किनारा

घननिळ सागराचा घननाद येत कानी ,
घुमती दिशादिशांत लहरीमधील गाणी .
चौफेर सुर्यज्वाला , वारा अबोल शांत , कोठे समुद्रपक्षी गगनी फिरे निवांत.
आकाश तेजभारे मांडावरी स्थिरावे ,
भटकी चुकार होडी, लाटात संथ धावे.
वाळुत स्तब्ध झाला रेखाक्रुती किनारा,
जवळी असुन पाणी अत्रुप्त तो बिचारा.
सानिध्य सागराचे आकाश पांघराया ,
परि साथ ना कुणाची अस्तित्व सावराया .

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

ही कविता तुमची आहे ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

या दुव्यावर पाठ्यपुस्तकातली कविता म्हणून ही कविता दिलेली आहे. तुम्ही ही तुमच्या नावावर खपवत आहात की पाठ्यपुस्तकाचा संदर्भ द्यायचा राहिला?

कृपया इतरांच्या कविता उद्धृत करताना कवीला श्रेय द्यावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्यामुळे काही बुचकळ्यात पाडणार्‍या ओळी स्पष्ट झाल्या (येथे प्रामादिक शब्द असल्यामुळे काही ओळी अर्थहीन होत्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0