देव वाटला- असुर निपजला !!

धर्म लाज संस्कार शरम
सोडुन बनला कसा नराधम -

फासुन व्यवसायास काळिमा
पैसा-पैसा करसी अधमा !

अर्भक दिसले- शस्त्र उचलले
माणुसकीचे नांव न उरले !

जिरला टाहो गर्भातच तो
माउलीस ना पान्हा फुटतो -

स्त्रीभ्रूणहत्या नित्य करावी
कशी कळावी मातृथोरवी !

धन्य होतसे का तव माता -
कृष्णकृत्य तव तिजला कळता ?

म्हणेल माता नक्की तुजला,
देव वाटला- असुर निपजला !!

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (2 votes)

प्रतिक्रिया

भेदक कविता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतीशय परिणामकारक, भेदक कवीता. इतकी की कवीता वाचुन डोळे पाणावले. धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला उधळायला फार फार आवडतं