पत्र
पत्र तुझे वाचत असताना
नटखट शब्दांपाशी अडतो
गाभुळलेल्या चिंचेचा मग
स्वाद जिभेवर उगा उतरतो
पत्र तुझे वाचत असताना
अडतो अनवट शब्दांपाशी
मग ओळींच्या अधली मधली
लड उलगडते जरा जराशी
तुझे पत्र वाचत असताना
अवघड शब्दांपाशी अडतो
शब्दांच्या घनदाटामध्ये
नको तिथे मग अर्थ भटकतो