ही विकॄती बरी होत असावी असे वाटते.<<

>>सामान्य माणसाला जे विचित्र आणि विकॄत वाटते अशा शरीरसंबंधांना कायद्याने मान्यता दिली तर<<

थोडा विषयबदल करून पाहू - सर्वसाधारण माणसांचा नैसर्गिक कल हा उजवा हात वापरण्याचा असतो. त्यामुळे डावखुरं असणं ही विकृती असावी असे प्रथमदर्शनी तरी वाटते. आणि मानसोपचारांनी ही विकॄती बरी होत असावी असे वाटते.

इथे मुळात हे लक्षात घ्यायला हवं की असं प्रथमदर्शनी वाटणं यात काहीही गैर नाही. डावखुरेपणाच्या अशुभतेविषयीच्या गैरसमजांमुळे भारतीय पालक आपल्या मुलांचा डावखुरेपणा बदलू पाहतात. त्यामागे सांस्कृतिक कारणं आहेत. इतकंच काय, पूर्वी बहुसंख्य लोकांना 'पृथ्वी गोल आहे' असंही प्रथमदर्शनी वाटत नसे. पण बहुसंख्यांना एखादी गोष्ट कशी वाटते याला अखेर किती महत्त्व द्यावं? माझ्या मते महत्त्वाचा मुद्दा हा आहे की शास्त्रशुद्ध संशोधनातून आज जी गोष्ट ज्ञात आहे तीवर विसंबायला अनेकांना इतका त्रास का होतो? असो.

जाताजाता : आंतरराष्ट्रीय रोग वर्गीकरण यादी (ICD) ही वैद्यकशास्त्रात जगभर अनेक ठिकाणी प्रमाण मानली जाते. आजच्या दिवशी १९९० साली जागतिक आरोग्य संघटनेनं 'समलैंगिकता' ही ICDतून काढून टाकली. त्यामुळे आजचा दिवस 'International Day Against Homophobia and Transphobia' म्हणून मानला जातो. आता जागतिक आरोग्य संघटनेपेक्षा मला स्वतःला या विषयात अधिक कळतं असं मला तरी वाटत नाही. प्रत्येकानं स्वतःपुरतं ते ठरवावं.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

१९९० पूर्वी आपले मत काय राहिले असते?

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

संबंध काय? काही तरी फालतू प्रश्न विचारून मुद्द्याला भरकटवायचे.

WHO ने असं ९० साली असं ठरवलं आहे असे त्यांनी लिहले आहे आणि पुढे असंही लिहलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेपेक्षा मला स्वतःला या विषयात अधिक कळतं असं मला तरी वाटत नाही. प्रत्येकानं स्वतःपुरतं ते ठरवावं.

त्यांच्या ९० आधीच्या वैयक्तिक मताचा इथे संबंध काय?

-Nile

विवाहसंस्थेचे अर्थशास्त्रीय विवेचन ब्लूमबर्गवर वाचायला मिळाले. विचार रोचक वाटले. विशेषतः उत्पन्न, समानता यांचा संबंध विवाहसंस्थेशी लावणे आणि विवाहसंस्था टिकवण्यासाठी सुचवलेला उपाय.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

चांगला दुवा आहे. पटण्यासारखे विश्लेषण आहे.

(म्हणजे माझे असेच विश्लेषण आधीही होते. त्यामुळे सहज पटले. ब्लूमबर्गवरील लेखकजोडीने हे विश्लेषण मला जमले असते त्यापेक्षा अधिक स्पष्टपणे मांडले आहे.)

दुवा रोचक आहे. विशेषतः

Today, we search for a soul mate rather than a good homemaker or provider. We are more likely to regard marriage as a forum for shared experiences and passions.

याचा एक संबंध वरच्या 'वंशवृद्धीसाठी शरीरसंबंध की सुखासाठी' याच्याशीही लावता येईल. म्हणजे एखाद्या कृती/संस्थेमागचे हेतू बदलले की तदनुसार तिच्या स्वरूपात आपसूक बदल होतात. हे बदल स्वीकारायची ज्यांची तयारी नसते ते अर्थात त्या बदलांचे फायदे घेण्यात मागे पडतात.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

विवाहसंस्था टिकावी असा लेखाचा दृष्टिकोन दिसतो. त्याविषयी आपल्याला काय वाटते? (इथं मी दांडेकर आहे असे समजावे!) Wink

>>विवाहसंस्था टिकावी असा लेखाचा दृष्टिकोन दिसतो. त्याविषयी आपल्याला काय वाटते? <<

विवाहसंस्था टिकावी की टिकू नये या नैतिक प्रश्नापेक्षा जी टिकली आहे ती कशामुळे एवढाच लेखाचा आवाका आहे. उदाहरणार्थ :

One might have expected marriage to disappear as its traditional benefits faded. Instead, it has evolved.

किंवा,

The implication is that ultimately, traditional marriages are doomed.

यामध्ये 'ज्यात सहभागी व्यक्तींचा दीर्घगामी फायदा नाही ती संस्था टिकणार नाही' असा दावा आहे. लेखकाची नैतिक भूमिका 'टिकू नये' अशी असेलच असं सांगता येत नाही.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पारंपरिक विवाहपद्धती बुडते आहे त्याबरोबरच विवाहसंस्था कालानुरूप बदलते आहे किंवा व्याख्येप्रमाणे माणसं वागत नाहीत तर माणसांच्या सोयीप्रमाणे तत्कालिन व्याख्या बनतात असं काहीसं.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आजच न्यू यॉर्क टाईम्समध्ये Psychiatry Giant Sorry for Backing Gay ‘Cure’ ही बातमी वाचली (www.nytimes.com/2012/05/19/health/dr-robert-l-spitzer-noted-psychiatrist...). समलैंगिकता 'दुरुस्त' केलेल्या लोकांविषयी काही वर्षांपूर्वी प्रकाशित केलेलं आपलं संशोधन कसं शास्त्रशुद्ध नव्हतं हे एका नामवंत मानसशास्त्रज्ञानं त्यात कबूल केलं आहे. असे, म्हणजे मानसोपचारांनी समलैंगिकता 'दुरुस्त' करण्याचे प्रकार कसे हानिकारक असतात हे अशा उपचारांना बळी पडलेल्यांशी बोलून त्याच्या लक्षात आलं. आपल्यामुळे समलैंगिकांना जो त्रास सहन करावा लागला त्याबद्दल त्यानं त्यांची माफी मागितली आहे.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

इंटरेस्टिंग. डॉ. स्पाईटझर यांना पार्किन्सनचा विकार आहे असेही त्या वृत्तात वाचले. आणखी इंटरेस्टिंग! पार्किन्सनच्या इतर लक्षणांमध्ये Anxiety, stress, and tension, Confusion, Dementia, Depression, Fainting, Hallucinations, Memory loss यांचाही समावेश असू शकतो, असं विज्ञान म्हणतं असं दिसतंय.
समलैंगिकता दुरूस्त करणे वगैरेविषयी मला काहीही बोलायचे नाही. ती दुरूस्त होते हे विज्ञान म्हणून किंवा अ-विज्ञान म्हणून, आणि तसे केल्याचा दावा करणे या दोन्ही गोष्टी जितक्या भंपक आहेत तितक्याच तसे होत नाही हे किंवा तो दावा चुकला हा आत्ताचा दावा या दोन्ही गोष्टीही भंपक असू शकतात किंवा नसूही शकतात.

लेख वाचलात तर लक्षात येईल की त्यांच्या संशोधनावर तेव्हाही टीका झालेली होती. नेहमीच्या पीअर-रिव्ह्यू प्रक्रियेतूनही ते संशोधन गेलं नव्हतं. प्रकाशित झाल्यानंतर अनेकांनी त्यातून चुकीचे अर्थ काढले आणि स्पिट्झर यांना ते दुरुस्त करावे लागले, वगैरे.

Dr. Spitzer could not control how his study was interpreted by everyone, and he could not erase the biggest scientific flaw of them all, roundly attacked in many of the commentaries: Simply asking people whether they have changed is no evidence at all of real change. People lie, to themselves and others. They continually change their stories, to suit their needs and moods.

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

लेख वाचलात तर

हो. वाचला. धन्यवाद. Wink

लक्षात येईल की त्यांच्या संशोधनावर तेव्हाही टीका झालेली होती.

टीका होतच असते. टीकेमुळं संशोधन निकाली निघत नसतेच म्हणा...

नेहमीच्या पीअर-रिव्ह्यू प्रक्रियेतूनही ते संशोधन गेलं नव्हतं.

तरीही आपण त्याला संशोधन म्हणूया. माझी हरकत नाही. म्हटल्याशिवाय पुढं ते निकालात काढता येत नाही.

प्रकाशित झाल्यानंतर अनेकांनी त्यातून चुकीचे अर्थ काढले आणि स्पिट्झर यांना ते दुरुस्त करावे लागले, वगैरे.

विज्ञानाची फॉल्सिफायाबिलिटी ही. स्वीकारलीच पाहिजे.