शुक्राचे अधिक्रमण

शुक्राचं अधिक्रमण सुरु आहे. त्याचा हा एक फोटो. मोठ्या आकाराकरता फोटोवर क्लिक करा.

हे अधिक्रमण ऑनलाईन इथेही पाहू शकता. http://venustransit.nasa.gov/webcasts/nasaedge/

किंवा इथे: http://sunearthday.gsfc.nasa.gov/webcasts/mtwilson/

अधिक फोटो, माहिती अधिक्रमण संपल्यावर.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (3 votes)

प्रतिक्रिया

उत्तम फोटो. लवकरच आणखी फोटो पहायला मिळतील अशी आशा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

सहमत. हा फोटो कसा काढला तेही समजल्यास उत्तम.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज पावसाचे आगमन झाल्याचा आनंद, हे अधिक्रमण दिसणार नाही या जाणीवेन नीट लुटताच आला नाही Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आमच्याकडे थोडे ढग होते त्यामुळे पुन्हा काही प्रमाणात वेगळे फोटो मिळाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वर धाग्यात दिलेला फोटो आँरेज फिल्टर वापरून काढलेला आहे. हा फोटो कोणत्यही फिल्टर विना काढला आणि रंग गिम्प हे सॉफ्टवेअर वापरून अ‍ॅडजस्ट केले आहेत. फोटो कसे काढले याबाबत थोडक्यात माहिती लवकरच देण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

आँरेज फिल्टरशिवाय काढलेला सुध्दा खूप लालसर आहे. किती वाजता काढलायस?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------------------------
लिखाण आवडलं तर तारांकीत करायला विसरू नका....

ऑरेंज फिल्टर वापरून काढलेला फोटो (इथून पुढे फोटो-१) साधारणपणे अधिक्रमण सुरु झाल्यावर दोन तासानंतरचा आहे. तर दुसरा फोटो अधिक्रमण सुरु झाल्यानंतर १०-१५ मिनिटांतला आहे.

कॅमेर्‍याची पोझिशन बदलल्याने शुक्राचा मार्ग पहिल्या आणि दुसर्‍या फोटोत वेगळा आहे. दुसरा फोटो माझ्या सापेक्ष शुक्राची जागा खरी दाखवतो. शुक्र साधारणपणे घड्याळ्यातल्या २ वाजता सुर्यात आला आणि सुर्यास्त होईतो ४ वाजेकडे गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

फोटो कसे काढले याची माहिती कृपया द्यावी.

अदितीने काढलेला फोटोही छान आहे. नाइलच्या फोटोइतका रेखीव नसला तरी त्यात एक वेगळा, काहीसा विमनस्क मूड येतो. शुक्राच्या अधिक्रमणाने गांजलेला सूर्य. नाइलच्या फोटोमध्ये सूर्य दिमाखदारपणे हे गालबोट मिरवताना दिसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तं रे नाईल! काल आमच्याकडे ढग होते त्यामूळे आम्ही हे अधिक्रमण अगदी थोडावेळ आणि तेही ऑनलाईन पाहिलं. तूझ्याकडून (किंवा अदितीकडून) सविस्तर माहितीच्या अपेक्षेत. काल हे अधिक्रमण बघताना सूर्यावर अजूनही काही बारीक स्पॉटस दिसत होते, त्याबद्दलही माहिती देऊ शकशील का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-अनामिक

ते काळे डाग म्हणजे सौर डाग (sun spots). त्याबद्दल काही माहिती इथे मराठीत मिळेल. दुर्बिणीतून पाहिल्यास, सध्या सूर्यावर एकेकटे डाग आहेतच, शिवाय एक एकत्र होणार्‍या डागांचा समूहही दिसतो आहे. माझ्या ३ इंची (७६ मिमी) व्यासाच्या छोट्या दुर्बिणीतूनही हे डाग स्पष्टपणे दिसत होते. माझ्या काही फोटोंमधे हे डाग दिसत आहेत, थोड्या वेळात फोटो टाकते. (ही दुर्बिण अगदी साधी आहे, त्यातून दिसताना दिसलं तरी फोटोंमधे एवढा क्रिस्पीपणा येत नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इतर काही सुंदर फोटो National Geographic वर आहेत.

फेसबुकावर मित्रांनी शेअर केलेले, आणि आवडलेले फोटो इथे दाखवत आहे. पहिल्या दोन फोटोंचे श्रेयः निखिल तुंगारे, स्थानः हैद्राबाद. यातला पहिला फोटो फिल्टरशिवाय काढला आहे. दुसर्‍या फोटोसाठी ६ फोटो एकत्र केले आहेत. खालच्या फोटोचे श्रेयः समीर धुर्डे. तो ही फोटो (मानवनिर्मित) फिल्टरशिवाय काढला आहे.

फोटोवर क्लिक करून मोठ्या आकाराचे फोटो पहाता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सुर्योदयाचा(!) फोटो आवडला. फोटोला बॉर्डरमात्र भलतीच जोडलीए.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

इथे फ्रेम विचित्र वाटत्ये, फक्त फोटो पहाताना डोळ्यांना खुपत नाहीये.

इथे आणखी काही रोचक फोटो मिळाले. मला पहिला फोटो फारच जास्त आवडला, त्यात त्रिमितीचा भास होतो आहे. अर्थात असले फोटो 'बनवता' येतात हे मान्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान चित्रे आहेत. मजा आली.

माझा पिनहोल कॅमेरा फसला Sad पण पाच मिटिटांत तयार करायचा प्रयत्न केला होता. फसणारच. पण सूर्याचे बिंब चांगले ३०० पिक्सेल होते. फोकस नीट असता, तर शुक्र दिसला असता...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पिनहोल कॅमेर्‍यात पिक्सल कसे आले? नक्की काय पद्धतीचा कॅमेरा होता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पिनहोल कॅमेर्‍याच्या पटलाचे चित्र फोनवरच्या कॅमेर्‍याने काढले.

एक कागदाची मोठी सुरळी घेतली - १ मीटर लांब, १० सेमी व्यास - जुने पोस्टर. त्याच्या एका बाजूला सफेद कागद चिकटवला. दुसर्‍या बाजूला पोस्टर कॅरियरचे प्लास्टिकचे गोल झाकण होते, ते घट्ट बसले. प्लास्टिकच्या झाकणात पिनहोल होता/केला. ही सुरळी सूर्याच्या दिशेने करता कागदाच्या पटलावर सूर्याचे बिंब दिसले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सूर्यबिंबाचे अशा पद्धतीने फोटो घेऊन 'पाय' मोजला पाहिजे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तीनशे पिक्सेलच्या चित्राने नव्हे, तर नाइलने वर दिलेलं चित्र वापरून. त्यात सुमारे दोन हजार पिक्सेलचा व्यास असल्याने उत्तर अतिशय अचूक येतं. लवकरच याची माहिती जाहीर करेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाईलच्या चित्रातून बर्‍यापैकी स्थिर ("स्टेबल") आकडा ३.१५+ इतका मिळाला. (क्षेत्रफळ पद्धत.)

नाईल यांचे चित्र ५६५*५३५ पिक्सेलांचे आहे. (म्हणजे त्यांच्यापाशी मोठे चित्र असेल, पण मी या आकारातले चित्र उतरवले.)

चित्र वेगवेगळ्या "threshold"ने कृष्णधवल केले.
कमीतकमी "३०" threshold ठेवल्यास क्षेत्रफळ २१३४८२ पिक्सेल आले (या क्षेत्रफळात शुक्राच्या व्यवधानाचा योग्य हिशोब लावला आहे), आणि या वर्तुळाचा अधरूर्ध्व व्यास ५२० पिक्सेल आहे, आणि उजवा-डावा व्यास ५२१ पिक्सेल आहे.
तर २१३४८२/(५२०.५/२)^२ = ३.१५९५३४ असे गुणोत्तर आले.
अधिकाताधिक "१४५" threshold ठेवल्यास क्षेत्रफळ २०८७१७ पिक्सेल आले (या क्षेत्रफळात शुक्राच्या व्यवधानाचा योग्य हिशोब लावला आहे), आणि या वर्तुळाचा अधरूर्ध्व व्यास ५१४ पिक्सेल आहे, आणि उजवा-डावा व्यास ५१५ पिक्सेल आहे.
तर २०८७१७ /(५१४.५/२)^२ = ३.१५३८९३७ असे गुणोत्तर आले.

३० पेक्षा कमी threshold सूर्याचे किरीट (कोरोना) वेडेवाकडे दिसू लागते.
१४५ पेक्षा अधिक threshold ठेवल्यास समोरचे सौर डाग काळेच राहातात, त्यामुळे जर परिघाशी डाग असतील तेसुद्धा काळे राहातील अशी भीती आहे.

या चित्रात सूर्याचा ध्रुवीय व्यास विषुववृत्तीय व्यासापेक्षा १ पिक्सेल कमी मोजला, ही बाब मलाच आश्चर्यकारक वाटली. (व्यासांतला वास्तविक फरक १/१०००००० इतका आहे, या चित्रात दिसावा असा १/५०० इतका मोठा फरक नाही. चित्रामधील व्यासांत दिसणारा फरक हवामानामुळे आणि वातावरणातील रेफ्रॅक्शनमुळे आहे, असा माझा कयास आहे. चित्रातील बिंब हे मूळ सूर्याइतकेसुद्धा "वर्तुळ" नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या चित्रात सूर्याचा ध्रुवीय व्यास विषुववृत्तीय व्यासापेक्षा १ पिक्सेल कमी मोजला, ही बाब मलाच आश्चर्यकारक वाटली.

कुतुहल म्हणून, मोजमापाच्या पद्धतीतला(मॅन्युअल पद्धत?) लिस्ट काऊंट काय अपेक्षित आहे? आणि मोजमापातील एरर किती अपेक्षित आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

लीस्ट काउंट एक पिक्सेल. (म्हणजेच) कमाल डिजिटल मेझरमेंट नॉइझ १ पिक्सेल. (पण त्याहून कमी अपेक्षित. कारण कॉस(~०) ~= १. ०, ९०, १८०, २७० डिग्रींना वर्तुळाच्या परिघात चार-सहा पिक्सेल एका ओळीत आहेत.)

सूर्य आणि पार्श्वभूमी यांच्यात कॉन्ट्रास्ट खूप आहे, त्यामुळे प्रकाशमापनातील अ‍ॅनॅलॉग->डिजिटल नॉइझ तसा कमी आहे, याचा कयास करताच येतो. थ्रेशोल्ड ३० ते १४५ इतके पुष्कळ बदलता व्यास फक्त ५२०->५१४ इतका थोडा बदलला.

म्हणजे व्यासातील १/१०००००० फरक चुकून १ पिक्सेल (१/५००) दिसण्याची शक्यता आहे. पण संभवनीयता फार कमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमच्या ३० थ्रेशोल्डच्या उदाहरणात क्षेत्रफळानुसार पाय अचूक काढायचा असेल तर व्यास सुमारे ५२१.३५८ असायला हवा. तुम्ही कुठेतरी किमान अर्ध्या पिक्सेलची गल्लत तर करत नाही ना? मला वाटतं थ्रेशोल्ड लावून जर पांढऱ्या भागाचं क्षेत्रफळ मोजायचं असेल तर व्यास अर्ध्या पिक्सेलने वाढवायला हवा. कारण व्यास मोजताना तुम्ही पिक्सेलच्या केंद्रापासून मोजता, मात्र क्षेत्रफळासाठी आख्खे पिक्सेल घेता. ती दुरुस्ती केल्यास तुमच्या पद्धतीने व्यास ५२१ येतो व पायची किंमत ३.१४५९ येते. ही पायपेक्षा अधिक आहे याचं कारण अजूनही काही पिक्सेलची टोकं वर्तुळाबाहेर आहेत. ५२१.५ हा व्यास घेतला तर सर्व पिक्सेल वर्तुळाच्या आत येतील व पायची खालची मर्यादा मिळेल. ही ३.१३९९ येते. म्हणजे पायची किंमत ३.१४५९ व ३.१३९९ च्या मध्ये आहे. सरासरी येते ३.१४३०.

दोन ठिकाणी व्यास मोजणं ही अत्यंत ढोबळ पद्धत झाली. या गणितात तुम्ही त्रिज्या किती अचूकपणे मोजता याने प्रचंड फरक पडतो. माझ्या मते किमान २० ते २५ ठिकाणी व्यास मोजून सरासरी काढायला हवी.

यापेक्षा कितीतरी अचूक उत्तर सव्वापाचशे पिक्सेल व्यासाच्या वर्तुळाने काढता येतं. त्यासाठी अनेक मोजमापं करावी लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काही हरकत नाही.

पण त्यानंतर सफेद पिक्सेलांची काही टोके बाहेर जातात, आणि काळ्या पिक्सेलांची काही टोके वर्तुळाच्या आत येतात.

२०-२५ ठिकाणी व्यास काढला तरी चालेल. काही फरक पडणार नाही. (कसा काढणार? माझी कल्पना डिजिटल व्हर्नियर कॅलिपर्सची आहे. उभ्यात आणि आडव्यात स्पर्शिका काढणे सोपे असते. म्हणून मी ती मोजमापे केली. वाकड्यात दोन समांतर स्पर्शिका डिजिटली काढणे थोडेसे किचकट आहे. म्हणून ते मोजमाप करायला सध्या माझ्यापाशी वेळ नाही. उभ्यात आणि आडव्यात वेगवेगळ्या थ्रेशोल्डांत फक्त १ पिक्सेलचा फरक आहे, तर २०-२५ मोजमापे करून याच क्षेत्रात व्यास सापडेल, असे माझे भाकीत आहे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

झकास रे निळ्या!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छोटा आरसा (घागर्‍यावर वगैरे लावतात तसला) घेऊन सूर्याचा कवडसा दूरच्या (सुमारे २० फूट) भिंतीवर पाडून उत्तम दृश्य दिसते. कुठल्याच प्रकारचा धोका न पत्करता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थोडा धोका पत्करून अधिक मजा असेल तर घ्यावी हो, काका. Wink

थोडी काळजी घेऊन जर दुर्बिण (बायनॉक्युलर्स/टेलिस्कोप) मध्ये पहायला मिळत असेल तर जरूर पहावे. सुर्यावरचे डाग तसेच ट्रांसिटच्यावेळच्या गमतीजमती (याबद्दल नंतर लिहतो) बघायला जास्त मजा येते. (नाहीतर ६ तासांचा ट्रांसिट तसा कंटाळवाणा होतो)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

माझ्यामते शुक्राच्या अधिक्रमणाचा सर्वोत्तम फोटो हा. शुक्र आणि हबल टेलिस्कोप एकाच वेळेला सुर्या समोरून जाताना. हबल सुर्यासमोरून सेकंदाच्या आत जाईल, या वेळात छायाचित्रकाराने ९ फोटो घेतलेले दिसतील (फोटोत वर्तुळात हबलचे ठिपके दिसतील). या क्षणा करता छायाचित्रकार फ्रांसवरून ऑस्ट्रेलियात गेला. मस्तच! अधिक माहिती फोटोवर क्लिक केल्यास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

या फोटोची माहिती वाचून एक गोष्ट आठवली. गोष्टीचा नायक आहे, १८ व्या शतकातला फ्रेंच खगोलाभ्यासक Guillaume Joseph Hyacinthe Jean-Baptiste Le Gentil de la Galaisière

धूमकेतूची कक्षा वर्तवणार्‍या प्रसिद्ध सर एडमंड हॅली यांनी सूर्याचे अंतर मोजण्यासाठी कल्पना सुचवली. वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अधिक्रमणाच्या वेळेस मोजमापं घ्यायची आणि त्यावरून सूर्य-पृथ्वी हे अंतर शोधावे. (हे गणित कसं करतात ते मायबोलीवर इथे प्रसिद्ध केलेलं आहे, मुद्दाम वेगळं लिहीत नाही.) तर या प्रकल्पात सहभागी असणारा गालासिएर फ्रान्समधून निघाला तेव्हा सगळं सुरळीत होतं. केप ऑफ गुड होपला वळसा घालून मॉरीशसमधून निघाला तेव्हा पाँडीचेरीमधे फ्रेंच आणि इंग्रजांचं युद्ध सुरू झालं होतं. भारताच्या कारोमांडेल किनार्‍यावर जाण्याचा इरादा ठेवून तो निघाला, पण ब्रिटीशांनी त्यांचं जहाज धक्क्याला लागू दिलं नाही. जहाजातूनच त्याला परत वळावं लागलं आणि हे अधिक्रमण त्याने बोटीतूनच पाहिलं. आकाश स्वच्छ होतं पण हेलकाव्यांमुळे त्याला गणितासाठी उपयुक्त अशी निरीक्षणं करता आली नाहीत. आता परत फ्रान्सला जाण्याचा पर्याय होता.

शुक्राची अधिक्रमणं जोडीने होतात. एक झालं की पुढचं आठ वर्षांनी होतं. त्यापुढची जोडी शंभराहून अधिक वर्षांनी येते. हे चुकलेलं अधिक्रमण जोडीतलं पहिलं होतं. एवढ्या लांब आला होताच तर तो आशियातच राहिला. इतर काहीबाही करत राहिला आणि पुढचं अधिक्रमण मनीला, फिलीपाईन्समधून बघण्याचं त्याने ठरवलं. तिथे स्पॅन्यर्डांची सत्ता होती, त्यांच्याशी याचं काहीतरी वाजलं. पण तोपर्यंत पाँडीचेरीत फ्रेंचांची सत्ता पुन्हा आलेली होती. मग गालासिएरने या अधिक्रमणासाठी पाँडीचेरीत वेधशाळा वगैरे सोयी बनवल्या. नेमकं अधिक्रमणाच्या वेळातच ढग आले आणि बिचार्‍या गालासिएरला एकही अधिक्रमण बघता आलं नाही. त्याच्या डोक्यावरही याचा परिणाम झाला.

हॅलीच्या या प्रयोगात किती लोकांनी भाग घेतला होता ते तर मला माहित नाहीच; पण गालासिएर १०-१२ वर्षांपूर्वी गोष्ट ऐकूनही लक्षात राहिला. अधिक्रमण हुकलं तरी त्याला अमरपट्टा मिळाला खरा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.