नास्तिक असणे हे एक चिरंतन मूल्य

माणूस हा एक ‘रॅशनल’ प्राणी आहे असे आपण आपल्या लहानपणापासून घोकत असलो, तरी कित्येकाच्या आयुष्यात रॅशनॅलिटीचा मागमूसही नसतो, हा आपल्या नित्याचा अनुभव आहे. या रॅशनॅलिटीवर इतकी धूळ का साचली आहे, हेही एक न सुटणारे कोडे ठरत आहे. रॅशनॅलिझमचा मूळ गाभाच परमेश्वर या संकल्पनेची चिकित्सा करणे हा असतो. हीच चिकित्सा आपल्याला नास्तिकतेपर्यंत पोचवते.

p1

गेली शेकडो वर्षे परमेश्वर या संकल्पनेबद्दल मोठ्या प्रमाणात चर्वितचर्वण झाले आहे. या चर्चेत परमेश्वर ही संकल्पना पूर्णपणे नाकारण्यात आली आहे. परंतु काही हितसंबंधीयांच्या दुराग्रहामुळे अजूनही ही संकल्पना आणि या संकल्पनेवर आधारलेली धर्मव्यवस्था जनसामान्यांच्या डोक्यातून गेलेली नाही. उलट धर्मव्यवस्था उर्जितावस्थेत पोचत आहे. कदाचित आपल्या देशातील लोकसभा व विधानसभांचे नावं धर्मसंसद म्हणून बदलण्यात येतील की काय, अशी आजची आपल्या देशाची स्थिती आहे. याचाच परिणाम म्हणजे नास्तिक अजूनही अल्पमतातच आहेत. परंतु सर्व जगभर मात्र या संबंधीच्या चर्चेमुळे व प्रबोधनामुळे परमेश्वर, ही संकल्पना बाद ठरत आहे.

माणसाने खोटे बोलल्यास भले मोठे घबाड मिळण्याची शक्यता असली तरी नेहमीच खरे बोलावे, कुणीही पकडण्याची शक्यता नसली तरी चोरी करू नये, सगळेच वापरतात म्हणून मीही भ्रष्टाचाराचा मार्ग वापरल्यास हरकत नसावी ही मानसिकता असू नये, इतराविषयी संवेदनशील असावे, भावनांचा उद्वेग नसावा, इत्यादी प्रकारच्या जीवनमूल्याप्रमाणेच परमेश्वर या संकल्पनेला नाकारणारे नास्तिक असणे हेसुद्धा एक चिरंतन मूल्य आहे. आपण नास्तिक आहोत म्हणजे आपण कुणी तरी वेगळे आहोत अशी समजूत करून घेणे याला काही अर्थ नाही. माणूस म्हणून काही मूल्यांबद्दल आपली बांधीलकी असायला हवी. त्याच मूल्यांपैकी नास्तिकता हेसुद्धा एक मूल्य असून आपण काही तरी विशेष करत आहोत असे वाटून घेण्याचे काही कारण नाही. खरे बोलणे जितके स्वाभाविकच असले पाहिजे, तितकेच परमेश्वराला नाकारणे किंवा त्याचे अस्तित्व अमान्य करणे हेही नैसर्गिकरित्या घडले पाहिजे.

माणसाच्या उत्क्रांतीतील सर्वांत महत्त्वाचा टप्पा मेंदूची उत्क्रांती असू शकेल. आणि हाच मेंदू आपल्याला कल्पनाशक्ती, विचार करण्याची क्षमता, तार्किकता, बुद्धिनिष्ठता प्रदान करते आणि आपण इतर प्राण्याहून वेगळे आहोत याची जाणीव करून देते. माणूस जेव्हा रानटी अवस्थेत होता, तेव्हा त्यांनी आपल्या बुद्धीच्या कुवतीनुसार काही कल्पना लढवल्या, नैसर्गिक घटनांचा अर्थ शोधताना काही (चित्र – विचित्र) उत्तरं शोधली आणि त्या अनुषंगाने तो जीवन जगू लागला. जसजशी त्याची बुद्धी विकसित होत गेली, त्यानुसार त्यातील अनेक गोष्टी गळून पडल्या. त्याची बुद्धिनिष्ठ जीवनाकडे वाटचाल सुरू झाली. ही वाटचाल अजूनही संपलेली नाही. परंतु काही कारणामुळे त्या काळी कल्पिलेली परमेश्वर ही संकल्पना अजूनही टिकून आहे. तज्ज्ञांच्या मते बुद्धिनिष्ठ जीवन पद्धतीला अडसर होत आहे. त्यामुळे काही सुज्ञ मंडळी परमेश्वर ही संकल्पना पूर्णपणे नाकारत नास्तिक जीवन जगण्यात आनंद, समाधान मानून घेत आहेत. मुळात परमेश्वरविरहित जीवन ही एक बुद्धिनिष्ठ जीवन पद्धती आहे, हे मान्य करायला हवे.

खरे पाहता नास्तिकता ही एक मानसिकता असते किंवा प्रवृत्ती (अटिट्यूड) असू शकते. त्याला आपण एक गुणविशेष (कॅरेक्टरिस्टिक्स) म्हणून दर्जा देता कामा नये. ही मानसिकता कशामुळे तयार होते, ती कशी वाढते, वाढलेल्या मानसिकतेला जपण्यासाठी नेमके काय काय करावे लागेल, हे प्रत्येकाचे वैयक्तिक प्रश्न असू शकतील. आपापल्या क्षमतेप्रमाणे त्या प्रश्नांची उत्तरे सापडत असतील, मानसिकता वर्धिष्णू होत असेल. परमेश्वराचे व परमेश्वर या संकल्पनेभोवती विणलेले धर्म, रूढी, परंपरा, कर्मकांड इत्यादी अमान्य करणे आणि मुक्त, स्वतंत्र मनोवृत्तीचे आनंद अनुभवणे नास्तिकतेमुळे शक्य होईल. त्यामुळे नास्तिकता म्हणजे काही तरी भयानक, प्रवाहाच्या विरोधात किंवा समाजाला न रुचणारी काही तरी भयंकर आहे हे समजण्यात हशील नाही. अशा प्रकारची प्रवृत्ती म्हणजे काहीतरी दहशतवादी, जनविरोधी असेही समजण्याचे कारण नाही. त्याचप्रमाणे यात काहीतरी थ्रिल आहे, काही तरी साहस आहे, असेही समजण्याचे कारण नाही.

काही कारणांमुळे आपल्या देशातील कौटुंबिक व समाजव्यवस्था व संस्कृती यांच्या दबावामुळे नास्तिकता अपरूप वाटत आहे. परंतु बुद्धिनिष्ठतेकडील वाटचाल करत असताना या सर्व दबावांना झुकारून पुढे जावे लागत आहे. आपल्या या समाजातील बहुतांश लोकांना बुद्धीनिष्ठतेच्या किमान पातळीवर आणण्यासाठी नास्तिकतेला पर्याय नाही. कारण आपल्यातील चिकित्सक वृत्ती विकसित होत आहे याचे दृश्य स्वरूपातील द्योतक नास्तिकता असते. आपल्यातील चिकित्सकवृत्ती विकसित झाल्यास आपल्या अनेक समस्यांना नक्कीच उत्तरे सापडत जातील.

परंतु माणूस फक्त रॅशनल नव्हे तर सामाजिक प्राणी म्हणूनही ओळखला जातो, हेही लक्षात ठेवायला हवे. फक्त आपल्या कोशात राहून स्वतःचे कसे भले करून घेणे आणि आपल्यापुरते पाहत राहणे, हे काही मानवीयतेच्या दृष्टीने योग्य ठरणार नाही. त्यामुळे मानवीयतेला पूरक अशा अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, याची जाणही आपल्याला हवी. हा समाज सशक्त व्हावा, समाजातील प्रत्येक व्यक्ती सबल व सक्षम असावी, त्यात कुठल्याही प्रकारचे शोषणाचा लवलेश नसावा असे वाटत असल्यास न्याय, करुणा, प्रेम, सहिष्णुता, इत्यादी मूल्ये रुजवण्याची गरज आहे. याच मूल्यांच्या जोडीला ही पृथ्वी दीर्घकाळ टिकावी, आपल्या पुढच्या पिढ्या सुखाने नांदावेत यासाठी पर्यावरण रक्षण, प्रदूषण मुक्त वातावरण, चंगळवादामुळे येऊ घातलेल्या गोष्टीबद्दल सावध पवित्रा यांचाही विचार करणे आवश्यक आहे. ही मूल्ये रुजवण्यासाठी कुठल्याही ईश्वरी संकल्पनेची गरज नाही. ईश्वराला शरण जाणारे तर न्याय, करुणा, प्रेम, सहिष्णुता, जणू काही त्यांचेच पेटंट्स आहेत, असे मानतात. परंतु ईश्वरी संकल्पनेशिवायसुद्धा ही मूल्ये रुजवता येऊ शकतात.
a2
गंमत म्हणजे परमेश्वरांच्या पुरस्कर्त्यांना त्यांच्या परमेश्वरामध्ये ही सर्व मूल्ये आहेत, याबद्दल त्यांच्या मनात तिळमात्रही शंका नाही. याचेच भांडवल करून शतकानुशतके सर्व जगभर बुद्धिभेद केला जात आहे. परंतु ज्या धर्माच्या आधारे प्रत्यक्ष व्यवहारात ही मूल्ये रुजवायला हवीत, तोच धर्म या मूल्यांना पायदळी तुडवत आला आहे. त्यांचा हा डाव हाणून पाडण्यात किंवा हा एक कुटील डाव आहे, हे सांगणाऱ्या चार्वाक पंथीयापासून अलिकडील सर्व नास्तिकांपर्यंतच्या सर्वांचे आपण आभार मानायला हवेत.

मुळात सर्वसामान्यातील दैवी भक्ती नेहमीच नैसर्गिक प्रकोपाच्या काळात उफाळून येते. कारण सर्वसामान्यांना या कठीण काळात कुणाचा तरी आधार हवा असतो, सहानुभूती हवी असते. आणि देवाच्या नावाने चाललेले धर्म या गोष्टी काही प्रमाणात पुरवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यामुळे धर्म अजूनही टिकून आहेत. मुळात निसर्गाला मानवी वा इतर प्राण्याविषयी थोडीसुद्धा आसक्ती नाही, आकस नाही, प्रेम नाही की द्वेषही नाही. थंडीच्या दिवसातील सूर्याची ऊब तुमच्यासाठी नसते, पावसाळ्यातला पाऊस तुमची तहान भागवण्यासाठीच नसते, हिवाळ्यातील गुलाबी थंडी तुमचे मन रिझवण्यासाठी नसते, हे मान्य करायला हवे. हा एक निसर्ग क्रम आहे, त्यात दैवी कृपा वगैरे काही नाही. त्याचप्रमाणे भूकंप, अतीवृष्टी, अनावृष्टी, वादळ, ज्वालामुखी, महापूर, दुष्काळ, अशा प्रकारची संकटेसुद्धा या जगावर अधून मधून कोसळत असतात. यात कुठल्याही देवाचा हात नसतो आणि ही काही देवाची अवकृपा नसते. या सर्व गोष्टी प्रकृतीनियमाप्रमाणे घडत असतात. आणि त्यांचा आजकाल अचूक अंदाजही घेता येऊ शकतो.

ही संकटे कुणीतरी मुद्दाम घडवत नाहीत. परंतु देवाचा बाजार मांडणाऱ्यांना ही संकटे देवानेच, देवाचे अस्तित्व विसरता कामा नये म्हणून आलेल्या आहेत, असे अपप्रचार करत सामान्यांची दिशाभूल करत असतात. वैज्ञानिकदृष्ट्या या संकटांचे विश्लेषण केल्यास त्यात ईश्वराचा काहीही संबंध नाही हे लक्षात येईल. अशा निसर्ग प्रकोपाच्या वेळी करुणा, प्रेम, सहानुभूती कामी येतात हाही अनुभव आहे. परंतु या मूल्यांसाठी जगताना आपल्यात सामर्थ्य हवे, जिद्द हवे व मनातली भीती नष्ट व्हायला हवी. म्हणूनच कदाचित माणसांना परमेश्वराला नाकारण्यास एवढा वेळ लागला असावा.

खरे पाहता निसर्गाकडे आपण केवळ त्याचे रौद्र स्वरूप बघून घाबरण्याचे कारण नाही. कारण निसर्गाची भव्यता रौद्र स्वरूपाच्या कित्येक पटीने जास्त आहे. ही भव्यता आनंददायी आहे, मनाला समाधान देणारी आहे. हे समजून घेण्यासाठी कलावंताचे मन हवे, हे मात्र निश्चित.

नास्तिकतेत आपणच आपले शिल्पकार असतो, आपल्याला घडवत असतो. आपण आपल्या प्रत्येक लहान-मोठ्या कृतीला आपणच जबाबदार असतो. त्यामुळे आपल्याला निर्भयपणाने मान वर करून जगता येते. आपल्यावर कुठल्याही गोष्टीचा दबाव नसतो. हे केल्यास काय होईल, ते नाही केल्यास काय होईल वा मृत्युनंतर काय होईल, याची अजिबात काळजी करत बसण्याचे कारणच उरणार नाही. पाप पुण्याचा हिशोब मांडणारा तेथे नसणार. आपल्या कृतीचे आपणच मूल्यमापन करत जगणे हे एक समाधानाची बाब ठरेल.

परंतु हे समाधान टिकवण्यासाठी, कठिण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी आणि या चिरंतन मूल्यांना जपण्यासाठी आणखी जास्त प्रयत्न करावे लागतील.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

माणूस म्हणून काही मूल्यांबद्दल आपली बांधीलकी असायला हवी. त्याच मूल्यांपैकी नास्तिकता हेसुद्धा एक मूल्य असून आपण काही तरी विशेष करत आहोत असे वाटून घेण्याचे काही कारण नाही. खरे बोलणे जितके स्वाभाविकच असले पाहिजे, तितकेच परमेश्वराला नाकारणे किंवा त्याचे अस्तित्व अमान्य करणे हेही नैसर्गिकरित्या घडले पाहिजे.

अगदी बरोबर पण आस्तिक असणे हेही तितकेच स्वाभाविक असू शकते.

खरे पाहता निसर्गाकडे आपण केवळ त्याचे रौद्र स्वरूप बघून घाबरण्याचे कारण नाही. कारण निसर्गाची भव्यता रौद्र स्वरूपाच्या कित्येक पटीने जास्त आहे. ही भव्यता आनंददायी आहे, मनाला समाधान देणारी आहे. हे समजून घेण्यासाठी कलावंताचे मन हवे, हे मात्र निश्चित.
हे काही कळले नाही. कलावंत नसणाऱ्याला हे समजून घेता येत नाही असं म्हणायचे असल्यास ते योग्य नव्हे.

नास्तिकतेत आपणच आपले शिल्पकार असतो, आपल्याला घडवत असतो. आपण आपल्या प्रत्येक लहान-मोठ्या कृतीला आपणच जबाबदार असतो. त्यामुळे आपल्याला निर्भयपणाने मान वर करून जगता येते.
हे वाक्य असे वाचायला बरे वाटते आहे.

मला वाटते लेखकाने जरी लिहिले आहे की नास्तिकता स्वाभाविक असायला पाहिजे, तरी लेखनाचा एकंदर सूर असा वाटतो आहे, की नास्तिक असणे हेच शहाणपणाचे लक्षण आहे.

धर्माच्या नावाने दिशाभूल केली जाते हे जरी खरे असले तरी म्हणून धर्म वाईट ठरत नाही, तर धर्माचा चुकीचा अर्थ लावणारे लोक दोषी धरतात. धर्माची कर्मकांडे मलाही योग्य वाटत नाहीत, पण काही वेळा समाजातील सर्व घटक एकत्रित येण्याला ती उपयोगीही असतात.
मी स्वत:ला नास्तिक समजत नाही, पण म्हणून सर्वस्वी ईश्वरकृपेवर आवलंबून राहत नाही. आजारी असताना आधी मी डॉक्टरकडे जाते, औषधे घेते मग देवाची प्रार्थना करते. परमेश्वराला नाकारणे म्हणजेच रॅशनल असणे हे काही बरोबर वाटत नाही. काही वेळा मनुष्याला मानसिक आधाराची गरज भासते, ती धर्म, देव इत्यादी संकल्पनेतून साध्य होते. माणूस मानसिक दृष्ट्या सक्षम असेल तरच रॅशनल निर्णय घेऊ शकेल ना?

पण एक मात्र खरे आहे, की धर्माचे आणि धार्मिकतेचे जे अवडंबर केले जाते (सर्वच धर्मात) ते भयावह आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

…नास्तिकता हासुद्धा अंतिमतः एक धर्म (किंवा कदाचित कल्ट?) ठरतो, या बाबीकडे (सर्वांचेच) दुर्लक्ष झालेले दिसते.

नाही म्हणजे, परमेश्वराचे अस्तित्व मानावे, की न मानावे, हा ज्याचातिचा वैयक्तिक प्रश्न असू शकतो. (त्याबद्दल मला काहीच आक्षेप नाही.) कदाचित ते त्या-त्या व्यक्तीकरिता स्वाभाविकही असू शकते. (इथवरही काहीही म्हणणे नाही.) मात्र, (इतरांनी) परमेश्वराचे अस्तित्व नाकारावे, झालेच तर परमेश्वराचे अस्तित्व नाकारणे हे नैसर्गिकरीत्या घडले पाहिजे, वगैरे (विध्यर्थी) प्रतिपादने जेव्हा येऊ लागतात, तेव्हा तो एक डॉग्मा (पर्यायाने: धर्म. नपक्षी, कल्ट.) ठरत नाही काय?

कोणाच्या नास्तिकतेबद्दल मला काहीही आक्षेप नाही. (फार कशाला, मूड असला, तर कधीकधी मीसुद्धा स्वतःला नास्तिक समजतो. (इतर वेळी कधीकधी मूडप्रमाणे मी स्वतःला परमेश्वरसुद्धा समजतो; परंतु ते एक जाऊ द्या. तरी एक बरे आहे, की मी कधी (थोडी जास्त झालेली असतानासुद्धा) स्वतःला एकसमयावच्छेदेकरून नास्तिक आणि परमेश्वर समजत नाही; अन्यथा, ते म्हणजे मी स्वतःचेच अस्तित्व नाकारल्यासारखे होईल! अर्थात, हे सर्व जगच मिथ्या आहे, असेसुद्धा तत्त्वज्ञान जेथे अस्तित्वात असू शकते, तेथे स्वतःचे (आणि, पर्यायाने, परमेश्वराचेसुद्धा!) अस्तित्व नाकारणे हे प्रश्नांकित ठरू नये, नाही काय? असो.)) हं, तर काय सांगत होतो? इतरांनी नास्तिक असण्यानसण्याबद्दल मला काहीही घेणेदेणे नाही. परंतु, कोणी (ख्रिस्ती पाद्र्याप्रमाणे, किंवा संघप्रचारकाप्रमाणे) नास्तिकतेचा प्रचार जर मजजवळ करू लागले, तर ‘तुझ्या बैलाला घो’ म्हणून आपल्या कामाला लागणे हेच प्राप्त ठरते. असो चालायचेच.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुम्ही श्रोडिंजरी नास्तिक/परमेश्वर आहात का हो, 'न'बा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

कोणास ठाऊक. नक्की कल्पना नाही.

(परंतु, कोठल्याही दिलेल्या क्षणी, मी नक्की परमेश्वर आहे, की नास्तिक, हे परमेश्वरालासुद्धा (पक्षी: मला) सांगता येणे अशक्य असल्याकारणाने, कदाचित असूही शकेन.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भक्ती जशी नैसर्गिक प्रकोपाच्या निमित्ताने उफाळून येते त्याचप्रमाणे एखादं नैसर्गिक संकट आलं की माणसं ऐहिक सुखाच्याही आहारी जातात. मानवतेला पुसून टाकतील की काय असं वाटावं अशा प्रकारच्या रोगांच्या साथी जेव्हा जेव्हा आल्या आहेत तेव्हा तत्कालीन विचारवंतांनी तेव्हाच्या लोकांच्या एकूण वर्तनाचं निरीक्षण करून नोंदवून ठेवलं आहे. तेराव्या शतकात झालेल्या प्लेगबद्दल अशा नोंदी आहेत. किंवा नंतर काम्यूनं प्लेग नावाची कादंबरीच लिहिलेली आहे. हे वाचायचा कंटाळा आला असेल तर कोव्हिडमध्ये किती लोकांनी घरी बसून सावर डो ब्रेड केले, किती वजन वाढवून घेतलं याचे किमान anecdotal किस्से आठवतीलच. किती काँडोम विकले गेले याचा डेटा नक्कीच मिळू शकेल आणि इतक्या भयावह परिस्थितीतही अनेकांनी मुलंही जन्माला घातली. ती देवाच्या किंवा स्वतःच्या पुण्याईच्या भरवशावर घातली किंवा कसं देवच जाणे!
खरंतर आपण कधीही मरू शकतो असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा सगळं सोडून एखादी जपमाळ घेऊन बसायला हवं. पण लोक अशा परिस्थितीत धर्मानं जे जे काही वर्ज्य ठरवलं आहे किंवा किमान ज्याच्या आहारी जाऊ नका असं सांगितलं आहे ते सगळं उत्साहाने करतात. काही लोक मृत्यूचं भय नसतानाही या पापांच्या आहारी जातात/जात नाहीत. काही लोकांची देवावरची श्रद्धा मासिक, सहामाही किंवा वार्षिक असते. काही लोकांचं नास्तिकपण कोणाबरोबर दारू प्यायला बसले आहेत त्यावर ठरतं. काही लोक धार्मिक नसूनही अहिंसावादी असतात (अगदी शाकाहारी असण्यापर्यंत मजल जाते यांची!)..ब्ला ब्लाब्लाब्ला.
Homo sum, humani nihil a me alienum puto

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

> तेराव्या शतकात झालेल्या प्लेगबद्दल अशा नोंदी आहेत.

चौदाव्या

---

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

आमच्या नातेवाईकांत काही जण हे उच्चविद्याविभुषित आहेत आणि अति धार्मिक आहेत. त्यासाठी ते स्वत:चा पैसा, उर्जा आणि वेळ इतक्या प्रमाणात खर्च करतात की आश्चर्य वाटते. एक वेळ, तो त्यांचा हक्क मानला तरी आपल्या अमेरिकेतल्या नातवंडांनी देखील रोज शुभंकरोती, आरत्या म्हणाव्यात, अशी त्यांची अपेक्षा असते. आमच्या घरांत देवच नाही याचे त्यांना सतत आश्चर्य वाटत असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक वेळ, तो त्यांचा हक्क मानला तरी आपल्या अमेरिकेतल्या नातवंडांनी देखील रोज शुभंकरोती, आरत्या म्हणाव्यात, अशी त्यांची अपेक्षा असते.

ते काय वाटेल त्या अपेक्षा करतील. अमेरिकेतली नातवंडे त्या अपेक्षांना भीक घालतात काय?

नसल्यास, प्रश्न मिटला. असल्यास, (आईवडिलांच्या दबावाखाली, असे गृहीत धरून) तो त्या अमेरिकेतल्या नातवंडांच्या आईवडिलांचा दोष आहे, या मंडळींचा नव्हे. (अमेरिकेतल्या नातवंडांचा तर नव्हेच नव्हे.) कां की ते (पक्षी: अमेरिकेतल्या नातवंडांचे आईवडील) आपल्या आईवडिलांच्या दबावाखाली येऊन मुलांना नाही नाही ते करण्यास भाग पाडतात.

हिंदू थेरडेशाहीचे काय, तिला जितकी भीक घालाल, तितकी ती फोफावेल, बोकाळेल, सोकावेल. ही साखळी कोणीतरी, कोठेतरी तोडावी लागते. असो चालायचेच.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

1) उच्च विद्ाविभूषित असलेला व्यक्ती नास्तिक असतो.
२) देवाचे अस्तित्व मानणार व्यक्ती विज्ञान वादी नसतो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नास्तिक लोक बीजनेस वाढवत नाहीत. पर्यटन, हार ,फुले, तसबिरी, पोथ्या , प्रवचने, गाणी वगैरे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Petrochemical, जहाज बांधणी, मनोरंजन, शिक्षण क्षेत्र ,पायाभूत सुविधा ह्या मध्ये पण व्यापार वाढवत नाहीत.
अंबानी पासून अदानी पर्यंत आणि बाकी अनेक सर्व आस्तिक च आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखासोबत जोडलेल्या चित्रातील कचऱ्याच्या टोपलीत, तीन प्रमुख इब्राहिमी धर्मांची प्रतीके फेकून दिल्याचे स्पष्टपणे दिसून येते; मात्र, हिंदुधर्माचे प्रतीक त्या टोपलीत फेकून दिल्याचे आढळून येत नाही. (तसे पाहायला गेल्यास नास्तिकता हाही जरी धर्मच असला, तरीही, नास्तिकांच्या धर्मास बहुधा प्रतीक नसावे (चूभूद्याघ्या.); त्यामुळे, ते कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिलेले आहे, किंवा नाही, हे निश्चितपणे कळून येण्यास काही मार्ग नाही. मात्र, हिंदुधर्माच्या प्रतीकाची अनुपस्थिती तेथे प्रकर्षाने जाणवते.) यावरून, लेखकास हिंदुधर्माप्रति (बहुधा छुपी) सहानुभूती असावी, अशी शंका येते. (अन्यथा, त्या प्रतीकांच्या मांदियाळीत एखादा ‘ॐ’ वगैरे आढळायला वस्तुतः काही अडचण नव्हती.)

किंबहुना, ‘चिरंतन मूल्य’सारख्या शब्दप्रयोगांची लेखातील लीलया फेक लक्षात घेता, लेखक (अ) एक तर आजकाल झोकून देऊ लागला असावा, नपक्षी (ब) हिंदू बाबाबुवांच्या मांदियाळीत अलिकडे सामील झाला असावा, अशा निष्कर्षावर उडी मारण्यास मुबलक वाव आहे. (अन्यथा, ‘चिरंतन मूल्य’-छाप भाषा आणखी कोण वापरणार? (चूभूद्याघ्या.))

——————————

आणखी एक शक्यता अशीही असू शकते, की तीन प्रमुख इब्राहिमी धर्मांची प्रतीके कचऱ्याच्या टोपलीत फेकून झाल्यानंतर, हिंदुधर्माचे प्रतीक फेकून द्यायला त्या कचऱ्याच्या टोपलीत जागा शिल्लक राहिली नसली पाहिजे. (चित्रावरून तसे सूचित होतेच आहे.) परंतु मग, तीन प्रमुख इब्राहिमी धर्मांची प्रतीके कचऱ्याच्या टोपलीत फेकण्याअगोदर हिंदुधर्माचे प्रतीक का फेकले नाही (कचऱ्याच्या टोपलीत फेकून देण्याकरिता तीन प्रमुख इब्राहिमी धर्मांच्या प्रतीकांना अग्रहक्क देण्याची नक्की काय निकड होती), असाही प्रश्न यातून उपस्थित होऊ शकतो. लेखकाच्या हिंदुधर्माप्रति छुप्या कलाचे/सहानुभूतीचे/पक्षपाताचेच हे द्योतक नव्हे काय? (अर्थात, ‘आमचा हिंदुधर्म विश्वव्यापी आहे, काय समजलेत? तुमच्या त्या एवढ्याश्या कचऱ्याच्या टोपलीत मावणार आहे काय?’ अशा प्रतिदाव्याच्या प्रतिपादनाची फुसकुली येथे सोडून देता येतेच म्हणा! चालायचेच.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आस्तिक असणे किंवा नास्तिक असणे याहीपेक्षा समंजस असणे महत्वाचे.
स्वत:चे मत इतरांवर जबरदस्तीने लादू पहाणारा आस्तिक असो किंवा नास्तिक, पण शहाणा नक्कीच म्हणता येणार नाही.
नास्तिक लोकांनी आस्तिक लोकांना अज्ञानी समजण्याचे कारण नाही आणि आस्तिकांनी नास्तिकांना हिणवणे निरर्थक आहे.

बऱ्याच वर्षांपूर्वी मी एक मुलाखत ऐकली होती. ते म्हणाले की अंधश्रद्धा वाईट आहे, माणूस वाईट नसतो. त्यांनी उदाहरण दिले होते एका बाईचे, जिच्या अंगात देवी येत असे. ते म्हणाले देवी येते हे खरे नाही, पण ती बाई लबाड असेलच असे नाही. कित्येकदा भारतीय स्त्रिया दुर्लक्षित असतात, त्या घरासाठी राबतात पण त्यांच्या कष्टांची किम्मत शून्य असते. घरात त्यांचे म्हणणे कुणीही ऐकत नाही, त्यांचे मत कुणी विचारत नाहीत, किंवा निर्णय प्रक्रियेत त्यांना सहभागी करून घेतले जात नाही. त्या सतत दबलेले, कुणाच्यातरी वर्चस्वाखाली असलेले आयुष्य जगतात. मग एखादे वेळेस असे काही होते, आजूबाजूच्या चार बायका म्हणतात हिच्या अंगात देवी आली (खरे तसे नसते). पण तिला बरे वाटते कारण त्यामूळे का होईना तिला महत्व प्राप्त होते. तिच्या मुखाने देवी बोलते म्हणून लोक तिला मान देतात. मग ती हे तसेच चालू ठेवते (हे सरसकट अंगात येणाऱ्या सर्व बायकांचे उदाहरण नाही). मला ऐकताना ते अगदीच बरोबर वाटले होते, आणि अजूनही माझे मत तेच आहे.

काही वेळेस बाईला जे काही होत असते, तिचे वैद्यकीय परिक्षण न करता ठरवले जाते, देवी हिच्या अंगात आली. पण या सर्व प्रकारात ती बाई खोटी किंवा लबाड असते असे समजण्याचे कारण नाही. काही बायका असतीलही फसवणाऱ्या, पण म्हणून सगळ्यांनाच एका मापाने तोलणे योग्य नाही.
अशा अनेक अंधश्रद्धा आहेत ज्या समजून घेऊन त्यांचे निराकरण करणे जरूरीचे आहे.

म्हणून समंजस असणे जरूरीचे. अंधश्रद्धाळू लोकांना सहानूभूतीने वागवणे आणि त्यांची समजूत चूकीची आहे हे समजावून सांगणे जरूरीचे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

भारतात नास्तिक आस्तिक ह्या दोन्ही गोष्टी राजकरण शी संबंधित आहेत
.
राजकीय फायद्या साठी आस्तिक ,नास्तिक हे प्रकार वापरले जातात.
जगात स्थिती वेगळी आहे.
जगातील कोणत्या ही देशात भारता व्यतिरिक्त तेथील नास्तिक लोक तेथील आस्तिक लोकांचा कोणत्याच बाबी वर नक्की आक्षेप घेत नसतील.

भारतातील नास्तिक जे विदूषक आहेत त्यांची कोणतीच मत ठाम नाहीत.
स्वतः चे नस्तिक पण प्रगत करण्यासाठी ते प्रयत्न करत नाहीत .
फक्त आस्तिक लोकांना ज्ञान देण्याचे फक्त काम करतात

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात एकही व्यक्ती नास्तिक नाही. नास्तिकता फक्त एक फॅशन आहे. स्वतःचा अहंकार जपण्याचासाठी नास्तिकतेचे ढोंग केले जाते. त्यासाठी गोल-गोल भाषा वापरली जाते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक2
  • पकाऊ0

आस्तिक लोक फॅशन करत नाहीत का?
आस्तिक लोक अहंकारी नसतात का? ते ढोंग करत नाहीत का? सध्या भारतात एक अहंकारी आस्तिक पुरुषाची चलती आहे? त्या व्यक्तीचा फॅशन सेन्सही जबरदस्त आहे ..
आपल्या देशात अनेक बाबा-बुवा गोल गोल भाषा वापरतात त्या बद्दल तुमचे मत काय आहे?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला फक्त एवढेच म्हणायचे आहे की ९९ टक्के नास्तिक म्हणविणारी लोक नास्तिक नसतात. अहंकार, सुंदर दिसण्याच्या प्रयत्न करणे, आपके उद्दिष्ट साधण्यासाठी गोल गोल भाषा वापरणे सामान्य माणसाचे गुण आहे.
बाकी एक निर्विकार सर्वांचा आदर करणाऱ्या आस्तिक व्यक्तिची चलती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जगात एकही व्यक्ती नास्तिक नाही. नास्तिकता फक्त एक फॅशन आहे.

ऑ ??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0