Skip to main content

GenZ - जंतर-मंतर आणि भारतात इतरत्र

1. आज वीस वर्षांच्या मुलाचं वय भाजपा सत्तेवर आली तेव्हा आठ वर्षांचं होतं. राममंदिर, संघ, स्वातंत्र्यलढा, सावरकर, नेहरू, गांधी, पटेल, लव जिहाद, काश्मिरी पंडित वगैरे कुठलाही विषय यांना भावना दुखावण्याचा अगर दुखावून घेण्याच्या लायकीचा वाटत नाही.
2. Gen Z चा sense of humor अफाट आहे आणि तो व्यक्त करण्यासाठी लागणारी creativity आणि media command त्यांच्याकडे भरपूर आहे.
3. Millennial आणि boomer - विशेषत: उजव्या विचारांच्या लोकांना GenZ चे विनोद झेपत नाहीत किंवा कळत सुद्धा नाहीत. किंबहुना stand up comedy, टवाळी वगैरे प्रकाराची त्यांना allergy आहे. हे लोक हसणं विसरले आहेत. त्यांना हसणार्या मुलांचा राग येतो, ती फालतू झुरळं वाटतात.
4. मुलांची भाषा अर्वाच्य असल्याने (आणि त्यातले विनोद कळत नसल्याने) त्यांच्या घोषणा आणि फलक यांमुळे बसलेल्या मानसिक धक्क्यातून वरच्या दोन पिढ्यातले बरेच लोक सावरूच शकत नाहियेत. लगेच नेहेमीप्रमाणे हेच का संस्कार, काय त्या मुलींचे कपडे, त्यापेक्षा xx परवडल्या वगैरे कोल्हेकुई सुरू झाली आहे. मुलांनी पंतप्रधानांसह कुणाचीही पत्रास बाळगली नाहिये. त्यांची शिवराळ भाषा आणि संघाला अपेक्षित संस्कृत प्रचुर हिंदी भाषा यांचा दूरान्वयानेही संबंध नाही. इंग्रजीतील फलकांवर f words चा सुकाळ आणि अश्लील caricatures आहेत.
Someone has summed it up as - protest generation Vs prostrate generation :-)
5. काही मुलं बिनधास्तपणे आमचे पालक संघी किंवा भाजपाई आहेत आणि आम्हाला त्याची लाज वाटते हे सांगत आहेत. पण तरीही हे सांगताना त्यात एक एकदम matter of fact tone आहे. चीड, खदखद, दुःख नाही.
6. मुलं आंदोलन सुद्धा "enjoy" करत आहेत- सगळ्या धुमश्चक्रीत जिथे मजेचे दोन क्षण सापडतील ते संपूर्णपणे जगून घेत आहेत.
4. भटकी कुत्री म्हणजे 'डाॅगेश भाई' यांच्या आत्यंतिक प्रेमाचा विषय आहे (मांजरी सुद्धा). त्यांना खाऊ घालायला यांनी dog food देखील पैदा केलं आहे. हा निरागसपणा खूप लोभस आहे.
5. आम्ही काही विशेष करत आहोत हा अभिनिवेष अजिबात नाही. उलट सद्यस्थितीत दुसरं काही करता येण्याजोगं नाही याचा पूर्ण स्वीकार दिसून येतो
4. त्यांच्यासाठी कुणी स्टार व्यक्तीने/ संस्थेने पाठीशी उभं राहावं अशी अपेक्षा नाही. त्यांना कोण आला गेला यानी फरकच पडत नाही.गुळमुळीत पाठिंबा द्यायला येऊ नका, त्यापेक्षा खरं बोला नाहीतर निघा असा स्पष्ट संदेश सचिन तेंडुलकर सारख्या so called cricket god लाही देऊन झाला आहे. विशेषतः राजकीय पक्षांशी त्यांनी फारकत घेतली आहे.
5. ही मुलं संतापाने आणि कटुतेने धुमसत राहणार नाहीत पण मुद्दा देखिल सोडणार नाहीत. ती खुनशी तर अजिबात नाहीत. उलट त्यांच्यात एक प्रांजळपणा आणि प्रेमळपणा आहे.
6. ज्या दिल्ली पोलिसांनी त्यांना मारलं त्यांना देखिल बरीच मुलं खायला देत आहेत. उपहासगर्भ आणि मजेशीर प्रश्न विचारून शरमिंदा करत आहेत.
7. दिल्लीत कसं, कुठे, किती दिवस राहणार याची कोणतीही काळजी दिसत नाही. उलट 'करू manage' हा विश्वास आहे. यात गरीब आणि privileged घरातली मुलं असा भेदभाव नाही.
8. मुली पोलिसांच्या लाठ्या काठ्यांना न घाबरता उलट भिडत आहेत. जाब विचारत आहेत. आम्ही आमच्या आणि देशाच्या भविष्याची काळजी म्हणून इथे आलो आहोत, आम्हाला आडवून तुमचा काय फायदा होणार आहे, आणि आम्ही तुमच्या मुलांकरता सुद्धा लढत आहोत हे ठासून सांगत आहेत. ' ये अंदरकी बात है, पुलिस हमारे साथ है' अशा घोषणा देत आहेत.
9. आंदोलनात मुलगे, पुरूष आसपास असताना दिल्लीच्या गर्दीत यापूर्वी इतकं सुरक्षित कधीच वाटलं नव्हतं हे मुली बोलून दाखवत आहेत.
10. भारतातले इच्छुक जनसामान्य आपापल्या पद्धतीने आंदोलनात सामिल आहेत. ते त्यांच्या शहरात मोर्चे नेत आहेत, social media वर खुलेपणाने पोस्ट टाकत आहेत, मुलांना जंतर-मंतर वर zomato swiggy द्वारा अन्नपुरवठा करत आहेत.
सांगण्याजोग्या बर्‍याच गोष्टी राहून गेल्यात. पण GenZ मुळे बदल होईल अशी वातावरणनिर्मिती मस्त झाली आहे. निदान चावर्या भक्तांच्या भीतीने गप्प बसलेले लोक बोलू लागले आहेत. हेही नसे थोडके.

'न'वी बाजू Sat, 25/07/2026 - 16:39

In reply to by तर्कतीर्थ

जेन-झीचे सोडा. उजव्या विचारांच्या लोकांना नक्की कोणाचे विनोद (नि कधी) कळले आणि/किंवा झेपले होते, की आताच अचानक त्यांना जेन-झीचे (किंवा कोणाचेही) विनोद कळू आणि/किंवा झेपू लागावेत?

shantadurga Sun, 26/07/2026 - 22:38

In reply to by 'न'वी बाजू

सत्यवचन!
शिवाय कळतील असे jokes आणि पोस्टर्स अश्लील असल्याने ती समजली हे दाखवायची देखिल चोरी. त्यामुळे ह्या लोक्सना संस्कारांवर घसरल्याखेरीज पर्यायच उरला नाही.
त्याचीही पब्लिकने टिंगल उडवली. उदा- फटति-फटतः-फटन्ति. इथे फोटो कसे चिकटवायचे कसे ते माहित नसल्याने ते पोस्टर दाखवता येत नाहिये..फक्त त्यावरचं text सांगितलं. The caricature was hilarious.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 27/07/2026 - 00:39

In reply to by shantadurga

फोटोची लिंक आहे का?

  • प्रतिसाद लिहिताना टेक्स्ट फॉरमॅट फुल एचटीएमल;
  • जिथे टंकतो, त्याच्या वर बटणं दिसतील, त्यांतलं डावीकडून तिसरं बटण.
  • त्यात ती लिंक पेस्ट करा.
  • ओके

shantadurga Mon, 27/07/2026 - 14:03

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्टोर्या link करता येत नाहीत.. काही पोस्टर्सचे स्क्रीनशॉट काढता येतात तेवढेच.

'न'वी बाजू Mon, 03/08/2026 - 08:29

In reply to by shantadurga

कळतील असे jokes आणि पोस्टर्स अश्लील असल्याने ती समजली हे दाखवायची देखिल चोरी.

उलट, कळतील अशा जोक्सवरून या लोकांच्या (पक्षी: आंदोलकांच्या. किंवा, जेन-झीच्या.) नीतिमत्तेवर, संस्कारांवर घसरण्याची सुवर्णसंधी. (वस्तुतः, यामागे नीतिमत्तेशी काहीही घेणेदेणे नसते, परंतु, तेवढेच आपले एक distraction निर्माण करून त्यावरून आंदोलनास, त्यातील रास्त मुद्द्यांस discredit करता येते, झाले.)

या एकंदरच आंदोलनाच्या संदर्भात, ‘त्या दुसऱ्या संकेतस्थळा’वरची एक चर्चा फॉलो करीत होतो. त्यातील एका उपचर्चेत एका सद्गृहस्थांनी एक रोचक मुद्दा मांडलेला आढळला.

आता, प्रस्तुत सद्गृहस्थांचे (माझ्या समजुतीतील) antecedents लक्षात घेता, त्यांच्या प्रस्तुत प्रतिसादामागील हेतूच्या प्रामाणिकतेबद्दल निदान माझ्या मनात तरी कोणताही संदेह नाही. त्यांनी मांडलेला मुद्दा (व्यापक पातळीवर) तत्त्वतः रास्त आहेच; झालेच तर, (प्रस्तुत आंदोलनाप्रति वा आंदोलकांप्रति त्यांच्या भूमिका वा भावना काहीही असोत, परंतु,) आंदोलनास (वा आंदोलकांस) discredit करण्याच्या express कुटिल हेतूपोटी त्यांनी तो मांडला असावा, असे निदान मला तरी वाटले नाही. (Of course, I could be wrong — one would never know — परंतु तरीही. निदान तूर्तास तरी मला तसे वाटत नाही.)

मात्र, भक्तगणांनी ताबडतोब त्या प्रतिसादाच्या बँडवॅगनवर मारलेली उडी मनोरंजक वाटली. परंतु, चालायचेच.

पैकी, दोन विशिष्ट विनोदांकडे प्रस्तुत सज्जनांनी केलेला अंगुलिनिर्देश महत्त्वपूर्ण वाटला.

“छप्पन्न इंच की छाती के लिए ब्रा कहाँ मिलेगी…”

ठीक आहे. हे अतिशय सेक्सिस्ट आहे. At the very minimum, gender-neutral नाही. झालेच तर, पुरुषाचा कमाल अपमान करायचा असला की त्याला बाईसारखे म्हणायचे, त्यात पुन्हा छातीला ब्रा मिळेल का वगैरे, आणि शिवाय, हे एक मुलगी (पक्षी: स्त्री) म्हणून दाखवणार, वगैरे.

सर्व आरोप मान्य. परंतु, हे सर्व मुदलात ज्या ‘छप्पन्न इंची छाती’तून आले, ते मुळात काय आहे मग? ते सेक्सिस्ट नाही? Gender-neutral आहे? (तथाकथित) ‘मर्दानगीची निशाणी’ वगैरे नाही? आणि, एक पुरुष हे म्हणून दाखवीत नाही?

नाही, एकाने गाय मारली म्हणून दुसऱ्याने वासरू मारू नये, वगैरे ठीकच आहे. (आणि, ‘छप्पन्न इंच की छाती के लिए ब्रा’चे समर्थन खचितच करायचे नाही.) परंतु, ‘जेन झी स्मार्ट झाले आहे परंतु ही (सेक्सिस्ट) वृत्ती अजून मनातून बाहेर पडली नाही’ म्हणताना, मुळातल्या ‘छप्पन्न इंच की छाती’च्या दावेदारांची वृत्ती मनातून बाहेर पडून कोठवर पोहोचली, म्हणायची?

मुळातल्या सवालाला त्याच (आणि, समजेल अशा) भाषेत जवाब, असे याकडे का पाहाता येऊ नये? अर्थात, हे कोठल्याच बाजूचे समर्थन नाही, परंतु… हे जर आक्षेपार्ह असेल (आणि, I daresay, हे आक्षेपार्ह आहे!), तर तेदेखील तितकेच (किंबहुना, original sin म्हणून अधिक) आक्षेपार्ह नव्हे काय?

आणि, gender neutralityच्या अपेक्षेचे ओझे एकट्या जेन-झीच्या खांद्यांवर काय म्हणून लादायचे? मानले, तरुण पिढी आहे, पुढील मार्ग त्यांनी दाखविला पाहिजे, वगैरे… परंतु म्हणून, थेरडेशाहीला केवळ ते थेरडे आहेत म्हणून free pass मिळावा काय?

असो. तर त्या सद्गृहस्थांनी अंगुलिनिर्देश केलेला दुसरा विनोद म्हणजे “बीवी नहीं है तो देश की मारोगे क्या?”.

यावर त्या सद्गृहस्थांचा आक्षेप असा आहे, की, हक्काची बायको असेल, तर तिची हक्काने मारणे गृहीत आलेच, आणि, ती नसली, तर कोणाचीतरी मारलीच पाहिजे, ही यामागील मनोवृत्ती आहे. आणि, (पुन्हा, त्या सद्गृहस्थांच्या म्हणण्याप्रमाणे) ही या (जेन-झी) मंडळींनी गाठलेली नवीन पातळी आहे.

आता, हक्काची बायको असेल, तर तिची हक्काने मारणे गृहीत आलेच, आणि, ती नसली, तर कोणाची तरी मारलीच पाहिजे, या मनोवृत्तीसंबंधीचा प्रस्तुत सद्गृहस्थांचा जो आक्षेप आहे, तो एकदम चोक्कस आहे. ही मनोवृत्ती अर्थातच घृणास्पद आहे, आणि, तिचे कौतुक होण्याचे तर सोडाच, परंतु समर्थन होण्याचेही काहीच कारण नाही, आणि, अशा घोषणा कदापि होऊ नयेत, या प्रस्तुत सद्गृहस्थांच्या मुद्द्याशी मी शतशः सहमत आहे. त्याबाबत काही वाद असण्याचे काहीच कारण निदान मला तरी दृग्गोचर होत नाही.

परंतु, प्रस्तुत विनोदाचा ज़िक्र ऐकून माझे मन मात्र भूतकाळात गेले. To be precise, १९८०च्या दशकात, माझ्या कॉलेजच्या दिवसांत. तेव्हा श्री. राजीव गांधी पंतप्रधानपदी होते, आणि, त्यांनी त्या पदाची धुरा उचलल्यास जेमतेम दोनएक वर्षे झाली असावीत. (चूभूद्याघ्या.)

आता, दिल्लीकर विद्यार्थी हा आमच्या कँपसवरील बहुसंख्य गट जरी नसला (आमचे कँपस हे हिंदी पट्ट्यात जरी असले, तरी कँपसची डी-फॅक्टो मातृभाषा तमिळ होती. परंतु, तो मुद्दा येथे पूर्णपणे अवांतर आहे. असो.), तरी dominant गट म्हणता येण्याजोगा होता. त्यामुळे, नाही म्हटले तरी दिल्लीकर सहविद्यार्थ्यांशी पाला पडण्याचे प्रसंग मुबलक येत. तर अशाच एका प्रसंगी एका दिल्लीकर सहविद्यार्थ्याकडून एक विनोद ऐकावयास मिळाला. (मूळ विनोदात श्री. राजीव गांधी तथा श्रीमती सोनिया गांधी यांचा उल्लेख एकेरी जरी असला, तरीसुद्धा, तो विनोद येथे पेश करताना औचित्यापोटी तो उल्लेख आदरार्थी बहुवचनी केलेला आहे.)

तर एकदा श्री. राजीव गांधी रात्रीच्या वेळेस आपल्या शयनकक्षात झोपण्याच्या तयारीने अंथरुणावर पहुडलेले असतात. त्यांच्या शेजारी अर्थात श्रीमती सोनिया गांधी पहुडलेल्या असतात. इतक्यात अंथरुणाशेजारच्या फोनची घंटा वाजते.

श्री. राजीव गांधी फोन उचलतात. क्रँक कॉल असतो.

“क्यों बे, सोनिया गाँधी को ** है क्या?”

श्री. राजीव गांधी काहीही उत्तर न देता फोन ठेवून देतात. मनाने डिस्टर्ब झालेले असतात, परंतु, काय करणार?

इकडे श्रीमती सोनिया गांधी पृच्छा करतात, कोणाचा फोन होता म्हणून. आता, आपल्या मनःशांतीला धक्का तर पोहोचलेलाच आहे, परंतु, उगाच त्यांना त्रास कशास द्या, या सद्भावनेने, श्री. राजीव गांधी “कोणास ठाऊक! काही विशेष नाही.” वगैरे थातुरमातुर उत्तर देऊन वेळ मारून नेतात.

परंतु, त्यानंतर हे रोजच होऊ लागते. रोज त्याच वेळेस तोच क्रँक कॉल येणार, तोच प्रश्न विचारणार, त्यावर श्री. राजीव गांधी काहीही उत्तर न देता फोन ठेवून देणार नि मनोमन डिस्टर्ब होणार. शेवटी चौथ्या की पाचव्या दिवशी श्रीमती सोनिया गांधींनाही लक्षात येऊ लागते, की प्रकरण सीधे नाही, आणि, जे काही आहे, त्याने आपल्या पतीस प्रचंड मनस्ताप होत आहे, म्हणून.

शेवटी काळजीपोटी त्या एके दिवशी श्री. राजीव गांधींस विचारतात, की नक्की काय चालले आहे, म्हणून. श्री. राजीव गांधी त्यांस मग सविस्तर कथन करतात.

श्रीमती सोनिया गांधी मग त्यांची समजूत घालतात, की प्रकरण तसे गंभीर आहे खरे, परंतु, हा कोणीतरी वेडा इसम असावा, त्याचे काय एवढे मनावर घ्यायचे नि स्वतःलाच मनस्ताप करून घ्यायचा? उद्या जर पुन्हा कॉल आला नि प्रश्न विचारला, तर “हो, आहे” म्हणून उत्तर द्या, नि मोकळे व्हा एकदाचे, म्हणून.

त्यानंतर पुढील दिवशी नेमाप्रमाणे कॉल येतो, नि पलीकडून तोच प्रश्न येतो. या वेळेस मात्र श्री. राजीव गांधी (पढविल्याप्रमाणे) उत्तर देतात, “हाँ, है।” म्हणून.

पलीकडून उत्तर येते, “तो फिर, भैं**, उसी की मार ना! देश की क्यों मारता है?”

(या (पक्षी: श्री. राजीव गांधी, श्रीमती सोनिया गांधी, तथा क्रँक कॉलर यांच्या संदर्भातील) विनोदाचा नेमका राजकीय उद्गम कोठून असावा, याबद्दल मला पुसटशीदेखील कल्पना नाही. मात्र, हा विनोद काँग्रेसी गोटांतून खासा उगम पावला नसावा, अशी, का, कोण जाणे, परंतु, जबरदस्त शंका येते. परंतु, येथे तो मुद्दा नाही.)

तर सांगण्याचा मतलब एवढाच, की विद्यमान पंतप्रधानांच्या संदर्भातील विनोदाबद्दल उर्वरित सर्व आक्षेप जरी ग्राह्य असले, तरी, ही जेन-झीने गाठलेली नवी पातळी असे तिचे categorization हे पटण्यासारखे नाही. किंबहुना, या विनोदातून जेन-झीने कोठलेही नवनिर्माण केलेले नाही, असे प्रतिपादण्याचे धाडस करू इच्छितो. प्रस्तुत विनोद ज्या (पक्षी: दिल्लीच्या.) परिसरात केला गेला, त्या परिसरात या विनोदाचे (किंवा, विनोदाच्या या genreचे) व्हिण्टाज किमान चाळीस वर्षांपूर्वीचे आहे. (आणि, या genreमधील विनोद काही वेगळ्या संदर्भात आम्ही स्वतः आमच्या कानांनी ऐकलेला आहे.)

(अर्थात, आक्षेपकर्त्या सद्गृहस्थांचा कदाचित दिल्लीच्या संस्कृतीशी — आणि, त्यातही, चाळीस वर्षांपूर्वीच्या दिल्लीच्या संस्कृतीशी — तितकासा निकटसंबंध आलेला नसू शकेलही. (चूभूद्याघ्या.) त्यामुळे, त्यांना प्रस्तुत विनोदाच्या व्हिण्टाजविषयी कल्पना नसल्यास ते अर्थातच क्षम्य आहे. त्याबद्दल त्यांना मी दोष देणार नाही. असो.)

हे जेन-झीने केलेल्या प्रस्तुत विनोदाचे (तथा त्यामागील मानसिकतेचे) समर्थन नव्हे. कोठल्याही अंगाने नव्हे. तसे समर्थन कोठल्याही प्रकारे करण्याचा हेतूही नाही. कदापि नाही. चाळीस वर्षांपूर्वीच्या तरुणाईने काही विशिष्ट मानसिकतेतून काही अरबटचरबट विनोद केला (नि तेव्हाच्या माहौलात तो खपूनही गेला), म्हणून आजच्या तरुणाईनेही त्याच प्रकारच्या मानसिकतेतून त्याच genreमधील विनोद आजही करावा का? या प्रश्नाचे उत्तर अर्थात “नाही” असेच द्यावे लागेल. दुसरे कोणतेही उत्तर देता येणे शक्य वाटत नाही.

परंतु, असे पाहा. त्या वयात असा विनोद केलेला मी ऐकलेला आहे, इतकेच नव्हे, तर (तेव्हासुद्धा माझा वैयक्तिक कल काहीसा काँग्रेसच्या बाजूस झुकता असूनसुद्धा) तो विनोद त्या वयात मी enjoyसुद्धा केलेला आहे, त्यावर खदाखदा हसलेलोसुद्धा आहे. (आणि, I daresay, आक्षेपकर्त्या सद्गृहस्थांनीसुद्धा, त्या वयाचे असताना, हा विशिष्ट विनोद नाही कदाचित, तरी अशा प्रकारचे विनोद ऐकून enjoy केलेले असतील, नि त्यावर खदाखदा हसलेसुद्धा असतील, याबद्दल मला खात्री आहे.) असे असताना, आम्हीं थेरड्यांनी आजमितीस आजच्या तरुणाईला नेमक्या कोणत्या तोंडाने सांगावे, की बाबांनो, असले विनोद करणे उचित नव्हे, म्हणून? (किंवा, कदाचित, आजच्या तरुणाईच्या नावाने खडे फोडताना, त्यांच्या संस्कारांवर वगैरे घसरण्यापूर्वी, आम्हीही त्यांच्या वयाचे असताना कदाचित असेच, इतकेच (किंवा याहूनही अधिक) वाईट असू शकू, हे स्मरून, जगाशी नाही तरी निदान स्वतःशी प्रामाणिक राहण्याचा काही किमान प्रयत्न तरी करू शकू काय?)

(बाकी, पंतप्रधान राजीव गांधींसंबंधीच्या वर उद्धृत केलेल्या विनोदात, श्री. राहुल गांधींच्या मातुःश्रींविषयी काही आक्षेपार्ह मजकूर आलेला आहे, असे आमच्या लक्षात येते. श्री. राहुल गांधी हे त्याबद्दल (त्यांच्या मातुःश्रींविषयी आक्षेपार्ह विधाने असलेले अरबटचरबट विनोद करणाऱ्या) आमच्या पिढीस मोठ्या उदार मनाने क्षमा करतील, किंवा कसे, हे भविष्यकाळच सांगू शकेल. (का, कोण जाणे, परंतु, ते त्या भानगडीतसुद्धा पडणार नाहीत, अशी दाट शंका आम्हांस येते. राहूनराहून येते. I honestly don’t think that he’d bother.) असो.)

मूळ आक्षेपकर्त्यांच्या मुद्द्यांबद्दल याहून अधिक आम्हांस काहीही म्हणायचे नाही. त्यांनी त्यांच्या भावना, त्यांचे विचार प्रामाणिकपणे मांडले. (त्याबद्दल — आणि अन्यथाही — त्यांच्याबद्दल आदर आहेच.) आम्हीही त्याबद्दल आम्हांस काय वाटले, ते (आमच्या परीने) प्रामाणिकपणे मांडले. आमच्या लेखी (तरी) हा विषय (त्यांच्यापुरता) येथेच संपला. आमचे उर्वरित विवेचन त्यांच्याविषयी (वा त्यांच्या मुद्द्याविषयी) नाही.

मात्र, त्यांच्या प्रतिसादाच्या बँडवॅगनवर उडी मारून जे इतर प्रतिसाद आले, ते काहीसे रोचक तथा मनोरंजक वाटले खरे. (अर्थात, त्याला मूळ आक्षेपकर्ते जबाबदार नाहीत, हे ओघानेच आले.)

एक मुद्दा असा वाचण्यात आला, की द्वेषाची पातळी किती खाली जाऊ शकते, याचे नवनवे आयाम पाहावयास मिळत आहेत, म्हणून.

आता, या म्हणण्यात खरे तर काहीच वावगे नाही. किंबहुना, अतिशय अचूक विधान आहे हे. या विधानाबद्दल आम्हांस काही आक्षेप जर असलाच, तर तो केवळ ‘नवनवे’ या शब्दापुरता आहे. परंतु, ते एक असो बापडे.

म्हणजे, कसे आहे ना, की, नेहरूंविषयी द्वेषमूलक विधाने एका विशिष्ट गोटाकडून आम्ही पुष्कळ ऐकलेली आहेत. म्हणजे, नेहरूंच्या धोरणांविषयीच नव्हे (त्यातील त्रुटींविषयीची सयुक्तिक तथा मुद्देसूद टीका ही अर्थातच kosher मानण्यास प्रत्यवाय नसावा; मुद्दा तो नव्हे.), तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याविषयी, झालेच तर त्यांच्या जन्माविषयी, त्यांच्या pedigreeविषयी, झालेच तर त्यांच्या आख्ख्या खानदानाच्या औरसतेविषयी. श्रीमती सोनिया गांधी (श्री. राहुल गांधी यांच्या मातुःश्री!) या इटलीतील बारसेविका असल्याबद्दल कुत्सित विधाने याच गोटातून ऐकलेली आहेत. (भले त्यात समजा कदाचित काही तथ्य आहे, असे जरी मानले, तरी, बारसेविका असण्यात नेमके काय गर्हणीय आहे, ते मला (निदान आजमितीस तरी) प्रामाणिकपणे कळू शकत नाही. या कुत्सितपणातून केवळ अशी विधाने करणाऱ्यांची मानसिकता दिसून येते, इतकेच.) महात्मा गांधी हे प्रातःपूज्य असल्याबद्दल जरी या गोटाची सांप्रतकालीन अधिकृत (कथित) भूमिका असली, तरीसुद्धा, या गोटातील मंडळी महात्मा गांधींबद्दल खाजगीमध्ये कशा प्रकारची, कोणत्या थराला जाणारी भाषा वापरतात, याचा पुरेपूर अनुभव या कानांनी अनेकदा घेतलेला आहे. अगदी महात्मा गांधींच्या अखेरच्या ‘हे राम’लादेखील या मंडळींनी सोडलेले नाही. (‘हे राम’ हे उद्गारदेखील प्रत्यक्षात काही वेगळेच असल्याबद्दलची (आणि फारसे glorious नसल्याबद्दलची) अत्यंत अश्लाघ्य भाषेतील काही बनी-बनायी कहाणी कट्टर संघविचाराच्या आमच्या एका भूतपूर्व सहाध्यायाने आम्हांस पूर्वी एकदा ऐकविली होती. ती तशीही येथे relevant नसल्याकारणाने ती येथे मांडण्याचे काही प्रयोजन आम्हांस दृग्गोचर होत नाही. तर ते एक असो.)

तर सांगण्याचा मतलब, हे सर्व काही नेहरूंविषयीच्या, सोनिया गांधींविषयीच्या, झालेच तर महात्मा गांधींविषयीच्या आत्यंतिक जिव्हाळ्यातून अथवा पराकोटीच्या प्रेमातून उद्भवत असावे, याबद्दल आम्ही साशंक आहोत. मग, अशा परिस्थितीत, हे सर्व घडत असतानाच तेवढा या राधासुतांचा धर्म कोठे केळी खावयास कडमडत असतो, याबद्दल आम्हांस कुतूहल वाटते, इतकेच.

नाही म्हणजे, आमचे माफक म्हणणे इतकेच आहे, की, या स्नानगृहात एवीतेवी समस्तजन विवस्त्रच जर असतील, तर मग विनाकारण किटलीने हंड्यास कृष्णवर्णीय ते काय वदावे, नव्हे काय?

पण लक्षात कोण घेतो? चालायचेच.


तळटीपा:

एका विशिष्ट अवयवाचा उल्लेख. स्पष्टपणे मांडणे सभ्यतासंकोचास्तव टाळले आहे.

दिल्लीकडील (विशेषेकरून पंजाबी समाजाच्या तोंडच्या) भाषेत, (हिंदी अथवा पंजाबी बोलताना) वाक्यातील स्वल्पविराम, अर्धविराम, तथा वाक्याअखेरीचा दण्ड यांच्या उच्चारणार्थ, झालेच तर क्वचित तोंडीलावणे अथवा पादपूरणार्थ म्हणूनही, सामान्यतः वापरला जाणारा एक ध्वनिसमुच्चय. त्या भाषाविशेषात (विशेषेकरून त्या समाजात) निरर्थक; अन्य ठिकाणी वा अन्य संदर्भांत त्याचा काही बरावाईट अर्थ निघाल्यास मंडळ त्यास जबाबदार नाही. (कदाचित त्या समाजातील काही सांस्कृतिक संदर्भ असावा, किंवा कसे, नकळे. (चूभूद्याघ्या.) असो.)

हा व्यक्तिमत्त्वाचा नसून वयाचा महिमा आहे. त्या वयात अनेकदा असलेच विनोद appeal होतात. ते योग्य नसले, तरीही. (किंबहुना, अनेकदा, ते योग्य नसतात, म्हणूनच.) त्यामागील नैतिकता, मानसिकता, वगैरे अक्कल बरीच नंतर, कदाचित जगात थोडे टक्केटोणपे खाल्ल्यानंतर, थोडी maturity वगैरे आल्यानंतर, कदाचित थोडे (स्वतंत्रपणे) विचार वगैरे करू लागल्यावर येऊ लागते. (अनेकांना ती त्यानंतरही येत नाही; परंतु, तो पूर्णपणे वेगळा मुद्दा.) अर्थात, हे कशाचेही समर्थन नव्हे; केवळ वस्तुस्थितीचे कथन आहे.

संस्कारांचेच म्हणाल, तर, (असले विनोद करावे, आणि/किंवा) असल्या विनोदांना खदाखदा हसावे, असे संस्कार आमच्याही आईवडिलांनी आमच्यावर केले नव्हते. In fact, quite the contrary. परंतु तरीही, in spite of आमच्या आईवडिलांनी आम्हांवर केलेले समस्त संस्कार (किंवा, खरे तर त्यांच्या नाकावर टिच्चून), आम्ही असले विनोद (त्या वयात) enjoy केले बुवा. (भले आमच्या स्वतःच्या तत्कालीन राजकीय कलाच्या विरोधात जाणारे असले, तरीही.) आणि, त्यांवर खदाखदा हसलोसुद्धा. (आणि, आजमितीस हे प्रामाणिकपणे कबूल करण्यास आम्हांस काडीमात्र अडचण येत नाही.) असो.

आता स्वतःशी प्रामाणिक राहण्याचाच वसा जर घेतलेला आहे, तर, मी ज्या वातावरणात वाढलो, तेथील आसपासचा माहौल लक्षात घेता, एका जमान्यात कदाचित मलादेखील हा व्यवसाय गर्हणीय वाटू शकला असता खरा, आणि, त्यातून, मीदेखील कदाचित एके काळी असा व्यवसाय करणाऱ्या एखाद्या व्यक्तीबद्दल (आणि, त्यातही, असा व्यवसाय करणाऱ्या एखाद्या स्त्रीबद्दल) कुत्सित विधाने करू शकलो असतो, हे कबूल करणे येथे प्राप्त आहे. Thankfully, I got an opportunity to evolve. (Not everyone may be that lucky.) आणि तसेही, एके काळी मी असा विचार करू शकलो असतो, याचा अर्थ तो विचार बरोबर आहे (किंवा, तसा विचार करणे हे उचित आहे), असा होऊ नये. In fact, quite the contrary.

एका विशिष्ट वयात — किंबहुना, ज्या तरुणाईचा येथे ज़िक्र होत आहे, त्या तरुणाईच्या सांप्रतकालीन विशिष्ट वयात — विशेष जिव्हाळ्याच्या एखाद्या मित्रास अनेकदा आईमाईवरून शिवी हासडून संबोधले जाते. मात्र, येथे, का, कोण जाणे, परंतु, तसा काही प्रकार असावा, असे वाटत नाही. असो.

येथे ‘राधासुत’ हे कोणी son-of-a-Radha अशा अर्थाने घेतल्यास, त्याबद्दल काही प्रत्यवाय नोंदविण्याचे काही कारण येथे निदान आम्हांस तरी (निदान वरकरणी) दृग्गोचर होत नाही, हे नमूद करणे येथे प्राप्त आहे.

गवि Sat, 08/08/2026 - 21:52

In reply to by 'न'वी बाजू

हे सर्व मुदलात ज्या ‘छप्पन्न इंची छाती’तून आले, ते मुळात काय आहे मग? ते सेक्सिस्ट नाही? Gender-neutral आहे? (तथाकथित) ‘मर्दानगीची निशाणी’ वगैरे नाही? आणि, एक पुरुष हे म्हणून दाखवीत नाही?

अत्यंत योग्य. मान्य.

संपूर्ण प्रतिसादाबद्दल , त्यातल्या समजूतदारपणा बद्दल अत्यंत आभार आणि सहमती. कौतुकही..

(आणि, I daresay, आक्षेपकर्त्या सद्गृहस्थांनीसुद्धा, त्या वयाचे असताना, हा विशिष्ट विनोद नाही कदाचित, तरी अशा प्रकारचे विनोद ऐकून enjoy केलेले असतील, नि त्यावर खदाखदा हसलेसुद्धा असतील, याबद्दल मला खात्री आहे.)३

 

सॉरी पण अत्यंत असहमत. स्वतःवरुन प्लीज जनरलायझेशन टाळलेले बरे. 

 

 

'न'वी बाजू Sat, 25/07/2026 - 17:58

In reply to by अमित.कुलकर्णी

शुभेच्छा, झालेच तर सहानुभूती, वगैरे तर आहेतच. (किंबहुना, तुम्हीआम्ही फक्त तेवढेच करू शकतो आणि/किंवा करतो. शिवाजी नेहमी शेजारच्या घरातल्या जिजाक्कांच्याच पोटी जन्मास येतो.)

परंतु, ही जेन-झी मंडळी तुमच्या(आमच्या) शुभेच्छांवर (किंवा सहानुभूतीवर, किंवा पाठिंब्यावरसुद्धा) अवलंबून नाहीत, असे वाटते.

(आणि, असूही नये. लढा द्यायचा आहे, तर द्यायचा आहे. ‘आलात, तर तुमच्यासह, नाहीतर तुमच्याविना.’ तुम्हीआम्ही शुभेच्छा द्यायला येण्याची वाट पाहात बसले, तर विचारायलाच नको. यशापयश, बरोबर-चूक वगैरे काय ते posterity पाहून घेईल. बाकी talking heads काय, बोलत राहातीलच. (‘झुरळे’ वगैरे तर काय, आत्ताच म्हणताहेत.))

चालायचेच.


म्हणजे, एकंदरीतच जेन-झीबद्दल. या विशिष्ट लढ्याच्या(च) संदर्भात, असे नव्हे.

मावळेसुद्धा शेजारपाजारच्या घरांतूनच गोळा होतात. चालायचेच.

यात तुम्हीआम्ही, झालेच तर इथले सगळेच आलो.

म्हणजे, तुम्हीआम्ही म्हणत नाही, परंतु तरीही.

अहिरावण Sat, 25/07/2026 - 13:56

जेन झीने उभ्या केलेल्या इतर देशांमधील आंदोलनाचे काय झाले? उगा आपले विशेषणांची सरबत्ती करुन काही होत नाही. होणार नाही.

पेपर फोडावा म्हणून बापाकडून पैसे घेऊन फोडणारी पिढी जेन झीच ना?

चिंतातुर जंतू Sat, 25/07/2026 - 16:08

In reply to by अहिरावण

पेपर फोडावा म्हणून बापाकडून पैसे घेऊन फोडणारी पिढी जेन झीच ना?


टूलकिट मिळालेलं दिसतंय. पण उशीर झाला जरा.

'न'वी बाजू Sat, 25/07/2026 - 17:34

In reply to by अहिरावण

जेन झीने उभ्या केलेल्या इतर देशांमधील आंदोलनाचे काय झाले?

केल्याने होत आहे रे… (किंवा, होतही नाही बऱ्याचदा. परंतु तरीही…) आधी केलेचि पाहिजे.

ते ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ की कायसेसे आपल्या हिंदू धर्मातच (नि त्यातसुद्धा साक्षात् भगवान श्रीकृष्णांनी) सांगून ठेवलेले आहे ना? (भगवान श्रीकृष्ण काय खोटे बोलत होते मग?)

बाकी, इतर देशांमधील आंदोलनांचे काय झाले, म्हणाल, तर तेथे प्रस्थापित (तूर्तास तरी) वरचढ ठरले. म्हणून तो लढा गैरवाजवी ठरतो काय?

एकट्या जलियाँवाला बाग प्रकरणामुळे जनरल डायरचे आणि/किंवा ब्रिटिश सत्तेचे शष्पसुद्धा वाकडे झाले नाही. फक्त, शेकडो हिंदुस्थानी मेले. बरे मग?

एकट्यादुकट्या घटनेत इन्स्टंट यश दर खेपेस मिळत नाही. (किंबहुना, अनेकदा नुकसानसुद्धा सोसावे लागते.) Sustained लढ्यातूनच काही घडले, तर घडते. (तेसुद्धा घडतेच, किंवा शंभर टक्के हवे तसे घडतेच, असे नाही.) परंतु म्हणून, अन्याय होतोय असे जर वाटत असेल, तर कोणी लढूच नये की काय?

पेपर फोडावा म्हणून बापाकडून पैसे घेऊन फोडणारी पिढी जेन झीच ना?

(तुमच्याच लॉजिकने जायचे, तर) गांधींवर गोळ्या झाडणारे हिंदूच ना?

अहिरावण Sat, 25/07/2026 - 19:51

In reply to by 'न'वी बाजू

>>>(तुमच्याच लॉजिकने जायचे, तर) गांधींवर गोळ्या झाडणारे हिंदूच ना?

हो... अगदी बरोबर. फक्त झाडणारे नाही तर झाडणारा... एक.
गांधींवर गोळ्या झाडणारा हिंदू... तो सुद्धा चित्पावन ब्राह्मण... बारामतीमधे जन्म.

मुद्दा संपला की डावे गांधीहत्येचा आधार घेतात असे ऐकले होते ;) बाकी आम्ही मागेच म्हटल्याप्रमाणे ना डावे ना उजवे... मध्यममार्गी... बाकी तुमचे चालू द्या... मजा येते.

shantadurga Sat, 25/07/2026 - 14:44

>काही होत नाही. होणार नाही.
-म्हणून त्यांनी पण (तुमच्यासारखं) बसून राहावं अशी तुमची अपेक्षा आहे का काका?
तसं काही होत नसतंय:-)
Education Minister Dharmendra Pradhan Sends Resignation To PM Modi Amid Student Protests https://share.google/dJJbKjpojg37Fcntk
घ्या नुकतीच बातमी आली आहे. आता मित्रों bro राजिनामा स्वीकारतात ते पाहू 😄
>बापाकडून पैसे घेऊन फोडणारी पिढी जेन झीच ना?
- आणि पैसे खाणारी पिढी निर्दोष का? त्यांना काय विशेषणं लावायची?

अहिरावण Sat, 25/07/2026 - 19:39

In reply to by shantadurga

>>> आणि पैसे खाणारी पिढी निर्दोष का? त्यांना काय विशेषणं लावायची?
तेच तर आमचे म्हणणे... पैसे देणारे आणि घेणारे सोडून भुक्कड मंत्र्याचा राजीनामा घेऊन काय घंटा होणार? सिस्टम तशीच चालू रहाणार... मोदी जाऊन रागा आला किंवा अखिलेश आला किंवा अदित्य ठाकरे आला तरी हेच होणार... जंतर मंतर जिंदाबाद...

shantadurga Sat, 25/07/2026 - 15:01

तुमच्या प्रतिसादावर कमेंट करतानाच राजिनाम्याची बातमी आली. In GenZ style - अहिरावण, you are OG bro. लगे रहो 😊

अमित.कुलकर्णी Sat, 25/07/2026 - 17:22

राजीनामा आला असता / नसता तरी मला फरक पडत नव्हता.
पण मुलांनी मुद्दा ना सोडता परिस्थिती ज्या पद्धातीने हाताळली ते कौतुकास्पद आहे.
पत्रकार त्यांना "cbse चा full form (तरी) येतो का" असे प्रश्न विचारात होते.
काल आरक्षणाबद्दल मते विचारात होते. मुलांनी अतिशय व्यवस्थितपणे हे सगळे सांभाळले.
पुढे काय होईल माहीत नाही, पण २ दिवस तरी "हे खरे विद्यार्थी नव्हतेच" / "५० सुद्धा लोक आले नव्हते" / "यांच्या funding चा source तपासा" असे फालतू मुद्दे वाचायला मजा येईल.
gen-z चे पुन्हा एकदा कौतुक!

(cbse च्या प्रश्नावर खरे तर "आता तुम्ही सांगा बरं २ +६ किती होतात? आणि १ + ७? असे प्रतिप्रश्न त्यांना विचारता आले असते )

shantadurga Sat, 25/07/2026 - 18:09

In reply to by अमित.कुलकर्णी

लाठ्या खाल्लेल्या मुलांकरता राजिनामा ही तात्पुरती का होईना मलमपट्टी आहे.
मग्रूर सत्तेला एक पाऊल मागे घ्यायला लागणं ही 2014 नंतर फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे या राजिनाम्याची किंमत 'थप्पड की गूँज ' या कॅटेगरीत आहे. दिल खुष हुआ.

shantadurga Sat, 25/07/2026 - 18:10

In reply to by अमित.कुलकर्णी

लाठ्या खाल्लेल्या मुलांकरता राजिनामा ही तात्पुरती का होईना मलमपट्टी आहे.
मग्रूर सत्तेला एक पाऊल मागे घ्यायला लागणं ही 2014 नंतर फार मोठी गोष्ट आहे. त्यामुळे या राजिनाम्याची किंमत 'थप्पड की गूँज ' या कॅटेगरीत आहे. दिल खुष हुआ.

अमित.कुलकर्णी Mon, 27/07/2026 - 09:51

In reply to by shantadurga

हे मान्य आहेच. माझ्यासह अनेकांना हा आशेचा किरण वाटतो आहे.

पण - काही निकटवर्तीयांचे विचार ऐकल्यावर हेही जाणवते की त्यांना आणि त्यांच्या समविचारी लोकांना "जे" हवे आहे त्याचा पुरवठा शेठ आणि त्याच्या टीम कडून जोपर्यंत होत राहील तोपर्यंत काही मोठे बदल होणे अवघड आहे.
(२०१४ साली झालेला बदल भ्रष्टाचाराला कंटाळून झाला- हा माझा गैरसमज लवकरच दूर झाला होता)

'न'वी बाजू Sat, 25/07/2026 - 18:33

In reply to by अमित.कुलकर्णी

पत्रकार त्यांना "cbse चा full form (तरी) येतो का" असे प्रश्न विचारात होते.

गळत्यात *** स्वतःची लाल करून घेण्याचा प्रकार… दुसरे काय? चालायचेच.

(cbse च्या प्रश्नावर खरे तर "आता तुम्ही सांगा बरं २ +६ किती होतात? आणि १ + ७? असे प्रतिप्रश्न त्यांना विचारता आले असते )

<स्वतःची जाहिरात मोड>
ते मरू द्या. हे पाहा.
</स्वतःची जाहिरात मोड>

(सांगण्याचा मतलब, २ + ६ किंवा १ + ७ किती, असे प्रतिप्रश्न विचारून उपयोग नाही. त्याची उत्तरे ते (पक्षी: detractors) तत्काळ बरोबर देतीलही. परंतु, केवळ बेरीज-वजाबाकी करता येते, म्हणून त्या बेरीज-वजाबाकीच्या (बरोबर) उत्तरांतून बरोबर निष्कर्ष काढता येतातच, असे नाही. आणि, ते expose करायला साटल्यत्वेकरून खोलात शिरावे लागते; ते असे इन्स्टंट पद्धतीने होऊ शकत नाही.)

अमित.कुलकर्णी Sat, 25/07/2026 - 19:02

In reply to by 'न'वी बाजू

मुद्दा लक्षात आला, आणि पटलाही!

फक्त एक प्रश्न- १+७ = २+६ = ८/ १+१=११ हे मास्टरस्ट्रोक तुम्ही ऐकले आहेत ना? नसतील तर शेठने हल्ली मलेशिया आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात केलेली भाषणे जरूर ऐका. (Extra 2ab च्या प्रचंड यशानंतरची ही रत्ने आहेत)

'न'वी बाजू Sat, 25/07/2026 - 19:52

In reply to by अमित.कुलकर्णी

नाही, ही रत्ने ठाऊक नव्हती. (माय बॅड.)

कसे आहे ना, की तुमचे विश्वगुरू काय, किंवा आमचे विश्वगुरू काय, एकंदरीतच या विश्वगुरू मंडळींना तूर्तास इतका विटलेलो आहे, की त्यांच्या मौक्तिकांना (किंवा त्यांनासुद्धा) तूर्तास मुद्दाम, आपण होऊन फॉलो करायला जात नाही. (त्यातून मनोरंजन होणेसुद्धा बंद झालेले आहे — These people are not even funny any more. फक्त डिप्रेशन वाढते, इतकेच.) असेच चर्चांतून नाहीतर वर्तमानपत्रांच्या हेडलाइनींतून काही कानांवर/डोळ्यांवर पडले, तर पडले. त्यामुळे… असो.

अहिरावण Sat, 25/07/2026 - 20:02

सध्या चालू असलेल्या घडामोडीनुसार धर्मेंद्र जाऊन देवेंद्र येणार असे दिसते. पवारांची मोदी भेट फळली. ब्राह्मण मुख्यमंत्री जाऊन ते पद मराठा समाजाकडे परत येणार. पेपर फोडणारे ब्राह्मण आता वाचणार नाहीत, बहुजन समाज आता मुक्त होणार.

केंद्रातील गृहमंत्र्याविरोधात वातावरण करुन मोदींनी योगींचा प्रवास सोपा केला पण देवेंद्र आणि तावडेची पाचर मारुन ठेवणार.

सई केसकर Sun, 26/07/2026 - 19:41

In reply to by अहिरावण

नवे शिक्षण मंत्री जोशी आहेत.
याबद्दल अदिती संहिता जोशींचे अभिनंदन.
ते ब्राह्मण आहेत किंवा नाही माहिती नाही. पण लहानपणापासून RSS मध्ये होते असे विकीवर वाचले.

या पार्श्वभूमीवर फडणवीस केंद्रात, मराठा राज्यात वगैरे प्रतिक्रिया किती विनोदी वाटते!!

'न'वी बाजू Sun, 26/07/2026 - 21:25

In reply to by सई केसकर

नवे शिक्षण मंत्री जोशी आहेत.

आणि

ते ब्राह्मण आहेत किंवा नाही माहिती नाही.

‘जोशी’ हे by definition ब्राह्मणांव्यतिरिक्त कोणीही असूच शकत नाहीत. (ब्राह्मणांमधील भिन्न पोटजातींत वा प्रांतीयतांमध्ये असू शकतात, परंतु essentially ब्राह्मण.)

सबब, प्रस्तुत हे जे कोणी ‘जोशी’ म्हणताय, ते (कोण आहेत, झालेच तर गोरे की काळे, हे मला ठाऊक नाही, परंतु) मराठी नसतीलही कदाचित, परंतु ब्राह्मण असणार, हे निश्चित. (Unless, मूळचे हिंदू ब्राह्मण, परंतु नंतर बाटून ख्रिस्तीबिस्ती झाले असल्याखेरीज. परंतु, भाजपच्या मंत्रिमंडळात आहेत, म्हटल्यावर तशी शक्यता नगण्य वाटते.)

(अतिअवांतर: ‘जोशी’ हा ‘ज्योतिषी’चा अपभ्रंश आहे. (Astronomer किंवा astrologer, दोन्हींपैकी कोठल्याही अर्थाने.) परंपरेने astrologerचा व्यवसाय, झालेच तर पंचांग पाहणे, मुहूर्त काढून देणे, कुंडली मांडणे, असल्या उद्योगांत specialize करणारे जे ब्राह्मण असत, ते ‘जोशी’ झाले. असो.)


महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले, तर देशस्थांत तथा कोकणस्थांत आढळतात. कऱ्हाड्यांत ऐकलेले नाही, परंतु असल्यास आश्चर्य वाटणार नाही.

महाराष्ट्राबाहेर गुजराती, उत्तरप्रदेशी, पहाड़ी (उत्तराखंड? नैनिताल वगैरे.), झालेच तर क्वचित नेपाळी समाजांत हे आडनाव आढळते. (इतर प्रांतांतही असू शकेल.)

सई केसकर Mon, 27/07/2026 - 09:20

In reply to by 'न'वी बाजू

ज्या भागाने पुण्यातल्या काही रसिकांना जीए दिले त्याच भागातून आपले शिक्षण मंत्री उदयास आले.
धारवाड रास्वसंचे ते प्रमुखही राहिलेले आहेत.
आता मोदींना कुंदा आणि पिठीसाखरेत लोळवलेले पेढे मिळणार.

मार्मिक गोडसे Mon, 27/07/2026 - 13:40

In reply to by 'न'वी बाजू

आगऱ्यांमध्ये असते जोशी आडनाव . ठाण्यात जोशी नावाचे माझे आगरी वर्गमित्र होते. सगळे रंगाने गोरे आणि घारे डोळे. तोंड उघडले तरच कळायचे.

shantadurga Sun, 26/07/2026 - 23:10

In reply to by सई केसकर

ह्या जोशींची ख्याती वाईट आहे म्हणतात. बिल्किस बानो प्रकरणातील रेपिस्टचे supporter आहेत असं वाचलं. गाळीव रत्नांचा खजिना आहे मित्रों कडे 🤷‍♀️

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 27/07/2026 - 00:41

In reply to by सई केसकर

माझं अभिनंदन.

शिवाय कन्नडिगांमध्येही जोशी असतात, उदाहरणार्थ भीमसेन जोशी, हे 'न'बा विसरल्याचं वाचून अंमळ गारगार वाटलं.

अहिरावण Mon, 27/07/2026 - 11:07

In reply to by सई केसकर

नवे शिक्षण मंत्री तात्पुरते प्रभारी आहेत. पवारांची भेट अचानक उगाच झाली नाही हे १९८० पासून त्यांचे राजकारण नीट पहाणा-याला कळेल. प्रत्येक गोष्ट विनोदी वाटणा-या आणि विनोद समजणे हेच प्रगल्भतेचे लक्षण मानणा-यांना कदाचित कळणार नाही. असो..

आमचे तात्या म्हणायचे तसे ज्याची त्याची समज वगैरे...

सई केसकर Mon, 27/07/2026 - 12:38

In reply to by अहिरावण

>>आमचे तात्या म्हणायचे तसे ज्याची त्याची समज वगैरे...
तुमचे तात्या अगदी बरोबर म्हणायचे. कारण तुम्ही एक मोठ्ठा पॉईंट मिस केला आहे.
गेल्या काही वर्षांत मोदी आणि रास्व संघाने प्रत्येक शिक्षण संस्थेत RSS चे लोक बसवले आहेत.
मग त्यांची पात्रता असो किंवा नसो. आता हे जोशी का कोण त्यांनी BA केलेलं आहे आणि नंतर ते केमिकल व्यवसाय करत होते.

त्यामुळे जरी फडणवीस शिक्षण मंत्री झाले तरी ते लहानपणापासून संघात जातात म्हणून होतील. शिक्षण संस्थांची जवाबदारी घ्यायची म्हणजे संघाचे असायलाच हवे. त्यामुळे अलीकडे विज्ञानातल्या कोणत्याही विषयात एक भारतीय संस्कृतीतील उदाहरण असतं. भले ते व्यवस्थित तर्काच्या आधारावर सिद्ध झालं असो किंवा नसो. एखाद्या संकल्पनेच्या केवळ अध्यात्मिक मांडणीलाही विज्ञानात आता जागा आहे.

अहिरावण Mon, 27/07/2026 - 13:27

In reply to by सई केसकर

>>>गेल्या काही वर्षांत मोदी आणि रास्व संघाने प्रत्येक शिक्षण संस्थेत RSS चे लोक बसवले आहेत.
मग त्यांची पात्रता असो किंवा नसो.

काय सांगता काय ? मला माहितच नव्हते. बरे झाले सांगितले. मी आपला अलिगढ, जामिया. जे एन्यु, उस्मानिया हि वानगीदाखल देतोय इथे महान पुरोगामी उजवे नसलेले पवित्र लोक असावेत असे समजत होतो. धन्यवाद.

नंदन निलेकणी पक्का संघी का? नाही त्याच्याकडे जबाबदरी दिली म्हणजे तो लहानपणापासून संघात जात असणार आणि वर गौड सरस्वत म्हणजे काय बल्ले बल्ले.... रागाला महित नव्हते म्हणून त्याला तिकीट दिले होते... खिक्क .

बाकी आम्हाला काय हो विज्ञान का काय ते माहित... त्यामुळे संकल्पनांना विज्ञानात जागा नव्हती आणि आता आहे हे समजले.

shantadurga Mon, 27/07/2026 - 14:11

In reply to by अहिरावण

शांतीश्री पंडित हे नाव JNU सन्दर्भात ऐकले नाही ?
"IIT administrations, including IIT Roorkee and IIT Madras, along with universities like Delhi University and JNU, issued directives and advisories urging students to stay away from the Jantar Mantar protests and to remove social media posts expressing solidarity with the demonstrations" - अशासारखा कंटेंट वाचत नाही असं दिसतंय.

अहिरावण Mon, 27/07/2026 - 14:32

In reply to by shantadurga

याच आय आय टी मधील हुशार मुले पुढे इतर देशांत विशेष करून अमेरिकेत शिकायला, नोकरी करायला, इथल्या कंपनी मार्फत काम करायला, जात असत्तात.

https://travel.state.gov/content/travel/en/News/visas-news/announcement…

वाचा म्हणजे कळेल जंतर मंतर कि आयुष्य याचा पर्याय निवड करतांना कोणते मार्गदर्शन योग्य राहील.

shantadurga Mon, 27/07/2026 - 15:53

In reply to by अहिरावण

तुम्ही लोक असे cute विचार लिहिता- बोलून दाखवता म्हणूनच GenZ - चाय बनाएं ×× नहीं, असं ठासून सांगते.
योग्य मार्गदर्शन आणि internal disciplinary action by the university यांच्यातला फरक GenZ ला चांगलाच कळतो :-)
त्यांनी अमेरिकेला जाणं न जाण्याची फिकीर युनिव्हर्सिट्यांना पडली नाहिये याची पूर्ण खात्री आहे. आयुष्यात पर्याय निवडण्यासाठी 'स्वातंत्र्य' असणं मुलांना अपेक्षित आहे.
"Universities warned that participation could invite legal consequences under applicable laws, social media restrictions, and internal disciplinary actions under the institutions' codes of conduct"

https://www.google.com/amp/s/indianexpress.com/article/cities/delhi/du-…

https://youtu.be/qXQY8S0l9Ek?si=ZD_fQ3CgYuUK10_A

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 25/07/2026 - 21:19

मला या मुलांचं कौतुक वाटतं. माझ्या पिढीनं खाल्लेलं शेण (हे शेण खाणं अजूनही सुरू आहेच) ही मुलं निस्तरायचा प्रयत्न करत आहेत, हे बघून आनंदही होत आहे. आतापर्यंत आशा वाटत नव्हती; पण या मुलांनी हे चित्र बदलायला सुरुवात केलेली आहे.

shantadurga Sun, 26/07/2026 - 08:42

या मुलांचं unassuming nature फार छान आहे. मित्रों आणि गँगच्या एकसे एक बढाईखोर आणि चिथावणीखोर भाषणांच्या वैतागापुढे GenZ speakers are a breath of fresh air. एक video content creator जंतर-मंतर वर प्रकाशझोतात आला कारण त्याचे video viral झाले. आणि मग अनेक दिवस आंदोलनाशी जोडला गेला. त्याने 'मी कसा पाहिल्यापासून CJP बरोबर होतो, मी आंदोलनाशी किती एकनिष्ठ आहे' वगैरे काहीही बढाया मारल्या नाहीत. यानंतर इतर intersting projects करेन असं सहजपणे म्हणून गेला. आणि लाखो followers मिळाल्याबद्दल एकदम amused होता.
Damage control म्हणून परवा Bro ने 'फ्रँड्स' अशी सुरवात करत मध्यरात्री किडके दात आणि नाकातले केस दिसतील इतक्या जवळ selfie camera धरून जी video clip प्रसारित केली त्याला तोड नव्हती. त्यावरच्या कमेंट्स वाचताना हसून पुरेवाट झाली. Gen Alpha सुद्धा आजोबांना फोन कसा धरावा याचं ट्रेनिंग देत होती 😀

अमित.कुलकर्णी Mon, 27/07/2026 - 16:39

In reply to by shantadurga

रेसिस्ट वाटल्यास माफ करा ही विनंती.
पण Bro ला आपल्या audience बरोबर कनेक्ट करण्याचे १०१ creative उपाय माहीत आहेत.
तमिळनाडू मध्ये प्रचार करताना चेहऱ्याला "गडद" रंग लावला होता (किंवा इतर वेळी करत असलेला मेकअप केला नव्हता)

shantadurga Sat, 01/08/2026 - 08:59

https://youtu.be/BmuFt6BsHpw?si=ZAY2kcDW62TvUNVV
हौस असल्यास पहा.
यांची troll gang गेली बारा वर्षं जी भाषा वापरत होती त्याने यांचे कान पावन नाही झाले. स्वतः शिव्या घालताना रागाची हयात असलेली आई नाही आठवली.
जंतर-मंतर वर मुलांची भाषा अर्वाच्य होती याबाबत दुमत नाही. पण ब्रो त्यामागचा राग आणि निराशा याबद्दल चकार शब्द काढणार नाही. शहाजोगपणे मुलांना माफ करणार.
का असले व्हिडिओ करून GenZ ला अजून खाद्य पुरवतो कोण जाणे! बच्चे शरारती आहेत- मूर्ख नाहीत!

'न'वी बाजू Mon, 03/08/2026 - 08:29

In reply to by shantadurga

तुमच्या पूर्वीच्या एका प्रतिसादास उत्तर देण्याचे खरे तर तेव्हाच मनात घेतले होते, नि ते लिहावयास सुरुवातदेखील केली होती, परंतु, ते उत्तर फारच लांबत गेल्याने कंटाळा करून ते मध्येच सोडून दिले गेले. परंतु, आता या प्रतिसादातून पुनश्च प्रेरणा मिळालेली असल्याकारणाने, ते उत्तर (आणि तेथेच) देऊन टाकतोच, झाले!

आभार.

'न'वी बाजू Wed, 05/08/2026 - 01:59

In reply to by shantadurga

यांची troll gang गेली बारा वर्षं जी भाषा वापरत होती त्याने यांचे कान पावन नाही झाले.

जौद्याहो! (तुम्ही पण ना...)

बोले तो, मोदींचासुद्धा विचार करा जरा! पंतप्रधान झाले, म्हणून काय झाले? (त्यांच्याच) किती जणांची तोंडे बंद करीत फिरतील? त्यांनासुद्धा काही दुसरे उद्योग आहेत की नाहीत? आँ?

त्यांच्या troll gangची म्हणा, "कार्यकर्त्यां"ची म्हणा, समर्थकांची म्हणा, सरासरी मानसिक पातळी पाहायचीय? ही पाहा!

(टीप: येथे कोण्या एका विशिष्ट दुसर्‍या संकेतस्थळाला टार्गेट करण्याचा हेतू नाही. परंतु, या विशिष्ट (राजकीय?) मतप्रवाहाचे एक से एक नमुने त्या संकेतस्थळावर मुबलक सापडतात, इतके, की, इतरत्र हुडकत जाण्याचे कष्ट घ्यावे लागत नाहीत, म्हणून सोयीखातर त्याचा वापर केलेला आहे, इतकेच.)

(घुसखोर मोरोक्कन शरणार्थींनी सेउता बेटावरील) स्पॅनिश बायका भोगल्या तर हा (भूतकाळातील स्पॅनिश वसाहतवादी जागतिक लुटालुटीविरुद्ध) 'काव्यगत न्याय' झाला, म्हणे!

(परंतु, प्रस्तुत सद्गृहस्थ हे बहुधा जेन-झी नसावेत — निदान, व्यक्तिमत्त्वाने तरी वाटत नाहीत — सबब, त्यांना हे बहुधा माफ असावे.)

To be fair, त्यांच्याच राजकीय धारणेच्या दुसर्‍या एका सद्गृहस्थांनी त्यांना विरोध केलेला आहे, नाही असे नाही. या दुसर्‍या सद्गृहस्थांचे म्हणणे असे, की (स्पॅनिश वा अन्य वसाहतकारांच्या) जागतिक लुटालुटीमध्ये सामान्य नागरिकांचा सहभाग नव्हता, म्हणून त्यांचा काव्यगत न्यायास विरोध आहे. (म्हणजे, (स्त्रियांवर समूहबलात्कार म्हणजे) 'काव्यगत न्याय' या संकल्पनेबद्दल त्यांचा आक्षेप नाही तर, केवळ त्याच्या टार्गेटच्या औचित्याच्या संदर्भात आहे.)

तिकडे तिसरे (त्याच विचारसरणीचे) आणखी एक सद्गृहस्थ म्हणताहेत, की कोणे एके काळी स्पेन आणि इतर युरोपीय देशांनी जगभर वसाहतवाद केला म्हणून आजघडीस तेथील सामान्य ख्रिश्चन स्त्रिया जिहादी अत्याचारास बळी पडाव्यात, याचे समर्थन कोणताही सच्चा हिंदू करणार नाही. सनातन हिंदू धर्माला हे मान्य नाही.

म्हणजे, त्यांच्या या म्हणण्याचा अर्थ कसा घ्यावा?

१. (प्रतिशोध म्हणून) स्त्रियांवर समूहबलात्कार या संकल्पनेस प्रस्तुत सद्गृहस्थांचा व्यक्तिशः आक्षेप एरवी नसता, परंतु, हाय! सनातन हिंदू धर्म आड येतो!

२. एक सच्चा हिंदू या नात्याने, युरोपीय वसाहतवादाच्या प्रतिशोधार्थ स्पॅनिश स्त्रियांवरील अत्याचारांचे समर्थन प्रस्तुत सद्गृहस्थ करू शकत नाहीत. (अन्य कारणांसाठी, कदाचित?)

३. ख्रिश्चन स्त्रियांवरील अत्याचारांचे समर्थन प्रस्तुत सद्गृहस्थ करू शकत नाहीत. (अन्यधर्मीय (उदाहरणादाखल, मुसलमान) स्त्रियांवरील, कदाचित?)

४. स्त्रियांवरील जिहादी (पक्षी: मुसलमानांच्या) अत्याचारांचे समर्थन प्रस्तुत सद्गृहस्थ करू शकत नाहीत. (अन्यधर्मीयांनी केला, तर तो सोवळा होईल, कदाचित?)

आखिर कहना क्या चाहते हो, भाई? वसाहतवादाचा प्रतिशोध वगळता इतर कारणांसाठी, काही विशिष्ट धर्मांतील स्त्रियांवर मुस्लिमेतरांकडून अत्याचार सनातन हिंदू धर्म मान्य करतो काय? (सनातन हिंदू धर्म मान्य करो वा न करो, परंतु) तुम्ही स्वतः त्याचे समर्थन कराल काय? आणि, Why bring सनातन हिंदू धर्म into it? उगाच सनातन हिंदू धर्माला मध्ये आणून, स्वतःची बिले त्याच्या नावावर फाडून, सनातन हिंदू धर्माला नाहक बदनाम का करता?

('स्त्रियांवरील अत्याचारांचे समर्थन (कोणत्याही परिस्थितीत) होऊ शकत नाही' एवढे साधेसोपेसुटसुटीत विधान या मंडळींकडून का येऊ शकत नाही? त्यामागे एवढी qualifications का यावी लागतात?)

कहाँ कहाँ से आते हैं लोग, पता नहीं! (प्रश्न rhetorical आहे; कृपया या प्रश्नाचे जैवशास्त्रीय उत्तर कोणी देऊ नये.)

(आणि, ही असली विचारसरणी कोठून येते, आईवडिलांच्या संस्कारांतून, शाखेतील बौद्धिकांतून, की अन्य कोठून, हे (असला तर) तो परमेश्वरच जाणे!)

तर सांगण्याचा मतलब, हाच जेथे त्या विशिष्ट राजकीय विचारसरणीचा लसावि (की मसावि? माझा नेहमी गोंधळ उडतो.) आहे, आणि, तो जाहीररीत्या चारचौघांत मांडायला जेथे या मंडळींना यत्किंचितही संकोच वाटत नाही, तेथे मोदीजी तरी (भले त्यांची स्वतःची विचारसरणी कशीही असो (वा नसो), परंतु) कोणाकोणाची तोंडे बंद करीत हिंडतील?

तुम्हीच सांगा!

shantadurga Wed, 05/08/2026 - 18:23

In reply to by 'न'वी बाजू

त्या संकेतस्थळावर मी गेले नव्हते. पण आश्चर्य वाटण्यासारखे फार काही नाही. लहान मुलींचे बाप असलेले अ‍ंधभक्त सुद्धा माझ्या ओळखीत (दुर्दैवाने) आहेत. त्यांच्या मुली त्यांना कधीतरी धडा शिकवतील अशी (कदाचित वेडी) आशा बाळगायला हरकत नाही. संघात मेंदूला सुद्धा खाकी चड्डी (आता राखाडी फुल प्यांट) चढवतात अशी आमच्याकडे म्हण आहे :-) तरीदेखील माझ्या पालकांनी मी तिसरी-चौथीत असताना मला कन्या शाखेत जाऊ दिलं होतं अनुभव घ्यायला. आठवडाभर कशीबशी टिकले. धन्य ते माझे
मायबाप! मतपरिवर्तन वगैरे शब्दांनी करण्याच्या भानगडीत पडले नाहीत. 'वंदनीय ताई' मला अद्दल घडवतील हा त्यांचा सार्थ विश्वास होता.
अवांतर: सध्या 'मुसाफिर कॅफे' नावाची वेब सिरीज जोरदार चर्चेत आहे. त्यातली लग्न-मुलं नको- livin चालेल, आपापली स्वप्नं आणि ध्येय सगळ्यात महत्त्वाची असं म्हणणारी सुधा जोरदार शिव्या खाते आहे. अशा मुली सनातानी धर्म बुडवून हिंदू जन्म दराचा x करणार आहेत. सगळा शिक्षणाचा परिणाम!

'न'वी बाजू Wed, 05/08/2026 - 19:08

In reply to by shantadurga

त्या संकेतस्थळावरील ते तमाम offending प्रतिसाद आता बोळा फिरवून पुसून टाकण्यात आलेले आहेत. Offending प्रतिसादक अर्थात उत्तरोत्तर असेच अधिक रोचक तथा मनोरंजक प्रतिसाद लिहावयास मोकळे.

एकंदरीत, सूर्य उगवून झाल्यावर post facto कोंबडे झाकून सूर्य उगवलाच नाही म्हणण्याचा प्रकार आहे, झाले. परंतु, चालायचेच. तसेही, ती पूर्णतया त्या संकेतस्थळाची डोकेदुखी तथा अंतर्गत भानगड असून, आपल्याला त्याच्याशी घेणेदेणे असण्याचे काहीच कारण नसावे, नाही काय? फक्त, गंमत वाटते, इतकेच.

अगोदर म्हटल्याप्रमाणे, चालायचेच.

shantadurga Fri, 07/08/2026 - 18:13

In reply to by 'न'वी बाजू

टिकली ताई म्हणजे no bindi no business नावाचा वेडगळ hashtag चालवणार्‍या अंधभक्त बाईंना विरक्तीचा झटका आला आहे (त्यांना म्हणे तिळी GenZ मुलं आहेत). ऑनलाइन जग मिथ्या हा साक्षात्कार झाला आहे.
काल भागवत काकांनी पण त्यांचा GenZ वर कित्ती विश्वास आहे हे जाहीरपणे बोलून दाखवलं आहे (यात नवल नाही). सरड्यांचे रंग तात्पुरते फिकट झाले आहेत.

'न'वी बाजू Fri, 07/08/2026 - 18:56

In reply to by shantadurga

काल भागवत काकांनी पण त्यांचा GenZ वर कित्ती विश्वास आहे हे जाहीरपणे बोलून दाखवलं आहे (यात नवल नाही).

संघातसुद्धा जेन-झी असतीलच ना?

जेन-झी हा काही monolithic प्रकार आहे, असे समजण्याची चूक आपण का बरे करावी?

(जेन-झी हा अंततोगत्वा एक वयोगट आहे, philosophy नव्हे.)

चिंतातुर जंतू Sat, 08/08/2026 - 08:14

In reply to by 'न'वी बाजू

संघातसुद्धा जेन-झी असतीलच ना?

ह्या आंदोलनादरम्यान काही कोथरुडी जेन-झी मुलामुलींचं अस्तित्व लक्षात आलं ते केवळ ह्या कारणामुळे - त्यांचे आईवडील (आणि मागील पिढ्याही) संघ-भाजप-मोदींचे चाहते. ते ह्या मुलांचा आंदोलनाला पाठिंबा पाहून त्यांना पाकधार्जिणे वगैरे म्हणू लागले. त्यावर ह्या मुलांनी त्यांना काहीच कसं कळत नाही म्हणून दयार्द्र नजर दाखवली किंवा सरळसरळ वाद घातले.

सुधीर Sat, 01/08/2026 - 22:29

२००७-०८ मध्ये माझ्या बॉसच्या डेस्कवर जॉर्ज बुशचं एक पेन स्टँड होतं. आणि त्याचे किती दिवस बाकी आहेत हे दाखवणारे एक कॅलेंडर. माझ्यासाठी त्यावेळी तो एक कल्चरल शॉक होता. आता ते पेन स्टँड मला नेटवर दिसत नाही आहे. पण ट्रंपचं इथे दिसले

मेघनाचा लेख आज चतुरंग मधे वाचला. 

तिरशिंगराव Sun, 02/08/2026 - 18:39

हे नतद्रष्ट भाजपीय जाऊन त्याजागी आपले गोंडस राजकुमार किंवा राजकुमारी कधी येणार याची वाट पहात आहोत. आमच्या उरलेल्या थेरडोत्सवातच हे घडावे अशी देवाजवळ प्रार्थना!

'न'वी बाजू Mon, 03/08/2026 - 17:15

In reply to by तिरशिंगराव

प्रस्तुत प्रतिसाद हा सार्क्याष्टिकत्वेकरून दिलेला आहे, किंवा कसे, हे निश्चितपणे कळावयास काही मार्ग नाही, परंतु, का, कोण जाणे, परंतु, तसा तो असावा, अशी एक घनदाट शंका मनात डोकावून जाते, इतकेच. परंतु, ते एक असो.

आमच्या राष्ट्रातील सांप्रतकालीन राजकीय परिस्थितीबद्दल आम्ही अनेकदा असे विधान करतो, की श्री. ट्रंप हे (आमच्या राष्ट्राला जडलेला) रोग नाहीत. श्री. ट्रंप हे फार फार तर रोगाचे लक्षण (आणि/किंवा रोगाची परिणती) आहेत; रिपब्लिकन पक्ष हा रोग आहे.

तद्वत, तुमच्या राष्ट्राच्या संदर्भात, श्री. मोदी यांजबद्दल काहीशी अशाच प्रकारची शंका उत्पन्न होते.

असो चालायचेच.

अमित.कुलकर्णी Mon, 03/08/2026 - 17:25

In reply to by तिरशिंगराव

राजकुमार / राजकुमारी यावरून आपला रोख कुणाकडे आहे त्याचा अंदाज आहे - त्यावरून हे कधीच होणार नाही हे नक्की.
'राजकुमार / राजकुमारी येतील' अशी भीती वाटणाऱ्या सर्वांनी बिलकूल काळजी करू नये - एक वेळ राजकुमार / राजकुमारी देशभक्तांना मिळून जातील आणि एखाद्या छोट्या - मोठ्या गावाचे सरपंच होतील, पण देशाचे सर्वोच्च पद देशभक्तांकडेच राहील. (असे झाले तर १+१+१=१११ असे एखादे चतुर सूत्र ऐकायला मिळेल)

(त्यापेक्षा हल्लीच एखाद्या खटल्यातून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता झालेले कोणी उच्चपदावर बसतील असे स्वप्न कोणी बघत असेल तर ते पूर्ण होईल)

shantadurga Tue, 04/08/2026 - 08:00

एक Bro कमी होते की आता संघदक्ष पण GenZ आणि Gen alpha शी संवाद साधणार.
https://www.google.com/amp/s/www.newindianexpress.com/amp/story/india/2…
सहा ऑगस्ट - बेटा, भाग ले!
हा बाबा कधीपासून हिंदू बायकांना 'किमान तीन मुलं होऊ द्या' असा सल्ला देत होता. काय दूरदृष्टी होती श्रोत्यांची संख्या वाढवण्याची! मास्टर स्ट्रोक!!