Skip to main content

सांस्कृतिक

महाराष्ट्रातील कावी कला असलेल्या एकमेव श्री माउली मंदिराचा विध्वंस

झोळंबे दोडदामार्ग, सिंधुदुर्ग येथील श्री माउली मंदिराचा बेकायदेशीर विध्वंस धक्कादायक आहे. जीर्णोद्धार ही आपल्या कोकणातील आणि राज्यभरातील सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारश्याला लागलेली मोठी कीड आहे. शंभर वर्षापूर्वीची कुठलीही वास्तू हा सार्वजनिक वारसा आहे आणि त्यात बदल करण्यासाठी पुरातत्व खात्याची परवानगी अनिवार्य आहे. श्री माउलीचे वारसा मंदिर उद्ध्वस्त होणे ही महाराष्ट्राची कधीही न भरून येणारी हानी आहे!!

बातमीचा प्रकार निवडा

IFFI २०२० इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया, गोवा (भाग १)

२०२० साल जवळ जवळ संपूर्णपणे कोरोनाने खाऊन टाकलं. त्यात चित्रपटसृष्टीलासुद्धा फटका बसला. IFFI हा दर वर्षी गोव्यात होणारा भारताचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही त्यामुळे पुढे ढकलला गेला. तो नुकताच पार पडला. तिथे प्रत्यक्ष जाऊन सिनेमे पाहून आलेले हेमंत कर्णिक काही चित्रपटांची ओळख करून देत आहेत.