कथा

जी.एंची निवडक पत्रे -सुरुवात

आमच्या घरात चांगली दोन अडीचशे पुस्तकं होती- लहान मुलांची सोडून. एक पुस्तकांचं कपाट ह्या मोठ्यांच्या पुस्तकांनी भरलं होतं आणि माझं पुस्तकांचं एक छोटं कपाट होतं, आणि त्यात आदिम काळातल्या डायनोसॉरपासून ते बोक्या सातबंडेपर्यंत सगळे गुण्यागोविंदाने रहात. टारझन, गोट्या, चिंगी, फास्टर फेणे, बोक्या सातबंडे अशा यत्ता पार करून झाल्यावर मग मला पुढला स्टॉप कुठला ते काही काळ उमगेना. विज्ञानकथा होत्या, पण त्या पुरेशा पडत नसत. ज्यूल्स व्हर्न, नारळीकर, निरंजन घाटे ह्यांची पुस्तकं इतक्या वेळा वाचून मग नवीन काहीतरी हवं असं वाटे.

ललित लेखनाचा प्रकार: 

जाणीव, नेणीव आणि फ्री विल ह्यांची ऐसी तैसी.

पहाटे म्हणा किंवा सकाळी म्हणा सहा वाजले की तात्याचा मोबाइल तात्याला विसाव्या शतकातील गोड गोड गाणी ऐकवून जागा करतो. तुम्ही काहीही म्हणा पण तात्याला स्वतःला विसाव्या शतकातील गाणी फार आवडतात. त्या वेळी कोणी लता मंगेशकर नावाच्या एक गायिका होत्या त्यांचा गळा गोड होता. त्यांनी गायिलेल्या बऱ्याच गाण्यांचा संग्रह तात्याकडे आहे. हा गाण्यांचा संग्रह तात्याला कसा मिळाला? सगळं सांगत बसलो तर वेळ लागेल. पुन्हा केव्हातरी.

ललित लेखनाचा प्रकार: 

“कसाई”

माझ्या डेस्क वरचा फोन वाजला . मी फोन उचलला . " विकास मेरे केबिन मे आओ ". आमच्या एच आर मॅनेजर फरीदाने मला बोलावलं . मी तिच्या केबिन मध्ये गेलो . तिने मला विचारलं स्टोर मॅनेजर दिलीप कैसे है ? तुम्हे कुछ पता है उनके बारे मे . मी एक दीर्घ श्वास घेतला आणि तिच्या समोरच्या खुर्चीवर बसलो . "हां " आय सी यू में है ". " तब्बेत खालावलीय आहे थोडी ". त्यांच्या डिपार्टमेंटची मुलं जाऊन आली त्या दिवशी . "बेशुदी मध्ये ओरडत आणि बडबडत असतात मोठ्याने ." " त्रास होतोय त्यांना खूप ".
"अल्लाह त्यांच्या तब्बेतीला आराम पडू देत ". ती म्हणाली .

ललित लेखनाचा प्रकार: 

जीवन: स्वप्नांची अखंड मालिका

I dream therefore I am.
The dreams can be as real as you want them to be.

ललित लेखनाचा प्रकार: 

मेहरबानी कसली, हे तर दरवानाचे कामच आहे

----------------------------------------------------------------
मेहरबानी कसली, हे तर दरवानाचे कामच आहे
----------------------------------------------------------------

"काय झालं, मेहता मॅडम? काही मदत करू का मी?" बिल्डिंगचा दरवान आपली जागा सोडून धावत आला आणि नुकत्याच बाहेर पडलेल्या पोक्त बाईला म्हणाला.

ललित लेखनाचा प्रकार: 

सिंधुआज्जी आणि म्हैसमाळावरचे कांगारू

(पूर्वप्रकाशन: "माहेर" दिवाळी अंक २०१९)

औरंगाबाद शहरालगतच्या म्हैसमाळ पठारावर तुम्ही सहलीला गेलात, तर मजेमजेनं उड्या मारताना तुम्हाला कांगारूंचे कळप दिसतील. या अजब चमत्काराला कारणीभूत आहेत सिंधुआज्जी.

आता सिंधुआज्जींची ओळख करून देणं क्रमप्राप्त आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

बुचाचे झाड

ललित लेखनाचा प्रकार: 

म्हणींच्या गोष्टी ...(२)

मराठी भाषेचे  शब्दवैभव, मराठी भाषिकांना आणि मराठीच्या जाणकारांना चिरपरिचित आहे.   विविध प्रकारच्या म्हणी,   वाक्प्रचार आणि सुविचारांच्या  अलंकारांची  लेणी मराठी भाषेला लाभलेली आहेत.   काही म्हणी  रोजच्या  संवादात  अगदी सहजपणे  वापरल्या जातात. त्या म्हणी कशा प्रचलित झाल्या असाव्यात,   त्या मागे काय कथा असतील?


तर काही म्हणींच्या या कथा...   
 


"ह्यात नाही राम - त्यात नाही राम"  
 

ललित लेखनाचा प्रकार: 

क्रोनोनॉट अरुण

अरुण रेडिओ वरची क्रिकेटची कॉमेंटरी ऐकण्यात अगदी रंगून गेला होता. खाली सोसायटी कंपाउंड मध्ये त्याचे मित्र गल्ली क्रिकेट खेळण्यात दंग होते. ते त्याला खेळण्यासाठी सारखे बोलावत होते. पण तो गेला नव्हता. त्याला भारत पाकिस्तान गेम मध्ये जास्त रस होता. शेवटची ओवर चालू होती. पाकिस्तान जिंकणे आता शक्यच नव्हते. हा गेम संपला की तो मित्रांच्या बरोबर खेळायला जाणार होता. इतक्यात आतून बाबा आले. आज बाबा ऑफिसला गेले नव्हते. त्यांना जबरदस्त सर्दी झाली होती. थोड अंग गरम झाल्यासारखे वाटत होते.
“ झाली की नाही तुझी मॅच?” बाबांनी थोड्या चढ्या आवाजांत विचारले.

ललित लेखनाचा प्रकार: 

सूर्योदय

उत्परिवर्तनशील करोना व्हायरसचा हल्ला नुकताच परतवण्यात आला होता आणि त्यांना त्यांच्या निवासस्थानी सी / १-१९९६बी २ धुमकेतू ह्युकुटेकडे जाण्यास भाग पाडले गेले होते. खंडणीची त्यांची मागणी नाकारली गेली. सैतानाने त्यांना पृथ्वीवर हल्ला करण्यासाठी उचकवले होते. माणसे हा नेत्रदीपक पराक्रम अर्थातच क्लिंगनच्या सक्रिय मदतीने साध्य करू शकले. नाहीतर मागच्या वेळी म्हणजे २०२० साली लाखो लोकांचा बळी देऊन आणि १० टन सोन्याची खंडणी घेऊन त्यांची बोळवण करावी लागली होती. निदान ह्यावेळी आम्ही सैतानावर मात करण्यात यशस्वी झालो होतो.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - कथा