गद्य

भाग 1: Pancakes, Pancakes!

एरीक कार्लच्या ह्या पुस्तकातला जॅक बाळा, सकाळी सकाळी आपल्या आईला लाडीगोडी लावून म्हणतो, "आई, आज मला पॅनकेक हवे! आज मला पॅनकेक हवे!!" त्यानंतर मला वाटलं, की फार तर फार आई त्याला सांगेल,"मी पॅनकेक करते, तोवर तू ताटं मांड." मग घरची मंडळी मिळून कसा छान ब्रेकफास्ट करतात, जॅक अगदी अमेरिकेतल्या टिपिकल शाण्या-बाळा प्रमाणे आपले आपले पॅनकेक गट्टम करतो, वगैरे वर्णन असेल...

ललित लेखनाचा प्रकार: 

वेदांग शिरोडकर

प्रारंभ:

ललित लेखनाचा प्रकार: 

मी आणि जातीयवाद

गेली अनेक वर्षे दलित हत्याकांड, शिक्षण व नोकऱ्यांत आरक्षण, अस्पृश्यता यांविषयी बातम्या व चर्चा, ६ डिसेम्बरचा मोर्चा आणि त्याने मागे सोडलेली घाण, ६ डिसेंबरला 'दादरला जाऊ नकोस बरे' अश्या अर्थाची टिप्पणी याव्यतिरिक्त माझा व्यक्तिशः जातीयवादाशी संबंध आहे असं कधी वाटलंच नाही. आणि ते साहजिकच होतं. मुंबईत ट्रेन आणि बसमध्ये आपण कोणत्या जाती-धर्माच्या गर्दीत गुदमरतोय याचा मी आणि आपण सर्वजण विचार करत नाही. तसंच कॉलेजमध्ये मैत्री करताना अथवा नोकरी करतानाही मी जातीपातीचा निकष लावत नाही.

ललित लेखनाचा प्रकार: 

यंदा कर्तव्य आहे

(शर्वरी कुणाची तरी वाट बघत एकटीच एका कॉफी-हाउस मध्ये बसलीय. तिने पंजाबी ड्रेस किंवा not too modern, not too traditional अशा पोशाख घातलाय. अधून-मधून घड्याळाकडे बघतेय, इकडे-तिकडे बघतेय, कॉफीचा सिप घेतेय.. तिच्यासमोर एक बझ्झर ठेवलाय, गेम शोमध्ये असतो तसला. एक तरुण आत शिरतो, इकडे-तिकडे बघतो आणि शर्वरीपाशी येतो. एकच मुलगा सगळ्या मुलांची भूमिका करतो. मुलाने बोलण्या-वागण्यातल्या विविधतेने पात्रांमध्ये रंगत आणावी).
मुलगा १: आपण शर्वरी का?
शर्वरी: हो. आणि आपण...अविनाश?
मुलगा १: हॅलो (मुलगा हात पुढे करतो).

ललित लेखनाचा प्रकार: 

काही चित्रपटीय व्याख्या

संशोधनातील पुढचा भाग, खास जनहितार्थ. आधीच्या संशोधनाची लिन्क इथे आहे. गाणी वगैरे ऐकताना लोकांना प्रश्न पडतात की तेरी मैफिल मे म्हणजे नक्की कोठे. तेथे ही माहिती उपयोगी पडेल. गेल्या काही दिवसांत वाचकांनी "प्रेमात पडल्यावर सजदे नक्की कधी करतात?", "तिच्या मैफिलीत जायचे आहे. काय तयारी करून जाऊ?", "जानेजा जास्त भारी की जानेजहॉ?" असे अनेक प्रश्न विचारले. म्हणूनच हा लेखप्रपंच.

तर काही गाण्यांमधून व डॉयलॉग्ज मधून नेहमी ऐकू येणार्‍या शब्दांच्या व्याख्या.

ललित लेखनाचा प्रकार: 

आयायटी, दक्षिणा आणि MCPपणा

एके काळी अनेक मित्र-मैत्रिणींच्या घरी मी आणि भाऊ एकत्र जायचो. कधी जेवायच्या वेळेस असलो, तर त्या घरचे लोक जेवायला घालायचेच. काही घरांमध्ये भावाला बारकी दक्षिणाही मिळायची.

मला पैशांबद्दल असूया नव्हती, पण मला मान का नाही मिळत! एका जवळच्या मित्राच्या घरी भावाला पैसे मिळायचे; त्याच मित्राला विचारलं. तो म्हणाला, "तुला आता लग्न झाल्यावरच दक्षिणा मिळेल." मित्रही ओवाळून टाकलेला. आम्ही दोघं हसलो.

हा मित्र आयायटीमध्ये शिकलाय.

ललित लेखनाचा प्रकार: 

पद्मावत- आत्मा परमात्मा मिलनाची गाथा

प्रेम म्हणजे शारीरिक आकर्षण नाही. शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीला कठोर तपस्या करावी लागली अमीर खुसरो यांनी म्हंटले आहे:

खुसरो रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को दोउ भए इक रंग.

संसार रुपी रात्र जागून काढल्या शिवाय प्रेमाची प्राप्ती नाही. प्रेम हे अलौकिक आहे. प्रेम म्हणजे आत्म्याचे परमात्म्याशी मिलन. पद्मावतच्या कथा हि आत्म्याचे परमात्म्याशी मिलनाची कथा आहे. पद्मावत महाकाव्याची कथा संक्षेप मध्ये सांगताना महाकवी जायसी म्हणतात

ललित लेखनाचा प्रकार: 

The Little Fellow

आज चार्ली चॅप्लीनची पुण्यतिथी. त्यानिमित्त मी काही दिवसांपूर्वी लिहिलेला लेख 'ऐसी' साठी सादर करतो आहे.
=======

ललित लेखनाचा प्रकार: 

एक दुःखद दिवस

..

ललित लेखनाचा प्रकार: 

दरस बिना..

समुद्राचा तळ गाठता येत नाही, आणि अश्रूचा स्रोतसुद्धा सापडत नाही.. दोघांना अस्तित्व खारेच आहे, एक अथांग तर दुसऱ्याचे अलौकिक.

दुपार सरत असतांनाचा वेळ, चार ते पाचचा, या वेळेत सारे भरून आलेले असते. ना खोल ना गंभीर, सगळे सुटेसुटे होणारे गुंते. वासांनी निर्माण झालेले जग मोकळे होत एक केवळ श्वास होणारे.

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य