प्रवास .

प्रवास

खाच खळग्यांच्या उंचसखल चिकचिक वाटा तुडवताना
आणि त्यातील मोजक्याच उंचवट्यांवरून
जपून चवड्यांवर चालताना
भरून आले पाय

मग ठरवले ...बस ...
ठेवावे पूर्णच पाउल ठासून
टोचतीलही कदाचित काही टोकदार तीक्ष्ण जागा

एक भय होतं काहीतरी रुपण्याचं खुपण्याचं
एक कौतुक कुठेतरी स्वतःला जपण्या-सावरण्याचं
पण त्याच कौतुकभयाला पाठीशी न घालता
थेट पायापाशी घातलं

खरं सांगते
काही वेळातच याची ही सवय होऊन गेली

आणखी काही वेळाने तर मौजही वाटू लागली
काही चिवट जखमा ठुसठुसत होत्या आत कुठेशा

आणि काही खोल घाव अजून ही भळाळणारे
पण सपशेल दुर्लक्षून त्यांचे घोर आक्रंद

तशीच निघाले थेट

नंतर
सहज मागे वळून पाहिलं

एक अशक्य अंतर पार करत
बरीच पुढे निघून आले होते मी .

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

क्या बात है!!!!
कविता आवडली .... प्रवास जास्ती आवडला.....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यु Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान वटल तुमची कविता वाचून...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

अप्रतिम!!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0