चाल वाकुडी

मला काही वाईट खोडी आहेत. फार नाहीत, थोड्याशाच. त्यातली एक खोड म्हणजे गाण्यांच्या चाली बदलून गाणी म्हणणं. परवाच लताच्या आवाजातलं घनगंभीर "मालवून टाक दीप" लागलं होतं. त्यात रंगून जाण्याचा मूड त्यावेळी तरी नव्हता. मग मी तेच शब्द नुसतेच गुणगुणले. थोडी चाल वेडीवाकडी करून बघितली. आणि काय आश्चर्य, 'आओ बच्चो तुम्हें दिखाए झॉंकी हिंदुस्तान की' ची चाल मस्त बसली. त्या चालीवर म्हटले की त्या अर्थपूर्ण शब्दांचं आणि त्यातल्या शृंगारिकतेचं सुंदर भजं होतं. विशेषतः 'लाधला निवांत संग' नंतर आपोआपच तोंडात वंदे मातरम् येतं तेव्हा.

'खबरदार जर टाच मारूनि जाल पुढे
चिंधड्या उडविन मी राईराईएवढ्या'

ही मर्दुमकीयुक्त कविता

'दिल दिवाना बिन सजनका के माने ना
ये पगला है समझानेसे समझेना'

या गाण्याच्या चालीवर म्हणता येते. दुसऱ्या ओळीत थोडी ओढाताण करावी लागते - चींधड्याउड्विन मी राई राईएव्ढ्या - असं म्हणावं लागतं. पण ते अशा विचित्र चालीवर ऐकलं की लोकांच्या चेहऱ्यावर जे भाव येतात ते पाहून आत्मा अगदी तृप्त होतो.

किंवा 'ऐ मेरे वतन के लोगो' हे गाणं 'ऐ मेरे दिल कही और चल' च्या चालीवर म्हटलं दुःखाचा पोत बदलतो. गाण्याचा तालच बिघडतो.

तुमची जर अशी काही चाल बदलून म्हणण्याची खास गाणी असतील तर जरूर सांगा.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

डर मधले "जादू तेरी नजर" आम्ही "ओम जय जगदिश हरे, स्वामी जय जगदिश हरे" च्या चालीवर पर्फेक्ट बसवत असू त्याची आठवण झाली.

शिवाय कवी अनिल ह्यांची सातवीला कविता होती "घननीळ सागराचा घननाद येत कानी" ती आम्ही मस्तपैकी "मेहन्दी लगा के रखना" च्या चालित आरामात म्हणायचो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हा हा हा. मस्त.

मेहन्दी लगा के रखना हे 'या झोपडीत माझ्या' च्या चालीवर म्हणता येतं. ती चाल नक्की कुठची हे ठरवण्यासाठी इथे झालेली चर्चा पहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पद्मा गोळेंच्या या कवितेसही 'मेहंदी लगाके रखना' लागू पडते!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तसेच पहावयास गेले, तर 'या झोपडीत माझ्या'ला 'मिली ख़ाक मे मुहब्बत'पासून ते 'सारे जहाँ से अच्छा'पर्यंत बर्‍याच वेड्यावाकड्या चाली लावता याव्यात.

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डर मधले "जादू तेरी नजर" आम्ही "ओम जय जगदिश हरे, स्वामी जय जगदिश हरे" च्या चालीवर पर्फेक्ट बसवत असू

'झूट बोले कौआ काटे' हेसुद्धा 'ॐ जय जगदीश हरे'च्या चालीवर म्हणून पहाच एकदा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'सदा सर्वदा योग तूझा घडावा' हे कधी 'ये दुनिया अगर मिल भी जाए, तो क्या है'च्या चालीवर म्हणून पाहिले आहे?

(खरे तर 'सदा सर्वदा' हे 'जिन्हें नाज़ है हिन्द पर, वो कहाँ है'च्या चालीवरही म्हणता यावे. परंतु मग त्यापुढील 'कहाँ है, कहाँ है, कहाँ हैऽऽऽऽ' या आर्तस्वरातील आरोळीच्या ठिकाणी 'चिआता, चिआता, चिआताऽऽऽऽ' हे तोडून म्हणायला कसेसेच वाटते. म्हणजे, एकता कपूरच्या कोठल्याही सीरियलमध्ये एखाद्या संवादवाक्यातील शेवटच्या शब्दाची (त्याबरोबरील हालचालींसह) तीनतीनदा पुनरावृत्ती होते, तसे काहीसे.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चौथीच्या पुस्तकात "तळ्याकाठी गाती लाटा" अशी धीवर पक्ष्यावर कविता होती ती आम्ही "मेरा दिल ये पुकारे आजा" च्या चालीवर (मूळ गाणे माहित नसताना) म्हणायचो. नंतर लवकरच मूळ गाणे ऐकले तेव्हा प्रचंड आश्चर्य वगैरे वाटले होते.
बालकवींच्या "श्रावण मासी" ला बीथोवेनची सिंफनीही बर्‍यापैकी बसते.(नंबर आठवत नाही, पण तीच ती "इतनाना मुझसे तू प्यार बढा" वाली).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बालकवींच्या "श्रावण मासी" ला बीथोवेनची सिंफनीही बर्‍यापैकी बसते.(नंबर आठवत नाही, पण तीच ती "इतनाना मुझसे तू प्यार बढा" वाली).

बेथोवेन नव्हे. मोझ्झार्ट. चाळीस नंबर.

(पण ती 'श्रावणमासी'ला लावून पाहिली; जमली नाही. Sad )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'मालवून टाक दीप' हे 'आओ बच्चों तुम्हे दिखा दूं'च्या चालीवर (खूपच ओढाताण केल्याशिवाय, इतकी, की आफ्टर द्याट, द एक्सर्साइझ जस्ट डझण्ट रिमेन वर्थ इट) बसत नाही. त्यामुळे त्यात मजा नाही. तीच गोष्ट 'खबरदार जर टाच मारुनी' हे 'दिल दीवाना बिन सजना के'च्या चालीवर म्हणण्याबाबत.

उलटपक्षी, 'ज्याक अ‍ॅण्ड जिल वेण्टप द हिल' हे 'आओ बच्चों तुम्हे दिखा दूं'च्या चालीवर म्हणून पहावे, म्हणजे मजा कशाला म्हणतात, ते कळेल. (किंवा, 'बा बा ब्ल्याक शीप' हे 'याद किया दिल ने कहाँ हो तुम'च्या चालीवर. आमच्या चिरंजीवांच्या बालपणी त्यांच्यावर या प्रयोगाचा आमच्याकडून इतका भडिमार झाला होता, की त्यानंतर बर्‍याच वर्षांनी त्यांना खरेखुरे 'याद किया दिल ने कहाँ हो तुम' जेव्हा ऐकायला मिळाले, तेव्हा त्यांची प्रामाणिक समजूत "ही 'बा बा ब्ल्याक शीप'ची हिंदी आवृत्ती आहे" अशी झाली होती. ती निस्तरता निस्तरता नाकी नऊ आले. तर ते एक असो.)

बाकी, कसरतीच करायची हौस असेल, तर 'कळा ज्या लागल्या जीवा' हे 'मुहब्बत ऐसी धडकन है'च्या चालीवर (किंवा वाइसे वर्सा) म्हणून पहायला हरकत नसावी.

किंवा, 'साउंड ऑफ म्यूझिक' मधील 'रेन्ड्रॉप्स ऑन रोझेस, अँड व्हिस्कर्स ऑन किटन्स'च्या चालीवर 'पूसी क्याट, पूसी क्याट, व्हेअर ह्याड यू बीन' म्हणावे. ते साधारणपणे 'दीज़ आर अ फ्यू ऑफ माय फेवरिट थींऽऽऽऽग्ज़'च्या ठिकाणी 'फ्राइटन्ड अ मा-आ-उस अंडर हर चेऽऽऽऽयर'पाशी येऊन संपते. मग पुढील एकदोन कडव्यांत मारिया आपल्या इतर "फेवरिट थिंग्ज़"बद्दल सांगते, त्या सर्व कडव्यांच्या ठिकाणी हवे तर 'पूसी क्याट'चीच आवर्तने (जेथे मूळ कडव्याची चाल बदललेली आहे तेथे ती त्यानुसार बदलून *) करावी. (त्याठिकाणी आणखी काही घालता येईल का यावर संशोधन करणे रोचक ठरावे.) मग त्यापुढे 'व्हेन द डॉऽऽऽऽग बाइट्स, व्हेन द बीऽऽऽऽ स्टिंग्ज़, व्हेन आय अ‍ॅम फीलिंग स्याऽऽऽऽड, आय सिंप्ली रिमेंबर माय फेवरिट थिंग्ज़, अ‍ॅण्ड देन आय वोण्ट फीऽऽऽऽल, सोऽऽऽऽ ब्याऽऽऽऽड'च्या जागी खुशाल 'लिटिल ज्याऽऽऽऽक हॉर्नर, स्याऽऽऽऽट इन अ कॉर्नर, ईटिंग हिज़ ख्रीऽऽऽऽस-मस पाऽऽऽऽय, ही पुट इन हिज़ थंब अ‍ॅण्ड पुल्ड औट अ प्लम, अ‍ॅण्ड सेड व्हॉट अ गुड बॉऽऽऽऽय, अ‍ॅऽऽऽऽम आऽऽऽऽय!' हे ठेवून द्यावे.


* 'व्हेन द डॉग बाइट्स'च्या अगोदरचे 'दीज आर अ फ्यू ऑफ माय फेवरिट थींऽऽऽऽग्ज़' हे वरची पट्टी गाठू पाहते, हे चाणाक्षांच्या नजरेतून निसटले नसावे.
  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंवा, 'साउंड ऑफ म्यूझिक' मधील 'रेन्ड्रॉप्स ऑन रोझेस, अँड व्हिस्कर्स ऑन किटन्स'च्या चालीवर 'पूसी क्याट, पूसी क्याट, व्हेअर ह्याड यू बीन' म्हणावे... पासून पुढला परिच्छेद

सादर प्रणामाचा स्वीकार करावा! _/\_
बाकी वर राजेशने दिलेले किंवा तुम्ही दिलेले इतर बरेचसे (शिवाय इतरही काही)'थालेपारट' कधीतरी कानावर पडले आहेत. मात्र सांग म्हटल्यावर एकही आठवेल तर शपथ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विषय निघालाच आहे म्हणून...,

'उषःकाल होता होता काळरात्र झाली' आणि बाबुजींचे 'देहाची तिजोरी, भक्तीचाच ठेवा' यांच्या चाली एकमेकांना लावून बघाव्या आणि तसे जर लतादिदींच्या समोर
म्हटले, तर त्यांचा चेहेरा कसा होईल त्याची कल्पना करावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'चेहरा है या चाँद खिला है...' हे सागर मधले गाणे 'आओ बच्चो तुम्हे दिखाए झाँकी हिदौस्तान की' या चालीवर तर काही वेळेस कोणत्यातरी तमाशातील गाण्याच्या चालीवर म्ह्णत असत ते आठवले Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'चेहरा है या चाँद खिला है...' तमाशातल्या सवाल-जवाबांच्या चालीवर ऐकल्याचं आठवतं. शिवाय त्यात "माझ्या सर्जा तु रं, माझ्या राज्या तु रं" असं पालुपदही जोडलेलं होतं.

तसं 'ये रे ये रे पावसा' निदान वीस हिंदी गाण्यांच्या चालीवर ऐकल्याचं आठवतं. पण ती गाणी कोणती हे आता आठवत नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"प्रिया आज माझी, नसे साथ द्याया" हे "गणाधीश जो ईश सर्वागुणांचा" या चालीवर ऐकवून पहा.

"दाटून कंठ येतो, ओठात येई गाणे" हे "लाजून हासणे अन हासून हे पहाणे" या चालीवर स्वतःच म्हणून पहा (ऐकवू नका). Wink

मूळ गाण्याच्या भावनेचे खंप्लीट शीर्षासन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

खिक
दाटून कंठ येतो ची साँलीड विडंबन आठवली

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुर्जींचे अलिकडले काही धागे वाचता त्यांचे इंटर्व्हेंशन झाल्यासारखे वाटले Wink
असो, मला मुळ चालच नीट म्हणता येत नाही तिथे अदलाबदल कसली बोडक्याची जमणार, सबब माझा पास.

-(वाकड्या चालीचा) सोकाजी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'कभी कभी मेरे दिल में खयाल आता है।' हे गाणं 'हमें तो लूट मिया मिल के हुस्न वालों ने' या कव्वालीच्या चालीत म्हणायला मजा यते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-------------------------------------------

हे असं कसं म्हणू शकता? कोणी कृपया असली रेकॉर्डींग्ज जालावर चढवून ऐकवणार काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पहाटे पहाटे मला जाग आली, तुझी रेशमाची घडी सैल झाली
आणि
मना सज्जना भक्तिपंथेचि जावें, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावें

हे एकमेकांच्या चालींत म्हणणे फारच सोपे आहे, कारण दोघांचे वृत्त एकच आहे (भुजंगप्रयात). परंतु अदलल्या-बदलल्या चाली संदर्भाला शोभत नाहीत, हे आलेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सगळीच भुजंगप्रयातातील गाणी रामरक्षेच्या चालीत तर सगळीच शार्दूलविक्रीडीत वृत्तातील गाणी मंगलाष्टकाच्या चालीत म्हणता येतात. असे प्रकार समुहाने पिकनिकला जाताना करण्यात मस्त मजा येते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याला सुहाना सफर और ये मौसम हँसी ची चाल पण चपखल बसते. मला वाटतं अण्णा रामचंद्र त्यांच्या कार्यक्रमात गंमत म्हणून सादर करायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

'सदा सर्वदा' गाण्यासाठी 'सुहाना सफ़र'मध्ये एक मात्रा कमी पडते.

(ठीकाय. कीस काढायचाच म्हटला, तर दोन मात्रा कमी पडाव्यात काय? एक गुरु मात्रा/पद/जी-काही-तांत्रिक-संज्ञा-त्याकरिता-असेल-ती कमी पडते.)

बाकी चालू द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0