Skip to main content

संस्कृती

यदुराजा

काळाचा प्रवाह अखंड वाहतो. नवनवीन घटना व व्यक्तिमत्त्वे जन्म घेत असतात व भूतकाळात गडप होत असतात. प्रत्येकाचे रूप, रंग, दैव, पराक्रम, कर्म वगैरे वेगवेगळे. पण काळाच्या या ओघात काहींचा ठसा दीर्घकाळ टिकून राहतो तर कित्येक विस्मृतीत जातात. वस्तुतः जगाच्या रंगमंचावरील या नाट्यात भूमिका कितीही छोटी वा मोठी असो पण आपल्या गुणांना कलाटणी देण्याची संधी सर्वांनाच असते. पौराणिक काळापासून अर्वाचीन काळापर्यंत अनेक महत्त्वपूर्ण घटनांमधे छोटी व्यक्तिमत्वे मोठा प्रभाव टाकून गेली तर मोठी व्यक्तिमत्त्वे झाकोळली गेली. अनेक जण लक्षात राहिले पण अपुरी ओळख ठेवून!

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

अवघड काळात निर्णय कसा घ्यावा? कर्ण व श्रीकृष्ण संवाद

हे मी केलेले स्वैर भाषांतर आहे.

महाभारतात कर्णाने भगवान श्रीकृष्णांना विचारले -

"माझा जन्म होता क्षणी माझ्या आईने मला सोडले. मी अनौरस मूल म्हणून जन्माला आलो. हा काय माझा दोष आहे?"

"मी क्षत्रिय नसल्यामुळे मला द्रोणाचार्यांकडून शिक्षण घेता आले नाही.
याच्या उलट, मी कुंतीपुत्र म्हणजे क्षत्रिय असल्याचे कळल्यावर, परशुरामांनी मला शाप दिला. म्हणे "त्यांनी मला जे काही शिकवलं, ते मला आयत्या वेळेला आठवणार नाही."

"एकदा एका गायीला चुकून माझा बाण लागला. खरंतर त्यात माझा काहीच दोष नव्हता. पण तरीही त्या गाईच्या धन्याचा शाप मला झेलायला लागलाच."

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

डॉ. श्रीराम लागू

Dr. Shriram Lagoo

डॉ लागू

आयुष्यातले एकेक संदर्भ गळून जाऊ लागतात आणि टप्प्याटप्प्याने आपण निस्संदर्भ होत जातो. मरत जातो. डॉ श्रीराम लागू यांच्या जाण्याने माझ्यासाठी या भावनेची एक वरची, मोठी पायरी ओलांडली गेली.

बातमीचा प्रकार निवडा

जेन ऑस्टीन वाचण्याच्या निमित्ताने

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

"मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार"

डिस्क्लेमर : माझ्या प्रस्तुत लेखामधे लैंगिक स्वरूपाचे उल्लेख आणि ज्याला अश्लील, ग्राम्य असं मानलं जातं त्या स्वरूपात बर्‍याच गोष्टी (वानगीदाखल, उधृतवजा अशा) येणार आहेत. तरी ज्यांना अशा गोष्टींचं वावडं आहे, त्यामुळे पावित्र्यभंग झाल्यासारखं वाटतं, भावना दुखावतात, अस्मितांना धक्का पोचतो, शीशी वाट्टं, घाण्घाण वाट्टं, त्यांनी न वाचलेलं बरं अशी नम्र विनंती.

पुस्तकाबद्दलचे तपशील :
"मराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार"
संपादक-अभ्यासक : अ. द. मराठे
ग्रंथाली प्रकाशन.
-----------------------

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

भाई : पु. लं.चे चुकीचे व्यक्तिचित्रण

तेंडुलकर, नेमाडे हे लेखक अन्य भाषिक भारतीयांना माहीत आहेत, त्याप्रमाणे पु.ल. नाहीत. हा चित्रपट पाहून एक विनोदाचा अट्टहास करणारा गमत्या माणूस अशी काहीशी प्रतिमा अन्य भाषिक मंडळींची होऊ शकते. त्या अर्थाने हा चित्रपट पु. लं.चे चुकीचे चित्रण करतो.

आगामी कार्यक्रम / उत्स्फूर्त कट्टे - कोणकोण येतंय? - ६

Taxonomy upgrade extras

दरवेळी ऐसीवरची मित्रमंडळी भेटतात तेव्हा तो जाहीर केलेला कट्टा असतोच असं नाही. कारण बऱ्याच वेळा कट्टा भरवणं, एकत्र भेटणं वगैरे ठरवायला चिकार वेळ लागतो. आणि दरवेळी पंधरा वीस लोक जमवणं शक्यही नसतं. कधीकधी चार टाळकी एकत्र जमली तरी मैफल जमू शकते. असे उत्स्फूर्त, इंप्रॉम्प्च्यू कट्टे अधिक वारंवार व्हावेत यासाठी हा धागा.

लाल मानेची अमेरिका. :-)

आमच्या ऑफिसमधला एक जण बंदुका बाळगणारा, बंदूक प्रकरणावर प्रेम असलेला आहे. कामाच्या निमित्ताने अनेक महिने संपर्कात आल्यानंतर ज्या गप्पा होतात त्यातून हे सगळं क्रमाक्रमाने कळलेलं. आज या सहकार्‍याच्या आग्रहावरून - आणि खरं सांगायचं तर कुतुहल अनावर झाल्यामुळे - ऑफिसहून जवळपास असलेल्या शूटींग रेंजला जाण्याचा प्रसंग आला - किंवा संधी मिळाली असंही म्हणू. आम्ही एकंदर पाचजण होतो. त्यातला अजिब्बात अनुभव नसलेला मीच एकमेव. बाकी सर्वजण कमीअधिक फरकाने "त्यातले." एकजण तर मरीन कोअर मधे ८ वर्षं होता.

धाग्याचा प्रकार निवडा:

माहितीमधल्या टर्म्स

महाराष्ट्रदिनाच्या निमित्ताने - अरुण खोपकर

मी जपानमध्ये क्योटोला असतानाची एक घटना. शोगुनच्या राजवाड्यात काही प्रवाशांच्या जथ्याबरोबर मी तिथल्या मार्गदर्शकाचे बोलणे ऐकत होतो. राजाच्या शयनगृहातल्या बांबूंच्या जमिनीचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर पाय पडला की बांबू एकमेकांवर घासून आणि बांबूंतली हवा बाहेर पडून त्यातून वाद्यासारखा सूर निघत असे. राजावर अपरात्री हल्ला झाला तर राजा जागा व्हावा म्हणून ही व्यवस्था. तो जागा तर व्हावाच पण त्याची झोपमोड करणारा ध्वनी हा स्वरबद्ध असावा. जपानी सौंदर्यदृष्टीच्या अनेक सूक्ष्म पैलूंतला हा एक.