जिज्ञासेच्या ज्योतीवर
फुंक अज्ञाताची येते
ज्ञेय-अज्ञेय द्वैताने
तर्कबुद्धी काजळते
कृष्ण ऊर्जा, कृष्ण द्रव्य,
संज्ञा पल्याड तर्काच्या
हुलकावण्या देतात
काठावर अज्ञाताच्या
किती कोडी अवघड
चराचरात दाटती
वाटे एक सुटले तो
नवी पुढ्यात ठाकती
अंतहीन अज्ञाताचे
प्रज्ञा करी दोन भाग
एक ज्ञेय- यत्नसाध्य
अज्ञेयाचा कोठे थांग?
कोडे सुटता दारी उभे नवे!
जिज्ञासेच्या ज्योतीने जाणिवेचा परीघ विस्तारतो तसा अज्ञेयाचा तिमिर मागे-मागे हटतो. अथांग काहीच नाही. विश्वही नाही. स्पेस-टाईमही नाही. हो की नाही?