सूचना
सध्यापुरतं अपडेटचं काम झालेलं आहे. याचे कुठलेही दृश्य बदल नाहीत.
दिनवैशिष्ट्य
५ डिसेंबर
जन्मदिवस : सिनेदिग्दर्शक फ्रिट्झ लँग (१८९०), कवी जोश मलिहाबादी (१८९६), अॅनिमेशनपटकर्ता वॉल्ट डिस्ने (१९०१), नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ वर्नर हाइजेनबर्ग (१९०१), अभिनेत्री नादिरा (१९३२), समीक्षक विलास खोले (१९४४), गायक होजे कारेरास (१९४६), लेखक हनीफ कुरेशी (१९५४)
मृत्युदिवस : संगीतकार मोत्झार्ट (१७९१), लेखक अलेक्झांडर द्यूमा (१८७०), चित्रकार क्लोद मोने (१९२६), चित्रकार अमृता शेरगिल (१९४१), चित्रकार अवनींद्रनाथ टागोर (१९५१), इतिहास संशोधक कृष्णाजी वासुदेव पुरंदरे (१९५५), नोबेलविजेता वैद्यकशास्त्रज्ञ जोसेफ अर्लँगर (१९६५), समीक्षक म. वा. धोंड (२००७), वास्तुरचनाकार ऑस्कर निएमेयर (२०१२), वंशभेदविरोधी चळवळीचे नेते नेल्सन मंडेला (२०१३)
---
राष्ट्रीय दिन / स्वातंत्र्यदिन - थायलंड
जागतिक स्वयंसेवक दिन.
१९३२ : अल्बर्ट आइनस्टाइनला अमेरिकेचा व्हिसा प्रदान.
१९३३ : अमेरिकेतली दारूबंदी उठली.
१९५२ : लंडनवर प्रदूषित धुक्याचे साम्राज्य. यथावकाश धुक्याने १२,००० मृत.
१९५५ : अमेरिकन कृष्णवर्णीयांच्या लढ्यातील महत्त्वाचा टप्पा असलेला माँटगोमेरी बस बॉयकॉट सुरू.
१९५८ : इंग्लंडच्या राणीने जगातील पहिले S.T.D. फोन संभाषण केले.
१९६९ : इंटरनेटचे पूर्वसूरी अर्पानेट कार्यरत.
१९८९ : फ्रान्सच्या टीजीव्ही रेल्वेने ताशी ४८२.४ कि.मी. गती गाठून विश्वविक्रम रचला.
२००५ : ब्रिटन : विवाहाशिवाय एकत्र राहणाऱ्या समलिंगी वा भिन्नलिंगी जोडप्यांना विवाहित जोडप्यांप्रमाणे हक्क देणारा नागरी जोडीदार कायदा अस्तित्वात आला.
दिवाळी अंक २०२४
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 2 सदस्य आलेले आहेत.
- 'न'वी बाजू
- गवि
कमला निवडून येणे भारताच्या
कमला निवडून येणे भारताच्या हिताचे नाही. सीआयएचे भारत विरोधी षड्यंत्र आणिक वाढतील. दुसरीकडे युक्रेन युद्धावर ही तोडगा निघणार नाही. ट्र्म्प निवडून आले तर भारत विरोधी षड्यंत्र कमी होतील. युक्रेन युद्ध थांबविण्याचा प्रयत्न होईल. जगात शांतता कायम राहण्याची शक्यता जास्त.
.
हाहाहाहाहाहा.
साहेब,
खास तुमच्यासाठी, आमच्या न्यूयॉर्कातला ब्रूकलिनचा पूल अतिशय स्वस्तात विकायला काढलाय. घेत असलात, तर त्याबरोबर पुण्यातला लकडीपूल फुकटात देईन! बोला, घेताय काय?
ट्रंपला स्वतःच्या देशाच्या भल्याची काही पडलेली नाहीये. तुमच्या देशाच्या भल्याची चिंता तो नक्की काय म्हणून करील, असे तुम्हाला वाटते?
(ट्रंपचे जाऊ द्या. अमेरिकेचा/ची कोठला/लीही अध्यक्ष भारताच्या भल्याला प्राधान्य नक्की काय म्हणून देईल, असे भारतीयांना वाटते, ही माझ्या आकलनापलीकडची गोष्ट आहे. असो.)
हं, आता, स्वतःच्या देशाची वाट लावताना, भारताची वाट लावण्याचा मुद्दाम विचार करायला त्याला वेळ राहणार नाही, असे काही “लॉजिक” असल्यास गोष्ट वेगळी. तरीही, ते भरवशाचे नाही. त्याची एकंदर वागणूक पाहता, (१) तो कधी, कोणाविरुद्ध, नि काय म्हणून उठेल, आणि (२) त्याच्या कोणत्या कृतीचे दुष्परिणाम कोणावर नि कसे होतील (नि त्यातून कोणाची, कशी, नि कधी वाट लागेल), याचा भरवसा, खुद्द परमेश्वर जरी आभाळातून पृथ्वीवर उतरून आला, तरी तोसुद्धा देऊ शकणार नाही. सांगण्याचा मतलब, ट्रंपचे येणे (अमेरिकेसाठी सोडा, परंतु) भारतासाठी हितावह असेलच, असे काही नाही.
(दुसरे कोणी — अगदी कमळाबाईसुद्धा! — असते, तर (कदाचित भारताविरुद्ध का होईना, परंतु) किमानपक्षी काही predictable तरी असते. ट्रंपचा काय भरवसा?)
(आणि, तसाही तो ‘America First!’ म्हणून बोंबलून राहिलाय. (त्याच्या कोठल्याच म्हणण्याला कधीच काहीच अर्थ नसतो, ही बाब अलाहिदा. पण, तूर्तास असे बोंबलतोय तरी.) तो भारताच्या भल्याबुऱ्याचा विचार कोठला आलाय करायला? हं, त्याच्या कोठल्याही करणीतून योगायोगाने भारताचे भले, किंवा बुरे, काहीही जरी झाले, तर गोष्ट वेगळी. परंतु, त्याला त्याचे काहीही देणेघेणे नाही.)
बाकी तुमचे चालू द्या.
मोदींना अशाच माणसांचा नीट
मोदींना अशाच माणसांचा नीट उपयोग करून घेता येतो. रागां वरती मोदींनी केलेले प्रयोगातून मोदी यात तयार झाले आहेत.
युक्रेन रशिया युध्द सुरू झालं. हे खूप शहाणपणाचं होतं का? नाही.
भारत तेल आयाती ऐवजी निर्यात करायला लागला.
बांगला देशात राजवट बदलली. हे खूप शहाणपणाचं होतं का? माहीत नाही.
भारतात टेकस्टाईल इन्डस्ट्री वाढली. निर्यातही वाढली.
ट्रंप-१ चीनच्या विरोधात गेला. हे शहाणपणाचं होतं का? माहीत नाही;)
भारतात चीनमधले उद्योग यायला लागले.
रागांचे भारतावर खूप मोठे उपकार आहेत की, त्यांनी मोदींना घडवले.
.
All the best!
(In any case, not my headache!)
शुभेच्छां बद्दल धन्यवाद.
शुभेच्छां बद्दल धन्यवाद.
🙏
आम्हालाही त्रास वगैरे नाहीये.
पण भारतात राहणाऱ्या आम्हां सदाशिवपेठींना हातात फार काही नसल्याने कुठल्यातरी आशेवर जगायची सवय लागलीय. मग असं काही तरी शोधून काढायला लागतं. काही सापडलं की तो दिवस चांगला जातो.
😀
आम्हां सदाशिवपेठींना हातात
आम्हां सदाशिवपेठींना हातात फार काही नसल्याने कुठल्यातरी आशेवर जगायची सवय लागलीय.
अरारा! 'अच्छे दिन ' मध्ये जीव गुदमरतोय का ? 'मंकी बात ' अतिरंजित वाटते का ? फिर कुछ लेते क्यू नही !
(No subject)
देवी वि देव
कमळाबाईंसाठी देवी पाण्यात घातल्या आहेत अन् तात्यांसाठी देव. बघूया काय होतेय ते. कोणीही निवडून आलं तरी दोहोंपैकी एकाच्या नशिबात जलसमाधी नक्की.
कोणीही निवडून आला/आली तरी
कोणीही निवडून आला/आली तरी अमेरुकेच्या परराष्ट्र धोरणात काडीचाही फरक पडत नाही. हा त्यांच्या अंतर्गत धोरणात फरक पडत असेल. परराष्ट्र धोरण हे मल्टीनॅशनल कंपन्या ठरवतात.
100%satya
अमेरिका च परराष्ट्र धोरणे तेथील बलाढ्य कंपन्याच ठरवतात.
हे अगदी खरे आहे
जुगार
एका सहकर्मचाऱ्यानं दोलांडवर पैसे लावले आहेत. तो निवडून आलाच तर किमान पैसे मिळाल्याचा आनंद साजरा करता येण्याची सोय होईल, असं म्हणाला.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
The Apprentice
हा ट्रम्पवरचा चित्रपट पहावा. म्हणजे त्याच्या आधीच्या सर्व आयुष्यावर प्रकाश पडेल.
ब्लडबाथ झाला की. सगळी अमरीका
ब्लडबाथ झाला की. सगळी अमरीका लालभडक.
गुमसुम गुमसुम हैं क्यूँ आज तू, बोलना बोलना
शेठजीचे मित्र जिंकले. आपल्या
शेठजीचे मित्र जिंकले. आपल्या देशात अनेकांना जुलाब ही झाले. या वेळी अमेरिकेत हिंदू सोबत मुस्लिमानी ही तात्यांना मोठ्या प्रमाणात मतदान केले. बहुतेक तात्या मध्य आशियात युद्ध थांविण्याचा प्रयत्न करतील ही आशा. पण जो पर्यन्त अमेरिका युक्रेनला युद्ध थांबविण्यासाठी राजी करत नाही तो पर्यन्त रशिया इराणच्या मतदिने हिजबुलल्लाला शस्त्र पुरवीत राहणार.
शेठजींचे “मित्र”??????
हाहाहाहाहाहा.
साहेब,
ब्रूकलिन ब्रिज नि लकडीपुलासोबत खास तुमच्यासाठी म्हणून कुतुबमिनारसुद्धा देतो. फुकट!
की त्याऐवजी ताजमहाल घ्याल म्हणताय? ठीक आहे, दोन्ही घेऊन टाका!
मग काय, ठरला सौदा पक्का? (पण रोख रक्कम हं, फक्त!)
एक गोष्ट लक्षात घ्या. आमचा ट्रंप काय, किंवा तुमचे शेठजी काय, हे कोणाचे “मित्र” कधीही होऊ शकत नाहीत. ही मूलतः स्वतःच्याच आवाजाच्या नि स्वतःच्याच थोबाडाच्या प्रेमात पडलेली मंडळी आहेत. हुक्की आली, लाडात आली, किंवा कॅमेऱ्यासमोर चांगले मिरवायला मिळेलसे वाटले, तर कोणालाही कडकडून मिठी मारतील. याचा अर्थ ते एकमेकांचे दोस्त आहेत, असा होत नाही काही. उगाच आपले ‘अहो रूपमहो ध्वनिः’, झाले. उद्या मर्जी फिरली, तर ‘तू वास मारतोस!’ म्हणून एकमेकांना दूर ढकलायलाही कमी करणार नाहीत. (निदान, आमचा ट्रंप तरी कमी करणार नाही. तुमच्या शेठजींचे मात्र काही सांगता येत नाही, हं!)
(तसेही, परराष्ट्रसंबंधांत कायमचे मित्र किंवा कायमचे शत्रू नसतात, फक्त कायमचे हितसंबंध असतात, असे म्हटले जाते खरे. परंतु, तो प्रकार पूर्णपणे वेगळा.)
हो, हे झालेय खरे. परंतु, त्याचा अर्थ, त्याची कारणमीमांसा, तुम्ही म्हणता तशी नाही. इतके सोपेही कारण नाही. (तूर्तास तपशिलात शिरू इच्छीत नाही.)
परंतु तसेही, अमेरिकेतले झाले, म्हणून काय झाले, हिंदू तथा मुस्लिम मतदार हे मूर्ख असू शकत नाहीत, आणि बिनडोकपणे स्वतःच्याच हितसंबंधांच्या विरोधात मतदान करू शकत नाहीत, असे कोणी म्हटले?
आणि, ट्रंपतात्या हे मुस्लिमांच्या बाजूचे असल्याचा, किंवा (विशेषेकरून) मध्यपूर्वेतील मुस्लिमांच्या हितार्थ मध्यपूर्वेतील युद्ध थांबविण्याकरिता कार्यरत असल्याचा आरोप त्यांच्यावर त्यांचा वाईटातला वाईट शत्रूदेखील करणार नाही. (भले अधूनमधून सौदी राजपुत्राच्या गळ्यात गळे घालून हिंडत असले, तरीही.)
या ‘आतल्या गोटा’तल्या बातम्या तुम्हालाच तपशीलवार माहिती. आम्ही त्यावर काय बोलावे?
बाकी तुमचे चालू द्या.
पाहा तुमच्या शेठजींचे दोस्त काय म्हणून राहिलेत ते...
https://indianexpress.com/article/business/trump-100-tariff-brics-us-dol...
एक दोस्त दुसऱ्या दोस्ताला असली धमकी देतो काय? तीसुद्धा, 'बऱ्या बोलाने कर, नाही, नुसते करच नव्हे, तर करशील असे लिहून दे, नाहीतर... बघूनच घेतो तुझ्याकडे!' असल्या भाषेत?
(आता यावर तुमचे शेठजी काय भूमिका घेतात, त्यावरून ते ट्रंपचे दोस्त आहेत, की भारताचे, हे पाहायचे...)
(आमच्या ट्रंपचे म्हणाल, तर तो कोणाचाच दोस्त कधीच नव्हता.)
--------------------
ही भाषा आहे. ऐका! दोस्त म्हणे शेठजींचे!
ब्रिक्स चलन याला भारताचे कधीच
ब्रिक्स चलन याला भारताचे कधीच समर्थन नव्हते. गेल्याच वर्षी जयशन्कर यांनी सन्गितले होते. सो या धमकीचा भारताच्या भुमिकेवर काहिच फरक पडणार नाहीये.
बाकी चालू द्या.
आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !
(बाकी चालू द्या.)
हत्ती जिंकला, गाढव हरले.
हत्ती जिंकला, गाढव हरले.
चीनकडून काही घेऊ नका हा सल्ला तात्या देणार का?