ध्वनिचित्र

झुळझुळत्या निळसर वळणावर
झुकून, जळाशी झुळुक झोंबते
ऐल पैल तीरांवरची मग
स्तब्ध लव्हाळी लहरून उठते

त्या वळणाच्या पुढे जरासा
कभिन्न काळा कातळ निश्चळ
रुणझुणत्या पाण्याचे पैंजण
ऐकत फुलते वेडी बाभूळ

निळ्या सावळ्या डोहतळाशी
अचपळ मासोळी सळसळते
पुन्हा पुन्हा त्या ध्वनिचित्राच्या
आठवणीने मन दरवळते

field_vote: 
0
No votes yet