दोन वीजा
दोन वीजा कडाडल्या
त्याही भर पावसात
तिने डोळ्यातून मारला
एक तीर काळजात.
चिंब होऊन शोधतो
एक चांदणी मनात
तीर मारुन नागिन
कुठे गेली अंधारात.
तिचं घर चौकात
का तिचं घर रानात
नुसत्या चौकशा चौकशा
माझ्या तोंडात कानात.
मन नाक्यावर राहिले
आलो भिजत घरात
तिच्या खिडकीचा चंद्र
माझ्या मनात मनात.
ढग पुन्हा कासावीस
पाऊस व्हायला आतुर
माझी चादरीत घालमेल
देह फितूर फितूर.
प्रतिक्रिया
वीजा
वीज चे अनेकवचन विजा होतं की वीजा ? भाषापंडितांनी मार्गदर्शन करावे.
…
‘खिडकीचा चंद्र’ ही उपमा१सुद्धा अंमळ jarring आहे.
असो चालायचेच.
——————————
१ किंवा उप्पीट, सांजा, शिरा, जे काही असेल ते.
‘वीजा’
भारतीय पासपोर्टाच्या रिकाम्या पानांवर ‘वीज़ा’ की कायसेसे लिहिलेले असते, त्याची या निमित्ताने आठवण झाली.
(परंतु, तेथे ‘ज’खाली नुक्ता असतो. त्यामुळे, ही ती भानगड नसावी. नपक्षी, ही कवीची शुद्धलेखनाची चूक१ असण्याची शक्यताही नाकारता येत नाही.)
असो चालायचेच.
——————————
१ पक्षी, ‘ज’खाली नुक्ता देणे टाळणे, ही.
पहिला वि बरोबर.
पहिला वि बरोबर.
जसे वीट आणि विटा..
(झीज - झिजलेल्या, पीत - पितांबर याला व्याकरणात काय म्हणतात आठवत नाही. पण असे रूपांतर अनेकदा दिसते.)
...
हे चुकून 'माझ्या चादरीत घालमेल' असे वाचले. अर्थाचा अनर्थ झाला. चालायचेच.
अनर्थ घालमेल शब्दामुळे होत
अनर्थ घालमेल शब्दामुळे होत असावी.
माझी काय अन माझ्या काय!
घालमेल
वर एकवचन- अनेकवचन अशी चर्चा दिसली.
त्यावरून -
'घालमेल' चं अनेकवचन 'घालमेल्या' असं होईल का असं वाटलं. त्यावरून "घाल मेल्या" अशी फोड सुचली. मग पुढे अजूनही काही सुचलं.
---
ही खरड चहाटळ वाटत असेल तर इग्नोरावी.
...
चुकून "दोन विजारीत कडाडल्या" असं वाचलं. वय झालं हो आता!