साने गुरुजी समग्र साहित्य

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो,

साने गुरुजींचे साहित्य वाचले नाही असा वाचक दुर्मिळच आहे.
"श्यामची आई" ही साने गुरुजींची अजरामर कलाकृती असली तरी साने गुरुजींनी एवढे चतुरस्त्र लेखन केले आहे की त्यांचे प्रत्येक पुस्तक एक वेगळा अनुभव ठरावा.

साने गुरुजींचे समग्र साहित्य इंटरनेटच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न पूजासॉफ्ट टेक्नॉलॉजीज् च्या श्री. माधव शिरवळकर यांनी केला आहे. यासाठी धारप असोशिएट्स ने आर्थिक आघाडीवर मदत करुन एक अतिशय मोलाचे कार्य केले आहे.

तर साने गुरुजींच्या समग्र साहित्याचा इंटरनेटच्या माध्यमातून आस्वाद वाचकांनी घ्यावा यासाठी या संकेतस्थळाची लिंक देत आहे :
साने गुरुजी समग्र साहित्य : http://saneguruji.net/

धन्यवाद

-~सागर~

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

धन्यवाद सागर ~

आजच्या दिवसभरातील ही एक अतिशय चांगली म्हणून आनंदाचीही बातमी आहे माझ्यासाठी. फुटकळपणे कित्येकदा साने गुरुजींच्या साहित्याचे (जरी समग्र नसले तरी) वाचन आणि त्या निमित्ताने समविचारी मित्रांच्यासमवेत वेळोवेळी चर्चाही झडल्या आहेत [त्यावेळी जालीय विश्व अवतरले नव्हते]. आज ही लिंक पाहताक्षणीच मी तिकडे जाऊन प्रथम काय पाहिले असेल तर गुरुजींचे 'धर्म आणि संस्कृती' वरील लिखाण आणि त्यातही "संन्यास व कर्मयोग यांच्या सहकाराची आवश्यकता"...कारण यावर माझा एक मित्र फार सुरेख बोलत असे त्याची आता या क्षणी तीव्रतेने आठवण होत आहे.

पूजासॉफ्टचे संचालक श्री.माधव शिरवळकर तसेच प्रकल्पासाठी आर्थिक साहाय्य देणारे मे.धारप असोसिएटसचे आभार मानावे तितके थोडेच. 'थिंक महाराष्ट्र' च्या साईटवरही या भावना पोच करीत आहे.

अशोक पाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद अशोक काका,

साने गुरुजींच्या अनुषंगाने तुमच्या मित्रवर्याशी झालेल्या चर्चांबद्दल मला माहिती करुन घ्यायला आवडेल. इथे देऊ शकलात तर उत्तमच. पण नाहीच जमले तरी फोनवरील चर्चांमध्ये वा प्रत्यक्ष भेट होईल तेव्हा बोलूच Smile

साने गुरुजींचे साहित्य आजच्या वाचकांपर्यंत पोहोचवावा एवढाच हेतू हा दुवा येथे देण्यामागे होता. साने गुरुजींचे सर्वच साहित्य केवढे नैसर्गिक व अकृत्रिम भावनांनी ओथंबलेले असायचे हे आजच्या वाचकांच्या अनुभवास यावे यासाठी हा प्रपंच Smile

काय वाचावे नि काय वाचू नये हे प्रत्येक जण ठरवत असतोच तरी आजच्या वाचकांना साने गुरुजींच्या साहित्याची गरज आहे असे मला वाटते.

शेवटी मी काय फक्त माध्यम आहे. खरे शिल्पकार तर श्री.माधव शिरवळकर आणि धारप असोसिएटस आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चांगली माहिती. आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!