वैज्ञानिक सत्यं खरी मानायला मानवी मन का कचरतं?

जी गोष्ट विज्ञानानं सिद्ध झालेली आहे तिच्यावर अनेक माणसांचा विश्वास बसत नाही असं अनेक बाबतींत दिसतं. हे असं का होत असावं याचं कारण कदाचित आपल्या मेंदूतच असावं असं आता आढळू लागलं आहे. जगाविषयीच्या काहीशा भोळसट संकल्पना माणसाच्या मेंदूत मुळातच असतात की काय असं मानण्याला जागा आहे. उदाहरणार्थ, 'सूर्य पृथ्वीभोवती फिरतो' हे आपल्या अंत:प्रेरणेतून आलेलं भोळसट ज्ञान म्हणता येईल. विज्ञान शिकताना अशा भोळसट अंतःप्रेरणांचा त्याग करावा लागतो. जी वैज्ञानिक तथ्यं अशा भोळसट ज्ञानाच्या विरोधात जातात त्यांच्यावर प्रक्रिया करायला मेंदूला त्रास द्यावा लागतो. गॅलिलिओच्या पिसाच्या कलत्या मनोर्‍यावरच्या प्रयोगाशी संबंधित माहिती जेव्हा भौतिकशास्त्राच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना एका प्रयोगांतर्गत दाखवली गेली तेव्हा त्यांच्या मेंदूतले विशिष्ट भाग उत्तेजित होताना दिसले. आपल्या अंतःप्रेरणांकडे आपण जेव्हा दुर्लक्ष करतो, तेव्हा मेंदूतले हे भाग उत्तेजित होतात. म्हणजे गॅलिलिओचा प्रयोग आणि त्याचे निष्कर्ष माहीत असूनदेखील भौतिकशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्या मेंदूत (अंतःप्रेरणांत) त्याविरोधात विचार उत्पन्न होतात आणि मग त्यांचा मेंदू त्या विचारांना गप्प करतो. जी आपल्या अंतःप्रेरणांच्या विरोधात आहेत अशी सत्यं स्वीकारायला माणसांना वेळ का लागतो आणि त्यामुळे माणसं अवैज्ञानिक विचारांवर श्रद्धा का ठेवतात याचं कदाचित हे उत्तर आहे. अधिक माहितीसाठी हे वाचा :
Why We Don’t Believe In Science

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

या छोटेखानी परिचयात चार वेळा भोळसट हा शब्द वापरण्यात आला आहे. त्याचा अर्थ नेमका कसा घ्यावा असा प्रश्न पडला आहे. थोडे स्पष्ट केले जाईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'वैज्ञानिक सत्य' बदलत नाही असं गृहितक आहे का? ज्ञानात भर पडत गेल्याने 'सत्य' बदलतं - मग त्यावर पूर्ण भरोसा न टाकणं स्वाभाविकच.
शिवाय ज्या गोष्टी आपल्या अनुभवातल्या नाहीत त्या कोणाही वैज्ञानिकाने सांगितल्या म्हणून त्यावर विश्वास का ठेवायचा- असा प्रश्न कुणाला पडला तर तेही स्वाभाविक आहे माझ्या मते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भोळसट हा शब्द मलाही थोडा अस्थानी वाटला. मला वाटतं बाळबोध हा शब्द तिथे अधिक समर्पक ठरला असता. न्यूयॉर्करच्या लेखात म्हटलेलं आहे

As Shtulman notes, people are not blank slates, eager to assimilate the latest experiments into their world view. Rather, we come equipped with all sorts of naïve intuitions about the world, many of which are untrue.

मानवी मेंदू म्हणजे कोरी पाटी हा विचार गेल्या पन्नासेक वर्षांत हळूहळू मागे पडलेला आहे. आपण जन्माला येताना भौतिकशास्त्राच्या, तर्कशास्त्राच्या काही बाळबोध संकल्पना घेऊन येतो. या संकल्पना काही बदलू शकत नाहीत असं नाही, पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

ज्ञानात भर पडत गेल्याने 'सत्य' बदलतं

हे विधान एका मर्यादेपर्यंतच बरोबर आहे. म्हणजे लांबून एक चतुष्पाद प्राणी एवढं कळत होतं त्याऐवजी थोडं जवळून बघितल्यावर गाय/बैल असावा हा अंदाज बांधता येतो, आणि अधिक जवळ गेल्यानंतर ती गाय आहे हे कळतं. चित्र अधिक स्पष्ट झाल्यामुळे जी विधानं पूर्वी केली जात त्यापेक्षा अधिक बारकाईने विधानं करता येतात. अशाच प्रकारे सत्य 'बदलतं'. आधीची विधानं पूर्णपणे टाकाऊ होत नाहीत, तर सुधारतात.

शिवाय ज्या गोष्टी आपल्या अनुभवातल्या नाहीत त्या कोणाही वैज्ञानिकाने सांगितल्या म्हणून त्यावर विश्वास का ठेवायचा- असा प्रश्न कुणाला पडला तर तेही स्वाभाविक आहे माझ्या मते.

मला वाटतं हाच तर कळीचा मुद्दा आहे. दोन वेगळ्या वजनाचे दगड एकाच वेळी खाली पडतात यावर का कोण जाणे पण आंतरिक विश्वास नसतो. म्हणून ते वाचून 'समजलं' असूनही, तरीही प्रत्यक्षात बघताना आंतरिक चित्राशी विसंगत असल्यामुळे मूक आश्चर्य व्यक्त होतं.

हा प्रयोग त्याच विद्यार्थ्यांवर अनेक वेळा केल्यावर हा परिणाम कमी होताना दिसला आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे थोडं विषयांतर अाहे, पण तरीही. इथे (निदान मलातरी) मराठीपेक्षा इंग्रजी वापरणं सोयीचं अाहे.

It is in fact 'intuitively' clear that two stones of unequal weight, if thrown from the same height, must reach the ground at the same time. The following argument comes from Galileo himself.

Take two stones: one heavy and one light. Suppose that the heavier stone comes down in 5 seconds and the lighter one in 10 seconds. Now tie the two stones together (by a string of insignificant mass) and throw down the 'new' stone. The lighter stone would act as a drag on the heavier, and the heavier would pull down the lighter. Hence the time of descent must be something in-between the two earlier times: say 8 seconds. However, the 'new' stone is heavier that the earlier heavy stone, so it should really take less than 5 seconds. Contradiction, and hence the original assumption must be wrong.

I would call this argument intuitive in the sense that it uses a bare minimum of mathematics (essentially nothing more than the notion of comparing two numbers). It seems safe to suppose that this (very modest) amount of mathematics is part of our genetic repertoire.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

या संकल्पना काही बदलू शकत नाहीत असं नाही, पण त्यासाठी प्रयत्न करावे लागतात.

आधीची विधानं पूर्णपणे टाकाऊ होत नाहीत, तर सुधारतात.

या दोन्ही मुद्यांशी सहमत आहे.
दोन वेगळ्या वजनाचे दगड एकाचवेळी खाली पडणे, द्रवावर दिलेला दाब सगळीकडे सारखा पसरणे किंवा प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असणे ही सत्ये प्रयत्न करून स्वीकारणे सहज शक्य आहे.
परंतु जी सत्ये आपल्या स्वमहतीच्या (self-importance) विरुद्ध जातात किंवा ज्या सत्यांमुळे आपल्या अस्तित्वाला धोका होऊ शकतो अशी सत्ये स्वीकारण्याविरुद्ध मेंदूत जन्मजात काही तरी संरक्षण व्यवस्था असावी असे मला वाटते.
त्यामुळेच मानवाला देवाने निर्माण केलेले नसून नैसर्गिक निवडीतून योगायोगाने आपली निर्मिती झालेली आहे हे स्वीकारणे जड जात असावे. कारण ते सत्य स्वीकारले तर आपला जन्म हा निव्वळ योगायोग असून त्याला तसे काही प्रयोजन नाही हे कळल्याने सगळंच निरर्थक वाटण्याचा धोका आहे. अर्थात थोड्या प्रयत्नाने हे सत्यही स्वीकारणे शक्य आहे. (खरं कळूनही काही लोक अध्यात्म वगैरे गोंडस लेबलं लावून माणूस म्हणजे शरीरापेक्षा जास्त काहीतरी आहे अशी स्वतःची फसवणूक करत राहण्याचा मार्ग स्वीकारतात यामागे स्वमहतीच कारण आहे असे मला वाटते.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या मागे अद्भुततेची किंवा नाट्याची ओढ असेल का? म्हणजे विज्ञानाने सरळ उत्तर दिलं तर त्या घटनेमागची अद्भुतता नष्ट होते व कार्यकारणभाव स्थापित होतो. आणि मग ती गोष्टी रोचक वाटेनाशी होते.

जसे देव आहे, त्याने माणूस बनवला, हे त्याचे नियम आहेत, हे पाप आहे, हे पुण्य आहे म्हटल्यावर काहितरी गुढ, अद्भुत वाटते मात्र माणूस आपोआप उत्क्रांत झाला, पाप-पुण्य असं काही नाही, माणूस मरतो म्हंजे बंद पडतो- संपतो वगैरे म्हटले तर 'मजा' निघून जाते! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

रोचक.
पृथ्वी सूर्य वगैरे एकमेकांभोवती फिरण्याबाबत माझे (आणि अन्य लोकांचे) काही विचार येथे :
भूस्थिरवादाचा पुरस्कार
भूस्थिरवादाचा पुरस्कार (भाग २)

पिसाचा मनोरा त्या मानाने बुटका आहे. खूप उंचावरून पडणारा पाण्याचा थेंब हा खूप उंचावरून पडणार्‍या गारेपेक्षा तसा पाहता अलगदच पडतो. असा आपला अनुभव आहे (म्हणजे प्रयोगच). आणि गारा आणि थेंब दोन्ही साधारणपणे गोलकच असतात - म्हणजे पीस विरुद्ध लोखंडाचा गोळा असा काही प्रकार नाही.

(टर्मिनल व्हेलॉसिटी) α √वस्तुमान
(इति विकिपीडिया)

अर्थात टर्मिनल व्हेलॉसिटी पोचायच्या आधीसुद्धा दोन वस्तूंच्या वेगात फरक असतो. पण थोड्याच उंचावरून समान आकाराच्या वस्तू टाकल्या तर तो फरक मोजण्याकरिता कठिण असू शकतो.

मग दोन गोळे धाग्याने बांधले तर टर्मिनल व्हेलॉसिटी काय असेल? गणित सोपे नाही. कारण समीकरणात वस्तूच्या आकारावरून ठरणारे "ड्रॅग कोएफिशियंट" आणि "प्रोजेक्टेड एरिया" हे दोन्ही येतात. आणि दोन गोळे बांधलेल्या नव्या जोड-वस्तूचा आकार बदललेला आहे. जर एकमेकात घट्ट दाबून गोळाच बनवला, तर टर्मिनल व्हेलॉसिटी कुठल्याही गोळ्यापेक्षा अधिक असेल. जर लांब धाग्याने दोन गोळे बांधले, तर टर्मिनल व्हेलॉसिटी अध्येमध्ये असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0