सँटा फे ऑपेरा कॉश्च्युम शॉप २अ - मॅगीची आयडिया

#आधीच्यापोस्टचासंदर्भआहे_ती_वाचा
गेल्या पोस्टमध्ये मॅगीबायच्या आयडियेबद्दल (हे लिहिल्यावर मजेशीर वाटतेय) सांगितले. अनेकांना नक्की काय गुंडी ते लक्षात आले नाही. साहजिक आहे. अश्या प्रकारचे कपडे आपल्याला पूर्ण अनोळखी असल्याने पटकन लक्षात येणे अवघड आहे. म्हणून ही छोटीशी चित्र-पोस्ट.

कॉरसेट - मॅगीबायची आयडिया

फोटोमध्ये दिसतंय ते नेहमीचं लेसिंग. कापडाचे य लेयर्स एकत्र असतात आणि जिथे दोन कडा मिळतात तिथे रिव्हेट्स(आपल्या भाषेत रिबीट!) करून लेसिंग केले जाते. हा बुटांच्या नाडीचाच फंडा आहे. बुटांची नाडी आठवली की तुम्हाला या लेसिंगसाठी लागणाऱ्या वेळेचा अंदाज येईल.
दुसऱ्या आकृतीत दिसेल की कोर्सेटच्या एका कडेला रिव्हेट्सऐवजी नाडीचे लूप्स शिवलेले आहेत. आणि त्या लूप्समधून एक बोनिंग - कोर्सेट शिवताना कापडांच्या य लेयर्समध्ये ठराविक अंतरावर धातूची पट्टी घालतात. जेणेकरून कोर्सेटचा आकार घट्ट होईल. पूर्वी यात व्हेल माश्यांची हाडे किंवा लाकडी पट्ट्याही घालत. या प्रकाराला बोनिंग म्हणतात - असे बोनिंग घातलेले दिसेल. चित्रात लाल रंगाने हे बोनिंग दाखवलेय. रिव्हेट्स ऐवजी कोर्सेटची कड, लूप्स आणि बोनिंग यांच्या मधली रिकामी जागा लेसिंगसाठी वापरलेली आहे. यातला एक फॅक्टर वजा झाला की लेसिंगसाठीची होल्स नाहीशी होणार. ती नाहीशी झाली लेसिंगही टिकणार नाही. तो एक वजा करायचा फॅक्टर म्हणजे बोनिंग. तेच खेचून काढायचे. लेसिंग सुर्र्कन मोकळे.
अर्थात हे तितके सोपे नाही. याच्या मागे पॅटर्निंगची बरीच आकडेमोड, शरीर-कपडा-गुरुत्वाकर्षण-वेळ यांचे गणित वगैरे बऱ्याच गोष्टी आहेत. उगाच नाही मॅगीला ग्रेट म्हणत मी!

- नी
#सँटाफेऑपेराकॉश्च्युमशॉप #स्मरणरंजन #भूतकाळातल्यादिवसभराच्याकामातले #कॉश्च्युमशॉपच्यागोष्टी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हे फारच सुरस आहे.
इमेजची वाट बघतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इमेज योग्य व्यक्तीकडे पाठवली आहे. थोड्या वेळाने येईल इमेज असं कळलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- नी

अ फ ला तू न !
आमच्या कम्प्युटर सायन्समध्ये अशा बऱ्याच क्लृप्त्या वापरल्या जातात त्याची आठवण झाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0