Skip to main content

बालगीत

फैय्याज यांनी गायिलेले
या बाई या बघा कशी माझी बसली बया
कुठे उपलब्ध आहे?

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

'न'वी बाजू Mon, 26/08/2024 - 04:21

…माझी स्मृती जर दगा देत नसेल, तर, फैयाज़ यांच्या अशा प्रकारच्या (बालगीतांच्या) ध्वनिमुद्रिकांच्या प्रकाशनात एके काळी (आमच्या लहानपणी, १९७०च्या दशकात, वगैरे) ‘महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळा’चा (तेच ते, ‘बालभारती’ फेम!) सहभाग नसे काय? कारण, आमच्या लहानपणी, त्यांच्या अशा ध्वनिमुद्रिका बाजारात येत असल्याची माहिती ‘किशोर’ मासिकातून (हे ‘पाठ्यपुस्तक मंडळा’चे दुसरे अपत्य!) वारंवार नि त्वरित प्रसिद्ध होत असे, असे अंधुकसे आठवते.

तेव्हा, ‘पाठ्यपुस्तक मंडळा’कडे चौकशी करून पाहिल्यास कदाचित काही उपयुक्त माहिती प्राप्त होणे अगदीच अशक्य नसावे (कोण जाणे, त्यांच्या आर्काइवातबिर्काइवात असे काही सापडले, तर, वगैरे) असे (‘फॉर व्हॉटेव्हर इट इज़ वर्थ’ तत्त्वावर) सुचवू इच्छितो.

आपल्या शोधकार्यास शुभेच्छा.

——————————

वानगीदाखल, ‘किशोर’ मासिकाच्या ऑक्टोबर १९७४च्या प्रस्तुत अंकाचे मलपृष्ठ चाळून पाहा. त्यावर आपल्याला हव्या असलेल्या गीताच्या ध्वनिमुद्रिकेच्या प्रकाशनाची माहिती आहे.