Skip to main content

ऋणनिर्देश

#अंकाविषयी #ऋणनिर्देश #आफ्रिका #ऐसीअक्षरे #दिवाळीअंक२०२३

ऋणनिर्देश

गेल्या दोन-चारशे वर्षांच्या प्रथेनुसार ह्या वर्षीही ऐसीचा दिवाळी अंक प्रकाशित करताना आम्हांला आनंद होत आहे. दर वर्षौच अंक काढण्यासाठी अनेकांचा हातभार लागतो; अनेक लोकांनी हातभार लावल्याशिवाय अंक चांगला निघू शकत नाही; आणि एवढी वर्षं अंक काढण्यासाठी अनेकांनी मिळून काम करणं आवश्यक आहेच. ह्या सर्वांचे औपचारिक आभार.

दिवाळी अंक जेवढा संपादन, संकलनात मदत करणाऱ्यांचा असतो, तेवढाच लेखन-वाचन-विचार करणाऱ्यांचाही असतो. अंक वाचा; आपल्या आप्तेष्टांना पाठवा; लाईक करा आणि सबस्क्राईबही कराच्च. ट्विटरवर जाहिरात करा, किंवा मास्टोडॉनवर, पण जाहिरात जरूर करा.

दिवाळीच्या शुभेच्छा.

थंब्ज अप

प्रियांका तुपे
अवंती कुलकर्णी
राजेंद्र बापट
आदित्य पानसे
नंदन होडावडेकर
रोचना
शैलेन
धनंजय
म्रिन
उज्ज्वला
राजेश घासकडवी
अमुक
चिंतातुर जंतू
संदीप देशपांडे
अवधूत बापट
सई केसकर
३_१४ विक्षिप्त अदिती
आणि सर्व कायनात.

विशेषांक प्रकार

जयदीप चिपलकट्टी Wed, 08/11/2023 - 07:48

'संकल्पनाविषयक' नसलेले लेख अगदीच तुरळक दिसतात. फार आफ्रिका-आफ्रिका झालं.
----

'न'वी बाजू Wed, 08/11/2023 - 08:23

In reply to by जयदीप चिपलकट्टी

म्हणजे, इथे मी ज्या-त्या लेखात ‘आफ्रिका कुठाय?’ म्हणून बोंबलतोय, नि तिकडे तुम्ही ‘जिकडेतिकडे आफ्रिकाच आफ्रिका काय म्हणून?’ म्हणून आक्षेप घेताय. अशा वेळेस व्यवस्थापनाने नक्की काय करावे?

I guess the management cannot please everyone, so they decided to please no one. It’s fair.

धर्मराजमुटके Wed, 08/11/2023 - 20:18

बरेच दिवसांनी ऐसी वर आलो. प्रथमदर्शनी अंक छान दिसतोय. वाचून निवांत प्रतिक्रिया देतो. अंकाची पीडीएफ कॉपी मिळेल काय ?

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 08/11/2023 - 23:09

In reply to by धर्मराजमुटके

तुमच्याकडे वेळ आहे का पीडीएफ बनवण्यासाठी? येत्या विकेण्डपर्यंत प्रकाशनाचं काम पूर्ण होईल.

धर्मराजमुटके Sat, 11/11/2023 - 21:24

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

वेळेचा प्रश्न नाही पण तंत्र कसे वापरायचे त्याबद्द्ल संभ्रम आहे.

सुधीर Thu, 09/11/2023 - 20:05

सगळेच लेख नाही वाचलेत. पण अंक नेहमीप्रमाणे वेगळा आणि माहितीपूर्ण झाला आहे.

पर्स्पेक्टिव्ह Fri, 10/11/2023 - 19:53

एरव्ही वर्षभर सहाराप्रमाणे जवळपास ओसाड पडलेल्या ‘ऐसी..’ वर दिवाळी अंक अगदी विषुववृत्तीय जंगलासारखा मनमोहक दिसतो आहे.

ही खोचक दाद फार मनावर घेऊ नका. अंक अपेक्षेपेक्षाही खूपच बहारदार आणि वाचनीय झालाय. :-)

उज्ज्वला Sat, 11/11/2023 - 07:43

आफ्रिका खंडासारख्या मोठ्या विषयाला न्याय देणारा असा हा अंक आहे. यापुढेही या विषयावर काही लेख आले तर भर घालत राहावी असे वाटते.