Skip to main content

कटु सत्य

व्रुध्दांनो! क्रोध करणे एकदम बंद करा. कारण राग कोणीही सहन करत नाही.युवकाने आपला क्रोध ' थोडा कमी ' केला तर चालू शकेल; परंतु व्रुध्दाने आपला क्रोध ' थोडा कमी' नाही, तर 'पूर्णच' सोडायला हवा. तारुण्यात क्रोधाला किँमत असते. जो कमावित असतो , घराचा खर्च चालवित असतो त्याचा क्रोध लोक सहन करु शकतात; पण जो काहीही कमवित नाही,केवळ बसुन खात असतो आणि तरीही गुरगुरतो अशा माणसाचा क्रोध कोणीही पसंत करीत नाही. व्रुध्दाची किँमत कुत्र्यासारखी असते. लोक म्हणतात , ' म्हातार्याला तर भुंकण्याची सवय झाली आहे. त्याला भुंकू द्या.'

नितिन थत्ते Sun, 20/05/2012 - 11:06

????????
:O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O
????????
:O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O
????????
:O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O
????????
:O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O
????????
:O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O
????????
:O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O
????????
:O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O :O

Nile Sun, 20/05/2012 - 11:31

In reply to by नितिन थत्ते

़क्रोधाला थांबवा आजोबा! ;-)

तिरशिंगराव Sun, 20/05/2012 - 13:03

असं एकदम संदर्भाशिवाय लिहिल्याने, तुमचा नक्की काय प्रॉब्लेम आहे ते कळले नाही. तसेच व्यक्तिगत अनुभवाचे जनरलायझेशन ही पटले नाही. त्यापेक्षा तुमच्यावर काय अन्याय झालाय ते मोकळेपणाने लिहा.

धनंजय वैद्य Sun, 20/05/2012 - 14:18

अरे मित्रांनो माझ्यावर कुठलाही अन्याय झालेला नाहिये. मी 18 वर्षाचा एक गोड छोकरा आहे. हे लिखाण माझे मनचे नसुन कडवे प्रवचन मधील आहे. ( संदर्भ- पुण्य नगरी )

राजेश घासकडवी Mon, 21/05/2012 - 17:43

In reply to by धनंजय वैद्य

लेखन उद्धृत करताना मूळ लेखात संदर्भ द्यावा. चर्चाप्रस्ताव मांडताना नुसताच तो उतारा न देता 'मी अमुकअमुक ठिकाणी असं वाचलं.' असं लिहावं. निव्वळ वाचकांची मतं मागवण्याआधी तुम्हाला त्याविषयी काय वाटतं हे थोडक्यात सांगावं.

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 24/05/2012 - 22:58

In reply to by सविता

प्रॉब्लेम समजला. १८ वर्षांचा असूनही स्वतःला गोड छोकरा समजण्यावर काही उपाय असेल असं वाटत नाही. तरीही तुम्हाला मोठे होण्यासाठी, बोळा निघण्यासाठी शुभेच्छा देते.

अशोक पाटील Thu, 24/05/2012 - 23:24

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

थॅन्क्स अदिती.....थॅन्क्स एवढ्यासाठी की मीदेखील चि.धनंजयला लवकर मोठे होण्यासाठी शुभेच्छा देण्याचा विचार करीत होतो, पण अन्य एका धाग्यावर त्यानी "महाराष्ट्रातील पाटील, पवार, देशमुख आदी मंडळी मग्रुर झाली आहेत...." असे मत मांडले असल्याने इथल्या एका पाटलाकडून ते कोणत्याही प्रकारच्या शुभेच्छा स्वीकारण्याच्या मन:स्थितीत नसणार (च) असे वाटल्याने थांबलो. तू ते काम केलेस, सो थॅन्क्स अगेन.

अशोक पाटील

३_१४ विक्षिप्त अदिती Thu, 24/05/2012 - 23:42

In reply to by अशोक पाटील

अवांतरः
अगदी याच आठवड्यातली गोष्ट. साधारण ८० वर्षांची एक अमेरिकन बाई एका स्टेट पार्कच्या ऑफिसात भेटली. इथल्या सर्वसाधारण वयस्कर लोकांप्रमाणे ही पण गोड होती. गप्पांच्या ओघात तिने आमचं आडनाव पाहून "याचा उच्चार काय करता?" असं विचारलं. तर पुढे म्हणाली, "याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली. भला माणूस आहे तो. तुम्हीही मूळचे भारतीयच का?" आमच्या होकारावर पुढे सांगत होती, "तुम्ही जोशी. माझं नाव जॉयस/Joyce. माझी काही नातवंडं मला जॉयसी म्हणतात त्याच्यासारखंच आहे तुमचं आडनाव." त्यावर मी तिला म्हटलं, "कधी भारतात गेलीस तर कोणत्याही गजबजलेल्या ठिकाणी जाऊन "ओ जोशी" एवढीच हाक मार. निदान चार-पाच लोकं पुढे येतील." त्यापुढचं "हे जोशी लोकं फार माजलेत, फार लोकसंख्या वाढवतात" असं तोंडावर आलेलं वाक्य गिळलं.

तसं या धाग्यावरचं गेट वेल्/बिग सून हे ही वाक्य गिळायचा विचार होता.

सुनील Fri, 25/05/2012 - 00:25

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

कृपया विरामचिन्हांचा वापर करावा!! :)

अन्यथा हे वाक्य - याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली. -

याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं, त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.

असे वाचले जाईल!

टीप - धाग्यावर एवितेवी अवांतरच चालले आहे, म्हटलं आपणही हात धुवून घ्यावेत.

चिंतातुर जंतू Fri, 25/05/2012 - 17:58

In reply to by सुनील

>>कृपया विरामचिन्हांचा वापर करावा!!

अन्यथा हे वाक्य - याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली. -

हा निव्वळ विरामचिन्हांचा नव्हे, तर सदोष वाक्यरचनेचा प्रकार आहे. हे वाक्य असं लिहायला हवं :
माझ्या आईचं बुडाचं हाड मोडलं होतं त्यावर याच आडनावाच्या एका भारतीय डॉक्टरने गेल्या आठवड्यात शस्त्रक्रिया केली.

धनंजय Fri, 25/05/2012 - 01:42

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

व्यायाम न-करता गिळून-गिळूनच तर आय गॉट बिग.
गेट बिग जावई, अँड आय विल गेट बिग सून.

(वरील सर्व निषेधात्मक प्रतिसादांचा निषेध "समन्वय मंच ऑफ धनंजय्ज् (समंध)" करणार होता. मात्र तेवढ्यात लक्षात आले की निषेध भुंकण्याइतके कटू व्रुद्ध कोणीच नाही - सर्वच वेगवेगळ्या वयांचे गोड समंध-छोकरे! म्हणून ठराव पसार न होता निषेधसभा बरखास्त झाली. तो सुसंदर्भ ठराव हातात नाही, म्हणून या अवांतर गंगेत मी देखील हात धुवून घेत आहे.)

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 25/05/2012 - 05:23

In reply to by धनंजय

धनंजय, आर यू बरा? नसलास तरी आत्तापर्यंत हा समज निर्माण करण्याएवढं नाटक बरं जमत होतं म्हणायचं. या विचारशील लेखामुळे बिंग अगदीच फुटलं.

'न'वी बाजू Fri, 25/05/2012 - 17:04

In reply to by धनंजय

आता अवांतर चाललेच आहे म्हणून सांगतो.

म्हणून या अवांतर गंगेत मी देखील हात धुवून घेत आहे.

'वाहत्या गंगेत हात धुवून घेण्या'करिता एक खास मराठमोळा पर्यायी वाक्प्रचारसुद्धा आहे, बरे का! (शेवटी कितीही झाले, तरी गंगामय्या उत्तरप्रदेशी, म्हणजे खरे तर गंगाभय्या! तसेही आपल्या महाराष्ट्रात हल्ली भय्ये खूप झालेत *, असे ऐकून आहे. आणखी एका भय्यिणीला डोक्यावर चढवून घ्यायला आपण काय शंकर लागून गेलो आहोत? म्हणून म्हणतो, मराठी लिहा, मराठी वाचवा!)

हं, तर काय म्हणत होतो? पर्यायी वाक्प्रचार! काहीतरी गळत्याशी संबंध आहे बुवा, नक्की विसरलो. (तशी मराठीत गळके, फुटके हौद वगैरेंची परंपरा फार जुनी हं! बहुधा अगदी पार गोखल्यांच्या वेळेपासूनची!)


* 'झालेत' हे (गिळलेल्या) वेगळ्याच एका शब्दासाठी यूफ़ीमिज़म. काय समजलेत?

ऋषिकेश Fri, 25/05/2012 - 18:42

In reply to by 'न'वी बाजू

शेवटी कितीही झाले, तरी गंगामय्या उत्तरप्रदेशी

हुच्चभ्रु ज्याला गोदावरी म्हणतात तिथे सामान्यजन तिला 'गंगा' म्हणतात.
तेव्हा गंगा मराठी असायला प्रत्यवाय (किती दिवस हा शब्द वापरायचा होता ;) )नसावा

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 25/05/2012 - 19:00

In reply to by ऋषिकेश

मराठी या मुद्द्यात फार राम* राहिला नाही असं दिसतंय.

*हा पण भय्याच हो, महाराष्ट्रात घुसखोरी करणारा पहिलाच भय्या. तर मग अमक्या गोष्टीत विठ्ठल राहिला नाही असंही म्हणता येत नाही. तो कन्नडिगा; बेळगाव आणि कृष्णेचं पाणी देत नाहीत तोपर्यंत विठ्ठलही आपला नाहीच.

धनंजय Fri, 25/05/2012 - 20:08

In reply to by ऋषिकेश

आमची अवांतर गंगा राजापूरची. अवचित वाहाते तेव्हाच हात घुवून घेता येतात.

मुंबई-रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.

ऋषिकेश Fri, 25/05/2012 - 22:14

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

+१ _/\_

'न'वी बाजू Fri, 25/05/2012 - 17:38

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तरीही तुम्हाला मोठे होण्यासाठी, बोळा निघण्यासाठी शुभेच्छा देते.

कोणाला???

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 25/05/2012 - 19:01

In reply to by 'न'वी बाजू

ज्यांचा प्रॉब्लेम आहे असं समजलं त्यांना. प्रॉब्लेम नाही त्यांना शुभेच्छांची काय गरज? याउप्पर कोणाला उगाचच शुभेच्छा हव्या असतील तर आपापल्या मिळवाव्यात, मी देणार नाही.

तिरशिंगराव Sun, 20/05/2012 - 14:26

आमचंच वाचन कमी पडलं.

............सा… Mon, 21/05/2012 - 18:44

वाट्टेल ते उतारे उध्रुत करुन आपण फक्त १८ वर्षाचे आहोत हे सिद्ध केलेच पाहीजे का? उद्या याहून हीन पातळीचा उतारा द्याल. कुत्रा काय गुरगुर काय. गलीच्छ उतारा आहे :(

मी Fri, 25/05/2012 - 11:48

>>व्रुध्दाची किँमत कुत्र्यासारखी असते.

तुमचे कुत्रे आणि त्यांच्या मालकांबद्दलचे अज्ञान कळले, इथे तुम्हाला आलेल्या निषेधात्मक प्रतिसादात ९०% लोक मालक असल्याचा मी दावा करतो, पण तुमचे अज्ञान व तुमचे वय समप्रमाणात असावे हे कटू सत्य आहे.