Skip to main content

खाद्यसंस्कृती

खाणं...चरणं...हादडणं...

Taxonomy upgrade extras

डोक्यात खाण्याबद्दल जे काही येतय ते लिहून काढावं म्हणतोय.
.
.
"तुझा आहार चांगलाय हां" अशी कमेंट/तारिफ(की टॉण्ट/टोमणा?) अजून एकदा ऐकायला मिळाला. कुणासोबत पंगतीला/बुफेला वगैरे बसणं झालं की अधूनमधून अशा कमेंटा मिळतातच. तरी मागील आठेक वर्षे बी एम आय बावीसेकच्या घरात आहे. वेगळा असा व्यायाम/पोहणं/जॉगिंग असंही काही करणं जमत नाही. जवळजवळ पूर्ण बंद. दिसायला जरी असं दिसत असलं की एकूणात मी बरच हादडतोय; तरी माझे खाण्याचे तसे बर्रेच नखरे आहेत. पण एकूणात काहीतरी बरोबर(किंवा निदान ठीकठाक) सुरु असणार. म्हटलं आठवून पहावं.
.
.

कॅफे..

Taxonomy upgrade extras

कॅफे या प्रकारच्या खाद्यगृहाचा एक स्वतःचा चाहता वर्ग आहे. नुसती कॉफी अन कुकीज मिळणार्‍या जागांपासून ते कॉफीचे शंभर प्रकार, सँडविच, पिज्झाचे चाळीस प्रकार आणि अगदी बियर, वाईन, कॉकटेल्स सर्व्ह करणार्‍या क्षुधाशांतिगृहांनाही कॅफे असं नाव दिलेलं दिसतं.

कॅफे आणि थीम रेस्टॉरंट या प्रकारात व्यावसायिक म्हणून नसला तरी ग्राहक म्हणून बराच अनुभव गाठीशी आहे. आपल्यातल्या अनेकांच्या असेल. आपलं स्वतःचंही एक कॅफे कॉलेजच्या कॉर्नरवर, बीचवर, मैदानाशेजारी किंवा कुठेतरी असावं अशी इच्छा अनेकांना असते. मला तरी नक्की अनेकदा अशी सुप्त इच्छा जाणवली आहे.

ती हिंगाची ज्यादा चिमूट - २

Taxonomy upgrade extras

भाग - १

व्यवस्थापकः
अगदी प्रचलित पदार्थच, पण एखाद्या व्यक्तीच्या हातून इतरांपेक्षा अत्यंत जास्त चांगले बनतात. तेव्हा अशा काही खास क्लृप्त्या - टिप्स- इथे देण्याकरता या धागा आहे. या विषयावर अधिक अंगाने + पदार्थांवर चर्चा व्हावी, विविध पाककृती करताना वापरल्या जाणार्‍या गोष्टी (जणू खांसाहेबांच्या चिजा) या चर्चेतील प्रतिसादातून खुल्या व्हाव्यात या उद्देशाने तसेच भविष्यात शोधायला सोपे जावे म्हणून हा धागा सुरू केला होता. पहिल्या धाग्यात बरेच प्रतिसाद झाल्याने नवा भाग सुरू करत आहोत.

=========

शाकाहार :- काही नवीन पैलु

Taxonomy upgrade extras

नमस्कार.
मी सुमारे सहा सव्वा सहा वर्षापूर्वी खालील धागा टाकला होता मिपावर.
http://www.misalpav.com/node/1740 ही त्याची लिंक.
तेव्हा डोक्यात बराच गोंधळ ,संभ्रम विविध बाबतीत होता.
त्यामानाने आज विशेष संभ्रम नाही.
माझी तेव्हाची सारीच मते आज जशाला तशी आहेत असेही नाही.
शाकाहाराबद्दल मारामारी सुरु होती, त्यात म्हटलं आपणही थोडं चिमूटभर भर टाकून पहावी.
मुद्दा क्र.५ पहावा.

मित्रहो,

जीवाची हत्या करणे वाइट,म्हणुन मांसाहार वाइट आणी म्हणुनच तो अयोग्य.शाकाहार तेव्हढा चांगला.
ह्यातील माझं काहीही म्हणणं नाही.
मी मानवी शरीर,प्रकृती ह्यासाठी स्वाभावीक अन्न कुठलं आहे, ते शोधतोय.

खाद्यसंस्कृतीचं औद्योगीकरण

Taxonomy upgrade extras

(व्यवस्थापन : 'सध्या काय वाचताय?' धाग्यातल्या नंदन यांच्या ह्या प्रतिसादातून निघालेली चर्चा विषयानुसार वेगळी केली आहे.)
मूळ प्रतिसाद -

* The Omnivore's Dilemma (2006) - Michael Pollan

भोजनकुतूहल : दृक-श्राव्य माध्यमं

Taxonomy upgrade extras

या धाग्याची प्रेरणा भोजनकुतूहल-१.
विविध पाकविधा, एखादा विविक्षित पदार्थ आणि त्यापाठचा सांस्कृतिक-ऐतिहासिक पसारा दाखवणार्‍या, एकंदर खाद्यसंस्कृतीमधल्या कुठल्याही घटकावर आधारित, त्या घटकाला वाहिलेल्या किंवा त्या घटकाचा वापर करणार्‍या दृक-श्राव्य माध्यमाविषयीचा हा धागा.

वानगीदाखल :

उदरभरण नोहे : हल्ली कुठे आणि काय खाल्ले? - १८

आपण रोजचे जेवण जेवतोच, पण त्याच बरोबर वेगवेगळ्या हॉटेलांमध्ये नवनवीन पदार्थ चाखत असतो. हॉटेलांतच नाही तर सणासुदीच्या निमित्ताने किंवा कधी सहज लहर आली म्हणून किंवा कधी एखादा जिन्नस स्वस्तात मिळाला म्हणून घरीच काहीतरी नवा, सुग्रास पदार्थ बनतो. हा धागा अशाच तुम्हाला आवडलेल्या / नावडलेल्या पदार्थांवर चर्चा करण्यासाठी आहे. इथे हल्ली तुम्ही कुठे आणि काय खाल्ले? ते तुम्हाला आवडले का? असल्यास का? नसल्यास का? जर हा पदार्थ घरी स्वतः बनवला असेल / त्याची पाकृ माहित असेल तर तो कसा बनवला? जर हा हॉटेलात खाल्ला असेल तर ते हॉटेल कुठे आहे? पदार्थाची किंमत काय होती?

उपवासाचे ढोंग

Taxonomy upgrade extras

सर्व प्राणीमात्रांना जगण्यासाठी अन्न खावे तर लागतेच, पण खाण्यासाठीच जगणारा मात्र माणूस हाच एकमेव प्राणी असावा ! आपल्या उठसूठ ‘चरण्याच्या’ प्रवृत्तीला थोडा तरी आळा बसावा या उद्देशाने उपवासाची संकल्पना मांडली गेली असावी. आठवड्यातून निदान एक दिवस तरी एक वेळचे भोजन न घेणे आणि दुसऱ्या वेळेस पचायला अत्यंत हलका व मित आहार घेणे हा अर्थ उपवास करण्यामागे अभिप्रेत आहे. आपल्यासाठी सतत राबणाऱ्या आपल्या पचनसंस्थेला अधूनमधून विश्रांती देणे हा त्यामागचा खरा हेतू आहे. परंतु वास्तव काय दिसते? नियमित उपवास करणाऱ्या कित्येकांना हा अर्थ समजलेला नाही, असे खेदाने म्हणावे लागेल.