ज्योत

रिकाम-टेकडी मोठी तिच्या माथ्यावर
माझा वायफळमळा-त्याच्या बांधावर
मृगजळ साठवितो रोज थोडे थोडे
पिऊनीया दौडतात कल्पनांचे घोडे
एकशृंगी घोडे त्यांचे पसरूनी पंख
उडतात - टाळण्यास समीक्षकी डंख

कल्पिताचे वास्तवाशी जुळवी जो नाते
ज्योत त्याची विझण्याच्या आधी मोठी होते

field_vote: 
0
No votes yet