चौथी भिंत

माझा एक मित्र हर्षद, ऐसीअक्षरेचा वाचक आहे. तो वाचनमात्र असतो. मात्र तो अनेकदा त्याला आवडलेल्या गोष्टींएमेल मधून पाठवत असतो. त्याच्या इमेलचा अनुवाद त्याच्या परवानगीने इथे देत आहे.

========================================
डिस्क्लेमर मला कृपया विचारू नका की मी ब्लॉग लिहायचा विचार करतो आहे का? किंवा ब्लॉग लिहितो का?. माझा कोणताही ब्लॉग नाही. माझ्या यासारख्या बऱ्याच विरोपांप्रमाणे यावेळीसुद्धा मला जालावर फिरता फिरता काहीतरी रोचक वाटले आणि ते मित्रांबरोबर शेअर करायला लिहितो आहे. फक्त दुवे देणे प्रशस्त वाटेना, त्यामुळे मी त्या 'दुवादाना'साठी ची पार्श्वभूमी व मला ते का आवडले हे कळावे म्हणूनच हे लिहिले आहे.

आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की चित्रपटांची स्वतःची संस्थळे असतात आणि चित्रपट 'चौथी भिंत' भेदायचा सतत प्रयत्न करत असतात. मात्र साधारणतः या संस्थळांवर काही छोटे लेख, काही वॉलपेपर्स आणि चित्रपटांचे काही 'टिझर्स' याव्यतिरिक्त फारसे काही हाती पडत नाही. 'चौथी भिंत भेदणे' म्हणजे साधारणतः नाटकातील/चित्रपटातील पात्राने दोन संवादादरम्यान (आपले म्हणणे अधिक स्पष्ट होण्यासाठी किंवा प्रेक्षकांना काही गोष्टी माहीत असाव्यात म्हणून) प्रेक्षकांशी थेट संवाद साधणे. दुर्दैवाने या बाबतीत बॉलीवूड किंवा हॉलिवूडची परिस्थिती बऱ्यापैकी सारखीच वाईट आहे. मात्र, हल्लीच मी अत्यंत अपवादात्मक अशा दोन संस्थळांना भेटी दिल्या. हे चित्रपट 'चौथी भिंत भेदण्यासाठी' साऱ्या शक्यतांचा वापर करत आहेत. दोन्ही चित्रपटांची संस्थळे आश्चर्यजनकरित्या माहितीने समृद्ध आहेत आणि त्यामुळे हे दोन चित्रपट बघण्याला एक नवा आयाम मिळतो.

'द डिक्टेटर' हा 'साचा बेरॉन कोहेन' (बोरात & अली जी) यांचा नवा चित्रपट जगभरांच्या हुकूमशहांवर एक पॅरोडी (विडंबनात्मक चित्रपट) आहे. त्यात कोहेन याने एक काल्पनिक राष्ट्र 'वाडिया'च्या सर्वोच्च नेत्याची भूमिका केली आहे. त्याने न्यूयॉर्क टाईम्सला 'जनरल अलादिन' म्हणून एक फर्मास 'टंग-इन-चिक' स्वरूपाची मुलाखत तर दिलीच शिवाय यावर्षी ऑस्करला त्याने संपूर्ण 'सैनिकी' पोशाख केला होता.

याव्यतिरिक्त 'वाडिया' संस्थानाची (रिपब्लिक ऑफ वाडिया) अधिकृत संस्थळदेखील आहे. मी अजून चित्रपट बघितलेला नाही, मात्र हे संस्थळ अगदी विचकट-मजेशीर(wickedly funny) आहे.. इथे 'सर्वात विनोदी संस्थळे' अर्थात the most hilarious site बघाल तर त्यात संयुक्त राष्ट्रांची 'ह्युमन राईटस कमिशन' चे संस्थळ दिसेल. :D. याव्यतिरिक्त 'हिस्टरी' आणि 'इन्व्हेस्ट इन वाडिया' हे भागही बघायला विसरू नका! बाकी, या संस्थळाचे आणि उत्तर कोरियाच्या अधिकृत संस्थळाच्या होमपेज मधील साधर्म्य नजरेतून सुटत नाही Smile

दुसरे उदाहरण आहे (एलियन, ग्लॅडीएटर, ब्लॅ. हॉ. डा. वगैरे फेम) दिग्दर्शक रिडली स्कॉटचा येणारा चित्रपट- Prometheus. ही एक परग्रहावरील वस्ती वगैरे सामान्य असणाऱ्या अत्यंत प्रगत भविष्यातील विज्ञान कथा आहे. या चित्रपटातील बहुतांश तंत्रज्ञान 'वेलँड इंडस्ट्रीज' नावाच्या एका काल्पनिक बृहदसंस्थेतून (megacorporation) येते असे दाखवले आहे. Prometheus ला इतर तत्सम 'साय-फाय-चित्रपटांपासून वेगळा करणारा घटक म्हणजे या 'वेलँड कॉर्पोरेशन' चे संस्थळ! किमान याला एका सुबक संस्थळात सहज गणता यावे. या संस्थळाचे 'ग्राफिक डिझाइन' आणि 'नॅविगेशन' मी बघितलेल्या कित्येक तंत्राधारित कंपन्यांच्या संस्थळाशी तुलना करता येण्याइतके (प्रसंगी त्यांहून सरस) आहे. मला वैयक्तिकरीत्या ह्या संस्थळाकडून 'मिनिमलिझम' आणि एकूण मांडणीतील सुस्पष्टतेची शिकवण घेण्यासारखी वाटते.

हे स्थळ केवळ 'सीजी ग्राफिक्स' आणि 'लै भारी ऍनिमेशन' इथेच मर्यादित आहे की त्यात त्याहून अधिक काही आहे हे समजून घेण्यासाठी मी त्यातील प्रत्येक भाग बघितला. संस्थळावर जवळजवळ पंधराएक विभाग आहेत आणि एकाही विभागाने मला हतोत्साहीत केले नाही! या संस्थळाची रचना एखाद्या प्रत्यक्षातल्या संस्थेच्या संस्थळासारखी आहे, ज्यात त्या संथेच्या मालाची माहिती वगैरे विखुरली आहे. या काल्पनिक कंपनीचा माल मेडिकल, डिफेन्स, एनर्जी इत्यादी भागात विभागला आहे. प्रत्येक विभागात कित्येक वस्तूंची यादी आहे; आणि त्यातील प्रत्येक होय अगदी प्रत्येक वस्तूचे माहिती तपशिलासकट नोंदविली आहे. त्या माहितीची भाषा आणि सुर एखाद्या प्रत्यक्षातल्या संस्थेच्या माहितीपत्रकातून उचलल्यासारखा वाटावा इतका नैसर्गिक आहे.

या संस्थळाचा 'कॉर्पोरेट' विभाग तर मेंदूला अधिकच झिणझिण्या आणतो. गुंतवणूकदारांच्या माहिती विभागात तेथील नोकरदारांची इत्थंभूत माहिती आहे(अगदी स्त्री-पुरूष माहिती सकट! ). शिवाय कंपनीच्या समभागांचा इतिहास, त्यांच्या व्यवसायाचा विस्तार.. तुम्ही जे मागाल ते इथे उपलब्ध आहे! तिथे (अर्थात काल्पनिक) संस्थापक पीटर वेलँड यांचा TED 'टॉक' देखील आहे! फॉक्स स्टुडियोने यात किती कष्ट (आणि पैसा) यात मनापासून गुंतवले आहेत हे दाखवणारी अजून एक गोष्ट म्हणजे या स्थळावरची माहिती -पूर्णपणे काल्पनिक असूनही- अत्यंत सुसंबद्ध आणि सर्वत्र सारखीच आहे. उदाहरणार्थ 'प्रॉडक्ट्स' या पानावर असलेली माहिती आपल्याला 'कॉर्पोरेट टाइमलाइन'वरही अचूक दिसते.

अर्थातच यावरून हे कोणालाही समजावे की Prometheus मध्ये यातील अनेक संदर्भ आणि चित्रे प्रेक्षकाला बघायला मिळतील. मला प्रश्न असा पडतो की (LOTR, Watchmen वगैरेसारखे) याच्या कथेत या चित्रपटबाह्य माध्यमातील माहितीचे इतके संदर्भ गरजेचे असतील की सामान्य प्रेक्षकांना चित्रपट बघताना त्यामुळे (माहितीच्या अभावामुळे) काही तुकडे हरवल्यासारखे वाटतील? या दोन चित्रपटांनी पुन्हा एकदा त्याच द्वंद्वाला जन्म दिला आहे, जे मी अनेकदा अश्या तपशीलवार चित्रपटांच्या निमित्ताने तुम्हा मित्रांसोबत यापूर्वी शेअर केले आहे: असे सामान्य प्रेक्षक, ज्यांना हे 'अवांतर' तपशील समजून घेण्यात रस नाही, ते या चित्रपटांचा संपूर्णपणे 'अनुभव' घेऊ शकतात /शकतील का?

- हर्षद
===========================

टिपः मुळ लेखकाला आवडण्याचे श्रेय द्यावे आणि भाषांतरातील चुका माझ्या आहे.:) मुळ इंग्रजी निरोप प्रतिसादात देत आहे

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

मुळ इंग्रजी इमेल इथे देत आहे:
=========================
Disclaimer: Please dont ask me if I have started / planning to write a blog. I do NOT intend to start a blog. Like my other such mails it was just something interesting I stumbled upon & wanted to share with my friends. But rather than just sharing links, I decided to write a few lines about why I liked these.

We are all familiar about movies having their own websites & movies breaking the Fourth wall. Usually these websites have nothing more than some minuscule writeup, wallpapers & teaser trailers. The fourth wall thing is generally some character talking to the audience directly in between the dialogues. In these aspects hollywood & bollywood are more or less score same.
However, I came across two very notable exceptions recently. These movies are using media in all its forms to break the fourth wall. Both these movies have websites associated with them which are unbelievably content rich & will add a new dimension to the experience of watching these 2 movies.

The Dictator is the latest film by Sacha baron Cohen (Borat & Ali G) parodying the military dictators world over. Cohen is playing Supreme Leader of the fictional republic of Wadiya. Not only he gave a formal albeit tongue-in-cheek interview to NY times as General Aladeen; he gatecrashed this years Oscars in full military regalia!!!
Then there is the official website of the Republic of Wadia. I am yet to see the movie but the site itself is wickedly funny. It lists the UN Human Rights Commission's website as “the most hilarious site” Biggrin Be sure to check out "History" & "Invest in Wadia sections". BTW the site's similarity to North Korea's official homepage is unmistakable Smile

Second example is director Ridley Scott's (Alien, Gladiator, Black hawk Down...) forthcoming film Prometheus. It is a science fiction based in hi-tech future where androids & planetary colonies are commonplace. Much of the technology shown in the the film comes from a fictional megacorporation called Weyland Industries. Now what sets Prometheus apart from hundreds of other sci-fi films is the real life website of the Weyland Corp. Its a spectacularly designed site to say the least. The graphic design & the navigation is at par ( & at times better) than most tech company sites I have seen. I personally found the aesthetics of the whole site a study for minimalism & clarity in design.
I decided to check out if the site is something more than just futuristic CG graphics & fancy flash animations, so I went through all sections displayed. There are some 15+ sections & not once was I disappointed! The site's organization is like standard corporate site with pages about products the company etc. The products are divided into medical, defense energy etc. Each type has several products listed. And EACH of these product has writeup describing the details. The language & tone used for these descriptions feels like its directly out of actual industrial brochures.
The corporate section of the website is even more mind boggling. The investor information page has demographic data about the employees (android listed along with men, women Biggrin ), company's stock history, business distribution.. you name it! There is even a TED talk by the founder Peter Weyland! There is another amazing fact that highlights the amount of serious effort( & money) invested by Fox studios in the site. All the supposed "information" on the site despite being purely fictional, is very consistent & cohesive. For example the products listed in products page also come up on the corporate timeline.
A very obvious deduction from all this is that Prometheus will have numerous visual & contextual references to the information on this site. Will the storyline use these external references so heavily ( like in LOTR, Watchmen etc) that the average audience is left searching in the gaps for continuity? These two movies again brings up the same debate I've had with many of you about such detailed movies : Can the average audience with no such fanboy obsession about fictional details, 'experience' these movies to its full extent?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

एका वेगळ्या विषयावरचा लेख अतिशय आवडला. तुमच्या मित्राने अजून लेखन करावं ही विनंती. लेखात दिलेल्या साइट्स अजून बघितलेल्या नाहीत, लवकरच पाहीन.

कलाकृतीचं जग आणि सत्य विश्व यांच्यातली भिंत मोडून टाकण्याचा किंवा ती धूसर करण्याचा प्रयत्न अनेकांनी केलेला आहे. माझ्या माहितीतला अतिशय परिणामकारक वापर 'वॉर ऑफ द वर्ल्ड्स' या कथेच्या रेडियो सादरीकरणात झाला. त्यावेळी चालू असलेला एक कार्यक्रम थांबवून धोक्याची बातमी दिल्याप्रमाणे 'मंगळावरच्या जीवांनी पृथ्वीवर हल्ला केलेला आहे' असं जाहीर करून ते सादरीकरण सुरू झालं. त्यामुळे अनेक लोकांमध्ये खरोखरच घबराट सुरू झाली होती.

स्टार वॉर्स सारख्या सिनेमाने जनसामान्यांच्या कल्पनाविश्वात प्रवेश केला. सिनेमातल्या तलवारी, यानांच्या प्रतिकृती बाजारात मिळायला लागल्या. एक किंवा दोन पिढ्यांमधल्या मुलांनी ती खेळणी वापरून स्वप्नरंजन केलं. यालाही मी चौथी भिंत मोडून पडणे असंच म्हणेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त मेल. इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राधिका

मला वेलँड कॉर्पोरेशनचे संस्थळ विषेश आवडले.

असाच प्रयत्न मध्यंतरी आमिर खानने विविध रूपे घेऊन कधी अलाहाबाद तर कधी जयपूर वगैरे ठिकाणी केल्याचा आठवतो. बहुदा ३-इडीयट्ससाठी! त्याव्यतिरिक्त बॉलिबुडमधे असा प्रयोग झाल्याचे ऐकीवात नाही. मराठी नाटकांत मागे प्रशांत दामले फाऊंडेशनने अशी सुरवात केली होती मात्र त्याचे पुढे काय झाले कळले नाही (म्हंजे बंदच पडले बहुदा, ते नाटक आणि प्रयत्न देखील Smile )

बाकी, हर्षदला इथे सभासदत्त्व घेण्याचे निमंत्रण दिले आहेच. त्याचा तो ठरवेलच! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चित्रपटबाह्य माध्यमातील माहितीचे इतके संदर्भ गरजेचे असतील की सामान्य प्रेक्षकांना चित्रपट बघताना त्यामुळे (माहितीच्या अभावामुळे) काही तुकडे हरवल्यासारखे वाटतील? या दोन चित्रपटांनी पुन्हा एकदा त्याच द्वंद्वाला जन्म दिला आहे, जे मी अनेकदा अश्या तपशीलवार चित्रपटांच्या निमित्ताने तुम्हा मित्रांसोबत यापूर्वी शेअर केले आहे: असे सामान्य प्रेक्षक, ज्यांना हे 'अवांतर' तपशील समजून घेण्यात रस नाही, ते या चित्रपटांचा संपूर्णपणे 'अनुभव' घेऊ शकतात /शकतील का?

हे अगदी खरे आहे, दा विन्सी कोड बघताना पण हाच अनुभव आला होता. कादंबरी वाचल्यामुळे सिनेमा कळला होता. माझ्याबरोबर असलेल्या मित्राला तो सिनेमा झेपलाच नाही. तो शेवटपर्यंत मर्डर मिस्ट्रीच समजुन बसला होता. सिनेमा संपल्यावर त्याला प्लॉट समजावून सांगितल्यावर त्याने त्या सिनेमाला खुप शिव्या घातल्या होत्या. म्हणजेच त्या चित्रपटांचा संपूर्णपणे 'अनुभव' तो घेऊ शकला नव्हता.

- (Prometheus सिनेमाचा 'अनुभव' न घेऊ शकलेला) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खरे आहे. ही समस्या बहुतेक कादंबर्‍यांवर आधारीत चित्रपटांना येत असेल.
पण, हॅरीपॉटरसारखे चित्रपट मात्र पुस्तक वाचणार्‍यांसोबत न वाचणार्‍यांनाही तितकेच समजतात(आवडतात-आवडत नाहीत हा भाग वेगळा). त्यांनी मात्र चौथी भिंत भेदायला काहि वेगळे प्रयत्न केल्याचे ऐकीवात नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!