Skip to main content

ब्राह्मणीकरण!

ब्राह्मणीकरण!
=======

-राजीव उपाध्ये

आज माझ्या फेसबुक कालरेषेवर एक रोचक कहाणी अवतरली. तमाल नावाचा नावाचा एक गोरापान आणि पीळदार शरीरयष्टी लाभलेला एक युवक आपल्याला त्याची गोष्ट सांगतो.[१]

तो १६-१७ वर्षांपूर्वी इस्रायल मधून भारतात त्याच्या कुटुंबाबरोबर आला आणि एका वैदिक गुरुकुलामध्ये त्याच्या आईवडीलांनी त्याला ठेवले. त्याला ते वातावरण आवडले आणि त्याला त्याचे आईवडील तिथेच सोडतात.

मग तो तिथे वैदिक धर्माच्या कर्मकाण्डाचे शिक्षण घेतो - पूजापाठ होमहवन इ० (म्हणजे आपण ज्याला ’भिक्षुकी’ म्हणतो) ते सरव करतो.

मला विशेष रोचक वाटलेली गोष्ट म्हणजे त्याच्या अंगावरचे जानवे! ज्याअर्थी त्याला पूजापाठ आणि होमहवन करायचे लायसन्स मिळाले आहे आणि ज्यार्थी त्याला जानवे मिळाले म्हणजे त्याला ’रितसर’ हिंदू/ब्राह्मण करून घेण्यात आले आहे. गंमत म्हणजे त्याच्या एकंदर आवेशावरून तो "वेदांचे रक्षण" करणारा देवदत्त रेखे सारखा "अस्सल" (घन, दण्डक्रम इ०) ब्राह्मण वाटत नाही.

या सर्वांचा अर्थ असा की ’ब्राह्मणीकरण’ ही प्रक्रीया आज ही काही ना काही प्रमाणात अस्तित्वात आहे. ब्राह्मणीकरण हा शब्द मी कोसंबींच्या पुस्तकात प्रथम वाचला. सध्या ब्राह्मणीकरणाचे दरवाजे बहुधा श्वेतकाय व्यक्तीनाच उघडे आहेत. दक्षिणेत काही दलितांना असे पूजाअर्चेचे अधिकार बहाल केले आहेत पण त्या्त असे सातत्य आहे का? ते माहित नाही.[२]

आता मला केवळ कुतुहलापोटी काही प्रश्न पडतात -

० या तमालला त्याच्या गुरुजीनी काहीतरी गोत्र बहाल केले असेल. ते कोणते? शिष्याला/यजमानाला गोत्र ठाऊक नसेल तर भटजी/गुरु स्वत:चे गोत्र लावतात. पण काही वेळा ते नवे गोत्र पण निर्माण करतात. हे धर्मशास्त्राला अनुसरून होते की गुरुच्या लहरीप्रमाणे होते?

० याला जे ब्राह्मणत्व मिळाले ते जन्माप्रमाणे मिळालेले नाही. त्यामुळे जात जन्मानुसार ठरते हा दावा बिनबुडाचा ठरतो.

० जात ही भ्रामक कल्पना सोशल कंस्ट्रक्ट आहे आणि ते आचार, विचार आणि ’संस्कार’ यामुळे यातून निर्माण होते. त्यामुळे "जात बदलता येत नाही" हाही दावा बिनबुडाचा ठरतो.

० हे ब्राह्मणीकरण सर्व भारतात दिसले तर कदाचित ब्राह्मणद्वेषाला थोडा आळा बसू शकतो. पण हे फार तुरळक आहे आणि त्यात फिरंग्यांसाठी जास्त सीट्स उपलब्ध आहेत असे दिसते.

संदर्भ:

१. https://youtu.be/Cq4_O-7Z0h4?si=0Q6z1qRdC0r1Yo60
२. https://youtu.be/0zqV25nbfok?si=X2zuiAh9qr9E9RF7

'न'वी बाजू Wed, 03/06/2026 - 19:00

हा 'तमाल' जो कोणी आहे, तो इस्राएलहून आला, असे तुम्ही म्हणता. यावरून, आणि त्याच्या त्वचेचा रंग, चेहरेपट्टी, झालेच तर उच्चारांतील आघात, वगैरे एकंदर पाहता, तो मूळचा यहुदी (किंवा फार फार तर अरब किंवा अन्य सेमिटिकवंशीय) असावा, असे मानावयास जागा आहे.

आता, 'ब्राह्मण' हा आर्यपरंपरेतील एक वर्ण (अथवा जात) आहे, हे लक्षात घेता, त्याला ब्राह्मण करून घेणार्‍या ब्राह्मणांचे डोके ठिकाणावर होते काय, असा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो.

नाही म्हणजे, हिटलरच्या आत्म्यास काय वाटले असते, हा प्रश्न तूर्तास बाजूस ठेवूयात. हिटलरच्या आत्म्यास जगाच्या अंतापर्यंत गरगर फिरत राहूद्यात. आपल्यास त्याबद्दल प्रत्यवाय नाही. मात्र, 'यहुदी ब्राह्मण' यात काही मूलभूत तार्किक विसंगती आहे, एवढी साधी गोष्ट या ब्राह्मणांच्या लक्षात येऊ नये?

(आणि, त्यापेक्षासुद्धा, प्रस्तुत यहुद्याने ब्राह्मण होण्यात — आणि, त्याहीपेक्षा, त्याच्या आईवडिलांनी त्याला ब्राह्मण बनविण्यात — (आणि, त्या अनुषंगाने, आर्यपरंपरेचे पाईक होण्यात) रुची दर्शवावी? (त्या Never againचे काय झाले मग?))

(अतिअवांतर शंका: सुंता झालेला हा जगातील एकमेव (अथवा सर्वप्रथम) ब्राह्मण असावा काय? (नाही म्हणजे, तसे असल्यास मला व्यक्तिशः काहीच प्रत्यवाय असण्याचे कारण नाही. परंतु, लोकांची 'सुंता होण्या'बद्दल आर्यपरंपरावाद्यांना सहसा प्रचंड obsessionवजा स्वारस्य असते, म्हणून विचारले.))

बाकी, तुमच्या इतर मुद्द्यांचा परामर्श सवडीने घेतो.


तळटीपा:

मेक्सिकन खाद्यसंस्कृतीत 'तमाल' (tamale/स्पॅनिश: tamal) नावाचा एक खाद्यप्रकार असतो. मक्याचे पीठ आणि डुक्कर यांचा वाफविलेला आणि नंतर मक्याच्या आवरणात (huskमध्ये) गुंडाळलेला लगदा! प्रस्तुत तमालपंतांचा१अ आणि या 'तमाल'चा काही संबंध नसावा, अशी आशा आहे.१ब

१अ 'पंत' ही उपाधी हा 'पंडित'चा संक्षेप असून, परंपरेने (केवळ) ब्राह्मणांच्या नावासमोर लावण्याचा प्रघात आहे.

१ब यहुदी (किंवा, अरब. किंवा, अन्य सेमिटिकवंशीय.) आणि डुक्कर! तौबा तौबा!

तर्कतीर्थ Wed, 03/06/2026 - 21:35

In reply to by 'न'वी बाजू

हुसेनी ब्राह्मण या शाखेबद्दल ऐकलं नाही का? तसा हा यहुदी ब्राह्मण, आहे काय अन नाही काय?

पंत <> पं(डी)त हे नव्याने समजले. मला पंत <> पंट(र) असं काही वाटले होते. ;)