ही बातमी समजली का? - १३४
Taxonomy upgrade extras
अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही.
- Read more about ही बातमी समजली का? - १३४
- 108 comments
- Log in or register to post comments
- 82961 views
शिवस्मारक - गरज की साधनसम्पत्तीचा अपव्यय?
Taxonomy upgrade extras
शासन ३६०० कोटी रुपये खर्चून शिवरायान्चे भव्य स्मारक अरबी समुद्रात बान्धणार असल्याची बातमी वाचली. महाराजांचे असामान्य कर्तृत्व वादातीत असल्याने त्यांचे (आणखी एक) स्मारक उभारणे वाईट नाही. मात्र त्यासाठी एवढा निधी (आणि अन्य साधनसम्पत्ती) खर्च करणे योग्य आहे का? विशेषतः राज्यासमोर आणि देशासमोर अनेक प्रश्न असताना? हा निधी अन्य उपयुक्त कामांकरिता वापरला गेला असता तर अधिक चांगले झाले असते का? ऐसीकरांचे मत काय?
- Read more about शिवस्मारक - गरज की साधनसम्पत्तीचा अपव्यय?
- Log in or register to post comments
- 4142 views
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा (भाग २)
Taxonomy upgrade extras
(व्यवस्थापन : निश्चलनीकरणाच्या धाग्यावर ५००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा काढत आहोत.)
पीएमओ चा इडी च्या धाडींच्या मागे प्रेरणास्रोत.
http://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/since-dem…
------
कोटक महिंद्र बँकेतुन ७० कोटी जप्त
- Read more about ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा (भाग २)
- 80 comments
- Log in or register to post comments
- 65120 views
मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७५
Taxonomy upgrade extras
ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या आसपास आहेत म्हणून हा पुढचा धागा.
----
मेट्रो घराजवळून जात असल्यास आवाजाचा कितपत त्रास होतो? कोणाला काही अनुभव?
- Read more about मनातले छोटेमोठे प्रश्न किंवा विचार - भाग ७५
- 104 comments
- Log in or register to post comments
- 101586 views
वणवा
वणवा...
ज्वाळा या वणव्याच्या, स्पर्शिती रान सारे
बापाविना जन्मला हा, कोण त्यास आवरे....
भासती भ्रमितांना, मुखवटे हिरवळीचे
धीरास जाण आहे, हे खेळ दिखाव्याचे....
बागडे पैलतीरी, पाहून आक्रोश
बीज आहे तेथेही, आंधळा सत्यास....
उडुनी जावे दूर, मार्ग एक आहे
हृदयग्रंथी जपून, निवाराच अंत पाहे....
अंधकार ज्ञानाचा, मी मात्र उरेन
भस्मसात जाहले ते, तरी एकटा जगेन....
मेघ येती घेऊन, आशा नव्या युगाची
मंदभाग्य ते थोर, ज्यांना जाच स्वातीची....
करुणा थोर आहे, फिकीर त्या जीवांची
कल्पातही दुर्मिळ, प्रतीक्षा 'त्या' घनाची....
- Read more about वणवा
- 2 comments
- Log in or register to post comments
- 2607 views
शेकोटी...
ललित लेखनाचा प्रकार
- Read more about शेकोटी...
- 5 comments
- Log in or register to post comments
- 9119 views
वृद्धांमध्ये मृत्यूचे प्रमाण निम्म्यावर आणणारे "एपीटॅलोन" हे पेप्टाइड
Taxonomy upgrade extras
वार्धक्याबाबतचा अलीकडचा एक अत्यंत महत्वाचा शोध: "एपीटॅलोन" हे पेप्टाइड
व्लादीमीर अनिसिमोव्ह या रशियन शास्त्रज्ञाने जन्मभराच्या प्रचंड संशोधनानंतर "एपीटॅलोन" नावाचे चार अमिनो-अम्लांचे संयुग ('पेप्टाइड ') शोधून काढले आहे, ज्याचे स्ट्रक्चर आहे Alanine-Glutamate-Asparagine-Glycine
हे संयुग आपल्या पेशींची विभाजनाची क्षमता (तारुण्याचा महत्वाचा गुणधर्म) बरीच वाढविते .
रशियात माणसांवर प्रयोग करण्याबाबतचे नियम बरेच शिथिल असल्यामुळे त्यांनी ते करून पाहिले आहेत. (अमेरिकेत नको तितके कडक नियम व खर्च असल्यामुळे ते सहजपणे शक्य झाले नसते!). त्यातील निरीक्षणे :
- Read more about वृद्धांमध्ये मृत्यूचे प्रमाण निम्म्यावर आणणारे "एपीटॅलोन" हे पेप्टाइड
- 12 comments
- Log in or register to post comments
- 15254 views
बॉब डिलानच्या तीन कवितांचा अनुवाद
बॉब डिलानच्या तीन कविता
१-
For Times Are A-Changin’.
काळ बदल्तोय
या लोक हो, एकत्र या
कुठेही भटकत असा
तुमच्या सभोवारचे पाणी फुगत चालले आहे मान्य करा
आणि हे ही करा मान्य
की भिजून जाल लवकरच हाडापर्यंत.
आपला वेळ, आपले जगणे महत्त्वाचे वाटत असलेच
तर आता हातपाय मारून पोहायला सुरुवात करा
नाहीतर बुडाल एखाद्या दगडासारखे
कारण काळ बदल्तोय
या लेखकांनो, या समीक्षकांनो
आता भविष्य सांगा आपल्या लेखणीने
ठेवा डोळे टक्क उघडे
अशी संधी पुन्हा येणार नाही
पण फार लवकरही नकाच बोलू
कारण अजून चाकांची गरगर जोरात आहे
आणि अजून कळणार नाही
कोणाकडे रोख आहे
आताचा हरणारा कुणी
नंतरचा जेता असेल
- Read more about बॉब डिलानच्या तीन कवितांचा अनुवाद
- 10 comments
- Log in or register to post comments
- 6766 views
हलती चित्रे आणि ज्ञानरुपी काजवा !
मुठीतल्या वाळुसारख झुळकन आयुष्य निसटून जात असताना,अचानक मला वर्ल्ड सिनेमाचा चस्का लागला. जीवनात किमान वर्ल्ड सिनेमासारखी एखादीतरी गोष्ट पुरेशा गांभीर्याने बघण्याचा प्रयत्न सुरु केला. काही सिनेमे डोक्याच्या दोन फूट वरून जायचे पण बरेचसे मनात घर करून राहू लागले. सिनेमा समजून घेण्यासाठी काय करता येईल असा लडिवाळ विचार मनाला स्पर्शून जात असे. पुण्या,मुंबईला जाऊन ,एखादी कार्यशाळा करून ,ज्ञानसाधनेसाठी कार्यालयातून सुट्टी घेऊन जाण्याचे कष्ट मात्र घेतले नाहीत. सिनेमाचा चालता बोलता ज्ञानकोश 'प्रा.समर नखाते' यांनी घेतलेली एक दिवसीय कार्यशाळा,अकस्मात खजिना सापडावा अशी आमच्या शहरातच लाभली.
- Read more about हलती चित्रे आणि ज्ञानरुपी काजवा !
- 20 comments
- Log in or register to post comments
- 17747 views
हे कसे करणार बुवा?
Taxonomy upgrade extras
विध्वंसक अण्वस्त्रांचा वापर शांततेसाठीच करण्यात येईल, अशी स्पष्ट ग्वाही भारताने दिली.
- Read more about हे कसे करणार बुवा?
- Log in or register to post comments
- 2391 views
