कोपनहेगन-पॅरीस भटकंती-१
युरोप! कधी आपण युरोपात जाऊ असं वाटलंही नव्हतं, मिपा, माबो अश्या साईट्सवर जाऊन आलेल्यांचे अनूभव ऐकणे ह्यापलिकडे कधी युरोपशी संबंधं आला नव्हता. बैलपोळ्याच्या दिवशी बैलासारखं काम करून आल्यावर रूमवर पडलो होतो. मोबाईल हातात धरला नी वाट्सअप पाहीलं “I have enrolled you for ***** advanced training in Denmark in November”
बाॅसचा मॅसेज होता. काय?? डेन्मार्क?? माझा विश्वास बसला नाही. पण बाॅसलोक अश्या चेष्टा करत नाहीत. मला विश्वासच बसेना. आपण डेन्मार्कला जाणार. ज्या युरोपच्या सुरस नी चमत्कारीक कथा फक्त ऐकायला मिळतात त्या प्रत्यक्ष पहायला मिळणार म्हणून भयानक आनंदं झाला. मी तयारीला लागलो, पासपोर्ट वगैरे रेडी होताच. विसा प्रोसेसींग वगैरे सर्व सोपस्कार पार पाडले. मला एक वर्षाचा मल्टी एंट्री नव्वद दिवसांचा विसा मिळाला. मध्यंतरी आणखी दोन जण भारतातून माझ्यासोबत येणार हे कळाले नी एक माघरेबहून. माघरेब नावाचा देश ऐकला नव्हता गूगलल्यावर कळालं की अल्जेरीया लिबीया मोरोक्को वगैरे भागास माघरेब म्हणतात. आम्ही ४ जण ट्रेनींगसाठी तयार झालो. इतर दोघे गुजरातहून येणार असल्याने मी सुध्दा अहमदाबाद- दुबई - कोपनहागेन तिकीट घेतले. मी नंतर पाहील्यावर लक्षात आलं की दिवाळीच्या सुट्ट्या लागूनच येताहेत मग बाॅसची परवानगी घेऊन मी दिवाळी पॅरीसलाच साजरी करायचं ठरवंलं. ठरलं! मी कोपनहेगन ते पॅरीस स्कॅन्ड्न्वीयन एअरलाईन्सचे तिकीट बूक केले. ते मला ९००० (४४युरो) ला पडले. (तिकडच्या मानाने फारच स्वस्त नाही का?) मी तयारीला लागलो. थाॅमस कूकच्या ओफीसला धडका देऊन २०० युरो घेऊन आलो. माझ्यासाठी १०० नी १०० सोबत्यासाठी. “जिथे जाल तिथले व्हा” हा माझा नियम असल्याने तिथे जाऊन त्यांचे पदार्थ खाऊ हे ठरवून जास्त खायचे पदार्थ मी घेतले नाहीत. हा सर्वात चुकीचा निर्णय ठरला एक मॅगीचं मोठं पॅकेट घेतलं ते बरं केलं. बरोबर चितळे काजू कतली, हल्दीराम संत्रा बर्फी बळजबरीने देण्यात आली. इतकं गोड मला नकोसं झालं होतं.
शेवटी दिवस ऊजाडला अहमदाबाद एअरपोर्ट ला पासपोर्ट दाखवून प्रवेश केला मी आमचा एक दुसरा बाॅस आणी सार्थक अश्या आम्ही तिघांनी प्रवेश केला. “ऐमीरेट्सला” ला चेकीन करून इमीगिरेशनला पोहोचलो. तिथे आम्ही दोघे पास झालो पण सार्थक (सोबती) अडकला. त्याच्या पासपोर्ट वर नेपाळहून यायचा
शिक्का होता. पण नेपाळला गेल्याचा शिक्का नव्हता. पासपोर्ट ओफीसर नकाराची मान हलवत त्याच्या साहेबाच्या कॅबीन मध्ये गेला. तोपर्यंत सार्थकचं तोंड पाहण्यासारखं झालं होतं. तो आणी मी पहील्यांदाच विदेशात चाललो होतो. “सु थयो?” म्हणून आमच्या बाॅसने त्याला विचारले. तो हाताने काही नाही म्हणून गेला नी शिक्का मारून पासपोर्ट सार्थकला दिला. आम्ही. सूटकेचा निश्वास सोडला. सार्थक ने प्रचंड धसका घेतला होता. मला ऐअरपोर्टलाच बोलला की तुझ्यासोबत बूक केलेली पॅरीसची फ्लाईट मी रद्द करतो ना कोपनहेगन वरूनच परत येतो. हे लोक मला पकडून जेल मध्ये टाकतील. आम्ही खुप हसलो. त्याला १२ दिवसाचाच विसा मिळाला होता.
आम्ही विमानात प्रवेशलो, मी ह्या आधी इंडीगोचं तीन इकडे तीन तिकडे असे सहाच सीट असलेलं विमान पाहीलं होतं, पण इथे तर प्रचंडं मोठं एका रांगेत दहा सीट असलेलं विमान होतं. फक्त विमानाने लादेनने ट्वीन टाॅवर कसे पाडले हा प्रश्न मला पाडला होता हे विमान पाहून लक्षात आलं का लादेनने केवढं खुळ धडकवलं असावं. चुकीच्या वेळी चुकीचा विचार. प्रवेश केल्या केल्या इतक्या अलिाशान सिट्स वगैरे पाहून मी भारावून देलो पण बाॅसने सांगीतले की आपल्या जागा इकोनोमीत आहेत .हा बिसीनेस क्लास आहे
एका रांगेत खिडकी पकडून बसलो. सार्थक ने खिडकी धरली, ढठरल्याप्रमाणे खिडकीची अदलाबदल दुबइत होणार होती, विमानात प्रचंड सोयीसुविधा होत्या पुढील सीटच्या मागल्या स्क्रिनवर सिनेमा पाहता येणार होता, गेम खेळता येणार होता, एअरशो तसेच विमानाला बसवलेल्या कॅमेराने लाईवही पाहता येणार होतं. एअर होस्टेस ने ऊशी, ब्लॅंकेट नी हेडफोन आणून दिले. मी प्रवासात पाहण्यासाठी “फौदा” नावाची वेबसीरीज डाऊनलोड करून ठेवली होती पण ती ज्यू मुस्लिम संघर्षावर असल्याने प्रवासात पाहू नको असा सल्ला मला आला. फ्लाईट मध्ये वेज हिंदू मील आलं पण ते इतकं चांगलं नव्हतं. दुबईत लॅंडल्यावर आम्ही पुढील कोपनहेगन फ्लाईटच्या गेटवर आलो. येताना प्रचंडं मोठी दुकाने एअरपोर्टभर पसरलेली होती. तीथे गेटवरही सार्थक चा पासपोर्ट भिंग वगैरे लावून चेक करण्यात आला, त्याला पुन्हा धास्ती बसली. मी दुबई एअरपोर्ट वायफायला मोबाईल कनेक्ट केला नी लगेच वेळ आपोआप दुबईप्रमाणे सेट झाली. दुबईहुन फ्लाईट निघाली. मी आता खिडकी पकडली होती. वरून बुर्ज खलिफा दिसली. आकाशातूनही ती इमारत भव्य दिसत होती. समोरच्या स्क्रिनवर दिसत होतं विमान कुठल्या देशावर आहे ते. बराच वेळ समूद्र दिसत हता नंतर विमान इराक वर आलं तेव्हा इराकमधील टेकड्या स्पष्ट दिसत होत्या. हिरवळ नव्हती. मध्ये जेवण नी झोप घेतली. शेवटी कोपनहेगन जवळ आल्यावर ऊठलो. जसजसं कोपनहेगन जवळ येऊ लागलं समुद्रात ऊभारलेल्या पवनचक्क्या दिसू लागल्या. कोपनहेगन ला लॅंड झालो. विमानतळावर आजिबात गर्दी नव्हती, प्रचंडं शांतता होती, काचेच्या पलिकडे विमान लॅंड होत असूनही आवाज नव्हता. लगेज बेल्टवरून ऊचलून आम्ही बाहेर आलो तर प्रचंडं थंडी झोंबली, एअरपोर्ट वातानबकूलीत होते हे लक्षात आले. एक टॅक्सी बूक करून आम्ही आमच्या “अर्बन हाऊस” हाॅटेल कडे निघालो. टॅक्सीवाला तुर्की मुस्लिम होता. आम्हाला भारतातून म्हणजे हिंदू का असे विचारता झाला. नंतर गप्पात इस्रायलचे अत्याचार आमच्या बाॅसला सांगू लागला. आम्ही दोघे खिडकीतून सूंदर इमारती, भव्य ट्रॅफीकरहीत आखीव रेखीव रस्ते डोळे भरून पाहत होतो. आपल्या इथे जसे डबके असते तसे तिथे तळे होते, त्यात बदक होते, भटके कुत्रे, गायी दिसंनात, टॅक्सी म्हणून मर्सीडीज होती. २० मिनीटाने आम्ही हाॅटेलला पोहोचलो. टॅक्सीचे बाल ३५० डॅनीश क्रोन्स झाले होते म्हणजे जवळपास चारेक हजार
प्रतिक्रिया
(अवांतर)
यात भारतीय इमिग्रेशन अधिकाऱ्यास काही अडचण का असावी, हे लक्षात येत नाही. भारतीय नागरिकाच्या बाबतीत विशेषत: नेपाळला प्रवास करताना असे होणे हे सहज शक्य आहे.
(माझ्या कल्पनेप्रमाणे, 'भारत सोडल्याचा शिक्का नाही परंतु भारतात परत आल्याचा शिक्का आहे' हा ट्रिगर असावा. भारत अवैधरीत्या सोडल्याची शंका आली असावी. परंतु, अगोदर म्हटल्याप्रमाणे, भारतीय प्रवाश्याने नेपाळला जातानायेताना हे होऊ शकावे.)
भारतीय नागरिकाने भारतातून थेट नेपाळला जाताना किंवा नेपाळहून थेट भारतात परतताना पासपोर्ट बाळगण्याची आवश्यकता नसते. पासपोर्टच्या जागी इतर काही अधिकृत कागदपत्रे चालू शकतात. (आणि, माझ्या कल्पनेप्रमाणे, त्या परिस्थितीत, पासपोर्ट जवळ नसल्यास बोर्डिंग पासावर इमिग्रेशनचे शिक्के मारतात.)
आता, समजा तुमच्या मित्राने नेपाळला जाताना भारतातल्या इमिग्रेशन अधिकाऱ्यास पासपोर्ट सादर न करता व्होटर रजिष्ट्रेशन कार्ड सादर केले. (नेपाळला जाताना हे वैध आहे.) अर्थात त्याच्या पासपोर्टात भारत सोडल्याचा शिक्का असणार नाही. त्याउपर, भारतात परतताना मात्र त्याने भारतातल्या इमिग्रेशन अधिकाऱ्यास पासपोर्ट सादर केला. या खेपेस त्याच्या पासपोर्टावर भारतात प्रवेश केल्याचा शिक्का पडेल.
यात खरे तर काहीही गैर किंवा अवैध नाही.
--------------------
अन्य देशांतसुद्धा, देशात प्रवेश करताना किंवा देश सोडताना पासपोर्टात शिक्का पडणे (पासपोर्ट आवश्यक असला, तरीही) हे नेहमी होतेच, असे नाही. (कोणीही कोठल्याही कायद्याचे उल्लंघन न करता हे कधीकधी होऊ शकते.)
- यूएसए सोडताना (तुम्ही कोठल्याही देशाचे पासपोर्टधारक असलात, तरी) तुमच्या पासपोर्टावर यूएसए सोडल्याचा शिक्का बसत नाही. (तसा शिक्का बसण्याची सुविधाही नाही; किंबहुना, यूएसए सोडताना बहुतांश परिस्थितींमध्ये तुम्हाला यूएसएच्या इमिग्रेशन ऑफिसरचे (आणि/किंवा कष्टम्स अधिकाऱ्याचे) तोंडही पाहावे लागत नाही.)
- यूएसएत प्रवेश करताना यूएसएच्या इमिग्रेशन अधिकाऱ्यास (आणि त्यानंतर अर्थात कष्टम्स अधिकाऱ्याससुद्धा) सामोरे जावे लागते. मात्र, तुम्ही यूएसएचे पासपोर्टधारक असल्यास, तुमच्या पासपोर्टात आगमनाचा शिक्का मारणे हे प्रस्तुत इमिग्रेशन अधिकाऱ्याकरिता वैकल्पिक आहे. (यूएसएचे ग्रीनकार्डधारक आणि कॅनडाचे पासपोर्टधारक यांच्या बाबतीतही यूएसएत प्रवेश करताना हे बहुधा लागू असावे, परंतु खात्री नाही.)
- कॅनडात प्रवेश करताना, यूएसएच्या पासपोर्टधारकांच्या पासपोर्टवर आगमनाचा शिक्का मारणे हे तेथील इमिग्रेशन अधिकाऱ्यांकरिता वैकल्पिक आहे. (एका जमान्यात कामाच्या निमित्ताने काही काळ माझी दर आठवड्याला अटलांटा-टोराँटो अशी ये-जा होत असे. कधी माझ्या पासपोर्टात कॅनडातील आगमनाचा शिक्का पडत असे, तर कधी पडत नसे. हे लक्षात आल्यावर एकदा चौकशी केली, तर 'यूएसएच्या पासपोर्टकरिता गरज नाही' असे उत्तर मिळाले.)
- कॅनडातून यूएसएत प्रवेश करताना, यूएसएची इमिग्रेशन तथा कष्टम्स तपासणी ही अमेरिकेत आल्यावर न होता कॅनडा सोडण्यापूर्वी तेथील विमानतळावर होते. तेथे अमेरिकन इमिग्रेशन तथा कष्टम्स अधिकाऱ्यांस सामोरे जावे लागते, परंतु कॅनडाच्या इमिग्रेशन तथा कष्टम्स अधिकाऱ्यांचे तोंड पाहावे लागत नाही. अर्थात, त्या परिस्थितीत कॅनडाचा सोडल्याचा शिक्का तुमच्या पासपोर्टात पडण्याचा प्रश्न उद्भवत नाही.
असो.
सायकली?
कोपनहेगनच्या सायकल लेनी बघितल्यात का? तिथे सायकल चालवलीत का?
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
सायकल लेणी ?? हे काय असतं?
सायकल लेणी ?? हे काय असतं? सायकल नाही चालवली.
सायकल लेणी
लेनी = Lanes
- चिंतातुर जंतू
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||
अच्छा. लेन्स पाहील्या पण
अच्छा. लेन्स पाहील्या पण सायकल नाही चालवली.
फक्त लेणी असून काही होत नाही.
फक्त लेणी असून काही होत नाही.
मुलांचा कल तसा असावा लागतो. हल्लीच्या पिढीत विडिओ गेम्सचे आकर्षण वाढले आहे.