Skip to main content

तीट

ओथंबल्या नभाखाली
भारलेली हवा

सोसाट्याच्या वाऱ्यामध्ये
सैरभैर थवा

गर्जणारा मेघ शिंपे
सृजनाचा ठेवा

वीज ओढी कड्यावर
ओरखडा नवा

काजव्यांच्या ठिणग्यांचा
पानोपानी दिवा.

आरस्पानी स्वप्नी सांगे
शकुनाचा रावा,

"दृष्टावल्या भवताला
काळी तीट लावा "

तिरशिंगराव Tue, 20/05/2025 - 06:37

छान जमलीये कविता!