'एलियन' विरुद्ध 'प्रोमेथियस' (भाग १)

रिडली स्कॉटचा ‘एलियन’ (१९७९) हा चित्रपट अमेरिकन चित्रपट इतिहासातला एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अमेरिकेच्या ‘नॅशनल फिल्म रजिस्ट्री’मध्ये सांस्कृतिकदृष्ट्या किंवा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या चित्रपटांना संग्रहित केलं आणि टिकवलं जातं. त्यात ‘एलियन’ समाविष्ट आहे. त्याचं वर्गीकरण हे हॉरर चित्रपट म्हणून करता येईल. खरं तर उच्चभ्रूंनी अशा चित्रपटांना नाकं मुरडायची पद्धत आपल्याकडे दिसते. पण तसं केलं तर मग ‘एलियन’चं वेगळेपण आणि महत्त्व कशात आहे ते समजणार नाही. एलियननं त्या काळातले अनेक पायंडे मोडले. उदाहरणार्थ, अंतराळयानातून अवकाश प्रवास दाखवणारा ‘स्टार वॉर्स’सारखा चित्रपट दोनच वर्षांपूर्वी (१९७७) येऊन गेला होता. त्यातला ‘धीरोदात्त सुष्ट नायक विरुद्ध डार्क दुष्ट खलनायक’ फॉर्म्युला चांगलाच लोकप्रिय झाला होता. त्याआधी १९६८ साली आलेला ‘२००१ : अ स्पेस ओडिसी’ लोकप्रिय झाला नाही, पण गोष्ट सांगण्यापेक्षा काहीशा अमूर्त दृक-श्राव्य अनुभवाकडे झुकणारा हा चित्रपट हळूहळू रसिकप्रिय झाला होता. एलियननं हे दोन्ही प्रकार नाकारले आणि चक्क अवकाशप्रवासादरम्यानची एक भयप्रद, बीभत्स कथा सांगितली. हॉरर चित्रपटांत ‘स्लॅशर’ म्हणून एक विधा आहे. कुणीतरी खुनी आहे आणि तो आपल्या सावजांना अत्यंत हिंसक आणि किळसवाण्या रीतीनं मारत राहतो असं याचं थोडक्यात वर्णन करता येईल. सुपरिचित चित्रपटांमध्ये उदाहरणार्थ ‘जॉज’ (१९७५) ही एक प्रकारची ‘स्लॅशर फिल्म’ म्हणता येईल. एलियनमध्ये अवकाशप्रवासात भेटलेले परग्रहावरचे प्राणी हे खुनी आहेत आणि त्यांच्यापासून बचाव करताना माणसांची दाणादाण उडते. हॉरर चित्रपटांमध्ये स्त्रियांना सावज ही भूमिका स्वीकारायला लावण्याची पद्धत होती. एकंदर हॉलिवूडमध्येसुद्धा स्त्रिया दुय्यमच असत. पण एलियनमधली सिगर्नी वीव्हर ही नायिका त्या बीभत्स परग्रहवासी प्राण्यांशी धीरानं मुकाबला करते.

याशिवाय एलियनचं आणखी एक वेगळेपण त्याच्या गोष्ट सांगण्यात होतं. एकामागोमाग एक मुडदे पडत जाताहेत असं दाखवण्यापेक्षा काहीतरी भयंकर घडणार आहे याची चाहूल देत देत एलियनमध्ये प्रेक्षकांची उत्कंठा प्रचंड ताणली जाते. प्रत्यक्ष परग्रहवासी पहिल्यांदा दिसतो तो फक्त एका अंड्याच्या स्वरुपात निद्रिस्त असा; आणि तो पहिल्या संपर्काचा प्रसंगदेखील जवळपास अर्धा तास उलटून गेल्यावर येतो. नंतरदेखील प्रत्यक्ष हल्ले कमी होतात; पण कुणीतरी आपल्या मागावर आहे ह्या कल्पनेतूनच आणि गडद, गूढ दृश्यचौकटींतून इथे भीती निर्माण केलेली आहे. (इथे हिचकॉकच्या ‘सायको’ची आठवण येते.)


हॉलिवूडचे धाडशी नायक वाटावेत असे उतावळे पुरुष त्या प्राण्याचं सावज बनतात, पण सावधगिरी बाळगणारी नायिका त्याला पुरून उरते. माणसावर हल्ला करण्याची त्या प्राण्याची पद्धत अतिशय बीभत्स आहे. सावधान, पुढे रहस्यभेद आहे. ज्यांना चित्रपटातले हल्ले कसे होतात ते अजून ठाऊक नाही आणि चित्रपट पाहण्याची मजा कमी व्हावी असं वाटत नाही त्यांनी उरलेला परिच्छेद वाचू नये. प्राण्याचा आकार लिंगसदृश (phallic) आहे. ‘चेहऱ्यावर झालेला बलात्कार’ असं त्या प्राण्याच्या हल्ल्याचं वर्णन करता येईल. आणि ते सार्थ ठरण्याचं आणखी एक कारण म्हणजे हल्ला झाल्यावर तो प्राणी निघून जातो, पण झालेल्या संभोगसदृश संपर्कादरम्यान त्यानं आपलं बीज सावजाच्या पोटात सोडलेलं असतं. ते नंतर सावजाचं पोट फाडून बाहेर येतं. त्यात सावज मरतं आणि आता तो नवजात प्राणी दुसरं सावज धुंडाळू लागतो. थोडक्यात, आपल्यावर जबरदस्ती होणार अशी, एरवी स्त्रियांच्या मनात घर करुन असणारी सनातन, पारंपरिक भीती इथे पुरुषांना लागू होते. याउलट नायिका प्राण्याशी लढून आपलं संरक्षण करते.

त्यामुळे एक प्रकारचा लढाऊ स्त्रीवादी (militant feminist) हॉररपट असं एलियनचं वर्णन करता येतं. एकीकडे एलियनशी जीवाची बाजी करून लढणारी पण त्याच वेळी आपल्या मांजरीला वाचवण्यासाठी धडपडणारी नायिका हे हॉलिवूडच्या ‘अ‍ॅक्शन फिल्म’ फॉर्म्युल्यात अनोखं होतं. सत्तरच्या दशकात ‘रो विरुद्ध वेड’द्वारे अमेरिकन स्त्रियांना गर्भपाताचा हक्क मिळाला. ज्याच्याविषयी ममत्व वाटतं ते मूल जपणं आणि नको असलेला गर्भ पाडणं या मुद्द्याचा संदर्भ या स्त्रीवादाला आहे असं म्हणता येईल.

याशिवाय सिनेमातले इतर काही घटकही अशा विवेचनाशी सुसंबद्ध आहेत. अंतराळयानावर असणाऱ्या सर्वज्ञानी संगणकाला सर्वजण ‘आई’ म्हणून संबोधतात. ‘आई’कडे जगातलं शहाणपण आहे, पण तिची ‘मुलं’ परग्रहावर पुरेशी सावधगिरी बाळगत नाहीत. अज्ञात ग्रहावर जाणं हे काहीसं पुरुषी वसाहतवादी दृष्टिकोनातून पाहता येतं. अज्ञात भूमी आकर्षक असते आणि तीवर पाय रोवून ती पादाक्रांत करणं हे एक प्रकारचं वर्चस्वप्रधान आणि म्हणून पुरुषी कृत्य म्हणता येईल. इथे मात्र भूमी पादाक्रांत करणं दूर राहतं आणि जीव मुठीत धरून पळ काढावा लागतो.

एलियनमध्ये उभी केलेली प्रतिसृष्टीसुद्धा रोचक होती. आशयाला अनुसरून सिनेमातलं वातावरण अतिशय काळंकुट्ट आहे. मानवजातीला प्रथमच परग्रहावर जीवसृष्टी सापडणार याची उत्कंठा आणि काहीतरी भयंकर घडणार आहे अशी भीती ही वातावरणनिर्मिती करण्यासाठी त्या प्रतिसृष्टीचा चांगला वापर केला गेला. ‘अंतराळात तुमची किंकाळी कुणालाच ऐकू जात नाही’ ही सिनेमाची टॅगलाईनसुद्धा वेधक ठरली.

एलियनला मिळालेलं प्रचंड यश पाहून हॉलिवूडनं त्याचे अनेक सीक्वेल पाडले. रिडली स्कॉटला ते सहज पाडता आले असते, पण त्याऐवजी त्यानं ‘ब्लेड रनर’*, ‘थेल्मा अ‍ॅन्ड लुईज’ किंवा ‘ग्लॅडिएटर’सारखे वेगळे चित्रपट बनवले. पण आता ‘प्रोमेथियस’द्वारा त्यानं एलियनचा प्रीक्वेल बनवला आहे. स्कॉट पुन्हा एकदा एलियनकडे वळल्यामुळे या चित्रपटाविषयी खूप चर्चा होत आहे. स्कॉटचे आणि त्याच्या एलियनचे चाहते या चित्रपटाची आतुरतेनं वाट पाहत होते. ३-डी तंत्रज्ञानाचा वापर स्कॉट कसा करेल याविषयीही लोकांना उत्सुकता होती. एलियनच्या तुलनेत प्रोमेथियस कसा दिसतो, ते पुढच्या भागात पाहू.

* - 'ब्लेड रनर'मधल्या रंगांच्या वापराविषयी यापूर्वी मी लिहिलेला लेख - ब्लेड रनर – चित्रपटात रंगसंगतीचा प्रभावी वापर

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण, रोचक लेख. एरवी माझ्याकडून वैयक्तिक आवडीनिवडीतून अशा प्रकारच्या चित्रपटांना सहजच टाळलं जातं. पण त्यामागचे संदर्भ, समृद्ध आशय, दृश्यातले प्रयोग... याबद्दल कळल्यानंतर ते टाळणं शक्य होणार नाही. निदान आवश्यक अभ्यास म्हणून तरी ते पाहिले जातील.
आभार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

आयला... हा 'एलियन' पाहणं पारच वाया गेलं राव आमचं. मिलिटंट स्त्रीवाद? एवढा विचारच केला नव्हता तो पिक्चर पाहताना. मांजरी वाचवणं म्हणजे हवं ते मूल टिकवणं, कॉम्प्यूटर म्हणजे आई वगैरे मुद्दे आमच्या वाडा चिरेबंदी मेंदूत शिरलेच नाहीत. आता 'एलियन'मध्ये मिलिटंट स्त्रीवाद वगैरे न दिसणारा आमचा मेंदू तेव्हाच एकूण अशा चित्रपटांतून निवृत्त झाला, हे त्या चित्रपटांचंच भाग्य. आमच्या मेंदूचं दुर्भाग्य ते हे की त्याला सालं हा आनंद घ्यायचा कसा हेच कळलं नाही. Smile
(या प्रतिसादातील आत्मटीका अत्यंत प्रांजल आहे. सवयीनुसार त्यात उपरोध शोधू नये.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सहमत.

चिंजं आमचे खरेखुरे शिक्षक आहेत. (गुर्जी शब्द टाळल्या गेल्या आहे याची कृपया नोंद घ्यावी)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिजं लेख आवडला.
पुढल्या भागाची आतुरतेने वाट पहातोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

लेख आवडला. मेघनाच्या प्रतिसादाशी सहमत.

सत्तरच्या दशकातल्या स्त्रीवादी संदर्भांवरून एक्स-मेन (कॉमिक्स आणि त्यावर बेतलेल्या चित्रपटांत) मालिकेत 'उपजत वेगळेपणा'वर केलं गेलेलं रूपकात्मक भाष्य आठवलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी एलियन बघतो (आजच डाऊनलोडायला लावण्यासाठी शोधून डाउनलोडवतो).. बघतो, आणि मग वाचतो
तोपर्यंत प्रतिसाद इल्ले! Wink

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेख वाचताना ह्या एलियनवरच्या लिखाणाची फार तिव्रतेने आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

>>मिलिटंट स्त्रीवाद? एवढा विचारच केला नव्हता तो पिक्चर पाहताना. मांजरी वाचवणं म्हणजे हवं ते मूल टिकवणं, कॉम्प्यूटर म्हणजे आई वगैरे मुद्दे आमच्या वाडा चिरेबंदी मेंदूत शिरलेच नाहीत.

एलियनमध्ये सुरुवातीपासून शेवटापर्यंत जन्म आणि मृत्यू विविध स्वरूपांत दिसतात. उदाहरणार्थ, अनेक वर्षांच्या मोहिमेवर असणार्‍या यानात आपापल्या कॅपसूलमध्ये निद्रेत असणारे अंतराळवीर 'आई' जागं करते म्हणून जागे होताना सुरुवातीच्या दृश्यात दिसतात. पृथ्वी (आणखी एक माता) जवळ आली म्हणून आपण जागे झालो असं त्यांना वाटतं; पण तसं नसतं. परग्रहावर जीवसृष्टी असू शकेल असे सिग्नल मिळाले तर चालू मोहीम सोडून तिथे कूच करण्याचा प्रोग्रॅम 'आई'त असतो म्हणून त्यांना जागं केलं गेलेलं असतं. अंतराळयानातून ग्रहावर जाण्यासाठी शटल बाहेर पडतं तेव्हाचा दृश्यपरिणामदेखील एक प्रकारच्या जन्मासारखा असतो. परग्रहावरचा नवजात जीव अंड्यातून बाहेर पडतो ते दृश्य एकाच वेळी मानवी जन्मासारखं रक्तरंजित आणि म्हणून किळसवाणं पण (परग्रहावरच्या जीवसृष्टीशी पहिला संपर्क म्हणून) अनोखं असतं. रहस्यभेद सुरू अखेरच्या दृश्यात यानातून तो किळसवाणा जीव बाहेर फेकला जातो हे दृश्यसुद्धा शटल बाहेर पडण्यासारखं म्हणजे जन्मसदृश आहे. फक्त इथे दिसतो तो गर्भाचा मृत्यू आहे. तो झाला नाही तर नायिका जगणार नाही. म्हणून ते नको असलेला गर्भ पाडण्यासारखं आहे. रहस्यभेद समाप्त

>>लेख वाचताना ह्या एलियनवरच्या लिखाणाची फार तिव्रतेने आठवण झाली.

दिलेला मजकूर वाचलेला नाही, पण हे अगदीच शक्य आहे. मी सांगितलं त्यात अनोखं असं काहीच नाही. एलियनचं या अंगानं विश्लेषण अनेकांनी केलेलं आहे. किंबहुना ते आतापावेतो काहीसं प्रमाण झालेलं आहे असं म्हणता येईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पृथ्वी (आणखी एक माता) जवळ आली म्हणून आपण जागे झालो असं त्यांना वाटतं; पण तसं नसतं. परग्रहावर जीवसृष्टी असू शकेल असे सिग्नल मिळाले तर चालू मोहीम सोडून तिथे कूच करण्याचा प्रोग्रॅम 'आई'त असतो म्हणून त्यांना जागं केलं गेलेलं असतं.

परग्रहावर जीवसृष्टी असल्यास त्या ग्रहाकडे 'आणखी एक माता' या दृष्टीकोनातूनच बघता येईल.

... अन्यथा 'एलियन' पहाण्याचा विचार केला नसता.

'बॅक टू द फ्यूचर' या साय-फाय करमणूकपटांमधे डॉक नावाचं पात्र आश्चर्य व्यक्त करण्याकरता 'ग्रेट स्कॉट' असे उद्गार काढतं. त्याचा संबंध रिडली स्कॉटशी लावता येईल का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेखन आवडलं. चित्रपटाची छान संगती दाखवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते