" हे माझे पंढरपूर ! "


हात जोडतो देवापुढती, कधी न जातो दूर,
घरातली माणसे देव, हे माझे पंढरपूर |

वारकरी ना दिंडीमधला, मनास ना हुरहूर
नातीगोती वारकरी, हे माझे पंढरपूर |

सुखात सोबत विठ्ठल माझा, दु:ख बने कापूर
सुविचारांचा टाळगजर, हे माझे पंढरपूर |

कर्तव्याचे रिंगण माझे, त्यात कधी न कसूर
सेवापूर्ती पालखीत, हे माझे पंढरपूर |

घेता नामस्मरणी विठ्ठल, चंद्रभागेला पूर
नयनामधुनी भिजे मूर्ति, हे माझे पंढरपूर ||

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

आपला विठ्ठल पंढरपुरात नसून मनात असतो, ही कल्पना छान मांडली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर स्तवन

आवडले

खास करुन शेवट तर अप्रतिमच Smile

घेता नामस्मरणी विठ्ठल, चंद्रभागेला पूर
नयनामधुनी भिजे मूर्ति, हे माझे पंढरपूर ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! सुरेखच!

पहिले कडवे जरा मीटरच्या बाहेर वाटले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!