Skip to main content

एआय च्या नावानं चांगभलं

टाईमपास करायचा म्हणून एआयला कामाला लावले. मराठीत ऐसपैस प्रॉम्ट दिला सोबत एक ॲचिव्हमेंटसची यादी दिली.

खालील प्रॉम्ट दिला होता -

जेमिनीअक्का
गेल्या १२ वर्षात भारताने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अनेक प्रकल्प सुरू केले आहेत 
असे जेवढे महत्वाचे प्रकल्प आहेत त्यांच्याबद्दल विस्तृत माहिती पाहिजे 
त्यासाठी तुला केंद्र सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन माहिती मिळेल 
महत्त्वाच्या वृत्तपत्रांत बातम्या मिळतील 
द हिंदू, टाईम्स ऑफ इंडिया इंडियन एक्सप्रेस आणि महत्त्वाची परदेशी वृत्तपत्रं ज्यात भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञान बद्दल माहिती दिली गेली 

अशी जेवढी माहिती उपलब्ध असेल इंटरनेट वर ती शोधून काढायची आहे 

यासाठी आपण एक लेखमाला वर काम सुरू करू

या सर्व योजना सुरू झाल्या आहेत त्या बद्दल कुठे काय माहिती असेल ती शोधाशोध करावी लागेल 

सुरवात रेल्वे प्रकल्पातील योजना बघू
कारण ९९% पेक्षा जास्त विद्युतीकरण झाले आहे लोहमार्गाचे.

नंतर अणू उर्जा प्रकल्प 
अंतराळ संशोधन प्रकल्प 
डिजिटल पेमेंट 
हेवी इंडस्ट्री इक्विपमेंट 
हाय परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग
सिलिकॉन चिप्स इंडस्ट्री
एआय 
अजून असे बरेच काही

आपण पहिल्यांदा लेखात भारत आजपर्यंत रेल्वे क्षेत्रात परदेशी इक्विपमेंट वर कसा अवलंबून होता हे लिहू

नंतर मेक इन इंडिया अंतर्गत आपण रेल्वे चे बरेच प्रकल्प भारतात डिझाईन केले मॅन्युफ्रॅक्चर केले याबद्दल माहिती घेऊन लिहू

नंतर रेल्वे सुरक्षेसाठी आधुनिक सुविधा प्रणाली सिग्नल सिस्टीम कशी बनवली याबद्दल माहिती घेऊन लिहू

मी तुला एक टेक्स्ट फाईल वाचायला देतो 
त्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील महत्वाच्या ॲचिव्हमेंटसची यादी दिली आहे 

ती तू वाचून प्रत्येक ॲचिव्हमेंटवर विस्तृत लिही

प्रत्येक ॲचिव्हमेंटवर लिहिताना याची काय गरज होती, कशाप्रकारे आपण परदेशी अवलंबित्व कमी केले आणि मेक इन इंडिया वर फोकस कसा केला याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती झाली का यातून तरूणांना नवीन क्षेत्रात संधी मिळाली आहे का वगैरे प्रश्न विचारून त्यानुसार प्रत्येक ॲचिव्हमेंटवर एक एक लेख लिहून दे

मिळालेल्या माहितीचे संकलन संपादन करून आपण विज्ञानविषयक लेख मालिका लिहू

प्रत्येक लेखात खालील मुद्यांवर सविस्तर चर्चा कर:

1. अशी गरज का भासली? (पार्श्वभूमी आणि जुन्या समस्या)
2. परदेशी अवलंबित्व कसे कमी केले? (तंत्रज्ञान व स्वयंपूर्णता)
3. 'मेक इन इंडिया'चा फोकस आणि अंमलबजावणी (देशांतर्गत उत्पादन व डिझाईन)
4. प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती (नवीन संधी आणि तरुणांसाठी रोजगारांची क्षेत्रे)

माहितीसाठी:
तयार केलेली लेखमाला

https://drive.google.com/file/d/1Tw98OgVTE3fA2TvkQC4DhunAW9bc85VH/view?…

ॲचिव्हमेंट्सची यादी

https://drive.google.com/file/d/13hBCZ0gVqkaCWJB_lpeWdyiukxQAKkXw/view?…

काही निरीक्षणे:

दिलेल्या प्रतिसादात एकाच पठडीतील लेख लिहून दिले. बऱ्याच वेळा काही गोष्टींची पुनरुक्ती झाली. लेखमाला वाचताना कृत्रिम पणा जाणवला मात्र बऱ्यापैकी मजा आला. टेक्स फाईल मध्ये कॉपी करताना लेखांचे फॉरमॅटिंग केले आहे. संपादन केले नाही. त्यात बराच वेळ गेला असता. मात्र एआय ला बऱ्यापैकी व्हेरिफाईड सोर्सेस ची माहिती जर पुरवली तर ‘सांगकाम्या ओयनाम्या’ प्रमाणे तेवढेच काम करतो.