'गमभन'चं स्क्रिप्ट ऐसीवर सुरू झालेलं आहे. ओंकार जोशीचे आभार.
ते चालवण्यासाठी Restricted HTML for gamabhana हा पर्याय कॉमेंटखालच्या टेक्स्ट फॉरमॅटमधून निवडा. त्यात वरची रिच टेक्स्ट एडिटरी बटणं गायब होतील. तुम्हाला काय हवा तो मजकूर लिहा. पुन्हा Full HTML निवडून हवं तसं फॉरमॅटिंग करा. झालं.
ओंकारनं बरंच काम केलं; तरीही या CKEditorबरोबर त्याचा कोड नीट चालत नाहीये. म्हणून अशी वाट वाकडी करावी लागत आहे.
I could type using gamabhana in the subject section. When you activate the type with gamabhana, the box outline turns pink. But I am unable to activate it in the comment box.
But I am unable to activate it in the comment box.
गमभन जरा ट्रिकी आहे त्यामुळे काही पथ्यं पाळावी लागतात. कमेंट फील्डमध्ये गेल्यावर पुन्हा टेक्स्ट फॉरमॅट 'रेस्ट्रिक्टेड एच्टीएमएल' निवडून 'टाईप विथ गमभन' करावं लागेल, ते विजेट लोड व्हायला थोडा वेळ लागतो. (काही सेकंद). 'लोडेड' असा मेसेज दिसला की टाइप करता येईल. (आणखी एक : हे लॅप्टॉपवरून वापरणार्यांसाठी आहे. मोबाईल किंवा टॅबवरून देवनागरीचा नेटिव्ह कीबोर्ड वापरावा.)
In lower right, you should see 'gamabhana' option. Click on it
Red prompt box will show about 'loading...' and in a few seconds confirm that its loaded. THe Subject box will become red lined
आता खालच्या 'टेक्स्ट फॉर्मॅट' बॉक्स मधे 'रिस्ट्रिक्टेड .....' निवडा.
- आता कॉमेंट बोक्सला पण लाल डॉट्टेड बॉर्डर दिसेल आणि सर्वात महत्त्वाचं, जे काही टायपाल ते - अहाहा - मराठीत येईल !!!
कामचलाऊ का होईना, परंतु गमभनचे विजेट सुरू झाले, हे चांगले झाले. आता विंडोजवर असताना प्रतिसाद लिहावासा वाटला, तरी (थोडी मारामारी करून का होईना, परंतु) लिहिता येईल. (तरीसुद्धा अजून, देवनागरीत मध्येच रोमन टंकायचे झाले, किंवा तळटीपादि उद्योगांकरिता वगैरे जरा विस्तृत एचटीएमएल वापरायचे झाले, तर (अशक्य नाही, परंतु) बरीच सव्यापसव्ये करावी लागतात. परंतु, काहीच नसण्याच्या तुलनेत वाईट नाही.)
जुन्या धाग्यावरचे प्रतिसाद सगळ्यांना दिसण्यासाठी तिथे नवीन प्रतिक्रिया लिहावी लागत आहे. यासाठी सदस्य मिसळपाव यांनी एक स्क्रिप्ट लिहिलं आहे. ज्या-ज्या धाग्यांवर प्रतिसाद आहेत तिथे हा बॉट जाऊन एक सध्यापुरता प्रतिसाद लिहीत आहे. त्यातून जुने धागे वर येत आहेत.
काही दिवसांनी या बॉटचं काम संपलं की पुन्हा नवे धागे वर येतील, कारण ज्या क्रमानं धागे लिहिले त्या क्रमानं हा बॉट प्रतिसाद देत आहे.
चाचणी करताना दिसलं होतं की नवा प्रतिसाद काढला तरीही एकदा धाग्यावर नवा प्रतिसाद आल्यावर सगळे प्रतिसाद दिसतात. जर ह्या प्रतिसादांचा उपद्रव होत असेल तर प्रतिसादसम्राट१ या आयडीकडून आलेले सगळे प्रतिसाद नंतर सहज काढता येतील, किंवा अप्रकाशित करता येतील.
तळटीप -
१. या बॉटनं वापरण्प्रयासाठी आयडीचं नाव प्रतिसादसम्राट ठेवणं ही माझी कल्पना आहे. #मला_पाहा_फुलं_वाहा
"ऑटोहॉट्की" लॅन्ग्वेजमधे लिहीलेली स्क्रीप्ट आहे ही. याचं ढोबळ स्वरूप - "अदितीने धाग्यांच्या आयडींची यादी दिली त्यातली एकेक आयडी घेउन, त्या आयडीनुसार URL तयार करून पान उघडायचं, ठराविक वेळा टॅब की दाबून कॉमेंट बॉक्समधे यायचं, ठरलेली (मराठीतली) कॉमेंट (शेवटी दिवस-वेळ जोडलेली) डकवायची आणि सेव बटण दाबायचं, जमलं / पान नाही सपडलं वगैरे काय ते लॉग फाईलमधे लिहायचं.
पायथन वगैरे अन्य भाषात पण सहजी करता येईल. If you are interested in such work, do check out autohotkey.org
याला "बॉट" म्हणणं म्हणजे थोडंसं एखाद्या वन-मॅन-शो चालवणार्या हँडीमनने, "फोन केलात की आमचा ऑफीस स्टाफ अपॉईंटमेंट ठरवेल तुमच्याबरोबर" असं कोणाला सांगण्यापैकी आहे!!
आता अदितीने त्याला 'बॉट' म्हणून गौरवल्यावर "तो मुळीच वद जाउ कुणाला गात नाही, तो नुसता किर्रर्रर्रर्रर्रर्रर्र करतो" च्या चालीवर मी काही "बॉट नाही हो, एक साधासा स्क्रिप्टेड प्रोसेस आहे तो" सांगत बसलो नाही हे मान्य करतो !!!!!
मी जावास्क्रिप्ट वापरून (अशाच धर्तीवरचे) चाळे करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे, लेटेष्ट धाग्याचा नंबर पाहून तेथपासून ते (खाली जातजात) १पर्यंत (असतील नसतील तेवढ्या) सर्व धाग्यांची यूआरएले बनवायची, ती आयफ्रेममध्ये किंवा स्वतंत्र विंडोमध्ये उघडायची, नि मग त्या (आयफ्रेममधल्या किंवा स्वतंत्र विंडोमधल्या) डॉक्युमेंटमधला प्रतिसादाचा टेक्ष्टएरिया शोधून काढून त्यात मजकूर भरायचा, नि मग सेव्ह बटन शोधून काढून ते क्लिकवायचे (नि मग स्वतंत्र विंडोत धागा उघडलेला असल्यास ती विंडो बंद करायची) असा विचार होता.
परंतु, कसचे काय! धाग्यांची यूआरएले बनविणे हा भाग अर्थात कठीण नव्हता; मात्र, ती यूआरएले (आयफ्रेममध्ये किंवा स्वतंत्र विंडोत) उघडताना माश्यांना एकसमयावच्छेदेकरून सर्द्या होऊ लागल्या. (सेक्युरिटी एरर, नि काय काय.) मग नाद सोडला.
आता ‘खरडफळा’नामे एक अद्भुत आणि अखिल ऐसीवरील एकमात्र जिवंत अशी सोय आपल्यातून निघून गेली असल्याने (ई. मृ. शां. दे.) एक सूचना करावी काय?
तात्पुरता एक धागा काढून त्याला खरडफळा असे नाव देऊया. त्यावर फक्त प्रतिसादाखाली दुसरा प्रतिसाद देता नाही आला पाहिजे. आणि (जमल्यास) लॉगिन केल्याखेरीज तो कुणाला दिसू देऊ नये.
काल रात्री एक स्वप्न पडलं होतं. ऐसीच्या अपग्रेडनंतर आता खरडफळा आणि खरडवही परत आलेले आहेत आणि मला खरडवहीच्या बाजूला कंसात दोन लिहिलेलं दिसलं. जुने फीचर्स आणण्याच्या नादात अदितीने हे अनेक वर्षांपूर्वी गेलेलं फीचरही (न वाचलेल्या खरडींचा काउंटर) परत आणलं वाटतं असं वाटून आणि मला कोण खरडी लिहितंय नक्की बघायला आत्ता लॉगिन केलं! कायपण स्वप्नं पडतात!
सदस्यांच्या प्रोफाईलवर गेल्यावर (सध्या) उजवीकडे View आणि सदस्याचे लेखन अशा दोन टॅब दिसतील. सदस्यांचे प्रतिसाद असे प्रोफाईलमध्ये दाखवण्याचाही प्रयत्न सुरू करत आहे.
ऐसीसाठी सध्या ड्रूपालबरोबर येतात त्यांतली एक डिफॉल्ट थीम वापरात आहे. चांगली थीम कुठली असेल यासाठीही काम सुरू आहे. तेव्हा या टॅब वरच्या बाजूला सरकतील.
(नेमकं सध्या मेलं ऑफिसचं खूप आणि खरोखरच चांगलं काम आलं आहे. ते १३-१४ फेब्रुवारीपर्यंत कमी होईल. आणि मग पुन्हा ऐसीकडे लक्ष देणं मला सोपं होईल. तसदीबद्दल क्षमस्व.)
१. इतर संस्थळांनी .... मिसळपाव, मायबोली, मनोगत यांनी अपग्रेड केलं तर त्यांचीही ऐसीएक्षरे स्थिती होईल का?
२. ड्रूपलबाबाने अशी काटछाट का केली? सुरक्षितता वाढवण्यासाठी बदल केले का साईटचा पसारा कमी केला.
३. जुनीच पद्धत ठेवून एचटीएमेलचे बरेच tab मायबोलीने ( नंतर मिसळपावनेही)दाबून टाकले तसं करता आलं असतं का? embed tab हा मोठा धोका देणारा असतो तो काढला. Formatting लाही कात्री लावली.
ओंकार जोशीचे आभार.
'गमभन'चं स्क्रिप्ट ऐसीवर सुरू झालेलं आहे. ओंकार जोशीचे आभार.
ते चालवण्यासाठी Restricted HTML for gamabhana हा पर्याय कॉमेंटखालच्या टेक्स्ट फॉरमॅटमधून निवडा. त्यात वरची रिच टेक्स्ट एडिटरी बटणं गायब होतील. तुम्हाला काय हवा तो मजकूर लिहा. पुन्हा Full HTML निवडून हवं तसं फॉरमॅटिंग करा. झालं.
ओंकारनं बरंच काम केलं; तरीही या CKEditorबरोबर त्याचा कोड नीट चालत नाहीये. म्हणून अशी वाट वाकडी करावी लागत आहे.
प्रशासनास विनंती
कृपया पुढील प्रतिसाद काढून टाकावेत.
https://aisiakshare.com/comment/199040#comment-199040
https://aisiakshare.com/comment/199042#comment-199042
काही सुधारणा झालेल्या आहेत त्या नीट दिसतायत
आता माझ्या प्रोफाईलवर माझं लेखन दिसू लागलेलं आहे. हा ऑलिव्ह ग्रीन रंग छान दिसतो आहे. नीळाही छान होता.
गमभन ट्रायल
I could type using gamabhana in the subject section. When you activate the type with gamabhana, the box outline turns pink. But I am unable to activate it in the comment box.
गमभन ट्रिक्स
गमभन जरा ट्रिकी आहे त्यामुळे काही पथ्यं पाळावी लागतात. कमेंट फील्डमध्ये गेल्यावर पुन्हा टेक्स्ट फॉरमॅट 'रेस्ट्रिक्टेड एच्टीएमएल' निवडून 'टाईप विथ गमभन' करावं लागेल, ते विजेट लोड व्हायला थोडा वेळ लागतो. (काही सेकंद). 'लोडेड' असा मेसेज दिसला की टाइप करता येईल. (आणखी एक : हे लॅप्टॉपवरून वापरणार्यांसाठी आहे. मोबाईल किंवा टॅबवरून देवनागरीचा नेटिव्ह कीबोर्ड वापरावा.)
इनस्क्रिप्ट
गमभनबरोबरच इनस्क्रिप्ट कीबोर्डही उपलब्ध झालेला आहे. ज्यांना तो सोयीचा आहे त्यांनाही वरीलप्रमाणेच पथ्यं पाळावी लागतील.
Try this. click on …
Try this.
आता खालच्या 'टेक्स्ट फॉर्मॅट' बॉक्स मधे 'रिस्ट्रिक्टेड .....' निवडा.
- आता कॉमेंट बोक्सला पण लाल डॉट्टेड बॉर्डर दिसेल आणि सर्वात महत्त्वाचं, जे काही टायपाल ते - अहाहा - मराठीत येईल !!!
छान!
कामचलाऊ का होईना, परंतु गमभनचे विजेट सुरू झाले, हे चांगले झाले. आता विंडोजवर असताना प्रतिसाद लिहावासा वाटला, तरी (थोडी मारामारी करून का होईना, परंतु) लिहिता येईल. (तरीसुद्धा अजून, देवनागरीत मध्येच रोमन टंकायचे झाले, किंवा तळटीपादि उद्योगांकरिता वगैरे जरा विस्तृत एचटीएमएल वापरायचे झाले, तर (अशक्य नाही, परंतु) बरीच सव्यापसव्ये करावी लागतात. परंतु, काहीच नसण्याच्या तुलनेत वाईट नाही.)
जुन्या धाग्यांवरचे प्रतिसाद
जुन्या धाग्यावरचे प्रतिसाद सगळ्यांना दिसण्यासाठी तिथे नवीन प्रतिक्रिया लिहावी लागत आहे. यासाठी सदस्य मिसळपाव यांनी एक स्क्रिप्ट लिहिलं आहे. ज्या-ज्या धाग्यांवर प्रतिसाद आहेत तिथे हा बॉट जाऊन एक सध्यापुरता प्रतिसाद लिहीत आहे. त्यातून जुने धागे वर येत आहेत.
काही दिवसांनी या बॉटचं काम संपलं की पुन्हा नवे धागे वर येतील, कारण ज्या क्रमानं धागे लिहिले त्या क्रमानं हा बॉट प्रतिसाद देत आहे.
चाचणी करताना दिसलं होतं की नवा प्रतिसाद काढला तरीही एकदा धाग्यावर नवा प्रतिसाद आल्यावर सगळे प्रतिसाद दिसतात. जर ह्या प्रतिसादांचा उपद्रव होत असेल तर प्रतिसादसम्राट१ या आयडीकडून आलेले सगळे प्रतिसाद नंतर सहज काढता येतील, किंवा अप्रकाशित करता येतील.
तळटीप -
१. या बॉटनं वापरण्प्रयासाठी आयडीचं नाव प्रतिसादसम्राट ठेवणं ही माझी कल्पना आहे. #मला_पाहा_फुलं_वाहा
…
@मिसळपाव:
हा बॉट नक्की कसा लिहिला? (कुतूहल)
"ऑटोहॉट्की" लॅन्ग्वेजमधे…
"ऑटोहॉट्की" लॅन्ग्वेजमधे लिहीलेली स्क्रीप्ट आहे ही. याचं ढोबळ स्वरूप - "अदितीने धाग्यांच्या आयडींची यादी दिली त्यातली एकेक आयडी घेउन, त्या आयडीनुसार URL तयार करून पान उघडायचं, ठराविक वेळा टॅब की दाबून कॉमेंट बॉक्समधे यायचं, ठरलेली (मराठीतली) कॉमेंट (शेवटी दिवस-वेळ जोडलेली) डकवायची आणि सेव बटण दाबायचं, जमलं / पान नाही सपडलं वगैरे काय ते लॉग फाईलमधे लिहायचं.
पायथन वगैरे अन्य भाषात पण सहजी करता येईल. If you are interested in such work, do check out autohotkey.org
याला "बॉट" म्हणणं म्हणजे थोडंसं एखाद्या वन-मॅन-शो चालवणार्या हँडीमनने, "फोन केलात की आमचा ऑफीस स्टाफ अपॉईंटमेंट ठरवेल तुमच्याबरोबर" असं कोणाला सांगण्यापैकी आहे!!
आता अदितीने त्याला 'बॉट' म्हणून गौरवल्यावर "तो मुळीच वद जाउ कुणाला गात नाही, तो नुसता किर्रर्रर्रर्रर्रर्रर्र करतो" च्या चालीवर मी काही "बॉट नाही हो, एक साधासा स्क्रिप्टेड प्रोसेस आहे तो" सांगत बसलो नाही हे मान्य करतो !!!!!
ह्म्म्म्म्म...
मी जावास्क्रिप्ट वापरून (अशाच धर्तीवरचे) चाळे करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे, लेटेष्ट धाग्याचा नंबर पाहून तेथपासून ते (खाली जातजात) १पर्यंत (असतील नसतील तेवढ्या) सर्व धाग्यांची यूआरएले बनवायची, ती आयफ्रेममध्ये किंवा स्वतंत्र विंडोमध्ये उघडायची, नि मग त्या (आयफ्रेममधल्या किंवा स्वतंत्र विंडोमधल्या) डॉक्युमेंटमधला प्रतिसादाचा टेक्ष्टएरिया शोधून काढून त्यात मजकूर भरायचा, नि मग सेव्ह बटन शोधून काढून ते क्लिकवायचे (नि मग स्वतंत्र विंडोत धागा उघडलेला असल्यास ती विंडो बंद करायची) असा विचार होता.
परंतु, कसचे काय! धाग्यांची यूआरएले बनविणे हा भाग अर्थात कठीण नव्हता; मात्र, ती यूआरएले (आयफ्रेममध्ये किंवा स्वतंत्र विंडोत) उघडताना माश्यांना एकसमयावच्छेदेकरून सर्द्या होऊ लागल्या. (सेक्युरिटी एरर, नि काय काय.) मग नाद सोडला.
असो चालायचेच. कोणाला तरी जमले, हे नसे थोडके.
नवीन जे काही बदल आहेत ते आवडलेले आहेत.
बदलासाठी झालेला त्रास रस्ते नवीन करताना किंवा मुंबईतल्या मेट्रोमुळे झालेल्या त्रासापेक्षा बराच कमी आहे. तेव्हा फुले वाहण्यात कमी पडू नका.
लोल
... मलाच फुलं वाहात असलात तरीही ही तुलना फारच आवडलेली आहे!
(कुतूहल)
याबद्दल अधिक माहिती पुरवू शकाल काय? (वेगळा धागा काढलात, तरी चालेल.)
चांगल्या सुधारणा होत आहेत…
चांगल्या सुधारणा होत आहेत. माझे लेखन दिसू लागल्यावर मला माझ्या एका लेखाची लिंक मित्राला पाठवता आली .
गमभनची मला गरज पडत नाही. Gboardवरून मराठी देवनागरीच लिहितो.
धागा वर आणण्यासाठी.
जुुन्या धाग्यांवरचे प्रतिसाद बघताना नव्या त्रुटी मागे पडू नयेत म्हणून प्रतिसाद.
नव्या लेआउट मध्ये पानावर खूप…
नव्या लेआउट मध्ये पानावर खूप जास्त मोकळी जागा दिसते आहे. दोन ओळीन्मध्येदेखील फार जास्त अन्तर आहे. आणि एका वेळेला स्क्रीनवर खूपच कमी मजकूर दिसतो आहे.
खरडफळा आणि व्यक्तिगत निरोप…
खरडफळा आणि व्यक्तिगत निरोप वगैरे सुविधा उडाल्या काय? तात्पुरत्या की कायमच्या?
कायमच्या!
ड्रुपलच्या नव्या आवृत्तीत प्रस्तुत सुविधा उपलब्ध नाहीत, असे कळते. (चूभूद्याघ्या.)
हात्त त्येच्या मायला! …
हात्त त्येच्या मायला! (ड्रुपलच्या ह्या आवृत्तीच्या बापाला)!!!
तात्पुरता खफ धागा
आता ‘खरडफळा’नामे एक अद्भुत आणि अखिल ऐसीवरील एकमात्र जिवंत अशी सोय आपल्यातून निघून गेली असल्याने (ई. मृ. शां. दे.) एक सूचना करावी काय?
तात्पुरता एक धागा काढून त्याला खरडफळा असे नाव देऊया. त्यावर फक्त प्रतिसादाखाली दुसरा प्रतिसाद देता नाही आला पाहिजे. आणि (जमल्यास) लॉगिन केल्याखेरीज तो कुणाला दिसू देऊ नये.
लेखकाच्या जुन्या पोस्ट
लेखकाच्या नावावर क्लिक केले कि जुन्या पोस्ट दिसत नाहित.
.
१. नवीन प्रतिक्रिया पानावर प्रतिसादकाचे नाव दिसत नाही आहे.
२. होम पेजवर "सध्या काय... " च्या लिंक चालत नाही आहेत.
३. फाँट साईज आणि दोन ओळींमधली जागा फार जास्त वाटते.
स्वप्न
काल रात्री एक स्वप्न पडलं होतं. ऐसीच्या अपग्रेडनंतर आता खरडफळा आणि खरडवही परत आलेले आहेत आणि मला खरडवहीच्या बाजूला कंसात दोन लिहिलेलं दिसलं. जुने फीचर्स आणण्याच्या नादात अदितीने हे अनेक वर्षांपूर्वी गेलेलं फीचरही (न वाचलेल्या खरडींचा काउंटर) परत आणलं वाटतं असं वाटून आणि मला कोण खरडी लिहितंय नक्की बघायला आत्ता लॉगिन केलं! कायपण स्वप्नं पडतात!
नवीन प्रतिसाद
नवीन प्रतिसाद पाहण्यासाठी प्रतिसादाचा विषय या रकान्यातील दुव्यावर क्लिक केल्यावर तो पूर्ण धागा उघडतो. कारण प्रतिसादाचा दुवा सध्या असा आहे.
http://aisiakshare.com/comment/206918
तो जर असा 👇 बदलला तर थेट नवीन प्रतिसाद उघडेल. संपूर्ण धागा स्क्रोल करावा नाही लागणार.
http://aisiakshare.com/comment/206918#comment-206918
सदस्यांचे लेखन
सदस्यांच्या प्रोफाईलवर गेल्यावर (सध्या) उजवीकडे View आणि सदस्याचे लेखन अशा दोन टॅब दिसतील. सदस्यांचे प्रतिसाद असे प्रोफाईलमध्ये दाखवण्याचाही प्रयत्न सुरू करत आहे.
ऐसीसाठी सध्या ड्रूपालबरोबर येतात त्यांतली एक डिफॉल्ट थीम वापरात आहे. चांगली थीम कुठली असेल यासाठीही काम सुरू आहे. तेव्हा या टॅब वरच्या बाजूला सरकतील.
(नेमकं सध्या मेलं ऑफिसचं खूप आणि खरोखरच चांगलं काम आलं आहे. ते १३-१४ फेब्रुवारीपर्यंत कमी होईल. आणि मग पुन्हा ऐसीकडे लक्ष देणं मला सोपं होईल. तसदीबद्दल क्षमस्व.)
काही प्रश्न.....१. इतर…
काही प्रश्न.....
१. इतर संस्थळांनी .... मिसळपाव, मायबोली, मनोगत यांनी अपग्रेड केलं तर त्यांचीही ऐसीएक्षरे स्थिती होईल का?
२. ड्रूपलबाबाने अशी काटछाट का केली? सुरक्षितता वाढवण्यासाठी बदल केले का साईटचा पसारा कमी केला.
३. जुनीच पद्धत ठेवून एचटीएमेलचे बरेच tab मायबोलीने ( नंतर मिसळपावनेही)दाबून टाकले तसं करता आलं असतं का? embed tab हा मोठा धोका देणारा असतो तो काढला. Formatting लाही कात्री लावली.
नवीन प्रतिसाद (१) यावर…
नवीन प्रतिसाद (१) यावर टोकल्यास धागा त्या प्रतिसादावर उघडत नाही.
नवीन प्रतिसाद पाहण्याची…
नवीन प्रतिसाद पाहण्याची क्लृप्ती सुनील यांनी दिली आहे ती चालत नाही.
या धाग्यावर नवीन १७ प्रतिसाद दाखवत आहेत ते कुठे आहेत?
एकूण हात टेकले.