guinea pig (शतशब्दकथा)
anant_yaatree
" प्रणव, दहावीत लिहिलेले निबंध हे माझं शेवटचं मराठी लेखन. कसा जिंकणार मी "कांदाभजी" संस्थळाच्या शशक स्पर्धेत?"-मी
" पक्या, बिंधास लिही. जिंकशील"
" प्रणव, प्रयत्न करून थकलोय रे, पण जमतच नाय"
" ठीकाय, ह्या पेनने लिहून बघ. हे पेन शास्त्रज्ञ नारगोळकरांना आजच मी बँकेत सही करायला दिलं होतं "
" तुझ्या पेनने काय वेगळे दिवे लागणार? पण दे."
.
प्रणवचं पेन लिहायला घेतलं अन शशक झरझर सुचत गेली. मग फटाफट टंकून "कांदाभजी" वर टाकली.
.
माझ्या विजेत्या कथेला प्रतिसाद देणाऱ्या बहुतेकांनी लिहिलं होतं "कसलेल्या वैज्ञानिकाने लिहिल्या सारखी उत्तम जमलीय."
.
प्रणवच्या "ब्रेन-हॅकिंग-पेन" च्या यशाने मी स्तिमित झालो होतो.
...अन चिंतितही