मोठ्यातल्या छोट्यांसाठी : झाडं असतात विद्यार्थी
झाडं असतात विद्यार्थी ऋतू त्यांचे गुरू असतात
झाडांचीही परिक्षा असते झाडंसुद्धा पेपर देतात
ऊन पाऊस वादळवारा अवघड अवघड विषय असतात
झाडांनाही ताण येतो झाडंसुद्धा कंटाळतात
अशावेळी झाडं मग पाखरांचं गाणं ऐकतात
जगत राहणं यालाच झाडं खरं मेरीट म्हणत असतात
वादळ कितीही मोठं असो झाडं जागा सोडत नाही
उन्मळून पडतात पण आत्महत्या करत नाहीत .....
- ग्लोरी
छोट्यांसाठी
तुमच्या कविता आवडतात, पण ही नीट जमली नाही असं वाटलं. नक्की मोठ्यांसाठी की छोट्यांसाठी या संभ्रमात न घर का न घाट का अशी थोडी अवस्था झाली आहे हिची. (शीर्षकातून तो संभ्रम तुम्हालाही होता हे जाणवतं) ही कविता छोट्यांसाठी, छोट्यांच्या शब्दांत आली असती तर अधिक परिणामकारक झाली असती असं वाटतं.
म्हणजे, झाड एखाद्या मुलाला सांगतं की माहित्ये का तुला काय वाटतं आम्हाला परीक्षा द्याव्या लागत नाहीत? अरे, आम्हाला कठीण विषय असतात, आणि एकदम कडक मास्तर असतात. आणि आमची तर कायमच शाळा चालू असते...
रोजच्या जगण्यातल्या साध्या
रोजच्या जगण्यातल्या साध्या साध्या गोष्टीञ्चे अभूतपूर्व कल्पनेत रूपान्तर करण्याची तुमची हातोटी खूप आगळी आहे. ती आवडते. पण वरील आणि 'वाढदिवस झाडाचा' या दोनही कवितान्त चमकदार कल्पना असूनही शब्द आणि लय थोडे थिटे पडले असे वाटते. 'माञ्जराने केला उन्दराला फोन' ही मला तुमची सर्वान्त आवडलेली कविता. तिथे मेळ छान जुळून आला होता. अजून अश्याच कविता येत राहोत ही मनधरणी.
प्रतिसादाबद्दल सर्वांचे
प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार.
>>नक्की मोठ्यांसाठी की छोट्यांसाठी
राजेश घासकडवीजी वरील संभ्रमात मी नक्कीच आहे. (पण त्यामुळे घर का ना घाटका अशी कवितेची अवस्था झाली असे मला वाटत नाही.......)
या कवितेत आत्महत्येचा उल्लेख असल्यामुळे ही कविता छोट्यांसाठी म्हणू नये असे मला सध्या वाटत आहे. पण मग मोठ्यांसाठी तरी अशी कविता लिहिण्याची गरज आहे का असाही प्रश्न आहेच. आपण सुचवलेली कल्पनाही छान आहे. पण मला ही कल्पना सहज सुचली आणि मी लिहिली. छोट्यांसाठी की मोठ्यांसाठी हा प्रश्न नंतर तयार झाला. मला वाटते आयुष्याच्या शाळेत अपयश पदरात पडलेल्या माझ्यातल्या विद्यार्थ्याची समजूत घालण्यासाठी मी ही कविता लिहिली असावी.
मोठ्यांसाठी की छोट्यांसाठी ?
या प्रश्नावर इतर मित्रांचे काय मत आहे?
मोठ्यांनी रुपक घ्यावे,
मोठ्यांनी रुपक घ्यावे, लहानांनी मजा!
मस्त गाणं!